Matthew 11

Matthew 11:1

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना येशूने कसा प्रतिसाद दिला ह्या कथेच्या विभागाची येथे सुरूवात होते.

मग असे झाले की

ह्या अहवालाची येथे सुरुवात होते हे दाखविण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग केला गेला आहे. जर तुमच्या भाषेत अहवालाच्या सुरुवातीला दाखविण्यासाठी मार्ग असेल तर त्याच येथे उपयोग करा. त्याचे असे भाषांतर होऊ शकते: "नंतर" किंवा "त्यानंतर"

सूचना देणे

ह्या शब्दाचे असे भाषांतर केले जाऊ शकते: "शिकवणे" किंवा "आदेश देणे"

त्याचे बारा शिष्य

हे येशूच्या बारा निवडलेल्या प्रेषितांचा उल्लेख करतो.

आता

"त्या वेळेस" ह्याला वगळले सुद्धा जाऊ शकते (पाहा यु डी बी )

च्या विषयी योहानाने बंदिशाळेत ऐकले तेव्हा

पर्यायी भाषांतर: "जेव्हा योहान बंदिशाळेत होता, तेव्हा त्याने च्या विषयी ऐकले" किंवा "बंदिशाळेत असणाऱ्या योहानाला जेव्हा च्या विषयी कोणीतरी सांगितले"

त्याने शिष्यांच्या हाती संदेश पाठविला

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने स्वत:च्या शिष्यांच्या हाती येशूला संदेश पाठविला.

आणि त्याला म्हटले

सर्वनाम "त्याला" हे येशूचा उल्लेख करते.

जे येणार ते आपणच का

जरी ह्याचे भाषांतर "येणारे तेच" किंवा "जे येणारे त्याची आम्ही अपेक्षा करतो ते," हे मशीहा साठी शिष्टोक्ति आहे. ("ख्रिस्त," यु डी बी )

आम्ही वाट बघावी

"आम्ही अपेक्षा करावी" "आम्ही" हे सर्वनाम केवळ योहानाच्या शिष्यांचाच नव्हे तर सर यहूदी लोकांचा उल्लेख करतो.

Matthew 11:4

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना प्रतिसाद देण्याचे येशू येथे समाप्त करतो.

योहानास अहवाल द्या

"योहानास सांगा"

Matthew 11:7

येशू लोकसमुदायाशी बाप्तिस्मा कारणऱ्या योहानाबद्दल बोलण्याचे सुरु करीत आहे.

बाप्तिस्मा करणारा योहान हा कोणत्या प्रकारचा व्यक्ती होता ह्याबद्दल लोकसमुदायाने विचार करावा ह्यासाठी येशूने तीन आलंकारयुक्त प्रश्नांचा उपयोग केला. ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "तुम्ही कांही पाहण्यासाठी बाहेर गेला होतात का....? अर्थात नाही!" किंवा "खात्रीने तुम्ही बाहेर बघण्यासाठी गेला नाहीत..!" (पाहा: अलंकारयुक्त प्रशन)

वाऱ्याने हालविलेला बोरू काय

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की १) यार्देन नदीच्या तिरावरची एक प्रत्यक्ष वनस्पती (पाहा यु डी बी ) किंवा २) एका प्रकारच्या व्यक्तीचे रूपक असू शकते "वाऱ्याने हालणाऱ्या बोरू सारखा मनुष्य" (पाहा: उपमा). ह्या उपमेचे दोन संभाव्य अर्थ आहेत १) अशा प्रकारच मनुष्य सहजवाऱ्याने हालविला जाऊ शकतो, सहजरित्या मन बदलणाऱ्या व्यक्तीसाठी हे रूपक आहे, किंवा २) वारा येतो तेव्हा याऱ्य खूप आवाज करतो, खूप कांही बोलणाऱ्या परंतु महत्वाचे असे कांहीच न सांगणाऱ्यासाठी हे रूपक आहे. (पाहा: रूपक)

बोरू

"उंच लांब अशी गवताळ वनस्पती"

तलम वस्त्रें घातलेला

"महाग कपडे घालणारा" केवळ श्रीमंत लोकच अशा प्रकारची वस्त्रे घालत होते.

