Matthew 27

Matthew 27:1

पहाटेला मुख्य याजक आणि वडील जनानी येशूला कोठे नेले?

येशूला त्यांनी पहाटेस राज्यपाल पिलाताकडे नेले होते [२७:२].

Matthew 27:3

येशूला शिक्षापात्र ठरविण्यांत आले आहे असे जेंव्हा यहूदा इस्कर्योतने पाहिले तेव्हा त्याने काय केले?

निर्दोष जीवास धरून दिल्याबद्दल यहूदाला पस्तावा झाला आणि त्याने ती चांदीची नाणी फेकली, व जाऊन गळफांस घेतला [२७:३-५].

Matthew 27:6

त्या तीस चांदीच्या नाण्यांचे प्रमुख याजकांनी काय केले?

त्यांनी उप-यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले [२७:६-७].

Matthew 27:9

ह्या घटनेने कोणाची भविष्यवाणी पूर्ण झाली?

ह्या घटनेने यिर्मयाची भविष्यवाणी पूर्ण झाली [ २७:९-१०].

Matthew 27:11

पिलाताने येशूला कोणता प्रश्न विचारला, आणि येशूने त्याला काय उत्तर दिले?

पिलाताने विचारले की तो यहूद्यांचा राजा आहे किंवा नाही, आणि येशूने उत्तर दिले आपण म्हणता तसेच [२७:११].

प्रमुख याजक व वडीलजन ह्यांच्या सर्व आरोपांचे येशूने काय उत्तर दिले?

येशूने एका शब्दानेहि उत्तर दिले नाही [२७:१२-१४].

Matthew 27:15

वल्हांडण सणाच्या रीतीप्रमाणे, पिलाताची येशुसाठी क्या इच्छा होती?

वल्हांडण सणाच्या रीतीप्रमाणे, येशूला सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती [२७:१५-१८].

Matthew 27:17

पिलात न्यायासनावर बसला सात त्याच्या पत्नीने त्याला कोणता संदेश पाठविला?

त्या नीतिमान माणसाच्या बाबीत आपण पडू नये असा तिने संदेश पाठविला [२७:१९].

Matthew 27:20

सणाच्या रीतीप्रमाणे येशूला नव्हे तर बरब्बाला का सोडले?

येशुऐवजी बरब्बाला मागून घ्यावे असे प्रमुख याजकांनी आणि वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळविले [२७:२०].

येशूचे काय करावे असे लोकसमुदायाने ओरडून सांगितले?

येशूला वधस्तंभावर खिळावे असे लोकसमुदायाने ओरडून सांगितले [२७:२२-२३].

Matthew 27:23

लोकांमध्ये गडबड सुरु होत आहे असे जेंव्हा पिलाताने पाहिले तेंव्हा त्याने काय केले?

पिलाताने त्याचे हात धुतले, आणि म्हटले की मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे व येशूला लोकांच्या स्वाधीन केले [२७:२४].

Matthew 27:25

पिलाताने जेंव्हा येशूला लोकांच्या स्वाधीन केले तेंव्हा लोकांनी काय म्हटले?

लोकांनी म्हटले की, "त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो" [२७:२५].

Matthew 27:27

सुभेदाराच्या सैनिकांनी येशूला काय केले?

सैनिकांनी त्याच्या अंगांत किरमिजी झगा घातला आणि त्याच्या मस्तकावर कांट्यांचा मुकुट ठेविला, त्यांनी त्याची थट्टा केली, त्याच्यावर थुंकले, त्याच्या मस्तकावर मारले, आणि मग ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले [२७:२७-३१].

Matthew 27:32

शिमोन कुरेनेकर ह्याला काय करण्यांस वेठीस धरले?

शिमोन कुरेनेकर ह्याला येशूचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले [२७:३२].

येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी कोठे घेऊन गेले?

ते त्याला गुलगुथा म्हणजे "कवटीची जागा" येथे घेऊन गेले [२७:३३].

Matthew 27:35

येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर सैनिकांनी काय केले?

सैनिकांनी येशूची वस्त्रें वाटून घेण्यासाठी चिठ्या टाकल्या, आणि त्याच्यावर पहारा करीत राहिले [२७:३५-३६].

येशूच्या डोक्यावर त्यांनी कोणता लेख लाविला?

त्यांनी लिहिले की "हा यहूद्यांचा राजा येशू आहे" [२७:३७].

Matthew 27:38

येशूबरोबर कोणाला वधस्तंभावर खिळले होते?

येशूबरोबर डो लुटारूंना, एकाला त्याच्या उजवीकडे तर दुस-याला त्याच्या डावीकडे []२७:३८].

लोक, मुख्य याजक, शास्त्री, आणि वडीलजन ह्यांनी येशूला काय आवाहन केले?

येशूने स्वत:ला वाचवावे आणि वधस्तंभावरून खाली उतरून यावे असे त्याला आवाहन केले [२७:३९-४४].

Matthew 27:45

सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत काय झाले?

सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देहभर अंधार पडला [२७:४५].

नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून काय म्हटला?

येशूने आरोळी मारून महाले, "माझ्या देवा माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?" [२७:४६].

Matthew 27:48

येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारल्यानंतर काय झाले?

त्याने आपला प्राण सोडला [२७:५०].

Matthew 27:51

येशू मेल्यानंतर मंदिरात काय झाले?

येशू मेल्यानंतर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागाला [२७:५१].

येशू मेल्यानंतर थडग्यांचे काय झाले?

येशू मेल्यानंतर थडगी उघडली, निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जन उठविले गेले आणि ते अनेकांना दिसले [२७:५२-५३].

Matthew 27:54

हे सर्व पाहिल्यानंतर शताधिपतिची काय साक्ष होती?

शताधिपतिने साक्ष दिली की, "खरोखर हा देवाचा पुत्र होता" [२७{५४].

Matthew 27:57

त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर, येशूच्या शरीराचे काय झाले?

योसेफ नांवाचा येशूचा एक श्रीमंत शिष्याने पिलाला येशूचे शरीर मागितले, त्याला तागाच्या स्वच्छ वस्त्रांत गुंडाळून ते त्याने खडकांत खोदलेल्या स्वत:च्या नव्या कंबरेत ठेवले [२७:५७-६०].

Matthew 27:59

जेथे येशूला ठेवले होते त्या काब्रेच्या तोंडाशी काय ठेवले होते?

येशूचे शरीर जेथे ठेवले होते त्या कबरेच्या एक मोठी धोंड ठेवण्यांत आली होती [२७:६०].

Matthew 27:62

दुस-या दिवशी मुख्य याजक आणि शास्त्री पिलाताबरोबर का जमले होते?

येशूचे शरीर कोणी चोरी नये म्हणून येशूच्या कबरेवर चांगला बंदोबस्त आहे किंवा नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी मुख्य याजक आणि शास्त्री जमले होते [२७:६२-६४].

Matthew 27:65

कबरेवर काय करण्याची परवानगी पिलाताने दिली?

पिलाताने त्यांना धोंडीवर शिक्कामोर्तब करण्यांस आणि पाहारा ठेवण्यांस परवानगी दिली [२७:६५-६६].