Matthew 13

Matthew 13:1

ह्या अध्यायामध्ये येशू, किनाऱ्यावर असलेल्या एका मचव्यामध्ये बसून लोकसमुदायाच्या मोठ्या जमावास देवाचे राज्य कशासारखे आहे हे त्यांना दाखल्यांद्वारे स्पष्ट करीत आहे.

त्या दिवशी

मागील अध्यायांतील त्याच दिवशी ह्या घटनां घडल्या होत्या.

घरातून निघून

येशू कोणाच्या घरी रहात होता ह्याबद्दल येथे कांहीच नमूद केले नाही.

मचव्यांत जाऊन बसला

ही कदाचित शीड असलेली लाकडाची उघडी नाव होती.

Matthew 13:3

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करीत आहे.

येशूने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टीं सांगितल्या

येशूने त्यांना दाखल्याद्वारे खूप गोष्टी सांगितल्या" # त्याने

जे लोक गर्दीत होते.

पाहा

पर्यायी भाषांतर: "बघा" किंवा "ऐका" किंवा " मी तुम्हांला जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका."

पेरणारा पेरणी करावयास गेला

"शेतकरी शेतामध्ये कांही बी फेकण्यासाठी गेला."

तो पेरीत असता

"जस पेरणारा पेरीत असतांना"

रस्त्याच्या बाजूला

शेताच्या बाजूची पाऊल वाट. लोक त्या वाटेने ये जा करीत असतात म्हणून ती वाट कठीण झाली असावी.

खाऊन टाकले

"सर्व बी खाऊन टाकले"

खडकाळ जमीन

खडकावर असलेली उथळ माती

ते लवकर उगवले

"बी लवकर अंकुरले आणि वाढले"

ते करपले

"सूर्याने त्या रोपट्याला करपून टाकले आणि ते खूप गरम झाले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते वाळून गले

"ते रोपटे सुकून गेले आणि नष्ट झाले"

Matthew 13:7

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट काणे पुढे चालू ठेवतो.

कांटेरी झाडांमध्ये पडले

"जेथे कांटेरी झाडे सुद्धा वाढतात तेथे पडले"

वाढ खुंटविली

"नवीन अंकुरांस खुंटविले." निदण जसे इतर रोपट्यांची वाढ खुंटविते त्यासाठी जो नेहमीचा शब्द आहे तोच वापरा.

धान्याचे उत्पन्न आले

"पीक आले" किंवा "अधिक धान्य झाले" किंवा "फळ आले"

ज्याला कान आहेत तो ऐको

द्वितीय पुरुषाचा उपयोग करणे कांही भाषांमध्ये अधिक स्वाभाविक वाटत असावे: "तुम्हां ज्या कोणाला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको" (पाहा: प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष)

ज्याला कान आहेत तो

"जो ऐकू शकतो तो" किंवा "जो माझे ऐकतो तो"

तो ऐको

"त्याने चांगले ऐकावे" किंवा "कि जे कांही सांगतों त्याने ते नीट ऐकावे"

Matthew 13:10

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट काणे पुढे चालू ठेवतो.

त्यांना

शिष्यांना

स्वर्गाच्या राज्याची रहस्यें जाणण्याचे दान तुम्हांस दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही

ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये नाहीत आणि माहिती सहित भाषांतर केले जाऊ शकते: "स्वर्गाच्या राज्याची रहस्यें जाणण्याचा विशेषाधिकार देवाने तुम्हांस दिलेला आहे, परंतु देवाने ह्या लोकांना तो दिलेला नाही." किंवा "स्वर्गाच्या राज्याची रहस्यें जाणण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम केले आहे, परंतु त्याने ह्या लोकांना सक्षम केले नाही." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)

तुम्हांला

शिष्यांना

रहस्यें

झाकून ठेवलेली रहस्यें परंतु आता येशू त्यांना प्रकट करीत आहे. पर्यायी भाषांतर: "गुप्त गोष्टीं" किंवा "झाकलेली सत्यें" (see यु डी बी ).

ज्या कोणाजवळ आहे

"जो कोणी शहाणा आहे" किंवा "मी जे शिकवितो ते जो स्वीकारतो."