खरोखर

"पाहा" असेच ह्या शब्दाचे भाषांतर केले जाते. हे मागून येणाऱ्या शब्दावर भर देते. पर्यायी भाषांतर: "खचितच."

Matthew 11:9

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

परंतु तूम्ही बाहेर काय बघण्यासाठी गेला होता

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल अलंकारयुक्त प्रश्नांची मालिका पुढे चालू राहाते. (पाहा; अलंकारयुक्त प्रश्न)

परंतु तुम्ही बाहेर काय बघण्यासाठी गेला होता~एका संदेष्ट्याला? मी तुम्हांला सांगतो होय,

बहुवचन सर्वनाम "तुम्ही" हे दोन्ही उदाहरणांत लोकसमुदायाचा उल्लेख करते.

संदेष्ट्याहूनहि जो श्रेष्ठ त्याला

"एका मामुली संदेष्ट्यांस नव्हे" किंवा "सामान्य संदेष्ट्याहून अधिक श्रेष्ठ"

तो हाच आहे

"हा" हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करते.

ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे

सर्वनाम "तो" हे पुढील वाक्यांशामध्ये येणाऱ्या "माझा दूत" ह्याचा उल्लेख करतो.

पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील

येशू येथे संदेष्टा मलाखीच्या पुस्तकातील अवतरणाचा उल्लेख देत मलाखी ३:१ मध्ये ज्या दूताबद्दल सांगितले आहे तो योहानाच आहे असे म्हणत आहे.

मी माझ्या दूताला पाठवितो

सर्वनाम "मी" आणि "माझ्या" हे देवाचा उल्लेख करतात. जुन्या कराराच्या भविष्यवाणीचा लेखक हा देवाने जे सांगितले त्याचा उल्लेख करीत आहे.

Matthew 11:11

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

स्त्रियांपासून जन्मलेल्यांत

ज्यांना स्त्रियांनी जन्म दिला आहे त्यांच्यांत" किंवा "आतपर्यंत जिवंत असलेल्यांत" (पाहा यु डी बी )

बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. AT: "बाप्तिस्मा करणारा योहान हा सर्वांत मोठा आहे"

स्वर्गाच्या राज्यांत

देव स्थापित करील त्या राज्याचा भाग. AT: "ज्याने स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश केला आहे."

तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे

"योहानापेक्षा तो श्रेष्ठ आहे"

बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसापासून तो आतापर्यंत

"ज्या वेळेपासून योहानाने त्याचा संदेश देण्याचे सुरु केले तेव्हापासून"

स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होता हे, आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत

संभाव्य अर्थ हे आहेत १) हिंसक लोक हिंसक वागणूक देतात. (पाहा यु डी बी ) किंवा २) "लोक स्वर्गाच्या राज्याच्या प्रजेचा छळ करीत आहेत आणि आक्रमक लोक ते बळकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत" किंवा ३) स्वर्गाचे राज्य सामर्थ्यशाली रीतीने पुढे जात आहे, आणि सामर्थ्यशाली लोक त्याच्यात सहभागी होऊ इच्छित आहेत."

Matthew 11:13

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

नियमशास्त्र

"मोशेचे नियमशास्त्र"

योहान

"बाप्तिस्मा करणारा योहान"

आणि जर तुमची

"तुमची" हे सर्वनाम जमावातील लोकांचा उल्लेख करते.

