स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करण्यासाठी आपण पश्चात्ताप करून लहान बाळकांसारखे झाले पाहिजे असे येशूने सांगितले [१८:३].
जो कोणी स्वत:ला बाळकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यांत सर्वात मोठ होय असे येशूने म्हटले [१८:४].
येशूवर विश्वास ठेवणा-या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळवितो त्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यांत बुडवावे ह्यांत त्याचे हित आहे [१८:६].
जे कांही आपल्याला अडखळविते त्याला आपण फेकून दिले पाहिजे असे येशूने सांगितले [१८:८-९].
आपण लहानातील एकालाहि तुच्छ मानू नये कारण त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहातात [१८;१०].
तसे ह्या लहानातील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही [१८:१२-१४].
र्वप्रथम तुम्ही त्याच्याकडे जाऊन तो व तुम्ही एकांतात असतांना त्याला त्याचा अपराध दाखवा [१८:१५].
तर दुस-यांदा साक्षीसाठी म्हणून तुम्ही तुमच्या सोबत आणखी एका किंवा दोघांना घेऊन जावे [१८:१६].
तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ती गोष्ट तुमच्या मंडळीला कळविली पाहिजे [१८:१७].
जेथे दोघे किंवा तिघे येशूच्या जमतात तेथे तो उपस्थित असणार असे त्याने अभिवचन दिले आहे [१८:२०].
येशूने सांगितले की आपण आपल्या भावाला सातच्या सत्तर वेळा क्षमा केले पाहिजे [११८:२१-२२].
दास त्याच्या धन्याचा लक्षावधी रुपयांचा कर्जदार होता आणि तो ते परतफेड करू शकत नव्हता [१८:२४-२५].
त्या धन्यला दया आली आणि त्याने त्यच्या दासाला माफ केले [१८:२७].
तो दास असहानशील वागला आणि त्याने त्याच्या सोबतीच्या दासाला तुरुंगांत टाकले [१८:२८-३०].
धन्याने त्या दासाला सांगितले की जशी त्याने त्याच्यावर दया केली होती तशी त्याने त्याच्या सोबतीच्या दासावर दया करावयास पाहिजे होती [१८:३३].
मग त्या धन्याने त्या दासाला तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणा-याच्या हाती दिले [१८:३४].
जर आपण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर आपला पिताहि ज्याप्रमाणे त्या धन्याने त्या दासाला केले त्याप्रमाणे करील असे येशूने म्हतले [१८:३५].