त्याला अधिक दिले जाईल

ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते: "देव त्याला अधिक समजबुद्धि देईल." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याला भरपूर होईल

"त्याला स्पष्टपणे समजेल"

ज्या कोणाजवळ नाही

"ज्या कोणाला समजबुद्धि नाही" किंवा "मी जे शिकवितो ते जो स्वीकारीत नाही"

त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल

ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते: "त्याच्याजवळ जे कांही आहे ते देखील देव काढून घेईल" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 13:13

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

मी त्यांच्याशी बोलतो

"त्यांचाय्शी" हे सर्वनाम ह्या दोन वचनांत असलेल्या लोकसमुदायाचा उल्लेख करतो.

कारण जरी ते पाहातात, तरी खऱ्या अर्थाने ते पाहात नाहीत, आणि जरी ते ऐकतात तरी खऱ्या अर्थाने ते ऐकत नाहीत

लोकसमुदाय ऐकण्याचे नाकारत आहे हे त्याच्या शिष्यांना सांगण्यासाठी येशू समांतरवादाचा उपयोग करीत आहे. (पाहा: समांतर वाद)

जरी ते पाहतात, तरी खऱ्या अर्थाने ते पाहात नाहीत

"जरी ते पाहातात तरी ते ओळखू शकत नाहीत." जर क्रियापदाला कर्माची गरज आहे, तर ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "जरी ते गोष्टीं पाहातात, त्यांना ते समजू शकत नाहीत" किंवा "जरी कांही गोष्टी घडत असतांना ते पाहातात, तरी त्यांचा अर्थ त्यांना समजत नाही." (पाहा: क्रियापद)

जरी ते ऐकतात, तरी खऱ्या अर्थाने ते ऐकत नाहीत, आणि समजतहि नाहीत

"जरी ते ऐकतात, त्यांना समजत नाही" जर क्रियापदाला कर्माची गरज आहे, तर ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "जरी ते सूचनांना ऐकतात, तरी ते सत्य समजत नाहीत."

  • तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणारच नाही, तुम्ही पाहाल तर खरे, परंतु दिसणारच नाही

यशयाच्या काळातील अविश्वासणाऱ्या बद्दलचे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातील हे अवतरण येथे सुरु होते. जो लोकसमुदाय येशूचे ऐकत होता त्यांचे वर्णन करण्यासाठी येशू ह्या अवतरणाचा उपयोग करीत आहे. हा आणखीन एक समांतरवाद आहे. (पाहा: समांतरवाद)

तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणारच नाही

ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "तुम्ही ऐकाल. परंतु तुम्ही समजणार नाहीत" जर क्रियापदाला कर्माची गरज आहे, तर ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "तुम्ही गोष्टीं ऐकाल परंतु त्यांना तुम्ही समजणार नाहीत."

तुम्ही पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणारच नाही

"तुम्ही बघाल परंतु तुम्ही ओळखणार नाही." जर क्रियापदाला कर्माची गरज आहे, तर ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "तुम्ही गोष्टींना पाहाल, परंतु तुम्ही त्यांना ओळखणारच नाही."

Matthew 13:15

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:१४ मधील यशयाच्या शब्दांची तो पुनरावृत्ती करण्याचे चालू ठेवतो.

लोकांचे अंत:करण जड झाले आहे

"हे लोक यापुढे कधीच शिकू शकणारच नाहीत" (पाहा यु डी बी ).

ते कानांनी मंद ऐकतात

"त्यांना यापुढे ऐकण्याची इच्छा नाही" (पाहा यु डी बी ).

त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत

"त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत" किंवा "त्यांनी बघण्याचे नाकारले आहे"

कदाचित त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये, आपल्या अंत:करणाने समजू नये, आणि परत वळू नये

"आणि म्हणून ते आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत, त्यांच्या कानांनी ऐकणार नाहीत, त्यांच्या अंत:करणाने समजणार नाहीत, आणि परिणामत: वळणार नाहीत."

