Matthew 27

Matthew 27:1

येशूच्या परीक्षा आणि त्याच्या मृत्यूचा अहवाल येथे सुरू होतो.

Matthew 27:3

येथे लेखक येशूच्या अटक होण्याची कथा सांगायचे ह्यासाठी बंद करीत आहे की तो यहूदाने स्वत:ची हत्या कशी केली हे तो सांगू शकेल (२७:३

१०)

मग जेव्हा

याऱ्य यहूदा

कथा मधेच तुटत आहे आणि नवीन कथा सुरू होत आहे हे दाखविण्याचा तुमच्या भाषेत जर कांही मार्ग असेल तर त्याचा येथे उपयोग करा.

तीस चांदीची नाणी

येशूचा विश्वासघात करण्यासाठी प्रमुख याजकाने यहूदाला ते पैसे देऊ केले होते (२६:१५)

निर्दोष रक्ताला

"मरणास पात्र नसलेला व्यक्ती" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 27:6

यहूदाने स्वत:ची कशी हत्या केली ह्याचा अहवाल पुढे चालू.

हे टाकणे सशास्त्र नाही

"आपले नियम शास्त्र हे टाकण्यास अनुमती देत नाही"

हे टाकण्यांस

"ही चांदीची नाणी"

रक्ताचे मोल

मनुष्याला मारण्यासाठी दिले गेलेलं पैसे (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा आणि यु डी बी )

कुंभाराचे शेत

यरूशलेमेमधील उपरी लोकांना पुरण्यासाठी हे शेत विकत घेतले होते. (पाहा यु डी बी )

आजपर्यंत

लेखकाने ते लिहिले त्या वळेपर्यंत

Matthew 27:9

यहूदाने स्वत:ची कशी हत्या केली ह्याचा अहवाल पुढे चालू.

जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले, ते ससे की

"यिर्मया संदेष्ट्याने ही भविष्यवाणी केली होती, आणि त्याने सांगितल्या प्रमाणे ती पूर्ण झाली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

इस्राएल लोक

इस्राएलाचे धार्मिक पुढारी (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

मला निर्देशित केले

"यिर्मया संदेष्ट्याला" निर्देशित केले (२७:९)

Matthew 27:11

२७:२ पासून सुरू झालेली रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

आता

थोडे थांबल्यानंतर कथेला पुढे चालू ठेवण्यासाठी तुमच्या भाषेत कांही मार्ग असेल तर त्याचा येथे उपयोग करा.

सुभेदार

"पिलात" (२७;१)

आपण म्हणता तसेच

"तुम्ही हे कबूल करता" (पाहा: वाक्प्रचार)

परंतु मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांच्या द्वारे त्याच्यावर आरोप केला जात असता

AT: "परंतु मुख्य याजक आणि वडील जन त्याच्यावर आरोप करीत असता" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तुझ्याविरुद्ध लावत असलेले आरोप तुला ऐकू येत नाहीत काय?

"तू वाईट गोष्टीं करतोस ह्या लोकांनी तुझ्यावर लावलेल्या आरोपांचे तू ह्या लोकांना कांहीच उत्तर देत नाहीस ह्याचे मला फार आश्चर्य वाटत आहे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

एक शब्द, जेणेकरून सुभेदार आश्चर्यचकित झाला

AT: "एका शब्दानेहि, ह्याने सुहेदाराला आश्चर्यचकित केले."

Matthew 27:15

रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

आता

हा शब्द मुख्य कथानकामध्ये खंड पाडण्यासाठी चिन्हांकित केला गेला आहे जेणेकरून सुरवातीला लेखनशैलीत

पार्श्वभूमी माहित्तीत काय होते ह्याची माहिती लेखक वाचकांना देऊ शकतो).

सण

ज्याच्या दरम्यान वल्हांडण सण साजरा केला जातो (२६:२)

लोकांद्वारे निवडलेला बंदिवान

AT: "लोकांनी निवडलेला बंदिवान" (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

कुप्रसिद्ध

वाईट गोष्टीं करण्यामध्ये प्रसिद्ध असा

Matthew 27:17

रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

त्याला सुपूर्द केले

"येशूला त्याच्याकडे आणले" ह्यासाठी की पिलात त्याची परीक्षा घेऊ शकेल.

तो बसला असता

"पिलात बसला असतांना"

न्यायसनावर बसला असता

एक अधिकारी ह्या नात्याने त्याचे कर्तव्य पार पाडीत असतांना ९पाहा: रूपक)

निरोप पाठविला

"एक संदेश पाठविला"

Matthew 27:20

रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

त्यांना विचारले

"लोकसमुदायाला विचारले"

Matthew 27:23

रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

त्याने केले

"येशूने केले"

ते ओरडले

"लोकसमुदाय ओरडला"

रक्त

"मरण" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 27:25

रोमन सुभेदाराच्या समोर येशूच्या परीक्षेचा अहवाल पुढे चालू.

त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो!

होय! आम्ही आणि आमचे वंशज त्याच्या मरणाचे दोषी ठरण्यांस आनंदाने तयार आहोत!" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 27:27

रोमन शिपाई येशूची थट्टा करतात तो अहवाल येथे सुरू.

राजवाडा

संभाव्य अर्थ: १) जेथे सैनिक राहात होते ती जागा (पाहा यु डी बी ) किंवा २) सुभेदार राहात होता ती जागा.

कपडे काढले

"अंगावरची वस्त्रें ओढून काढली"

किरमिजी

लालभडक

अभिवादन

"आम्ही तुझा सन्मान करतो" किंवा "दिर्घायू व्हा"

Matthew 27:32

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा अहवाल येथे सुरू.

