येशूने असे भविष्य केले होते की मंदिराच्या ची-यावर असा एकहि चिरा राहाणार नाही की जो पाडला जाणार नाही [२४:१-२].
ह्या गोष्टीं कधी घडतील आणि त्याच्या येण्याचे व युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय असे शिष्यांनी येशूला विचारले [२४:३].
अनेक लोक येऊन मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील आणि पुष्कळांना फसवील [२४:५].
लढाया, दुष्काळ आणि भूमिकंप ह्या घटनां प्रसूती वेदनेचा प्रारंभ असणार असे येशूने म्हटले [२४:६-८].
येशूने म्हटले विश्वासणा-यांना यातना सहन कराव्या लागतील, कांही जण अडखळतील आणि एकमेकांना धरून देतील आणि पुष्कळांची प्रीति थंडावेल [२४;९-१२].
जो शेवटपर्यंत टिकून राहील तो तरेल असे येशूने सांगितले [२४:१३].
शेवट होण्याअगोदर राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजविली जाईल [२४:१४].
येशूने म्हटले की विश्वासणा-यांनी तेंव्हा डोंगरावर पळून गेले पाहिजे [२४:१५-१८].
जगाच्या प्रारंभापासून असा संकटाचा काळ झाला नाही असा तो काळ भयंकर संकटाचा असेल [२४:२१].
ते मोठी चन्हे आणि अद्भूतें दाखवून पुष्कळांना फसवितील [२४:२४].
जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल [२४:२७].
सूर्य आणि चंद्र अंधकारमय होतील आणि तारे आकाशातून खाली पडतील [२४:२९].
पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक छाती ठोकून शोक करतील [२४:३०].
जेंव्हा दूत निवडलेल्यांना जमा करतील तेव्हा कर्ण्याचामहानाद ऐकू येईल [२४:३१].
हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीसी होणार नाही असे येशूने सांगितले [२४:३४].
आकाश आणि पृथ्वी नाहीसी होतील परंतु त्याची वचनें नाहीसी होणारच नाहीत [२४:३५].
केवळ स्वर्गीय पित्यालाच ह्या घटनां कधी घडतील हे ठाऊक आहे [२४:३६].
लोक खातील व पितील लग्न करून देतील, लग्न करून घेतील, त्यांचा नाश करणा-या येणा-या न्यायदंडाबद्दलची त्यांना मुळीच जाणीव नसेल [२४:३७-३९].
येशूने म्हटले की त्याच्या शिष्यांनी नेहमी जागृत असावे कारण प्रभू कधी येईल हे त्यांना ठाऊक नाही [२४:४२, ४४].
धनी दूर गेल्यावर विश्वासू आणि बुद्धिमान दास त्याच्या धन्याच्या घराची काळजी घेतो [२४:४५-४६].
घरधनी परत आल्यानंतर तो त्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाची त्याच्या सर्वस्वावर नेमणूक करील [२४:४७].
दुष्ट दास जेव्हा त्याचा धनी दूर असतो तेंव्हा तो त्याच्या सोबतीच्या दासांना मारील, दारुड्यांबरोबर खाईल आणि पीईल [२४:४८=४९].
धनी परत आल्यानंतर त्या दुष्ट दासाला छाटून टाकील आणि जेथे दांतखाणे चालते अशा ठिकाणी तो त्याला पाठवून देईल [२४:५१].