परत वळणे

"मागे फिरणे" किंवा "पश्चात्ताप करणे"

आणि मी त्यांना बरे करावे

"त्यांना बरे करणे मला भाग पडावे." पर्यायी भाषांतर: "आणि मी त्यांना परत स्वीकारावे." (पाहा: रूपक)

Matthew 13:16

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

तुमचे....तुम्ही

येशू त्याच्या शिष्यांशी बोलत आहे

कारण ते पाहात आहेत

"कारण ते पाहू शकतात" किंवा "कारण ते बघाण्यांस सक्षम आहेत"

कारण ते ऐकत आहेत

"कारण ते ऐकू शकतात" किंवा "कारण ते ऐकण्यास सक्षम आहेत"

तुम्ही जे पाहात आहा

"मी करत असलेल्या गोष्टीं तुम्ही पाहात आहात"

तुम्ही जे ऐकत आहां

"मी बोलत असलेल्या गोष्टीं तुम्ही ऐक आहात"

Matthew 13:18

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:८ मध्ये त्याने जो दाखला सांगितला होता त्याचे येथे तो स्पष्टीकरण देत आहे.

तेव्हा

याऱ्य तो दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणांत पेरलेले ते हिरावून घेतो

त्याने जे देवाचे वचन ऐकले आहे ते त्याला विसरण्यांस सैतान भाग पाडतो."

हिरावून घेतो

रास्त मालकाकडून कांहीतरी जबरदस्तीने हिसकावून घेणे अशा अर्थाचा शब्द येथे वापरण्याचा प्रयत्न करा.

त्याच्या अंत:करणांत पेरलेले ते

कर्तरी प्रयोगामध्ये ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "देवाने त्याच्या अंत:करणांत वचन पेरले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याच्या अंत:करणांत

ऐकणाऱ्याच्या अंत:करणांत.

वाटेवर पेरलेला तो हा आहे

जर शब्दश: भाषांतराचा कांही अर्थ बनत नाही, तर अशाप्रकारे भाषांतर करण्याचा प्रयत्न करा की, वाचक हे समजेल की, येशू हा पेरणारा आहे, संदेश हे बी आहे, आणि ऐकणारा ही वाटेवरील माती आहे. संभाव्य भाषांतर: "जे वाटेवर पेरले गेले होते ते अशाप्रकारचे आहे." (पाहा: उपमा आणि पदलोप)

वात

"रस्ता" किंवा "पाऊलवाट" १३:४ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच येथे सुद्धा करा.

Matthew 13:20

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:८ मध्ये त्याने जो दाखला सांगितला होता त्याचे येथे तो स्पष्टीकरण देत आहे.

खडकाळीवर पेरलेला तो हा आहे

जर शब्दश: भाषांतराचा कांही अर्थ बनत नाही, तर अशाप्रकारे भाषांतर करण्याचा प्रयत्न करा की, वाचक हे समजेल की, येशू हा पेरणारा आहे, संदेश हे बी आहे, आणि ऐकणारा हा खडकाळ भूमि आहे. संभाव्य भाषांतर: "जे खडकाळीवर पेरले गेले होते ते अशाप्रकारचे आहे." (पाहा: उपमा आणि पदलोप)

त्याला मूळ नाही

"त्याचे मूळ उथळ आहे" किंवा "तो नवीन रोपट्याला मूळ धरण्यांस जागा देत नाही" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार आणि सामीप्यमुलक लक्षणा)

वचनामुळे

"संदेशामुळे"

तो लागलाच अडखळतो

"त्वरित तो मागे जातो" किंवा "लगेच तो त्याचा विश्वास सोडून देतो." (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 13:22

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. १३:८ मध्ये त्याने जो दाखला सांगितला होता त्याचे येथे तो स्पष्टीकरण देत आहे.

