Matthew 12

Matthew 12:1

भूक मिटविण्यासाठी येशूच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे तोडून खाल्यामुळे परुश्यांनी त्यांची टीका केली तेव्हा याऱ्य येशूने त्यांचा बचाव केला.

धान्याचे शेत

धान्याची वनस्पती पेरण्याची जागा. जर गहू अपरिचित असतील आणि "धान्य" फारच सामान्य असेल, "शेतातील वनस्पतीपासून ते भाकर बनवितात."

कणसे तोडून खातात... आणि शब्बाथ दिवशी जे कायदेशीर नाही ते करतात

दुसऱ्याच्या शेतातील कणसे तोडून खाणे हे चोरी करणे समजले जात नव्हते (पाहा यु डी बी ). प्रश्न हा होता की ही अन्यथा कायदेशीर क्रिया एखादा शब्बाथ दिवशी करू शकत होता का.

ती

कणसे

कणसे

हा गव्हाच्या वनस्पतीचा सर्वांत वरचा भाग आहे, जो मोठ्या गवतासारखा दिसतो. जो परिपक्व धान्यास किंवा बियांस एकत्र धरून ठेवतो.

पाहा

पर्यायी भाषांतर: "बघा" किंवा "ऐका" किंवा "मी जे सांगत आहे त्याकडे लक्षपूर्वक ध्यान द्या."

Matthew 12:3

भूक मिटविण्यासाठी येशूच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे तोडून खाल्यामुळे परुश्यांनी त्यांची टीका केली तेव्हा याऱ्य येशूने त्यांचा बचाव करणे पुढे चालू ठेवतो.

त्यांनी...तुम्ही

परुशी

तुम्ही वाचले नाही काय

ते जे कांही वाचतात त्यापासून ते कांही शिकत नाहीत म्हणून येशू परुशी लोकांना थोडासा दटावीत आहे. पर्यायी भाषांतर: "तुम्ही ज्याबद्दल जे कांही वाचले आहे त्यातून शिकावयास हवे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तो ...त्याने

दावीद

समर्पित भाकरी

देवाला दिलेल्या आणि त्याच्यासमोर ठेवलेल्या भाकरी (UBD)

जे त्याच्याबरोबर होते त्यांनी

"दाविदाबारोबर असलेल्या माणसांनी."

फक्त याजकांसाठीच कायदेशीर आहे

"फक्त याजकांना खाण्याची परवानगी होती (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 12:5

भूक मिटविण्यासाठी येशूच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे तोडून खाल्यामुळे परुश्यांनी त्यांची टीका केली तेव्हा याऱ्य येशूने त्यांचा बचाव करणे पुढे चालू ठेवतो.

तुम्ही...तुम्हांस

परुशी

नियमशास्त्रांत तुम्ही वाचले नाही काय

"तुम्ही नियामशास्त्र वाचले आहे, आणि म्हणून ते काय सांगते हे तुम्हांला माहित आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

शब्बाथ मोडतात

"इतर दिवशी ते जे कांही करतात ते शब्बाथ दिवशी करणे"

निर्दोष असतात

"देव त्यांना शिक्षा देणार नाही"

मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक

मंदिरापेक्षा अधिक महत्वाचा असा कोणी एक" येशू स्वत:चा तो थोर व्यक्ती म्हणून उल्लेख करीत आहे.

Matthew 12:7

भूक मिटविण्यासाठी येशूच्या शिष्यांनी शब्बाथ दिवशी कणसे तोडून खाल्यामुळे परुश्यांनी त्यांची टीका केली तेव्हा याऱ्य येशूने त्यांचा बचाव करणे पुढे चालू ठेवतो.

जर तुम्हांला समजला असता

"तुम्हाला समजत नाही"

तुम्ही...तुम्हांला

परुशी लोक

मला दया पाहिजे, यज्ञ नको

यज्ञ चांगले आहेत, परंतु दया त्यांच्यापेक्षा चांगली आहे (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

ह्याचा अर्थ काय

"देवाने पवित्र शास्त्रामध्ये काय सांगितले आहे"

मला पाहिजे

"मला" हे सर्वनाम देवाचा उल्लेख करते.