एलीया हाच आहे

"हाच" हा शब्द बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उल्लेख करतो. हा वाक्यांश सामीप्यमुलक लक्षणा आहे जी असे व्यक्त करते की जुन्या करारातील एलीयाबद्दलची भविष्यवाणी ही बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याशी जुळते, परंतु ती असे सांगत नाही की बाप्तिस्मा करणारा योहान हाच प्रत्यक्षांत एलीया आहे (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

ज्याला कान आहेत तो ऐको

"जो कोणी ऐकू शकतो" किंवा "मी जे कांही सांगतो त्याकडे त्याला लक्ष देऊ द्या"

Matthew 11:16

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

मी कोणती उपमा देऊ

अलंकारयुक्त प्रश्नांची ही सुरुवात आहे. त्या काळातील लोक आणि बाजारातील मुलें काय म्हणतात ह्यातील तुलनेचा परिचय करून देण्यासाठी येशूने ह्याचा उपयोग केला. तो अलंकारयुक्त प्रश्नाद्वारे सुरुवात करीत आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

बाजारात खेळत असलेल्या आणि एकमेकांना हांक मारीत असलेल्या मुलांसारखी आहे

ह्या उपमेचा अर्थ १) येशूने "पांवा वाजविला" आणि योहानाने "शोक केला," परंतु ह्यापिढीने नाचण्यांस आणि शोक करण्याचे नाकारले, परुशी आणि इतर धार्मिक पुढाऱ्यांनी सामान्य लोकांवर टीका केली की ते त्यांनी मोशेच्या नियम शास्त्रात जोडलेल्या दुसऱ्या नियमांचे लोक पालन करीत नाहीत. (पाहा: उपमा, रूपक)

हे पिढी

"आत्ता राहाणारे लोक" किंवा "हे लोक" किंवा "ह्या पिढीच्या लोकांनो" (पाहा यु डी बी )

बाजार

हे एक भव्य आणि खुले मैदान असे जेथे लोक त्यांच्या वस्तू विकण्यासाठी येत असत.

आम्ही तुमच्यासाठी पांवा वाजविला

"आम्ही" हा बाजारांत बसलेल्या मुलांचा उल्लेख करतो. "तुम्ही" हा "ह्या पिढीचा" किंवा त्या जमावाचा जो संगीत ऐकतो परंतु प्रतिसाद देत नाही त्याचा उल्लेख करतो.

पांवा

हे लांब व पोकळ असे संगीत वाद्य आहे ज्यांत एका बाजूने फुंकण्याद्वारे वाजविले जाते.

आणि तुम्ही नाचला नाही

"परंतु संगीतावर तुम्ही नाचला नाही"

आणि तुम्ही शोक केला नाही

"परंतु तुम्ही आमच्या बरोबर शोक केला नाही"

Matthew 11:18

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल येशू लोकसमुदायास सांगणे पुढे चालू ठेवतो.

भाकर खात नाही

"भोजन खात नाही." ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "वारंवार उपास करणे" किंवा "चांगले भोजन न खाणे" (यु डी बी ). ह्याचा अर्थ असा नव्हे की योहान कधीच जेवला नाही.

'त्याला भूत लागले आहे' असे ते म्हणतात

योहानाबद्दल लोक काय बोलत होते ह्याचा येशू उल्लेख करीत होता. ह्याचे अप्रत्यक्ष उदाहरण म्हणून भाषांतर केले जाऊ शकते: "ते म्हणतात की त्याला भूत लागले आहे" किंवा "त्याला भूत लागले आहे असा त्याच्यावर आरोप करतात" (पाहा: अवतरण भाषण)

ते

"ते" हे सर्वनाम त्या पिढीतील वर्तमान लोकांचा उल्लेख करते. (वचन १६).

मनुष्याचा पुत्र

तेथे असलेल्या लोकांनी तो मनुष्याचा पुत्र आहे हे समजावे अशी त्याची अपेक्षा असल्यामुळे, त्याचे असे देखील भाषांतर होऊ शकते की, "मी, मनुष्याचा पुत्र."

ते म्हणतात, पाहा, खादाड मनुष्य

मनुष्याचा पुत्र म्हणून लोक त्याच्याविषयी काय म्हणतात ह्याचा येशू उल्लेख करीत होता. ह्याचे अप्रत्यक्ष उदाहरण म्हणून भाषांतर केले जाऊ शकते, "ते म्हणतात की तो खादाड मनुष्य आहे" किंवा "तो जास्त खातो असा ते त्याच्यावर आरोप करतात" जर तुम्ही "मनुष्याचा पुत्र" ह्याचे "मी, मनुष्याचा पुत्र आहे " असे भाषांतर केले आहे, तर अप्रत्यक्ष उद्धरणाचे असे भाषांतर करू शकता "ते म्हणतात की मी खादाड मनुष्य आहे."

