Matthew 14

Matthew 14:1

येथे वर्णन केलेल्या घटनांच्या अगोदर १२ मध्ये घटनां घडल्या होत्या.

त्यावेळी

"त्या दिवसांत" किंवा "येशू सेवाकार्य करीत होता तेव्हा."

मांडलिक हेरोद

हेरोद अंतीपास हा एक चतुर्थांश इस्राएलाच राज्यकर्ता होता. (पाहा: नावांचे भाषांतर)

येशूच्या विषयी बातमी ऐकली

"येशूच्या विषयीचा अहवाल ऐकला" किंवा "येशूची कीर्ती ऐकली"

त्याने म्हटले

"हेरोदाने म्हटले"

Matthew 14:3

हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कसे ठार मारले ह्याचा अहवाल पुढे चालू.

हेरोदाने योहानाला धरून, बांधून कैदेत टाकले होते

बहुधा हेरोदाने त्याच्यासाठी हे सर्व करण्यांस दुसऱ्याना सांगितले असावे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

हेरोदाने योहानाला धरले

"हेरोदाने योहानाला अटक केले"

कारण योहानाने त्याला म्हटले होते की, "तू तिला तुझी बायको म्हणून ठेवावे हे तुला योग्य नाही"

कारण योहानाने त्याला सांगितले होते की, त्याने तिला आपली बायको म्हणून ठेवून घ्यावे हे त्याच्यासाठी कायदेशीर नव्हते." (पाहा: संभाषण अवतरण)

कारण योहानाने त्याला सांगितले होते

"कारण योहान हेरोदाला सांगतच राहिला होता" (see यु डी बी ).

हे कायदेशीर नाही

यु डी बी ने असे गृहीत धरले आहे की, हेरोदाने हेरोदियाशी लग्न केले तेव्हा फिलिप्प जिवंत होता, परंतु माणसाने आपल्या भावाच्या विधवेशी लग्न करावे हे मोशेच्या नियमशास्त्राने सुद्धा मना केले आहे.

Matthew 14:6

हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कसे ठार मारले ह्याचा अहवाल पुढे चालू.

सर्वांमध्ये

वाढदिवस समारंभास उपस्थित असलेल्या सर्व अतिथींच्या मध्ये (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 14:8

हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कसे ठार मारले ह्याचा अहवाल पुढे चालू.

तिच्या आईने तिला सूचना दिल्याप्रमाणे

AT: "नंतर तिच्या आईने तिला सूचना दिल्याप्रमाणे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सूचना दिली

"पढविले"

कशाबद्दल काय मागावे

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "कशाबद्दल मागावे" मूळ ग्रीक भाषेमध्ये हे शब्द नाहीत. ते संदर्भां द्वारे निहीत आहेत. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

ती म्हणाली

"ती" हे सर्वनाम हेरोदाच्या मुलीचा उल्लेख करतो.

तबक

मोठी सपाट थाळी

तिच्या मागणीने राजा खूप अस्वस्थ झाला

"तिच्या मागणीने राजाला खूप अस्वस्थ केले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

राजा

मांडलिक हेरोद अंतीपास (१४:१)

Matthew 14:10

हेरोदाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला कसे ठार मारले ह्याचा अहवाल पुढे चालू.

त्याचे शीर तबकांत तबकांत घालून मुलीला आणून दिले

"कोणीतरी त्याचे शीर तबकांत घालून त्या मुलीला आणून दिले." (पाहा: कर्तरी किंवा कर्माण)

तबक

फार मोठी थाळी

मुलगी

अविवाहित तरुण मुलीसाठी जो शब्द आहे तो वापरा

त्याचे शिष्य

"योहानाचे शिष्य"

प्रेत

"मृत शरीर"

त्यांनी येशूला जाऊन सांगितले

"बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला काय झाले हे योहानाच्या शिष्यांनी येशूला सांगितले." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 14:13

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ठार मारले आहे हे ऐकल्यानंतर येशू निर्जन ठिकाणी गेला.

हे ऐकले

"योहानाला काय झाले हे ऐकले" किंवा "योहानाविषयी वर्तमान ऐकले." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

निघून गेला

तो गेला किंवा लोकसमुदायापासून दूर गेला.

