Matthew 17

Matthew 17:1

येशूबरोबर उंच डोंगरावर कोण गेले होते?

पेत्र, योकोब व योहान हे येशूबरोबर उंच डोंगरावर गेले होते [१७:१].

डोंगरावर येशूच्या रूपास काय झाले होते?

त्याचे रूप पालटले जेणेकरून त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले, आणि त्याची वस्त्रें प्रकाशासारखी शुभ्र झाली [१७:२].

Matthew 17:3

कोण येऊन येशूशी बोलत होते?

मोशे आणि एलीया येऊन येशूशी बोलत होते [१७>३].

पेत्राने काय करण्याचे सुचविले?

तीन माणसांसाठी तीन मंडप बांधण्याचे पेत्राने सुचविले [१७:४].

Matthew 17:5

मेघांतून येणा-या वाणीने काय सांगितले?

"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका" असे मेघांतून येणा-या वाणीने सांगितले [१७:५].

Matthew 17:9

ते सर्व डोंगराच्या खाली येत असतांना येशूने शिष्यांना काय आदेश दिला?

मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेपर्यंत ह्या दृष्टांताबद्दल कोणालाहि सांगू नये असे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले [१७:९].

Matthew 17:11

एलीया प्रथम आला पाहिजे ह्या शास्त्री लोकांच्या शिकवणीबद्दल येशूने काय म्हटले?

येशूने म्हटले की एलीया येऊन सर्वकांही यथास्थित करील हे खरे [१७:११].

येशूने म्हटले की एलीया आलाचा आहे तो कोण आणि त्याच्याशी काय करण्यांत आले होते?

येशूने म्हटले की बाप्तिस्मा करणारा योहान हा एलीया होता आणि लोकांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले [१७:१०-१३].

Matthew 17:14

फेफरेकरी मुलासाठी शिष्य काय करू शकले होते?

त्या फेफरेकरी मुलाला शिष्य बरे करू शकले नव्हते [१७:१४-१६].

Matthew 17:17

येशूने त्या फेफरेकरी मुलाला काय केले?

येशूने त्या भूतला दटाविले, आणि तो मुलगा त्या घटकेपासून बारा झाला [१७:१८].

Matthew 17:19

त्या फेफरेकरी मुलाला शिष्य का बरे करू शकले नव्हते?

येशूने म्हटले की त्यांच्या अल्पविश्वासामुळे ते त्या फेफरेकरी मुलाला बरे करू शकले नव्हते [१७:२०].

Matthew 17:22

येशूने त्याच्या शिष्यांना असे काय सांगितले की ज्यामुळे ते खिन्न झाले?

येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाईल, ते त्याला जिवे मारतील, आणि तिस-या दिवशी तो उठविला जाईल [१७:२२-२३].

Matthew 17:26

पेत्र आणि येशूने त्यांचा अर्धा शेकेल कर कसा दिला?

येशूने पेत्राला सांगितले जाऊन समुद्रांत गळ टाक आणि प्रथम जो मासा सापडेल त्याच्या तोंडांत कर देण्यासाठी एक शेकेल असेल [१७:२७].