दोन दिवसानंतर वल्हांडण सण येणार असल्याचे येशूने सांगितले [२६:२].
ते येशूला कपटाने धरून जिवे मारण्याचा कर रचित होते [२६:४].
त्यांनी जर येशूला सणाच्या वेळेस मारले तर लोकांमध्ये दंगा होईल अशी त्यांना भीती होती [२६:५].
ते पाहून शिष्य रागावले होते आणि ते सुगंधी तेल विकून गरिबांना पैसे का दिले गेले नव्हते जे त्यांना जाणून घ्यायची इच्छा होती [२६:६-९].
त्या स्त्रीने ते सुगंधी तेल त्याच्या उत्तरकार्यासाठी त्याच्या अंगावर ओतले होते असे येशूने म्हटले [२६:१२].
प्रमुख याजकांच्या हाती येशूला धरून देण्यासाठी यहूदा इस्कर्योत ह्याला चांदीची तीस नाणी देण्यांत आली होती [२६:१४-१५].
येशूला धरून देणा-याबद्दल येशूने सांगितले की तो मनुष्य जन्मालाच नसता तर ते त्याला बरे झाले असते [२६:२४].
येशूने म्हटले, "घ्या, खा. हे माझे शरीर आहे" [२६:२६].
येशूने म्हटले की तो प्याला त्याच्या 'नव्या कराराचे रक्त' आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे [२६:२८].
येशूने सांगितले की त्या रात्री त्याचे सर्व शिष्य त्याच्याविषयी अडखळतील [२६:३०-३१].
येशूने म्हटले की त्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी पेत्र त्याला तीन वेळेस नाआकारील [२६:३३-३४].
येशूने त्यांना तेथे जागृत राहाण्यांस सांगितले [२६:३७-३८].
होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे अशी विनंती त्याने केली [२६:३९].
येशूने त्याची इच्छा नव्हे तर पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली [२६:३९, ४२].
येशू प्रार्थना करून येत असतांना शिष्य झोपले होते [२६:"४०, ४३, ४५].
येशूने तीन वेळां शिष्यांना सोडून जाऊन प्रार्थना केली [२६:३९=४४].
येशूला धरून देण्यासाठी यहूदाने येशूचे चुंबन घेऊन येशू हाच तो व्यक्ती आहे ह्याचे जमावाला चिन्ह दिले [२६:४७-५०].
येशूच्या एका शिष्याने त्याची तरवार काढून मुख्य याजकाच्या दासाचा कान छाटून टाकला [२६:५१].
येशूने म्हटले की तो त्याच्या पित्याजवळ मागू शकतो आणि तो त्याला देवदूतांच्या बारा सैन्यांच्या तुकड्या पाठवू शकतो [२६:५३].
ह्या घटनांद्वारे पवित्र शास्त्र लेख पूर्ण होत होते अस येशूने सांगितले [२६:५६].
सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेगे [२६:५६].
येशूला मरण दंड देण्यासाठी ते सर्व त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष शोधत होते [२६:५९].
तो देवाचा पुत्र ख्रिस्त आहे किंवा नाही हे सांगण्याची प्रमुख याजकाने येशूला आज्ञा केली [२६:६३].
येशूने उत्तर दिले, "होय, तुम्ही स्वत:च अतसे सांगितले आहे [२६:६४].
येशूने सांगितले की प्रमुख याजक मनुष्याला पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि मेघांवर आरूढ होऊन येतांना पाहिलं [२६:६४].
प्रमुख याजकाने येशूवर दुर्भाषण केल्याचा आरोप लावला [२६:६५],
ते येशूच्या तोंडावर थुंकले, त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या, काहींनी हातांनी त्याला चपडाका मारल्या [२६:६७].
तो येशूला ओळखत नाही असे पेत्राने उत्तर दिले [२६:७०, ७२, ७४].
पेत्राने तिस-या वेळेस उत्तर दिल्याबरोबर कोंबडा आरवला [२६:७४].
कोंबडा आरवण्याअगोदर पेत्र येशूला तीन वेळेस नाकारील असे जे येशूने म्हटले होते ते पेत्राला आठवले [२६:७५].