Matthew 12:9

शब्बाथ दिवशी माणसाला बरे केले ह्याबद्दलच्या परुश्यांच्या टीकेच्या प्रती येशूचा प्रतिसाद.

मग येशू तेथून निघून गेला

"येशू शेतातन निघून गेला"

त्यांच्या

ज्या परुश्यांशी तो बोलत होता त्यांचे सभास्थान.

पाहा

"पाहा" हा शब्द आपल्याला कथेतील एका नवीन व्यक्तीबद्दल सावध करीत आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा.

वाळलेला हात

"सुकून गेलेला" किंवा "मुठीमध्ये वाकून गेलेला"

Matthew 12:11

शब्बाथ दिवशी माणसाला बरे केले ह्याबद्दलच्या परुश्यांच्या टीकेच्या प्रती येशूचा प्रतिसाद पुढे चालू.

तुम्हांमध्ये असा कोण मनुष्य आहे की जो...समजणार नाही...बाहेर काढणार नाही?

पर्यायी भाषांतर: "तुम्हांपैकी प्रत्येक जण...समजेल आणि बाहेर काढील." (पाहा; अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही...तो

परुशी

जर त्याला असते तर

"जर त्या माणसाला असते तर"

बाहेर काढणे

"खाचेतून मेंढराला बाहर काढणे"

चांगले करणे योग्य आहे

"जे चांगले करतात ते देवाची आज्ञा मोडत नाहीत" किंवा "जे चांगले करतात ते देवाच्या आज्ञेचे पालन करतात"

Matthew 12:13

शब्बाथ दिवशी माणसाला बरे केले ह्याबद्दलच्या परुश्यांच्या टीकेच्या प्रती येशूचा प्रतिसाद पुढे चालू.

तो माणूस

वाळलेल्या हाताचा माणूस

तुझा हात लांब कर

"तुझा हात पुढे सरळ कर" किंवा "तुझा हात पुढे कर."

त्याने

तो माणूस

तो.....तो

त्या माणसाचा हात

बारा झाला

"संपूर्णपणे बरा झाला" किंवा "पहिल्यासारखा चांगला झाला"

विरुद्ध मसलत केली

"घात करण्याची योजना केली"

घात कसा करावा

"करण्याचा मार्ग शोधणे"

त्याला ठार मारणे

येशूला ठार मारणे.

Matthew 12:15

हा अहवाल हे स्पष्ट करतो की येशूच्या कृत्यांनी कशी यशया संदेष्ट्याची एक भविष्यवाणी पूर्ण झाली.

हे

"परुशी त्याला ठार मारण्याची योजना करीत आहेत"

तेथून निघाला

"निघून गेला"

त्याला इतरांना प्रगट करू नका

"त्याच्याबद्दल कोणालाहि सांगू नका"

यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते असे की

"यशया संदेष्ट्याने जे लिहिले होते, त्याद्वारे देवाने ते सांगितले"

Matthew 12:18

हा अहवाल हे स्पष्ट करतो की येशूच्या कृत्यांनी कशी यशया संदेष्ट्याची एक भविष्यवाणी पूर्ण झाली, ते पुढे चालू. हे शब्द देवाचे शब्द आहेत जे यशयाने लिहून ठेवले आहेत.

Matthew 12:19

हा अहवाल हे स्पष्ट करतो की येशूच्या कृत्यांनी कशी यशया संदेष्ट्याची एक भविष्यवाणी पूर्ण झाली, ते पुढे चालू. हे शब्द देवाचे शब्द आहेत जे यशयाने लिहून ठेवले आहेत.

