Matthew 19

Matthew 19:1

येशू गालील सोडून यहूदीयामध्ये शिकविण्याचे सुरु करतो.

मग असे झाले की

कथेच्या नवीन भागाच्या सुरुवातीला चिन्हांकित करण्यासाठी तुमच्या भाषेमध्ये जर कांही मार्ग असेल तर येथे त्याचा उपयोग मारण्याचा विचार करा.

हे सर्व बोलणे

१८:१

३५ मधील सर्व शब्द

तेथून निघून गेला

"च्या पासून निघून गेला" किंवा "सोडून गेला"

त्या हद्दीत

"त्या क्षेत्रात"

Matthew 19:3

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे सुरु करतो.

त्याच्याजवळ आले

"येशू जवळ आले"

तुम्ही वाचले नाही काय...?

परुश्यांनी लाजेने माना खाली घालावयात अशी येशूची इच्छा होती (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 19:5

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो.

आणि त्याने असे म्हटले..?

पदन्यूनता प्रश्न पुढे चालू)

त्याच्या बायकोशी जडून राहील

"त्याच्या बायकोच्या जवळच राहील"

एक देह

"एक व्यक्ती (पाहा: रूपक)

Matthew 19:7

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो.

ते त्याला म्हणाले

"परुशी येशूला म्हणाले"

आम्हांला आज्ञा

"आम्हां यहूद्यांना आज्ञा द्या"

सूट पत्र

सुलभरित्या विवाह समाप्त होण्याचे दस्तावेज.

सुरुवातीपासून हे असे नव्हते

जेव्हा देवाने पुरुष व स्त्रीला निर्माण केले तेव्हा त्याने त्यांनी एकमेकांणा सूत्पात्र द्यावे अशी त्याने योजना आंखली नव्हती."

जारकर्माच्या कारणाशिवाय

"लैगिक अविश्वासू पणाच्या कारणाशिवाय"

टाकून दिलेल्या बाईबरोबर जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो. अनेक प्रारंभीच्या मजकूरांमध्ये हे शब्द नाहीत.

Matthew 19:10

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो.

आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत

"कार्यकारी लैगिक अवयवांशिवाय जन्मलेले पुरुष"

ज्यांनी स्वत:ल नपुंसक करून घेतले आहे असे नपुंसक

संभाव्य अर्थ १) "असे नपुंसक ज्यांनी स्वत: त्यांचे लैगिक अवयव छाटून टाकले आहेत" किंवा २) "पुरुष ज्यांनी अविवाहित राहून लैगिकरित्या स्वत:ला शुद्ध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे" (पाहा: रूपक)

स्वर्गाच्या राज्यासाठी

"अशाप्रकारे ते देवाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील"

ज्यांना ही शिकवण स्वीकारता येते...त्याने स्वीकारावी

१९:११ मध्ये तुम्ही ही शिकवण स्वीकारत येते....स्वीकारा" ह्याचे जसे भाषाणार केले आहे ते बघा.

Matthew 19:13

लोक बाळकांना येशूकडे आणतात.

कांही बालकांना त्याच्याकडे आणण्यांत आले

AT: "कांही लोकांनी बालकांना येशूकडे आणले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

परवानगी देणे

"अनुमति देणे"

त्यांना माझ्याकडे येऊ देण्यांस मना करू नका

"माझ्याकडे येण्यापासून त्यांना थांबवू नका"

कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे

"जे ह्यांच्या सारखे आहेत त्या लोकांचेच स्वर्गाचे राज्य आहे" किंवा "जे लोक ह्या लहान बाळकांसाराखे आहेत केवळ तेच स्वर्गाच्या राज्यांत जाऊ शकतील"

Matthew 19:16

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील बक्षीसें ह्याबद्दल येशू शिकविण्यांस सुरूवात करीत आहे.

पाहा

लेखक कथेमध्ये एका नवीन व्यक्तीला घेऊन येत आहे. तुमच्या भाषेमध्ये असे करण्याचा मार्ग असावा.

चांगली गोष्ट

देवाला प्रसन्न करते अशी गोष्ट

चांगला असा एकच आहे

"देव हाच संपूर्णपणे चांगला आहे"

Matthew 19:18

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

Matthew 19:20

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

इच्छा

"गरज"

Matthew 19:23

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

देवाच्या राज्यांत धनवानांचा प्रवेश होते ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे

श्रीमंत लोकांना देवाच्या राज्यांत प्रवेश करणे फारच कठीण आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

सुईचे नाक

धागा जाण्यासाठी सुईच्या एका टोकाला असलेले छिद्र.

Matthew 19:25

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

ते फार आश्चर्यचकित झाले

"शिष्य फार थक्क झाले"

कोणाचे तारण होणे शक्य आहे?

संभाव्य अर्थ: १) ते उत्तर शोधत होते किंवा २) AT: "मग होणाचे तारण होऊ शकणार नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आम्ही सर्व सोडून दिले आहे

"आम्ही आमची सर्व संपत्ती सोडून आलो अहो" किंवा "आम्ही आमच्या सर्व मालमत्तेचा त्याग केला आहे"

तर आम्हांला काय मिळणार

"कोणत्य चांगली गोष्टीं देव आम्हांला देईल"

Matthew 19:28

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

नवीन जन्मामध्ये

"ज्या वेळेस सर्व कांही नवीन केले जाईल तेव्हा" किंवा "नवीन युगांत"

बारा राजासनावर बसून, न्याय कराल

"च्यावर राजे आणि न्यायाधीश व्हाल" (सामीप्यमुलक लक्षणा)

Matthew 19:29

जगातील संपत्ती आणि स्वर्गातील प्रतिफळ ह्याबद्दल येशू शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

शंभर पटीने मिळेल

"त्यांनी ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्यापेक्षा शंभर पटीने जास्त चांगल्या गोष्टीं त्यांना प्राप्त होतील"

जे पहिले ते आता शेवटले होतील

जगाच्या दृष्टीने जे आता पहिले म्हणजे जे श्रीमंत आहेत आणि जे इतरांवर अधिकार चालवितात, ते एके दिवशी देवाच्या राज्यांत शेवटचे होतील.