तो खादाड मनुष्य आहे

"तो अधाशीपणे खाणारा आहे" किंवा "तो नेहमीप्रमाणे जास्त अन्न खातो"

दारूबाज

"प्यालेला" किंवा "नेहमीप्रमाणे प्यालेला"

परंतु ज्ञान तिच्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते

ही कदाचित एक म्हण असावी जिला येशू ह्या परिस्थितीशी लागू करीत आहे, कारण त्याला आणि योहानाला ज्या लोकांनी नाकारले ते ज्ञानी नव्हते. यु डी बी मध्ये आहे तसे ह्याचे कर्तरी वाक्यामध्ये भाषांतर केले जाऊ शकते (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ज्ञान न्यायी ठरते

ही अभिव्यक्ती जेथे ज्ञानाचे मानवीकरण केले आहे ते देवाच्या अगदी पुढे आहे ह्या अर्थाने त्याचा उपयोग केला गेला नाही, तर ज्ञान हे योग्य आहे असे साबित केले आहे अशा अर्थाने त्याचा उपयोग केला गेला आहे. (पाहा: मानवीकरण

तिची कृत्यें

सर्वनाम "तिची" हे मानवीकरण ज्ञानाचा उल्लेख करते.

Matthew 11:20

पूर्वी ज्या नगरांमध्ये येशूने चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांविरुद्ध येशू बोलण्यांस सुरुवात करीत आहे.

नगरांना दोष देणे

येशू येथे सामीप्यमुलक लक्षणाचा उपयोग करीत आहे, ह्या नगरांतील लोकांना त्यांच्या चुकीबद्दल दोष देत आहे. (पाहा: सामीप्य मुलक लक्षणा)

नगरें

"शहरें"

ज्यामध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्यें घडली होती

ह्याचे कर्तरी क्रियापदासह भाषांतर केले जाऊ शकते: "त्यांत त्याने त्याची बहुतेक पराक्रमाची कृत्यें केली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पराक्रमाची कृत्यें

ह्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "सामर्थ्यशाली कार्यें" किंवा "सामर्थ्याची कृत्ये" किंवा "चमत्कार" (यु डी बी ).

कारण त्यांनी पश्चात्ताप केला नव्हता

"त्यांनी" हे त्या नगरातील लोकांनी ज्यांनी पश्चात्ताप केला नव्हता त्यांचा उल्लेख करते.

हे खोराजिना, तुखी केवढी दुर्दशा होणार!, हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार!

येशू अशा प्रकारे बोलत आहे की खोराजिना आणि बेथसैदा नगरातील लोक जणू कांही त्याचे ऐकत आहेत परंतु तसे कांहीच नाही (पाहा: परोक्षसंबोधन)

खोरीजिना....बेथसैदा....सोर....सीदोन

ह्या नगरांच्या नावांचा त्यामध्ये राहाणा

य लोकांसाठी सामीप्यमुलक लक्षणा म्हणून उपयोग केला गेला आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्यें घडली ती जर सोर आणि सीदोन ह्यांत घडली असती तर

ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते: "तुमाच्याम्ह्ये मी जी सामर्थ्यशाली कार्यें केली ती जर मी सोर आणि सीदोन मध्ये केली असती तर" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तुझी केवढी दुर्दशा होणार जी तुमच्यामध्ये केली असत

येथे "तुझी" हे सर्वनाम एकवचनी आहे.

त्यांनी मागेच पश्चात्ताप केला असता

सर्वनाम "त्यांनी" हे सोर आणि सीदोनच्या लोकांचा उल्लेख करतो.

