Matthew 20

Matthew 20:1

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांस सुरूवात करीत आहे.

म्हणून स्वर्गाचे राज्य एका घरधन्यासारखे आहे

जसा एखादा घरधनी त्याच्या जमिनीवर अधिकार करतो तसाच देव सर्व गोष्टींवर अधिकार करतो. (पाहा: उपमा)

स्वर्गाचे राज्य च्यासारखे आहे

१३:२४ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

त्याने ठरविल्यानंतर

"घरधन्याने ठरविल्यानंतर"

एक दिनार

"एका दिवसाची मजुरी" (पाहा: बायबलचा पैसा)

Matthew 20:3

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो. न तो परत बाहेर गेला

"घरधनी परत बाहेर गेला"

रिकामे उभे राहिलेले

"कांहीही करीत नसलेले" किंवा "ज्यांना काम नव्हते असे"

Matthew 20:5

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो.

तो परत बाहर गेला

"परत घरधनी बाहेर गेला"

रिकामे उभे राहिलेले

"कांहीही करीत नसलेले" किंवा "ज्यांना काम नव्हते असे"

Matthew 20:8

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो.

त्या प्रत्येकाला

"अकराव्या तासाला काम सुरु करणाऱ्या प्रत्येक मजुराला"

एक दिनार

"एका दिवसाची मजुरी" (पाहा: बायबलचा पैसा)

त्यांना असे वाटले

"ज्या कामकऱ्यानी दिवसभर काम केले होते त्यांनी"

Matthew 20:11

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो.

त्यांनी मजुरी घेतल्यावर

ज्या कामकाऱ्यानी दिवसभर काम केले होते त्यांनी मजुरी घेतल्यावर"

मालमत्तेचा मालक

"जमिनींचा मालक" किंवा द्राक्षमळ्याचा मालक"

आम्हांला ज्यांनी प्रखर उन्हात दिवसभर कष्ट उपसले त्यांना

"आम्हांला ज्यांनी उन्हातान्हात कष्ट केले त्यांना"

Matthew 20:13

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो.

त्यांतील एकाला

"ज्यांनी दिवसभर काम केल होते त्यांतील एका कामकऱ्याला"

गड्या

एक माणूस दुसऱ्या माणसाची विनयशीलपणे खरडपट्टी काढीत आहे अशा शब्दाचा उपयोग करा.

तू माझ्याबरोबर एक दिनाराचा ठरावा केला की नाही?

AT: "मी तुला एक दिनार देईन हे आपण अगोदरच ठरविले होते." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

एक दिनार

"एका दिवसाची मजुरी" (पाहा: बायबलचा पैसा)

अशी माझी इच्छा आहे

"हे मला देणे आवडते" किंवा "मला देण्यास आनद वाटतो"

Matthew 20:15

एक घरधनी त्याच्या दासांना मजुरी देतो तो दाखला येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यांचे पुढे चालू ठेवतो.

माझ्या मालमत्तेचे माझ्या मर्जीप्रमाणे करावयास मी मुखत्यार नाही काय?

AT: "माझ्या मालमत्तेचे माझी इच्छे प्रमाणे मी कांहीही करू शकतो" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कायदेशीर

"कायद्याला धरून" किंवा "न्याय" किंवा "योग्य"

किंवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?

ज्यांना मिळाले नाही त्या लोकांसाठी मी चांगले केले ह्याबद्दल तुला दु:ख वाटावयास नको."

Matthew 20:17

येरूशलेमस जात असता येशू त्याच्या शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

आपण जात आहो

येशू त्याच्या शिष्यांचा समावेश करीत आहे. (पाहा; समावेशीकरण)

मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यांत येईल

AT: "कोणीतरी मनुष्याच्या पुत्राला धरून देईल" (पाहा; कर्तरी किंवा कर्मणी)

ते मरणदंड ठरवितील......आणि त्याची थट्टा करावयास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील

मुख्य याजक आणि शास्त्री त्याला मरणदंड ठरवितील आणि त्याला परराष्ट्रीयाच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील.

तो पुन्हा उठविला जाईल

AT: "देवा त्याला पुन्हा उठवील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 20:20

दोन शिष्यांची आई येशू जवळ विनंती करते.

तुमच्या उजवीकडे....तुमच्या डावीकडे

"अधिकारांच्या स्थानांवर" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 20:22

येशू त्याच्या दोघा शिष्यांच्या आईला उत्तर देतो.

तुम्ही

आई आणि तिचे दोन मुलगे (पाहा: "तू" चे प्रकार

दुहेरी/अनेकवचनी)

तुम्ही सक्षम आहांत काय...?

येशू केवळ मुलांशीच बोलत आहे.

मी जो प्याला पिणार आहे तो प्याला पिता येईल काय

"मी जे दु:ख सहन करणार आहे ते तुम्ही सहन कराल काय" (पाहा: वाक्प्रचार)

ते

दोघे मुले

ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे

"माझ्या बाजूला बसण्याचा सन्मान माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केला आहे त्यांना मिळेल" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सिद्ध केला आहे

तयार केला आहे.

Matthew 20:25

येशूने त्यांच्या आईला जे सांगितले त्याचा उपयोग तो त्याच्या शिष्यांना शिकविण्यासाठी करीत आहे.

परराष्ट्रीयांचे अधिपति त्यांच्यावर प्रभुत्व चालवितात

"परराष्ट्रीयांचे अधिपति त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना करण्याची सक्ती करतात"

त्याचे महत्वपूर्ण पुरुष

अधिपति ज्या लोकांना अधिकार सोपवितात ते लोक

अधिकार गाजवितात

"च्यावर नियंत्रण ठेवतात"

आपला प्राण अर्पण करण्यांस

"मरावयाला तयार होण्यांस"

Matthew 20:29

येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करण्याचा अहवाल येथे सुरु होतो.

ते जात असतांना

हे येशूच्या शिष्यांबद्दल बोलत आहेत.

मागे चालला

"येशूला अनुसरला"

पाहा

लेखक वाचकांना येणाऱ्या अद्भुत माहितीकडे लक्ष देण्यांस सांगत आहे. हे करण्याचा तुमच्या भाषेत कांहीतरी मार्ग असेल.

जवळून जात होता

"त्यांच्या जवळून चालत होता"

ते अधिकच जोराने ओरडले

"ती आंधळी माणसे पूर्वीपेक्षा अधिकच जोराने ओरडली" किंवा "ते जोराने ओरडले"

Matthew 20:32

येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करण्याचा अहवाल पुढे चालू.

त्यांना बोलाविले

आंधळ्या माणसांना बोलाविले.

इच्छा

"गरज असणे'

आमचे डोळे उघडावे

AT: "आम्हांला दिसू लागेल असे तुम्ही करावे" किंवा "आम्हांला दिसू शकावे" (पाहा: वाक्प्रचार आणि पदलोप)

कळवला आला

"दया आली" किंवा "त्याला त्यांचा कळवळा आला"