Matthew 25

Matthew 25:1

वराला भेटावयास गेल्यानंतर मूर्थ कुमारींनी काय केले नव्हते?

वराला भेटावयास गेल्यानंतर मूर्थ कुमारींनी त्यांच्या दिव्यांसाठी त्यांच्याबरोबर तेल घेतले नव्हते [२५:३].

वराला भेटावयास गेल्यानंतर शहाण्या कुमारींनी काय केले?

वराला भेटावयास गेल्यानंतर शहाण्या कुमारींनी काय दिव्यांसाठी त्यांच्याबरोबर तेल घेतले [२५:४].

Matthew 25:5

वर केंव्हा आला, आणि ती काय अपेक्षित वेळ होती?

वर मध्यरात्री आला, आणि तो अपेक्षित वेळेनंतर कितीतरी उशिरा आला [२५:५-६].

Matthew 25:10

वर आला तेंव्हा शहाण्या कुमारींचे काय झाले?

वराबरोबर त्या शहाण्या कुमारिका लग्नाच्या मेजवानीत सामील होण्यासाठी आंत गेल्या [२५:१०].

वर आला तेंव्हा मूर्ख कुमारींचे काय जाहले?

मूर्ख कुमारी तेल विकत घेण्यासाठी गेल्या होत्या, त्या आल्या तेंव्हा लग्नाच्या मेजवानीत जाण्यासाठी दरवाजे बंद झाले होते [२५:८-१२].

त्याच्या विश्वासणा-यांनी कुमारींच्या ह्या दाखल्यावरून काय शिकावे अशी येशूची इच्छा होती असे त्याने म्हटले?

विश्वासणा-यांनी नेहमी जागृत असावे कारण त्यांना तो दिवस किंवा ती घटिका माहित नाही असे येशूने सांगितले [२५:१३].

Matthew 25:14

पांच हजार रुपये आणि दोन हजार रुपये मिळालेल्या दासांनी त्यांचा धनी प्रवासावर गेल्यानंतर काय केले?

पांच हजार रुपये असलेल्या दासाने आणखी पांच हजार रुपये मिळविले आणि दोन हजार रुपये असलेल्या दासाने आणखी दोन हजार रुपये मिळविले [२:१६-१७].

Matthew 25:17

एक हजार रुपये मिळालेल्या दासाने त्याचा धनी प्रवासास गेल्यानंतर त्या एक हजार रुपयाचे काय केले?

एक हजार रुपये मिळालेल्या दासाने जमिनीत खड्डा खणून त्याच्या धन्याचे ते एक हजार रुपये लपवून ठेवले [२५:१८].

Matthew 25:19

धनी किती काळ पावसावर गेला होता?

उ धनी बराच काळ प्रवासावर गेला होता [२५:१९].

धनी प्रवासावरून परतल्यानंतर पांच व दोन हजार रुपये दिलेल्या दासांना त्याने काय केले?

धन्याने म्हटले, "शाबास, भल्या व विश्वासू दासा" आणि त्याने त्यांची पुष्कळशा गोष्टींवर प्रभारी म्हणून नेमणूक केली [२५:२०-२३].

Matthew 25:26

जेंव्हा धनी परतला तेंव्हा एक हजार रुपये दिलेल्या दासाचे त्याने काय केले?

धन्याने म्हटले, "अरे दुष्ट आणि आळशी दासा" आणि त्याच्याकडून ते एक हजार रुपये घेतले आणि बाहेरील अंधारांत टाकून दिले [२५:२४-३०].

Matthew 25:31

मनुष्याचा पुत्र जेंव्हा येईल व त्याच्या वैभवशाली राजासनावर बसेल तेंव्हा तो काय करील?

मनुष्याचा पुत्र सर्व राष्ट्रांना एकत्र जमविल आणि लोकांना एकमेकांपासून वेगळे करील [२५:३१-३२].

Matthew 25:34

राजाच्या उजवीकडे असलेल्या लोकांना काय प्राप्त होईल?

राजाच्या उजवीकडे असलेल्या लोकांना त्यांच्यासाठी जगाच्या स्थापनेपासून सिध्द केलेले राज्य त्यांना प्राप्त होईल [२५:३४].

राजाच्या उजवीकडे असलेल्यांनी आपल्या जीवनांत काय केले होते?

राजाच्या उजवीकडे असलेल्यांनी जर भुकेले होते त्यांना खावयास दिले, जे तान्हेले होते त्यांना प्यावयास पाणी दिले, परक्यांना घरांत घेतले, उघड्यांना वस्त्र दिले, आज-यांची काळजी घेतली, आणि कैद्यांना भेटी दिल्या [२५:३५-४०].

Matthew 25:41

राज्याच्या डावीकडे असलेल्यांना काय मिळेल?

राजाच्या डावीकडे असलेल्यांना सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या अग्नीमध्ये पाठवील [२५:४२].

Matthew 25:44

राजाच्या डावीकडे असलेल्यांनी त्यांच्या जीवनांत काय केले नव्हते?

राजाच्या डावीकडे असलेल्यांनी भुकेल्यांना खावयास दिले नव्हते, जे तान्हेले होते त्यांना प्यावयास पाणी दिले नव्हते, परक्यांना घरांत घेतले नव्हते, उघड्यांना वस्त्र दिले नव्हते, आज-यांची काळजी घेतली नव्हती, आणि कैद्यांना भेटी दिल्या नव्हत्या [२५:४२-४५].