Matthew 26

Matthew 26:1

येशू त्याच्या शिष्यांना तो कसा दु:ख सहन करील व मरेल हे संगण्यांस सुरूवात करीत आहे.

मग असे झाले की

कथेच्या नवीन भागास चिन्हांकित करण्यासाठी तुमच्या भाषेत कांही मार्ग असेल तर त्याचा येथे उपयोग करण्याचा विचार करा.

सर्व बोलणे

२४:४

२५:४६ ह्यांतील सर्व शब्द

मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्यासाठी धरून दिला जाईल

"कांही लोक मनुष्याच्या पुत्राला इतर दुसऱ्याच्या हाती धरून देतील आणि ते त्याला वधस्तंभावर खिळतील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 26:3

येशूला धरून जिवे मारावे अशी यहूदी पुढाऱ्यानी मसलत केली.

कपटाने

"गुप्तपणे"

सणाच्या वेळेस

वार्षिक वल्हांडण सणाच्या वेळेस

Matthew 26:6

येशूच्या मृत्युच्या पूर्वी एक स्त्री येशूचा तैलाभ्यंग करते.

पडणे

त्याच्या एका बाजूला पडणे. जेवतांना लोकांची सामान्य कशाप्रकारे पद्धत असते ह्याचे वर्णन करण्यासाठी जर तुमच्या भाषेमध्ये शब्द असेल तर त्याचा येथे उपयोग करा.

एक स्त्री आली

एक स्त्री येशूकडे आली

अलाबास्त्र कुपी

मुलायम दगडापासून बनविलेली कुपी जी फारच महाग असते.

सुगंधी तेल

संतुष्ट्कारक गंध असणारे तेल

हा नाश कशाकरिता?

ह्या सुगंधी तेलाचा नाश करून ह्या स्त्रीने वाईट केले आहे!' (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 26:10

येशूच्या मृत्युपूर्वी त्याला तैलाभ्यंग केला म्हणून येशू त्या स्त्रीची प्रशंसा करीत आहे.

ह्या स्त्रीला का त्रास देता?

AT: "तुम्ही ह्या स्त्रीला त्रास देऊ नये!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही...तुमच्याजवळ....तुम्हांस

शिष्य

Matthew 26:12

येशूच्या मृत्युपूर्वी त्याला तैलाभ्यंग केला म्हणून येशू त्या स्त्रीची प्रशंसा करीत आहे.

Matthew 26:14

येशूचा एक शिष्य येशूला पकडून देऊन त्याला ठार मारण्यासाठी यहूदी पुढाऱ्याना मदत करण्याचे मान्य करतो.

त्याला धरून दिले तर

"येशूला तुमच्या हाती दिले तर" किंवा "येशूला अटक करण्यांस तुमची मदत केली तर"

चांदीची तीस नाणी

जुन्या करारातील भविष्यवाणीमध्ये जे शब्द आहेत तेच शब्द येथे आहेत, म्हणून आधुनिक पैशांत त्यांना बदलण्याऐवजी त्याच प्रकारचा उपयोग करा.

त्याला त्यांच्या हाती धरून देण्यासाठी

"येशूला अटक करण्यासाठी मुख्य याजकाला मदत करणे"

Matthew 26:17

येशू त्याच्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घेण्याची तयारी करीत आहे.

त्याने म्हटले, "नगरांत अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, 'गुरु म्हणतात,' "माझी वेळ जवळ आली आहे; मी आपल्या शिष्यांसह तुमच्या घरी वल्हांडण सण करीन."

येशू त्याच्या शिष्यांना एका दुसऱ्या माणसाला येशूचा संदेश सांगण्यासाठी सांगत आहे. AT: "त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले की नगरांत एका अमुक माणसाकडे जाऊन त्याला गुरु असे म्हणतो हे सांगा की, 'माझी वेळ जवळ आली आहे. माझ्या शिष्यांबरोबर मी तुझ्या घरी वल्हांडण सण करीन,'" किंवा "त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले नगरांत एका अमुक माणसाकडे जा आणि त्याला सांगा की माझी वेळ जवळ आली आहे आणि मी माझ्या शिष्यांबरोबर ताच्या घरी वल्हांडण सण साजरा करीन."