पश्चात्ताप केला

"ते त्यांच्या पापांसाठी क्षमस्व आहेत हे दाखविणे"

न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल

"देव न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सोर आणि सीदोन ह्यांना अधिक दया दाखवील" किंवा "देव न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन पेक्षा तुम्हांला अधिक कठोरपणे शिक्षा देईल" (पाहा यु डी बी ). निहीत माहीती ही आहे "तुम्ही मी केलेले चमत्कार पाहिल्यावर पश्चात्ताप करून माझ्यावर विश्वास ठेवला नाही (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

च्या पेक्षा तुम्हांला

हे सर्वनाम एकवचनी आहे आणि ते खोरजिना आणि बेथसैद उल्लेख करतात.

Matthew 11:23

येशूने ज्या शहरांमध्ये चमत्कार केले होते तेथिल लोकांच्या विरुद्ध तो आताही बोलणे सुरु ठेवतो. # तु कफर्णहूम

येशू कफर्णहूमच्या लोकांना असे उद्देशून बोलत आहे की जणु काय त्यांना त्याचा आवाज ऐकु येत आहै, परंतु वास्तवात असे नाही. ( पाहा अँपॉस्ट्रॉफी) येथे तु हे सर्वनाम पुढील दोन्हीही वचनांमध्ये कफर्णहूम या शहरासाठी उपयोगात आणले आहे. # कफर्णहूम...सदोम

ही दोन्ही नावे या शहरांतील रहवाश्यांना उद्देशून उपमा म्हणून उपयोगांत आणली आहेत. ( पाहा लक्षणालंकार) # तुम्हाला स्वर्गात घेतले जाईल असे वाटते काय ? हा एक उपरोधात्मक प्रश्न आहे. येशू येथे कफर्णहूम येथील रहीवाश्यांना त्यांच्या गर्विष्ठ वर्तना बद्दल बोल लावत आहे. याचे भाषांतर आपण कर्तरी प्रयोगात असेही करू शकता, " तुम्ही स्वर्गात जाल का?" किंवा " देव तुमचा सन्मान करील असे तुम्हाला वाटते काय" # महिमा पावेल

"सन्मान पावेल " # तुम्हाल नरकांत टाकले जाईल याचे भाषांतर कर्तरी प्रयोगातही केले जावू शकते. देवा तुम्हाला नरकांत टाकिल. # तुमच्यामध्ये जी आश्चर्यं कर्मे घडलीत ती जर सदोमांत घडली असती तर" याचे भाषांतर "मी तुमच्यामध्ये जे चमत्कार केले ते जर सदोमांत केले असते तर " # महत्कर्मे म्हणजे चमत्कार # ते आजपर्यंत पाहीले असते

येथे "ते" हे सर्वनाम सदोम शहरासाठी वापरण्यात आले आहे. # न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोमाच्या लोकांना सोपे जाईल. याचे भाषांतर असेही होईल कि, न्यायाच्या दिवशी देव तुमच्यावर सदोमाहून अधिक कठोरते न्याय करील.

Matthew 11:25

येशू अजूनहि लोक समुदायासमोर उपस्थित असतांना तो त्याच्या स्वर्गीय पित्याची प्रार्थना करीत आहे.

येशूने उत्तर देत म्हटले

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) १२:१ मध्ये येशूने शिष्यांना पाठविले होते आणि तो कोणीतरी त्याला विचारलेल्या कांही गोष्टीबद्दल प्रतिसाद देत होता, किंवा २) पश्चात्ताप न केलेल्या नगरांविषयी येशू त्यांना दोष देण्याचे संपत करीत होता: "आणखी, येशूने म्हटले."

हे पित्या

हे कोणा जगिक पित्याचा उल्लेख करीत नसून देव पित्याचा उल्लेख करीत आहे.

स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो

ह्याचे सामीप्य मुलक म्हणून भाषांतर केले जाऊ शकते, "पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्वलोक आणि सर्व गोष्टींवरचा मालक, " किवा उपलक्षण म्हणून भाषांतर केले जाऊ शकते "अवघ्या सृष्टीचा मालक" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा आणि उपलक्षण)

ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टीं गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या

"ह्या गोष्टीं" कोणत्या हे स्पष्ट झाले नाही." जर तुमच्या भाषेत ह्याचे स्पष्टीकरण करण्याची गरज असली तर पर्यायी भाषांतर चांगले ठरू शकेल: "तू ज्ञानी आणि शिक्षित लोकांना सत्यें शिकू दिली नाहीस परंतु ती सत्यें तू अशिक्षित लोकांना प्रगट केलीस."