तो...त्याची

१२:१८ मधील दास

चेपलेला बोरू तो मोडणार नाही

"तो कमकुवत लोकांना तुडविणार नाही" (पाहा: रूपक)

चेपलेला

"अंशत: तुटलेला किंवा खराब झालेला"

मिणमिणती वात

बत्ती फुंकल्यानंतर वाटेतून धुरासहित दिसणारी ठिणगी, जी असहाय्य आणि दुर्दैवी लोकांचे प्रतिनिधित्व करते (पाहा: रूपक)

तोपर्यंत

एका नवीन वाक्याने ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "तोपर्यंत तो हे करील"

तो न्यायला विजय देईल

"तो न्यायी अशी लोकांची खात्री करून देईल"

Matthew 12:22

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल येथे सुरु.

आंधळा व मुका असलेला कोणी एक

"जो बघू शकत नव्हता किंवा बोलू शकत नव्हता अस कोणी एक."

सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित झाला

"सर्व लोक ज्यांनी येशूला त्या माणसाला बरे करीत असतांना पाहिले ते सर्व फारच आश्चर्यचकित झाले"

Matthew 12:24

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल पुढे चालू.

हा चमत्कार

आंधळा, मुका आणि भूतग्रस्त अशा माणसाला बरे करण्याचा चमत्कार.

हा मनुष्य भुताचा अधिपति जो बालजबूल त्याच्या साहाय्याशिवाय भूतें काढीत नाही

"हा मनुष्य फक्त भूतांना काढू शकतो कारण तो बालजबूलचा दास आहे."

हा मनुष्य

परुशी लोकांनी येशूचे नांव घेण्याचे टाळले ह्यावरून हे लक्षांत येते की त्यांनी त्याला नाकारले होते.

त्यांच्या....त्यांस

परुशी

Matthew 12:26

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांच्या आरोपाचा येशूने दिलेला प्रतिसाद पुढे चालू.

सैतान जर सैतानाला काढीत असेल तर = येथे दुसऱ्यादा वापरलेला सैतान हा शब्द दुष्टात्म्यांचा उल्लेख करतो. AT: "जर सैतान स्वत:च्या दुष्टात्म्यांच्या विरुद्ध कार्य करतो" (पाहा: सामीप्य मुलक लक्षणा)

सैतान......बालजबूल

दोन्ही नावे एकाच व्यक्तीचा उल्लेख करतात.

मग त्याचे राज्य कसे टिकणार?

परुश्याना आवाहन देण्यासाठी येशू प्रश्नाचा उपयोग करीत आहे. AT: "सैतानाचे राज्य टिकणार नाही" किंवा "सैतानाचे राज्य जास्त दिवस चालणार नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुमचे अनुयायी त्यांन कोणाच्या साहाय्याने काढतात?

परुश्यांना आवाहान करण्यासाठी येशू दुसऱ्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे. AT: "मग तुम्ही असे म्हणावयास पाहिजे की तुमचे अनुयायी देखील बालजबूलच्या साहाय्यानेच दुष्टात्म्यांना काढतात. परंतु, तुम्हांला हे माहित आहे की हे खरे नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आणि म्हणून तेच तुमचा न्याय करितील

"कारण तुमचे अनुयायी देवाच्या साहाय्याने भूतें काढत असल्यामुळे, माझ्याविषयी तुमचा अभिप्राय चुकीचा आहे असा ते पुरावा देतात."

Matthew 12:28

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल पुढे चालू.

तुमच्यावर

परुश्यांवर

बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय

"प्रथम बलवान माणसावर नियंत्रण प्राप्त केल्याशिवाय"

जो माझ्याबरोबर नाही

"जो मला पाठींबा देत नाही" किंवा "जो माझ्याबरोबर काम करीत नाही"

तो माझ्या विरुद्ध आहे

"माझ्याविरुद्ध काम करतो" किंवा "माझ्या कामाचा नाश करतो"

गोळा करणे

पीक कापून गोळा करण्यासाठी हा एक सामान्य शब्द आहे. (पाहा: रूपक)

Matthew 12:31

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल पुढे चालू.