माझी वेळ

संभाव्य अर्थ: १) "ती वेळ जिच्याविषयी मी तुम्हांला सांगितले आहे" (यु डी बी ) किंवा २) "ती वेळ जी देवाने माझ्यासाठी नेमलेली आहे."

आता जवळ आली आहे

संभाव्य अर्थ: १) "जवळ आहे" (यु डी बी ) किंवा २) "आली आहे." (पाहा: वाक्प्रचार)

वल्हांडण सण साजरा करणे

"वल्हांडण सणाचे भोजन खाणे" किंवा "खास भोजन खाण्याद्वारे वल्हांडण सण साजरा करणे"

Matthew 26:20

आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन खात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकवीत आहे.

तो खाण्यांस बसला

तुमच्या संस्कृतीमध्ये जेवावायला बसतांना कोणत्या पद्धतीने बसतात त्यासाठी जो शब्द आहे तो येथे वापरा.

प्रभुजी, तो मी तर नाही ना?

"खात्रीपूर्वक मी तो नाही, प्रभुजी मी तर नाही ना?" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 26:23

आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन खात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

तो मनुष्य ज्याच्याद्वारे मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यांत येते

"तो मनुष्य तो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो'

तू स्वत: सांगितले आहेस

"तू म्हणालास तसेच" किंवा "तू आताच कबूल केले आहेस" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 26:26

आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन खात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

घेतली...आशीर्वाद दिला....मोडली

तुम्ही १४:१९ मध्ये जसे ह्याचे भाषांतर केले आहे तसेच करा.

Matthew 26:27

आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन खात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

घेतला

१४:१९ मध्ये जसे भाषांतर केले आहे तसेच करा,

त्यांना दिला

"शिष्यांना दिला"

हे कराराचे रक्त आहे

"करार हा प्रभावी आहे हे रक्त दाखविते" किंवा "रक्त हे करारास शक्य करते"

ओतले जात आहे

"मरणामध्ये ओतले जात आहे" किंवा "मी जेव्हा मरेण तेव्हा ते रक्त माझ्या जखमांमधून वाहत राहील"

द्राक्षफळांचा रस

"द्राक्षांरस" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 26:30

ते जैतुनाच्या डोंगरावर जात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

भजन

देवाच्या स्तुतीचे गीत

दूर जाल

"सोडून जाल"

कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल

AT: १) "कळपातल्या सर्व मेंढरांची ते दाणादाण करतील" (यु डी बी ) किंवा २) "कळपातली मेंढरे सर्व दिशांना धावून जातील"

कळपातली मेंढरे

शिष्य (पाहा:रूपक)

मी उठविला गेल्यानंतर

AT: "देवाने मला उठविल्यानंतर" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

मी उठविला गेलो

"मरणातून देवा मला उठवितो"

Matthew 26:33

ते जैतुनाच्या डोंगरावर जात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

दूर जाल

२६:३१ मध्ये तुम्ही जसे भाषांतर केले आहे तसेच करा.

कोंबडा आरवण्यापूर्वी

AT: "सूर्य उगवण्यापूर्वी"

कोंबडा

सूर्य उगवण्याच्या सुमारास जोराने ओरडणारा पक्षी"

आरवणे

"कोंबडा काढतो तो आवाज"

Matthew 26:36

ते जैतुनाच्या डोंगरावर जात असतांना येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

खिन्न

फार दु:खी

Matthew 26:39

येशू गेथशेमाने बागेमध्ये प्रार्थना करतो ह्याचा अहवाल येथे सुरू होतो.

पालथा पडला

प्रार्थना करण्यासाठी जाणीवपूर्वक मान खाली झुकविणे. (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 26:42

येशू गेथशेमाने बागेमध्ये प्रार्थना करतो ह्याचा अहवाल पुढे चालू.

