"कोणत्याहि कारणावरून बायकोला टाकणे सशास्त्र आहे काय?" असे परूशी लोकांनी येशूला विचारले [१९:३].
येशूने सांगितले की सृष्टीच्या निर्मितीपासून देवाने त्यांना नरनारी असे केले [१९:४].
पुरुषाने त्याच्या बापाला आणि आईला सोडून आपल्या पत्नीशी जडून राहिले पाहिजे [१९:५].
जेंव्हा पती आपल्या पत्नीशी जडून राहातो तेंव्हा ते दोघे एकदेह होतात असे येशूने सांगितले [१९:६].
देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये असे येशूने सांगितले [१९:६].
यहूदी लोकांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे मोशेने सूटपत्र देण्याची आज्ञा दिली असे येशूने सांगितले [१९:८].
येशूने म्हटले की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुस-या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी सूटपत्र दिलेल्या स्त्रीशी लग्न करतो तो सुद्धा व्यभिचार करतो [१९:९].
ज्याला दान दिले गेले आहे तो नपुंसक म्हणून स्वीकार करू शकतो [१९:१०-१२].
जेंव्हा कांही लहान मुलांना येशूकडे आणण्यांत आले तेंव्हा शियांनी त्यांना दाटाविले [१९:१३].
येशूने म्हटले, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेचआहे [१९:१४].
सार्वकालिक जीवनांत प्रवेश करण्यासाठी आज्ञा पाळ असे येशूने त्या तरुण माणसाला सांगितले [१९:१७].
जेव्हा त्या तरुण माणसाने मी आज्ञा पाळल्या आहेत असे सांगितले तेंव्हा येशूने त्याला त्याचे सर्व विकून टाकून गरिबांना देण्यांस सांगितले [१९:२१-२२].
तो तरुण माणूस खिन्न होऊत्न निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती [१९:२२].
येशूने म्हटले की धनवानांना स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करणे कठीण आहे, परंतु देवाला सर्व कांही शक्य आहे [१९:२३-२६].
येशूने त्याच्या शिष्यांना वचन दिले की नव्या जन्माठायी ते बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करतील [१९:२८].
येशूने सांगितले की जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे आता शेवटचे आहेत ते पहिले होतील [१९:३०].