गुप्त ठेवली

"लपून ठेवली" हे क्रियापद "प्रगट केले" ह्याच्या विरुद्ध आहे.

ज्ञानी आणि विचारवंत

"ज्ञानी आणि विचारवंत लोक" पर्यायी भाषांतर: "ते लोक जे स्वत:ला स्न्यांनी आणि विचारवंत समजतात." (पाहा यु डी बी , उपरोध)

त्यांना प्रगट केल्या

"त्यांना" हे सर्वनाम ह्या वचनांत अगोदर आलेल्या "ह्या गोष्टी" ह्यांचा उल्लेख करतो .

न शिकवलेल्या अशा बाळकांसारख्या

एक शब्द ज्याचे दोन अर्थ होतात "बाळकें" आणि "न शिकवलेले" किंवा "अज्ञानी" पर्यायी भाषांतर: "अज्ञानी लहान बाळकें"

बाळकांसारखे

लोक जे ज्ञानी किंवा सुशिक्षित नाहीत, किंवा ते लोक ज्यांना हे माहती आहे की ते ज्ञानी किंवा सुशिक्षित नाहीत त्यांच्यासाठी ही उपमा आहे. (पाहा: उपमा)

कारण हेच तुला योग्य दिसले

"कारण हे करणे तुला चांगले वाटले"

माझ्या पित्याद्वारे माझ्या हाती सर्व कांही दिले गेले आहे

ह्याचे कर्तरी क्रियापदांत भाषांतर केले जाऊ शकते: "माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व कांही दिले आहे" किंवा "माझ्या पित्याने माझ्या हातात सर्व कांही सोपविले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

पित्यावांचून पुत्राला कोणी ओळखीत नाही

"केवळ पिताच पुत्राला ओळखतो"

पुत्राला ओळखतो

"वैयक्तिक अनुभवावरून ओळखतो"

पुत्र

येशू स्वत:चा उल्लेख त्रैकत्वामधील तिसरी व्यक्ती म्हणून करीत आहे. (पाहा: प्रथम, दुसरा, किंवा तिसरा व्यक्ती)

पुत्रावांचून पित्याला कोणी ओळखीत नाही

"केवळ पुत्रच पित्याला ओळखतो"

पित्याला ओळखतो

"वैयक्तिक अनुभवावरून ओळखतो"

आणि त्याला ज्या कोणास प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल तर

"पित्याला प्रगट करावयाची जर पुत्राची इच्छा असेल तर लोकांना माहित होईल की पिता कोण आहे."

त्याला ज्या कोणास प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल तर

"त्याला" हे सर्वनाम देव पित्याचा उल्लेख करते.

Matthew 11:28

येशू लोकसमुदायाशी बोलण्याचे समाप्त करतो.

कष्टी व भाराक्रारंत जनहो

हे रूपक यहूदी नियम शास्त्राच्या "जूं" चा उल्लेख करते (पाहा: रूपक)

मी तुम्हांला विसावा देईन

"मी तुम्हांला तुमच्या श्रमापासून आणि ओझ्यापासून तुम्हांला विसावा घेऊ देईन" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

माझे जूं आपणांवर घ्या

ह्या वचनातील "आपणांवर" हे सर्वनाम "जे सर्व कष्टी आणि भाराक्रांत आहेत त्यांचा उल्लेख करते." ह्या रूपकाचा अर्थ म्हणजे, "मी जी कार्यें तुम्हांला नियुक्त करीन ती तुम्ही स्वीकारा." (पाहा यु डी बी ) किंवा "माझ्या बरोबर काम करा." (पाहा: रूपक)

माझे ओझे हलके आहे

येथे "हलके" हा शब्द जड शब्दाच्या विरुद्ध आहे.