तो तेथून गेला

"येशू तेथून गेला"

हे मी प्याल्याशिवाय

"हा दु:खाचा प्याला मी प्याल्याशिवाय"

त्यांचे डोळे जड झाले होते

"त्यांना फार झोप आली होती" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 26:45

येशू गेथशेमाने बागेमध्ये प्रार्थना करतो ह्याचा अहवाल पुढे चालू.

घटका जवळ आली आहे

"वेळ आली आहे"

पापी लोकांच्या हाती

"पापी लोक" (पाहा: उपलक्षण)

पाहा

"मी तुम्हांला जे सांगणार आहे त्याकडे नेट लक्ष द्या."

Matthew 26:47

येशू गेथशेमाने बागेमध्ये प्रार्थना करतो ह्याचा अहवाल पुढे चालू.

तो बोलत आहे इतक्यांत

"येशू बोलत आहे इतक्यांत"

म्हणाला, "मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा"

"असे म्हटला की तो ज्याचे चुंबन घेईल त्यालाच त्यांनी धरावे." (पाहा: संभाषण अवतरण)

ज्या कोणाचे

"ज्याचे मी चुंबन घेईन" किंवा "त्या माणसाला ज्याचे मी चुंबन घेईन" (यु डी बी )

चुंबन

एखाद्याच्या गुरुस अभिवादन करण्याची आदरणीय पद्धती.

Matthew 26:49

गेथशेमाने बागेत येशूला अटक करण्याच्या अहवालाची येथे सुरूवात होते.

तो येशुजवळ आला

"यहूदा येशुजवळ आला"

त्याचे चुंबन घेतले

"चुंबन घेऊन त्याला भेटला"

येशूवर हात टाकले

"येशूला इजा करण्याच्या हेतूने त्यांनी त्याला धरले" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

अटक केली

त्याला बंदिवान केले.

Matthew 26:51

गेथशेमाने बागेत येशूला अटक करण्याचा अहवाल पुढे चालू.

पाहा

कथेमध्ये लेखक एका नवीन व्यक्तीला घेऊन येत आहे. हे करण्याचा तुमच्या भाषेत मार्ग असावा.

तुला काय वाटते की माझ्या पित्याजवळ मला मागता येत नाही, आणि तो मला देवदूतांच्या सैन्यांच्या बारा तुकड्या पाठवून देणार नाही?

AT: "तुला हे माहित असावयास पाहिजे की मी माझ्या पित्याजवळ मागू शकतो, आणि तो माझ्याकरिता देवदूतांच्या सैन्यांच्या बारा तुकड्यांपेक्षा अधिक पाठवू शकतो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुकड्यांपेक्षा

देवदूतांच्या सैन्यांच्या बारा तुकड्यांपेक्षा अधिक

देवदूतांची अगदी तंतोतंत संख्या महत्वाची नाही. (पाहा: अपरिचितांचे भाषांतर)

Matthew 26:55

गेथशेमाने बागेत येशूला अटक करण्याचा अहवाल पुढे चालू.

एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरावयास तुम्ही तरवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहां काय?

AT: "तुम्हांला माहित आहे की मी लुटारू नाही, म्हणून तरवारी व सोटे घेऊन मला धरावयासाठी बाहेर येणे हे चुकीचे आहे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

सोटे

लोकांना मारण्यासाठी टणक लाकडाचा मोठा तुकडा.

त्याला सोडून गेले

त्यांनी त्याच्याजवळ जेव्हा असावयास पाहिजे होते तेव्हा ते त्याला सोडून गेले ह्या अर्थाचा तुमच्या भाषेत जर शब्द असेल तर त्याचा येथे उपयोग करा.

Matthew 26:57

प्रमुख याजकाकडून येशूला प्रश्न विचारण्यात येतात तो अहवाल येथे सुरू होतो.

प्रमुख याजाकाचा वाडा

प्रमुख याजाकाच्या वाड्या जवळील मोकळी जागा.

Matthew 26:59

प्रमुख याजकाकडून येशूला प्रश्न विचारण्यात येतात तो अहवाल पुढे चालू.

