Matthew 23

Matthew 23:1

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.

मोशेच्या आसनावर बसणे

"मोशेप्रमाणे अधिकार असणे" किंवा "मोशेचे नियमशास्त्र काय म्हणते ते सांगण्याचा अधिकार असणे" (पाहा: रूपक)

जे कांही

"कांहीही" किंवा "सर्वकांही"

Matthew 23:4

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.

ते वाहण्यास कठीण अशी जड ओझी बांधतात

"पाळण्यांस कठीण असे अनेक नियम ते तुमच्यावर लादतात." (पाहा: रूपक)

ते स्वत: बोटंहि लावणार नाहीत

"ते कमीत कमी मदत देखील करणार नाहीत." (पाहा: रूपक)

मंत्रपत्रे

लहान चार्मांच्या पेट्या ज्यांत पवित्रशास्त्र वचने कागदांवर लिहून ठेवली जातात.

Matthew 23:6

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.

Matthew 23:8

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.

पृथ्वीवरील कोणाहि मनुष्याला आपला पिता म्हणू नका

"जो पृथ्वीवर आहे त्या कोणालाही तुमचा पिता म्हणू नका" किंवा "पृथ्वीवरील कोणताहि मनुष्य तुमचा पिता आहे असे म्हणू नका"

Matthew 23:11

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.

स्वत:ला उंच करतो

"स्वत:ला अति महत्वाचा समजतो"

उंच केलेला

"महत्वाच्या स्थळी उंचावला गेलेला"

Matthew 23:13

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

तुम्ही आंत जात नाही

"तुमच्यावर अधिकार करण्यांस तुम्ही देवाला अनुमती देत नाहीत"

तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता

"ज्यांना संरक्षण करण्याचे कोणतेही साधन नाही अशा स्त्रियांचे सर्वकांही चोरून घेता"

नरकपुत्र

"नरकवासी असलेला एक व्यक्ती" किंवा "नरकांत जावे असा एक व्यक्ती" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 23:16

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

आंधळ्या वाटाड्यांनो....मूर्खांनो

पुढारी जरी शारीरिकरित्या आंधळे नसले तरी ते चुकीचे आहेत हे त्यांना समजू शकत नाही. (पाहा: रूपक)

त्याच्या शपथेने तो बांधला जातो

AT: "त्याने वचन दिल्याप्रमाणे ते केलेच पाहिजे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

मोठे कोणते, सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर?

परुश्यांची खरडपट्टी काढण्यासाठी येशी ह्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 23:18

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

आंधळ्या लोकांनो

आध्यात्मिकरित्या आंधळ्या लोकांनो (पाहा: रूपक)

मोठे कोणते, अर्पण, किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी?

त्यांना अगोदरच हे माहित आहे हे दाखविण्यासाठी येशू ह्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

अर्पण

वेदीवर ठेवण्याअगोदर बलि चढविण्यासाठी प्राणी किंवा दळलेले धान्य देवाजवळ आणणे. एकदा ते वेदीवर चढविले तर ते अर्पण होत असे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 23:20

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

Matthew 23:23

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

तुमची केवढी दुर्दशा होणार

२३:१३ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

पुदिना, बडीशेप व जिरे

जेवणाला चांगला स्वाद येण्यासाठी पाने व बियांचा उपयोग करतात (पाहा: अपरिचीतांचे भाषांतर)

अहो आंधळ्या वाटाड्यांनो

हे लोक शारीरिकरित्या आंधळे नाहीत येशू आध्यात्मिक आंधळेपणाची शारीरिक आंधळेपणाशी तुलना करीत आहे. (पाहा: रूपक)

तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता

कमी महत्वाचे नियम पाळता आणि अधिक महत्वाचे नियम टाळता हे तितकेच मूर्खपणाचे आहे की सर्वांत लहान अशुद्ध प्राण्याला गिळण्याचे टाळता परंतु मुद्दाम किंवा नकळत मोठ्या अशुद्ध प्राण्याचे मांस खाता. AT: "तुम्ही त्या व्यक्ती इतकेच मूर्ख आहा जो त्याच्या पेयांत पडलेल्या मुरकुट गाळतो परंतु उंटाला गिळून टाकतो." (पाहा: रूपक आणि अतिशयोक्ती अलंकार)

मुरकुट गाळतो

कपड्याने गाळून प्याल्याने मच्छरास तोंडांत जाऊ देत नाही.

मच्छर

एक लहान उडणारे कीटक.

Matthew 23:25

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

तुमची केवढी दुर्दश होणार

२३:१३ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता

"शास्त्री" आणि "परुशी" दुसऱ्याला "बाहेरून शुद्ध दिसतात." (पाहा: रूपक)

परंतु ती आंतून जुलूम आणि असंयम ह्यांनी भरलेली आहेत

"ते दुसऱ्याचे जे कांही आहे ते सक्तीने हिसकावून घेतात म्हणजे त्यांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त असू शकते."

अहो आंधळ्या परुश्यांनो

परुशी लोक सत्य समजत नाहीत. ते शारीरिकरित्या आंधळे नाहीत. (पाहा: रूपक)

पहिल्याने ताटवाटी आंतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनहि साफ होईल

जर त्यांचे हृदय देवाशी उचित प्रकारे जुडलेले आहे तर ते त्यांच्या जीवनाद्वारे दिसून येईल. (पाहा: रूपक)

Matthew 23:27

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

Matthew 23:29

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

Matthew 23:32

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या पापांचे माप भर

"तुमच्या पूर्वजांनी जे पाप सुरू केले ते तुम्ही पूर्ण करा" (सामीप्यमुलक लक्षणा)

अहो सापांनो, सापाच्या पिल्लानो

"तुम्ही जसे वाईट, तसेच धोकादायक सांप आहांत" (पाहा: रूपक)

तुम्ही नरकदंड कसा चुकवल?

"नरकदंडापासून तुम्हांला सुटका मिळण्याचा दुसरा मार्गाच नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 23:34

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.

हाबेला....पासून...ते...जखऱ्या

हाबेल हा सर्वांत पहिला खूनेचा बळी होता, आणि जखऱ्या हा यहूदी लोकांद्वारे मंदिरामध्ये ठार मारलेला शेवटच व्यक्ती होता अये वाटते.

जखऱ्या

बापिस्मा करणाऱ्या योहानाचा पिता नव्हे.

Matthew 23:37

यरूशलेमेच्या लोकांनी देवाचा त्याग केला म्हणून तो दु:खी आहे असे येशू म्हणतो.

यरूशलेमे, यरूशलेमे

येशू यरूशलेमेच्या लोकांशी बोलत आहे जणू ते स्वत: नगर आहेत (पाहा: परोक्षसंबोधन आणि सामीप्यमुलक लक्षणा)

तुझ्या मुलांबाळांना

संपूर्ण इस्राएल (पाहा: उपलक्षण)

पाहा तुमचे घर तुम्हांवर सोडले आहे

AT: "देव तुमच्या घराला सोडून देईल, आणि ते रिकामे राहील" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तुमचे घर

संभाव्य अर्थ: १) यरूशलेम नगर (पाहा यु डी बी ) किंवा २) मंदिर (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)