Matthew 25

Matthew 25:1

येशू पांच शहाण्या आणि पांच मूर्ख कुमारींचा दाखला सांगण्याचे सुरू करतो. (पाहा: दाखले)

दिवे

हे असू शकते १) दिवे (पाहा यु डी बी ) किंवा मशाली म्हणजे काठीच्या एका टोकाला चिंध्या गुंडाळून त्यांना तेलामध्ये भिजवतात.

त्यांच्यापैकी पांच

"त्यांच्यापैकी पांच कुमारी"

त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही

"फक्त त्यांच्या दिव्यांमध्ये तेल होते"

Matthew 25:5

येशू पांच शहाण्या आणि पांच मूर्ख कुमारींचा दाखला सांगण्याचे सुरू करतो.

त्या सर्वांना झोप येऊ लागली

"सर्व दहा कुमारींना झोप येऊ लागली"

Matthew 25:7

येशू पांच शहाण्या आणि पांच मूर्ख कुमारींचा दाखला सांगण्याचे सुरू करतो.

त्यांचे दिवे नीट केले

"लख्ख प्रकाश द्यावा म्हणून त्यांनी त्यांचे दिवे सुस्थीत केले"

मूर्खांनी शहाण्यांना म्हटले

"मूर्ख कुमारींनी शहाण्या कुमारींना म्हटले"

आमचे दिवे जाऊ लागले आहेत

"आमच्या दिव्यांमधील वातां मंद होऊ लागल्या आहेत" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 25:10

येशू पांच शहाण्या आणि पांच मूर्ख कुमारींचा दाखला सांगण्याचे सुरू करतो.

त्या गेल्यावर

"पांच मूर्ख कुमारी गेल्यावर"

जे तयार होते

ज्या कुमारींकडे अधिक तेल होते त्या

दार बंद झाले

AT: "कोणीतरी दार बंद केले"

आमच्या साठी दार उघडा

"आमच्यासाठी दार उघडा म्हणजे आम्ही आंत येऊ (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

मी तुम्हांस ओळखीत नाही

"तुम्ही कोण आहांत हे मी ओळखीत नाही."

Matthew 25:14

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे सुरू करतो.

त्यापमाणे आहे

"देवाचे राज्य ह्या सारखे आहे (पाहा २५:१)

जाणार होता

"जाण्यासाठी तयार होता" किंवा "लवकरच जाणार होता"

त्यांच्यावर त्याने त्याची मालमत्ता सोपवून दिली

"त्याच्या संपत्तीची जबाबदारी त्यांना सोपवून दिली"

त्याची संपत्ती

"त्याची मालमत्ता"

पांच टॅलेन्टस?

"एक टॅलेन्ट?" म्हणजे वीस वर्षांची मजूरी. आधुनिक पैशांमध्ये ह्याचे भाषांतर करण्याचे टाळा. दाखला हा पांच, दोन, आणि एक आणि त्यामध्ये समाविष्ट मोठ्या प्रमाणातील संपत्तीची तुलना तुलनात्मक रक्कमेमध्ये करीत आहे. (पाहा यु डी बी , "सोन्याच्या पांच पिशव्या" आणि बायबलचा पैसा)

तो प्रवासास गेला

"धनी प्रवासास गेला"

आणि आणखी पांच हजार रुपये मिळविले

"आणि आणखी पांच हजार कमाविले"

Matthew 25:17

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

आणखी दोन हजार रुपये मिळविले

"आणखी दोन हजार कमाविले"

Matthew 25:19

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

मी आणखी पांच हजार रुपये मिळविले आहेत

"मी आणखी पांच हजार रुपये कमाविले आहेत"

टॅलेन्टस?

२५:१५ मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

शाबास

"तू फार चांगले केले" किंवा "तू उचित ते केले" एखादा धनी (किंवा अधिकारावर असलेला व्यक्ती) त्याच्या दासाने (किंवा त्याच्या अधीन असलेला दुसर व्यक्ती) जे केले ते त्याला मान्य आहे हे व्यक्त करण्याचा तुमच्या भाषेमध्ये मार्ग असावा.

Matthew 25:22

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

मी मिळविले.....अधिक रुपये

२५:२० मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

शाबास...तू आपल्या धन्याच्या आनंदांत

२५:२१ मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

Matthew 25:24

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

जेथे तुम्ही पेरले नाही, तेथे कापणी करता, आणि जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता

AT: "जेथे तुम्ही दुसऱ्याला तेथे बी पेरण्यासाठी पैसे दिलेत त्या बागेतून तुम्ही बागेतील अन्नधान्य गोळा करिता" (पाहा: समांतरवाद)

पसरविणे

त्याकाळी ते शेतामध्ये रांगेत बी पेरण्याऐवजी नेहमी कांही बी फेकीत असत.

पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत

"पाहा, तुमचे जे आहे ते येथे आहे"

Matthew 25:26

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

हे दुष्ट व आळशी दासा

"तू दुष्ट दास आहेस ज्याला काम करण्याची इच्छा नाही"

मी तेथे कापणी करतो जेथे मी पेरले नाही, व तेथून गोळा करतो जेथे मी पसरले नाही

२५:२४ मध्ये ह्या कल्पनेचे तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

माझे मी परत घेतले आहे

"माझे सोने मी परत घेतले आहे" (पाहा: पद्लोप)

व्याज

धन्याच्या पैशाच्या तात्पुरत्या उपयोगाचे मिळालेले मानधन.

Matthew 25:28

विश्वासू आणि अविश्वासू दासांचा दाखला सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

त्याला भरपूर होईल

"अधिक जास्त"

तेथे रडणे व दांतखाणे चालेल

"जेथे लोक रडतात व दांत खातात."

Matthew 25:31

युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू लोकांचा कसा न्याय करील हे तो त्याचं शिष्यांना सांगण्यास सुरू करतो.

त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील

AT: "तो त्याच्या पुढे सर्व राष्टांना एकत्र जमवील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याच्या पुढे

"त्याच्या समोर"

सर्व राष्ट्रे

"प्रत्येक देशातील लोक" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

शेरडें

शेरडें ही मध्यम आकाराची मेंढरासारखेच दिसणारे सस्तन प्राणी आहेत, ज्यांना अनेकदा मेंढरासारखेच पाळले व चारले जाते.

तो ठेवील

"मनुष्याचा पुत्र ठेवील"

Matthew 25:34

युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू लोकांचा कसा न्याय करील हे तो त्याचं शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

राजा

"मनुष्याचा पुत्र" (२५:३१)

जे त्याच्या उजवीकडे आहेत ते

"मेंढरे" (२५"३३)

माझ्या पित्याचे आशीर्वादिजनहो, या

AT: "या, ज्या तुम्हांला माझ्या पित्याने आशीर्वाद दिला आहे ते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

तुम्हांकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या

AT: "देवाने जे राज्य तुमच्यासाठी तयार केले आहे ते घ्या"

Matthew 25:37

युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू लोकांचा कसा न्याय करील हे तो त्याचं शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

राजा

"मनुष्याचा पुत्र (२५"३१)

त्यांना सांगेल

"त्याच्या उजवीकडे जे आहेत त्यांना"

बंधू

पुरुष व स्त्री ह्यांना समाविष्ट करणारा जर शब्द तुमच्या भाषेत असेल तर त्याचा येथे उपयोग करा.

तुम्ही ते मला केले आहे

"तुम्ही ते मला केले असे मी मानतो"

Matthew 25:41

युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू लोकांचा कसा न्याय करील हे तो त्याचं शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

अहो शापग्रस्तहो

"देवाने शाप दिलेले तुम्ही लोक आहांत"

सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे

AT: "देवाने तयार केलेला सार्वकालिक अग्नी" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याचे दूत

त्याचे मदतनीस

तुम्ही मला वस्त्र घातले नाही

"तुम्ही मला वस्त्र दिले नाही"

आजारी आणि बंदिशाळेत

"मी आजारी आणि बंदिशाळेत होतो"

Matthew 25:44

युगाच्या समाप्तीच्या वेळी येशू लोकांचा कसा न्याय करील हे तो त्याचं शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो

तेहि त्याला उत्तर देतील

"डाव्या बाजूला असलेले ते" सुद्धा उत्तर देतील (२५:४१)

ह्या कनिष्ठांपैकी एकालाहि

"माझ्या लोकांतील कमी महत्वाच्या एकालाहि"

तुम्ही मला केले नाही

"तुम्ही मला केले नाही असे मी मानले" किंवा "मी तो एक होतो ज्याला तुम्ही मदत केली नाही"

सार्वकालिक शिक्षा

"न संपणारी शिक्षा"

नीतिमान सार्वाकालिक जीवनांत

"नीतिमान लोक सार्वकालिक जीवनांत जातील"