तेथून

"त्या ठिकाणापासून"

जेव्हा लोकसमुदायाने ऐकले

"ते कोठे गेले होते हे जेव्हा लोक समुदायाने ऐकले" (पाहा यु डी बी ) किंवा "तो निघून गेला असे जेव्हा लोक समुदायाने ऐकले"

"लोकांचे समुदाय" किंवा लोक"

मग येशू त्यांच्या अगोदर आला आणि त्याने मोठ लोकसमुदाय पाहिला

"जेव्हा येशू किनाऱ्यावर आला, तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला."

Matthew 14:15

येशूच्या मागे निर्जन स्थळी गेलेल्या लोकसमुदायाला तो खावयास देतो.

त्याचे शिष्य त्याच्याकडे आले

येशूचे शिष्य त्याच्याकडे आले"

Matthew 14:16

येशूच्या मागे निर्जन स्थळी गेलेल्या लोकसमुदायाला तो खावयास देतो.

त्यांना गरज नाही

"लोकसमुदायातील लोकांना गरज नाही"

तुम्ही त्यांना दय

"तुम्ही" हा शब्द बहुवचन आहे, जो शिष्यांचा उल्लेख करतो. (पाहा: तू चे प्रकार)

त्यांनी त्याला सांगितले

"शिष्यांनी येशूला सांगितले"

पांच भाकरी व दोन मासे

"५ भाकरी आणि २ मासे" (पाहा: संख्येचे भाषांतर)

ते इकडे माझ्याजवळ आणा

"भाकरी आणि मासे माझ्याजवळ आणा"

Matthew 14:19

येशूच्या मागे निर्जन स्थळी गेलेल्या लोकसमुदायाला तो खावयास देतो.

खाली बसा

किंवा "आडवे पडा" तुमच्या संस्कृतीमध्ये साधारणपणे लोक कोणत्या अवस्थेमध्ये जेवावयाला बसतात तो शब्द येथे वापरा.

घेतल्या

"त्याने हातात धरल्या." "त्याने त्या चोरल्या नाहीत" (पहा: वाक्प्रचार)

पावांच्या लाद्या

"भाकरी" किंवा "सर्व भाकरी"

आणि पाहात

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो: १) पाहात असतांना" किंवा "पाहिल्यानंतर."

त्यांनी घेतल्या

"शिष्यांनी गोळा केल्या."

जे जेवले ते

"ज्यांनी भाकरी आणि मासे खाल्ले ते." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 14:22

येशू पाण्यावर चालतो.

लागलेच

"येशूने पांच हजारांना जेवू घातल्यानंतर,"

जेव्हा रात्र झाल्यावर

"संध्याकाळी उशीरा" किंवा "जेव्हा अंधार झाला तेव्हा"

लाटांमुळे जवळ जवळ ताब्यांत ठेवता न येणारा

"लाटां तारूवर आदळत होत्या."

Matthew 14:25

येशू पाण्यावर चालतो.

येशू समुद्रावर चालत होता

"येशू पाण्याच्यावर चालत होता"

ते घाबरून गेले

"शिष्य फारच घाबरले होते"

भूत

मेलेल्या माणसाचा त्याला सोडून गेलेला आत्मा

Matthew 14:28

येशू पाण्यावर चालतो,

पेत्राने त्याला उत्तर दिले

"पेत्राने येशूला उत्तर दिले"

Matthew 14:31

येशू पाण्यावर चालतो.

"अरे अल्पविश्वासी"

६:३० मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

तू संशय का धरिलास

"तू संशय करावयास नको होता." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 14:34

निर्जन ठिकाणावरून परत आल्यानंतर येशू गालीलामध्ये त्याचे सेवाकार्य पुढे चालू ठेवतो.

जेव्हा ते पलीकडे गेले तेव्हा

"जेव्हा येशू व त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा"

गनेसरेत

गालील समुद्राच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले एक छोटे शहर (पाहा: नावांचे भाषांतर)

त्यांनी संदेश पाठविले

"त्या क्षेत्रातील माणसांनी संदेश पाठविले"

त्यांनी त्याला विनंती केली

"त्या दु:खणाइतांनी त्याला विनंती केली"

वस्त्र

"झगा" किंवा "त्याने काय घाले होते ते"