ते बाहेर आल्यावर

"ते यरूशलेमेतून बाहेर आल्यावर" (पाहा: स्पष्ट व अस्पष्ट)

त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले

"त्याला शिपायांनी येशूचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले"

गुलगुथा नावाची जागा

"ती जागा जिला लोक गुलगुथा म्हणत असत"

पित्त

पचन क्रियेमध्ये उपयुक्त कडू रसायन

Matthew 27:35

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

वस्त्रें

येशूने घातेलेल कपडे (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 27:38

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

दोन लुटारूंना त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते

AT: "शिपायांनी येशूबरोबर दोन लुटारूंना वधस्तंभावर खिळले होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्यांची डोकी हालवीत

येशूची थट्टा करीत होते

Matthew 27:41

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

त्याने दुसऱ्याला वांचविले, परंतु स्वत:ला वाचवू शकत नाही

संभाव्य अर्थ: १) येशूने इतरांना वाचविले किंवा तो स्वत:ला वाचवू शकतो असा यहूदी पुढारी विश्वास ठेवीत नव्हते (पाहा: उपरोध आणि यु डी बी ) किंवा २) त्यांचा असा विश्वास होता की त्याने इतरांना वाचविले होते परंतु आता ते ह्यासाठी त्याची थट्टा करीत होते की तो स्वत:ला वाचवू शकत नव्हता"

तो इस्राएलाच राजा आहे

येशू हा इस्राएलाचा राजा आहे असा त्यांचा विश्वास नव्हता. (पाहा: उपरोध)

Matthew 27:43

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

आणि जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते

"शिपायांनी ज्या लुटारूंना वधस्तंभावर खिळले होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 27:45

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

मोठ्याने ओरडणे

"हांक मारणे" किंवा "मोठ्याने ओरडून बोलणे"

एली, एली, लमा सबखथनी

भाषांतरकार सहसा त्यांच्या मूळ इब्री भाषेमध्ये हे शब्द सोडून देतात. (पाहां: नावांचे भाषांतर)

Matthew 27:48

येशूला वधस्तंभावर खिळल्याचा व तो मेल्याचा अहवाल पुढे चालू.

त्यांच्यातील एकाने

संभाव्य अर्थ: १) शिपायांतील एकाने" किंवा २) जे बाजूला उभे राहून बघत होते त्यांतील एक.

स्पंज

मासे धरतांना त्यांच्यात असलेले पाणी शोषून घेतून नंतर ते दाबून पिळून बाहेर टाकण्यासाठी उपयोगात आणला जाणारा पदार्थ.

त्याला दिला

"येशूला दिला"

Matthew 27:51

येशू मेल्यानंतर घडलेल्या घटनांचा अहवाल येथे सुरू होतो.

पाहा

मागून येणाऱ्या अद्भुत माहितीकडे वाचकांनी लक्ष द्यावे असे लेखक त्यांना सांगत आहे.

थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरें उठविली गेली

"देवाने थडगी उघडली आणि मेलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ शरीरें त्याने उठविली" (पाहा: कर्तरी किंवा कर्माण)

निजलेले

"मेलेले" (पाहा: शिष्टोक्ति)

थडगी उघडली गेली....अनेकांना दिसले

घटनांचा क्रम येथे अस्पष्ट आहे. संभाव्य क्रम: भूमिकंप झाल्यानंतर जेव्हा येशू मेला व थडगी उघडली गेली १) पवित्र जन उठविले गेले, येशूचे पुनरुत्थान झाले, आणि पवित्र जनांनी नगरांत प्रवेश केला आणि त्यांना पुष्कळ लोकांनी पाहिले, किंवा २) येशूला उठविले गेले, पवित्र जनांना उठविले गेले, नगरांत गेले, आणि त्यांना पुष्कळ लोकांनी पाहिले.

Matthew 27:54

येशू मेल्यानंतर घडलेल्या अद्भुत घटनेचा अहवाल पुढे चालू.

Matthew 27:57

.येशूला पुरले जाण्याचा अहवालाची सुरूवात होते.

मग पिलाताने ते त्याला द्यावयाची आज्ञा केली

"मग पिलाताने योसेफाला येशूचे शरीर देव्याची शिपायांना आज्ञा केली."

Matthew 27:59

येशूला पुरले जाण्याचा अहवाल पुढे चालू.

ताग

अतिशय महाग असलेले तागाचे वस्त्र

कबरेसमोर

"कबरेपासून पलीकडे"

Matthew 27:62

येशूला पुरले गेल्यानंतरच्या घटनांचा अहवाल पुढे चालू.

तयारी

वल्हांडण सणाची तयरी करण्याचा दिवस

तो ठक जिवंत असतांना

"जेव्हा येशू, तो ठक, जिवंत असतांना"

Matthew 27:65

येशूला पुरले गेल्यानंतरच्या घटनांचा अहवाल पुढे चालू.

पहारा

४ ते १६ रोमन शिपाई

धोंडीवर शिक्का मोर्तब करणे

संभाव्य अर्थ: १) त्यांनी दगडाभोवती दोरखंड बांधून त्याला काबारेच्या प्रवेश दाराच्या खडकाच्या भिंतीशी सलग्न केले (पाहा यु डी बी ) किंवा २) त्यांनी दगड आणि भिंत ह्यामध्ये शिक्कामोर्तब केले.

पहारेकाऱ्याना ठेवले

"लोकांना कबरेजवळ येण्यांस प्रतिबंद करण्याच्या ठिकाणी त्यांना उभे राहाण्यास सांगितले"