कांटेरी झाडांमध्ये पेरेलेला तो हा आहे.....चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे

जर शब्दश: भाषांतराचा कांही अर्थ बनत नाही, तर अशाप्रकारे भाषांतर करण्याचा प्रयत्न करा की, वाचक हे समजेल की, येशू हा पेरणारा आहे, संदेश हे बी आहे, आणि ऐकणारा हा कांटेरी भूमि आहे. संभाव्य भाषांतर: "जे कांटेरी झाडांमध्ये पेरले गेले होते ते अशाप्रकारचे आहे.....जे चांगल्या जमिनीत पेरले गेले होते ते अशाप्रकारचे आहे." (पाहा: उपमा आणि पदलोप)

वचन

"संदेश"

संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो

ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "जशी रानटी झुडपे चांगल्या रोपट्याची वाढ खुंटवितात, त्याप्रमाणे संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह ह्या माणसाला फलदायी होऊ देत नाही." (पाहा: रूपक)

संसाराची चिंता

"ह्या जगातील गोष्टीं ज्याबद्दल लोक चिंता करतात"

निष्फळ होतो

"अनुत्पादक होतो"

तो ह आ आहे की जो फळ देतोच देतो

"हे ते आहेत जे फलदायी आणि उत्पादनक्षम आहेत" किंवा "चांगले फळ देणाऱ्या निरोगी झाडांसारखे आहेत, हे लोक उत्पादनक्षम आहेत." (पाहा: रूपक आणि उपमा)

Matthew 13:24

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला

येशुने लोकसमुदायाला दुसरा दाखला सांगितला.

स्वर्गाचे राज्य एका मनुष्यासारखे आहे

भाषांतराने स्वर्गाचे राज्य मनुष्यासारखे आहे असे दाखवू नये तर, त्याऐवजी ते दाखल्यामध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीसारखे आहे असे दाखवावे (see यु डी बी ).

चांगले बी

"चांगल्या अन्नाचे बी" किंवा "चांगल्या धान्याचे बी" प्रेक्षकांना कदाचित असे वाटले असावे की येशू गव्हाबद्दल बोलत आहे. (पाहा स्पष्ट आणि अस्पष्ट)

त्याचा वैरी आला

"त्याचा वैरी शेतात आला."

निदण

ह्याचे असे भाषांतर होऊ सहकार "वाईट बी" किंवा "रानटी बी." निदणाचे रोपटे जेव्हा वाढते तेव्हा ते अन्नासारखेच दिसते परंतु त्याचे धान्य विषारी असते.

जेव्हा पाला फुटला

"जेव्हा गव्हाचे बी अंकुरले" किंवा "जेव्हा रोपटे विकसित झाले"

जेव्हा पीक आले

"धान्य आले" किंवा "जेव्हा गव्हाचे पीक आले"

तेव्हा निदण सुद्धा दिसले

पर्यायी भाषांतर: "तेव्हा शेतात निदण सुद्धा आले असे लोक पाहू शकले."

Matthew 13:27

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. ह्या वचनात निदणाचा दाखला पुढे चालू.

घरधनी

शेतामध्ये चांगले बी पेरणारा हाच तो मनुष्य होय.

आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले होते का?

"आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले होते" घरधन्याने कदाचित त्याच्या दासांकडून बी पेरून घेतले असावे (see यु डी बी ). (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न आणि [en:ta:translate:metonymy|]]).

तो त्यांना म्हणाला

"घरधनी दासांना म्हणाला" न आपली इच्छा आहे की आम्ही

"आम्ही" हा शब्द दासांचा उल्लेख करतो.

त्यांना गोळा करा

फेकून देण्यासाठी "निदण उपटून टाका" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 13:29

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो. ही वचनें निदणाच्या दाखल्यास समाप्त करतात.

घरधनी म्हणाला

घरधन्याने त्याच्या दासांना म्हटले."

मी कापणाऱ्यास सांगेन

"पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारांत सांठवा"

अप्रत्यक्ष अवतरण म्हणून तुम्ही ह्याचे भाषांतर करू शकता: "मी कापणाऱ्याना सांगेन की प्रथम निदण गोळा करून ते जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, आणि नंतर गहू माझ्या कोठारांत सांठवा." (पाहा: संभाषण अवतरण)

माझे कोठार

कोठार ही शेतामधली इमारत आहे ज्यांत धान्य साठवून ठेवू शकतो.

Matthew 13:31

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

येशूने आणखी एक दुसरा दाखला त्यांना प्रस्तुतु केला

"येशूने लोकसमुदायाला आणखी एक दुसरा दाखला सांगितला"

स्वर्गाचे राज्य च्या सारखे आहे

१३:२४ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले ते पाहा.