दोघे जण पुढे आले

"दोन माणसे पुढे आली" (यु डी बी ) किंवा "दोन साक्षीदार पुढे आले"

म्हणाले, 'देवाचे मंदिर मोडावयास व तीन दिवसांत ते बांधावयास मी समर्थ आहे', असे ह्याने म्हटले.'"

AT: "तो देवाचे मंदिर मोडावयास व ते तीन दिवसांत पुन्हा बांधावयास समर्थ आहे असे येशूने म्हटले असे त्यांनी ऐकल्याची साक्ष दिली." (पाहा: संभाषण अवतरण)

ह्या माणसाने म्हटले

"येशू ह्या माणसाने म्हटले"

Matthew 26:62

प्रमुख याजकाकडून येशूला प्रश्न विचारण्यात येतात तो अहवाल पुढे चालू.

हे तुझ्याविरुद्ध साक्षी देतात

"हे साक्षीदार तुझ्याविरुद्ध साक्षी देत आहेत"

तू ख्रिस्त आहेस का हे आम्हांला सांग

"जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग"

आपण म्हटले तसेच

"होय, आपण म्हटले तसेच" किंवा "आताच तुम्ही हे कबूल केले आहे" (पाहा: वाक्प्रचार)

परंतु मी तुम्हांस सांगतो, ह्यापुढे तुम्ही

येशू हा प्रमुख याजक आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत आहे.

ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला पाहाल

संभाव्य अर्थ: १) थोड्या काळाने भविष्यांत ते मनुष्य पुत्राला पाहातील (पाहा यु डी बी ) किंवा २) "आतापर्यंत येशूच्या म्हणण्याचा अर्थ की त्याचे मरण, त्याचे पुन्हा जिवंत होणे, आणि त्याचे स्वर्गांत परत जाणे ह्याची वेळ "आता" आहे.

सर्वसमर्थाच्या उजवीकडे

"सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे"

आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन

"आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन पृथ्वीकडे येईल"

Matthew 26:65

प्रमुख याजकाकडून येशूला प्रश्न विचारण्यात येतात तो अहवाल पुढे चालू.

प्रमुख याजाकाने आपली वस्त्रें फाडली

वस्त्रें फाडणे हे रागाचे व दु:खाचे चिन्ह होते.

त्यांनी उत्तर दिले

"यहूदी पुढाऱ्यानी उत्तर दिले"

Matthew 26:67

प्रमुख याजकाकडून येशूला प्रश्न विचारण्यात येतात तो अहवाल पुढे चालू.

तेव्हा ते

संभाव्य अर्थ: "मग माणसांपैकी काहींनी" किंवा "मग सैनिकांनी"

त्याच्या तोंडावर थुंकले

अपमान म्हणून

Matthew 26:69

पेत्र येशूला ओळखत्तो हे पेत्राने नाकारले त्याचा अहवाल येथे सुरू होतो.

तू काय म्हणतेस हे मला ठाऊक नाही

ती दासी काय म्हणत होती हे पेत्र चांगल्या रीतीने समजू शकत होता. तो येशुबारोब्रर होता हे नाकारण्यासाठी त्याने त्या शब्दांचा वापर केला.

Matthew 26:71

पेत्र येशूला ओळखत्तो हे पेत्राने नाकारले त्याचा अहवाल पुढे चालू.

जेव्हा तो

"जेव्हा पेत्र"

देवडी

वाड्याच्या भिंतीतील प्रवेशदार"

Matthew 26:73

पेत्र येशूला ओळखत्तो हे पेत्राने नाकारले त्याचा अहवाल पुढे चालू.

त्यांतला एक

"येशूबरोबर असलेल्यांपैकी एक"

कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते

"तू गालीलाचा राहाणारा आहेस हे आम्ही सांगू शकतो कारण तू गालीलकरांसारखा बोलतोस"

शाप

"स्वत:ला शाप देणे"

शपथ घेणे

"मी त्या माणसाला ओळखत नाही,"

AT: "तो त्या माणसाला ओळखत नाही," (पाहा: संभाषण अवतरण)