Matthew 28

Matthew 28:1

कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी मग्दालीया मरीयाआणि दुसरी मरीया येशूच्या कबरेजवळ गेल्या होत्या?

आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या पहाटेस त्या येशूच्या कबर जवळ गेल्या होत्या [२८:१]. प? येशूच्या कबरेवरील शोंड कशी लोटली होती?

प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला आणि त्याने धोंड एकीकडे लोटली [२८:२].

Matthew 28:3

पहारेक-यांनी जेव्हा स्वर्गदूताला पाहिले तेंव्हा त्यांनी काय केले?

जेंव्हा त्यांनी स्वर्गदूताला पाहिले तेंव्हा ते फारच भ्याले आणि मृतप्राय झाले [२८:४].

Matthew 28:5

स्वर्गदूताने त्या दोन स्त्रियांना येशुबद्दल काय सांगितले?

येशू उठला असून तो त्यांच्यापुढे गालीलामध्ये जाणर असल्याचे स्वर्गदूताने त्यांना सांगितले [२८:५-७].

Matthew 28:8

त्या दोन स्त्रियां ज्या शिष्यांना सांगावयास चालल्या होत्या त्यांचे काय झाले?

त्या स्त्रियां येशूला भेटल्या आणि त्यांनी त्याचे चरण धरले आणि त्याला नमन केले [२८:८-९].

Matthew 28:11

कबरेजवळ जे काय घडले ते पहारेक-यांनी जेंव्हा मुख्य याजकांना सांगितले तेंव्हा मुख्य याजकांनी काय केले?

मुख्य याजकांनी पहारेक-यांना पुष्कळ पैसे दिले आणि येशूच्या शिष्यांनी येशूचे शरीर चोरले असे सांगावयास सांगितले [२८:११-१३].

Matthew 28:16

शिष्यांनी जेंव्हा येशूला गालीलांत पाहिले तेंव्हा त्यांनी काय केले?

शिष्यांनी त्याल नमन केले, परंतु कित्येकांस संशय वाटला [२८:१७].

Matthew 28:18

येशूला कोणता अधिकार दिला गेला होता असे त्याने सांगितले?

येशूने म्हटले की स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला दिला गेला आहे [२८:१८].

कोणत्या तीन गोष्टीं येशूने त्याच्या शिष्यांना करावयास सांगितल्या?

येशूने त्याच्या शिष्यांना लोकांना शिष्य करण्यांस, त्यांना बाप्तिस्मा देण्यांस, आणि जे कांही त्याने त्यांना आज्ञापिले होते ते सर्व त्यांना पाळावयास शिकविण्यास सांगितले [२८:१९-२०].

कोणाच्या नावाने बाप्तिस्मा देण्यांस येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले?

येशूने त्याच्या शिष्यांना पित्याच्या, पुत्राच्या, व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्यांस सांगितले [२८:१९].

Matthew 28:20

येशूने त्याच्या शिष्यांना कोणते अंतिम वचन दिले?

युगाच्या समाप्तीपर्यंत त्यांच्याबरोबर राहाण्याचे त्याने त्यांना वचन दिले [२८:२०].