पहाटेस कामाला लावलेल्या कामक-यांना प्रत्येकी एक दिनार देण्याचे धन्याने ठरविले होते [२०:१-२].
जे योग्य ते तो त्यांना देईल असे धन्याने त्यांना सांगितले [२०:४-७].
अकराव्या तासास कामाला लावलेल्या कामक-यांना प्रत्येकी एक दिनार मजुरी मिळाली [२०:९].
त्यांची तक्रार अशी होती की त्यांनी पूर्ण दिवस काम केल्यावरहि त्यांना ज्यांनी एक तास काम केले त्यांच्यासारखीच मजुरी मिळाली [२०:११-१२].
धन्याने म्हटले की पहाटेस कामाला लागलेल्या कमक-यांना त्याने जी मजुरी ठरविली होती त्याप्रमाणे त्यांना त्याने प्रत्येकी एक दिनार दिले, आणि दुस-या कमक-यांना देखील तीतकीच मजुरी देण्याची त्याची मर्जी आणि अधिकार आहे [२०:१३-१५].
येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्याला मुख्य याजक आणि शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यांत येईल, ते त्याला मरणदंड ठरवितील, वधस्तंभावर खिळतील, आणि तिस-या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल [२०:१७-१९].
येशूने त्याचं राज्यांत तिच्या दोन मुलांना म्हणजे एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुस-याला त्याच्या डावीकडे बसण्याची आज्ञा करावी अशी तिची इच्छा होती [२०:२०-२१].
पित्याने त्या जागा ज्याच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांस तो त्या देईल असे येशूने सांगितले [२०:२३].
येशूने म्हटले जो कोणी श्रेष्ठ पाहू इच्छितो त्याने सेवक झालेच पाहिजे [२०:२६].
येशूने म्हटले की तो सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे [२०:२८].
ते दोन आंधळे ओरडून म्हणाले, "हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आम्हांवर दया करा" [२०:३०].
येशूला त्यांचा कळवला आला म्हणून त्याने त्या दोन आंधळ्यांना बरे केले [२०:३४].