मोहरीचा दाणा

अगदी लहानसे बी जे मोठ्या वनस्पतीमध्ये वाढते (पाहा: अपरिचितांचे भाषांतर)

दुसऱ्या बियांपेक्षा हे बी सर्वांत लहान असते

मोहरीचे दाणे हे सर्वांत लहान दाणे असतात हे श्रोत्यांना माहित होते. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

परंतु जेव्हा ते वाढले

"परंतु जेव्हा ते रोपटे वाढले"

त्याचे झाड झाले

"मोठे झुडूप होते" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार आणि उपमा आणि अपरिचितांचे भाषांतर)

आकाशांतील पांखरें

"पक्षी" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 13:33

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

येशूने तेव्हा त्यांना आणखी एक दुसरा दाखला सांगितला

"येशूने तेव्हा लोकसमुदायाला आणखी एक दुसरा दाखला सांगितला"

स्वर्गाचे राज्य च्या सारखे आहे

तुम्ही उपमेमध्ये ह्याचे कसे भाषांतर केले ते पाहा)

तीन मापें पीठ

"मोठ्या प्रमाणात पीठ" तुमच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात पीठ मापायाच्या मापासाठी जर शब्द असेल तर त्याचा उपयोग करा (पाहा यु डी बी ).

ते फुगे पर्यंत

कणीक फुगेपर्यंत. निहीत अर्थ असा आहे की खमीर आणि तीन मापें पीठ भाजण्यासाठी माळून ठेवले होते. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

Matthew 13:34

येशू मोठ्या लोकसमुदायाला देवाचे राज्य कशासारखे आहे हे विविध दाखले सांगून स्पष्ट करणे पुढे चालू ठेवतो.

ह्या सर्व गोष्टीं येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या; आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर कांही बोलला नाही

क्रम सांगितले.....दाखले....दाखले...सांगितले" ह्यांवर भर देण्याचा अर्थ असा की तो त्यांच्याशी दाखल्यानेच बोलला.

ह्या सर्व गोष्टीं

येशूने १३:१ पासून ज्या गोष्टीं शिकविल्या त्या सर्व.

दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर कांही बोलला नाही

"त्याने त्यांना जे कांही शकविले ते दाखल्याद्वारेच शिकविले." पर्यायी भाषांतर: "सर्वकांही जे त्याने त्यांना सांगितले ते दाखल्यातच सांगितले." (पाहा: अतिशयोक्ती अलंकार आणि पर्यायोक्ती)

संदेष्ट्यांच्या द्वारे जे कांही सांगितले होते ते पूर्ण व्हावे, असे त्याने सांगितले

ह्याचे कर्तरी क्रियापदात भाषांतर केले जाऊ शकते: "पाहर पूर्वी देवे एका संदेष्ट्याला जे कांही लिहावयास सांगितले होते ते त्याने खरे केले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जेव्हा त्याने सांगितले

"जेव्हा संदेष्ट्याने सांगितले"

गुप्त ठेवलेल्या गोष्टीं

ह्याचे कर्तरी क्रियापदामध्ये भाषांतर केले जाऊ शकते: "देवाने गुप्त ठेवलेल्या गोष्टीं." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जगाच्या स्थापनेपासून

"जगाच्या प्रारंभापासून" किंवा "देवाने जग निर्माण केल्यापासून."

Matthew 13:36

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो.

तो घरांत गेला

"घरामध्ये गेला" किंवा "तो जेथे राहात होता त्या घरांत गेला."

जो पेरतो तो

"पेरणारा"

मनुष्याचा पुत्र

येशू येथे स्वत:चा उल्लेख करतो

राज्याचे पुत्र

"लोक जे राज्याचे रहिवासी आहेत ते"

दुष्टाचे पुत्र

"लोक जे दुष्टाचे आहेत ते"

ते पेरणारा तो वैरी

निदण पेरणारा तो वैरी.

जगाचा अंत

"युगाची समाप्ती"

Matthew 13:40

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो.

म्हणून, जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात

ह्याचे कर्तरी क्रियापदामध्ये भाषांतर केले जाऊ शकत: "म्हणून, जसे लोक निदण गोळा करून त्यांना अग्नीत जाळतात." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जगाचा अंत

"युगाची समाप्ती"

मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील

येशू येथे स्वत:बद्दल बोलत आहे. ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "मी, मनुष्याचा पुत्र, मी माझ्या दूतांना पाठविन."