तुम्हांस

परुश्यांना

प्रत्येक पाप आणि दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल

माणसांनी केलेले प्रत्येक पाप आणि दुर्भाषण ह्यांची देव त्यांना क्षमा करील" किंवा "जो पाप आणि दुर्भाषण करतो त्या प्रत्येक व्यक्तीला देवा क्षमाकारील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही

"पवित्र आत्म्याविरुद्धच्या दुर्भाषणाची देव क्षमा करणार नाही"

मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी कांही बोलेले तर त्याची त्याला क्षमा होईल

"मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जो कोणी कांही बोलेल त्याला देव क्षमा करील"

ह्या युगी....येणाऱ्या युगी

पर्यायी भाषांतर: "ह्या काळी....आणि येणाऱ्या काळीहि."

Matthew 12:33

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल पुढे चालू.

झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, किंवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा

"फळ चांगले आहे म्हणून झाड चांगले आहे किंवा फळ वाईट आहे म्हणून झाड वाईट आहे हे ठरवा"

चांगले....वाईट

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "निरोगी...अनारोगी" किंवा २) "खाण्याजोगा....न खाण्याजोगा."

फालावरून झाड कळते

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "फळाकडे बघितल्यानंतर लोकांना हे कळते की झाड निरोगी आहे किंवा नाही" किंवा २) " फळाकडे बघितल्यानंतर लोकांना हे कळते की कोणत्या प्रजातीचे हे झाड आहे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तुम्ही....तुम्हांला

परुशी

अंत:कारणांत जे भरून गेले आहे तेच मुखावाटे बाहेर येते

"एखाद्या व्यक्तीच्या हृदयांत काय आहे तेच तो बोलू शकतो" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

चांगले भांडार....वाईट भांडार

"नीतिमान विचार.....वाईट विचार" (पाहा: रूपक)

Matthew 12:36

येशूने सैतानाच्या शक्तीने माणसाला बरे केले असे परुश्यांनी म्हटल्याचा अहवाल पुढे चालू.

तुम्हांस...तू

परुशी

लोक हिशेब देतील

"देव त्यांना च्याबद्दल विचारील" किंवा "देव च्या मुल्यांचा न्याय करील"

निरर्थक

"व्यर्थ" पर्यायी भाषांतर: "हानिकारक" (पाहा यु डी बी ).

ते

"लोक"

तू निर्दोष ठरशील.....तू दोषी ठरशील

"देव तुला निर्दोष ठरवील.....देव तुला दोषी ठरवील" (पाहा; कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 12:38

येशूने आंधळ्या आणि दुष्टात्मा असलेल्या माणसाला बरे केल्यानंतर शास्त्री आणि परुशी लोकांनी त्याला चिन्ह मागितले म्हणून येशू त्यांची खरडपट्टी काढीत आहे.

इच्छा

"इच्छा करणे"

दुष्ट आणि व्यभिचारी पिढी

ह्या काळी राहाणाऱ्या लोकांना वाईट करणे फारच आवडत होते आणि ते देवाच्या प्रती अविश्वासू होते.

तिला चिन्ह दिले जाणारा नाही

"ह्या दुष्ट आणि व्यभिचारी पिढीला देव चिन्ह देणार नाही" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

योनाचे चिन्ह

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "योनाला काय झाले होते" किंवा "देवाने योनासाठी चमत्कार केला होता" (पाहा: रूपक)

पृथ्वीच्या पोटांत

प्रत्यक्षांत भौतिक काबरेमध्ये

Matthew 12:41

येशूने आंधळ्या आणि दुष्टात्मा असलेल्या माणसाला बरे केल्यानंतर शास्त्री आणि परुशी लोकांनी त्याला चिन्ह मागितले म्हणून येशू त्यांची खरडपट्टी काढणे पुढे चालू ठेवीत आहे.