ते जे सर्व अनाचार करणारे

"ते जे सारे नियमशास्त्र भंग करणारे" किंवा "दुष्ट लोक"

अग्नीची भट्टी

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "धगधगणारी भट्टी." जर "भट्टी" ही अपरिचित असेल तर "एक प्रकारची मोठी चूल" तिचा उपयोग केला जाऊ शकतो.

सूर्यासारखे प्रकाशतील

"सूर्याला जसे बघतो तसे बघण्यांस सोपे" (पाहा: उपमा)

ज्याला कान आहेत तो ऐको

कांही भाषांमध्ये द्वितीय पुरुषाचा उपयोग केल्यास अधिक स्वाभाविक वाटेल: "तुम्ही जे तुम्हांला कान आहेत ते ऐका" किंवा "तुम्हांला कान आहेत तर तुम्ही ऐका" (पाहा: प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष)

Matthew 13:44

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो. ह्या दोन दाखल्यांमध्ये, येशू त्याच्या शिष्यांना स्वर्गाचे राज्य हे कशासारखे आहे हे शिकविण्यासाठी दोन उपमांचा उपयोग करतो (पाहा: उपमा)

स्वर्गाचे राज्य च्या सारखे आहे

तुम्ही उपमेमध्ये ह्याचे कसे भाषांतर केले ते पाहा)

शेतात लपविलेली ठेव

ठेव ही फार मौल्यवान बहुमोल वस्तू आहे किंवा गोष्टींचा संग्रह आहे. ह्याचे कर्तरी क्रियापदा सोबत भाषांतर केले जाऊ शकते: "कोणीतरी शेतामध्ये लपविलेली ठेव" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तिला लपविले

"तिला झांकले"

आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो

माहिती अशी आहे की, तो व्यक्ती त्या शेतात्तील ठेविला प्राप्त करण्यासाठी ते शेत विकत घेतो. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

व्यापारी

व्यापारी हा व्यवसायी किंवा घाऊक विक्रेता असतो, जो नेहमी विक्रीचा माल विविध जागेतून प्राप्त करतो.

मोलावान मोत्याचा शोध करणे

निहीत माहिती अशी आहे की तो मनुष्य मोलवान मोत्याचा शोध ह्यासाठी करीत होता की त्याला तो विकत घेऊ शकेल. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

मोलावान मोती

ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "उत्तम मोती" किंवा "सुंदर मोत्ती" "मोती" हा समुद्रातील शिंपल्या मध्ये तयार झालेला गुळगुळीत, कठीण, चमकदार, सफेद किंवा रंगीत मणी आहे जो रत्नासारखा खूप मौल्यवान असतो आणि त्याचे बहुमोल दागिने सुद्धा केले जातात.

Matthew 13:47

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो. ह्या दाखल्यांमध्ये, येशू त्याच्या शिष्यांना स्वर्गाचे राज्य कशासारखे आहे हे शिकविण्यासाठी परत उपमेचा उपयोग करतो (पाहा: उपमा)

स्वर्गाचे राज्य च्या सारखे आहे

तुम्ही उपमेमध्ये ह्याचे कसे भाषांतर केले ते पाहा)

समुद्रांत टाकलेल्या एखाद्या जाळ्यासारखे आहे

ह्याचे कर्तरी क्रियापदा सोबत भाषांतर केले जाऊ शकते: "कांही मासे धरणाऱ्यानी समुद्रांत जाळे टाकल्यासारखे आहे."

समुद्रांत टाकलेले जाळे

"समुद्रांत फेकलेले जाळे"

सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात

"सर्व प्रकारचे मासे पडकले"

ते किनाऱ्याकडे ओढले

"त्या जाळ्याला वर किनाऱ्याकडे ओढून नेले" किंवा "जाळ्याला किनाऱ्याजवळ ओढले" # चांगल्या गोष्टी

जे चांगल # निरउपयोगी गोष्टी

खराब मासे किंवा खाण्यास अयोग्य मासे

फेकून दिले

"ठेवले नाही"

Matthew 13:49

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो.