निनवेचे लोक न्यायाकाळी.....ह्या पिढीबरोबर उभे राहून...हिला दोषी ठरवितील

. पर्यायी भाषांतर, "निनवेचे लोक ह्या पिढीला दोषी ठरवितील.....आणि देव त्यांच्या आरोपाकडे कान देईल आणि तुम्हांला दोषि ठरवील" किंवा "देव निनवेच्या आणि ह्या पिढीच्या लोकांचा दोघांचाहि त्यांच्या पापासाठी त्यांचा न्याय करील, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला आणि तुम्ही केला नाही म्हणून तो फक्त तुम्हांलाच शिक्षा देईल" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

ही पिढी

येशू उपदेश देत होता त्याकाळी राहाणारे लोक (पाहा: रूपक)

कोणी एक थोर

"अधिक महत्वाचा असा कोणी एक"

Matthew 12:42

येशूने आंधळ्या आणि दुष्टात्मा असलेल्या माणसाला बरे केल्यानंतर शास्त्री आणि परुशी लोकांनी त्याला चिन्ह मागितले म्हणून येशू त्यांची खरडपट्टी काढणे पुढे चालू ठेवीत आहे.

दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून....हिला दोषी ठरवील

पर्यायी भाषांतर: "दक्षिणेकडची राणी ह्या पिढीला दोषी ठरवील आणि देव तिचा आरोप ऐकेल आणि तुम्हांला दोषी ठरवील" किंवा "देव दोघांनाहि दक्षिणेकडच्या राणीस आणि ह्या पिढीस त्यांच्या पापासाठी त्यांना दोषी ठरवील, परंतु कारण ती राजा शलमोनाचे ऐकावयास आली आणि तुम्ही माझे ऐकले नाही म्हणून तो फक्त तुम्हांलाच शिक्षा करील (पाहा; सामीप्यमुलक लक्षणा, स्पष्ट आणि अस्पष्ट)

दक्षिणेकडची राणी

हे परराष्ट्रीय राज्य शीबाच्या राणीचा उल्लेख करतो (पाहा: नावांचे भाषांतर, अपरिचितांचे भाषांतर)

तीपृथ्वीच्या सीमेपासून आली

"ती फार दूरवरून आली होती (पाहा: वाक्प्रचार)

ही पिढी

येशू उपदेश देत होता त्याकाळी राहाणारे लोक (पाहा: रूपक)

कोणी एक थोर असा

"कोणी एका अधिक महत्वाचा असा"

Matthew 12:43

येशूने आंधळ्या आणि दुष्टात्मा असलेल्या माणसाला बरे केल्यानंतर शास्त्री आणि परुशी लोकांनी त्याला चिन्ह मागितले म्हणून येशू त्यांची खरडपट्टी काढणे पुढे चालू ठेवीत आहे.

निर्जल स्थलीं

"ओसाड प्रदेशांत" किंवा "जेथे कोणीहि लोक राहात नाहीत अशा ठिकाणी (पाहा यु डी बी )

मिळत नाही

'विसावा मिळत नाही"

तो म्हणतो

"अशुद्ध आत्मा म्हणतो"

ते घर त्याला झाडलेले आणि सुशोभित केलेले असे आढळते

पर्यायी भाषांतर: "कोणीतरी ते घर झाडून स्वच्छ केले आहे आणि सर्व कांही त्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवले आहे असे त्या अशुद्ध आत्म्याला आधालेते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 12:46

येशूची आई आणि बंधूजन आल्यावर त्याला त्याच्या आध्यात्मिक कुटुंबाचा परिचय करून देण्याची संधी मिळते.

त्याची आई

येशूची मानवी आई

त्याचे भाऊ

ह्याचा असा अर्थ होऊ शकतो १) विभक्त किंवा विस्तारित कुटुंबाच्या आतील भाऊ (पाहा यु डी बी ) २)घनिष्ठ मित्र किंव इस्राएला मधील सहकारी

पाहात आहेत

"इच्छित आहेत"

Matthew 12:48

येशूची आई आणि बंधूजन आल्यावर त्याला त्याच्या आध्यात्मिक कुटुंबाचा परिचय करून देण्याची संधी मिळते.

कोणीएकाने त्याला सांगितले

"तो मनुष्य ज्याने येशूला सांगितले की त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटण्यासाठी थांबले आहेत"

कोण माझी आई? आणि कोण माझे भाऊ?

पर्याये भाषांतर: "माझी खरी आई आणि माझे खरे भाऊ कोण हे मी तुम्हांला सांगतो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

जो कोणी

"कोणीही"