जगाचा अंत

"युगाची समाप्ती"

बाहेर येऊन

"बाहेर ये" किंवा "बाहर जा" किंवा "स्वर्गातून येणे"

त्यांना फेकतील

"दुष्टांना फेकून देतील"

अग्नीची भट्टी

ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "धगधगणारी भट्टी" "हे नरकाच्या अग्नीसाठी रूपक आहे जे दानिएल ३:६ ह्या जुन्या कारारात असलेल्या प्रतिमेचा उपयोग करते. (पाहा: रूपक) जर अग्नीची भट्टी हा शब्द परिचित नसेल तर "एक प्रकारची मोठी चूल" ह्या शब्दाचा उपयोग करू शकता.

तेथे रडणे व दांत खाणे चालेल

"जेथे दुष्ट लोक रडतील आणि त्यांचे दांत खातील"

Matthew 13:51

स्वर्गाच्या राज्याच्या दाखल्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू त्याच्या शिष्यांबरोबर एका घरांत जातो व ते तो पुढे चालू ठेवतो.

"तुम्हांला ह्या सर्व गोष्टीं समजल्या काय?" शिष्यांनी त्याला म्हटले, "होय"

जर आवश्यकता भासल्यास, ह्याला अप्रत्यक्ष अवतरण म्हणून लिहिले जाऊ शकते, जसे "येशूने त्यांना विचारले, की त्यांना हे सर्व समजले काय, आणि त्यांनी म्हटले त्यांना समजले." (पाहा: संभाषण अवतरण)

चा शिष्य झाला आहे

"बद्दल शिकला आहे"

भांडार

भांडार हे फार मौल्यवान व बहुमोल वस्तू आहे, किंवा गोष्टींचा संग्रह आहे. येथे ह्या सर्व गोष्टीं सांठवून ठेवण्यासाठी असलेली जागा असा ह्याचा उल्लेख केला आहे, "खजिना" किंवा "कोठार."

Matthew 13:54

येशूने स्वत:च्या गावांतील सभास्थानांत जाऊन लोकांना शिकविले परंतु त्यांनी त्याचा कसा अस्वीकार केला ह्याचा हा अहवाल आहे.

त्याच्या स्वत:च्या क्षेत्रांत

"त्याच्या स्वत:च्या गांवी" (पाहा यु डी बी )

त्यांच्या साभास्थानांमध्ये

"त्यांच्या" हे सर्वनाम त्या क्षेत्रातील लोकांचा उल्लेख करते.

ते आश्चर्यचकित झाले

"ते थक्क झाले"

आणि ही अद्भूत कृत्यें

"ही अद्भुत कृत्यें करण्याचे सामर्थ्य ह्याला कोठून" (पाहा: पदलोप)

सुताराचा पुत्र

सुतार म्हणजे लाकडांपासून वस्तू बनविणारा.जे "सुतार" हा शब्द परिचित नसेल तर "बांधकाम" करणारा ह्या शब्दाचा उपयोग करू शकता.

Matthew 13:57

येशूने स्वत:च्या गावांतील सभास्थानांत जाऊन लोकांना शिकविले परंतु त्यांनी त्याचा कसा अस्वीकार केला ह्याचा अहवाल पुढे चालू.

ते त्याच्या द्वारे अडखळले

"येशूच्या गावांतील लोकांनी त्याला मानण्याचे नाकारले" किंवा "..त्याचं स्वीकार करण्यांस तयार नव्हते"

एका संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही

सगळीकडे संदेष्ट्याचा सन्मान होतो" किंवा "संदेष्ट्याला सगळीकडे सन्मान प्राप्त होतो" किंवा "सगळीकडे लोक संदेष्ट्याला सन्मान देतात"

त्याच्या स्वत:चा देश

"त्याचे स्वत:चे क्षेत्र" किंवा "स्वत:चे गाव"

त्याचे स्वत:चे कुटुंब

"त्याचे स्वत:चे घर"

त्याने तेथे फारशी अद्भुत कृत्यें केली नाहीत

"येशूने त्याच्या स्वत:च्या गावांत फार चमत्कार केले नाही."