Matthew 8

Matthew 8:1

येशू चमत्कारिकरित्या अनेक लोकांना बरे करतो त्या अहवालाची ही सुरूवात आहे.

येशू जेव्हा डोंगरावरून खाली आला तेव्हा लोकांचे थवे त्याच्या मागे चालले

पर्यायी भाषांतर: "येशू डोंगरावरून खाली आल्यावर, लोकांचे थवे त्याच्या मागे चालले." जे डोंगरावर येशू बरोबर होते व जे येशुबरोबर नव्हते ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांचा जमावामध्ये समावेश असू शकतो.

पाहा

"पाहा" हा शब्द आपल्याला कथेमधील एका नवीन व्यक्तीची सूचना देतो. तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असावा.

कुष्ठरोगी

"ज्याला कुष्ठरोग आहे तो मनुष्य" किंवा "चर्मरोग झालेला मनुष्य" (यु डी बी )

तुझी इच्छा असली तर

पर्यायी भाषांतर: "जर तुला करावेसे वाटले तर" किंवा "जर तुझी इच्छा असली तर." त्या कुष्ठरोग्यास हे ठाऊक होते की त्याला बरे करण्याचे येशूला सामर्थ्य आहे, परंतु त्याला हे ठाऊक नव्हते की त्याला स्पर्श करण्याची येशूची इच्छा होती किंवा नाही.

तुम्ही मला शुद्ध करू शकता

पर्यायी भाषांतर: "तुम्ही मला बरे करू शकता" किंवा "कृपया मला बरे करा" (यु डी बी )

लागलेच

"ताबडतोब"

त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला

"शुद्ध हो" असे येशूच्या शब्दाने परिणामत: तो मनुष्य बारा झाला. पर्यायी भाषांतर: "तो बरा होता" किंवा "त्याचे कुष्ठ गेले" किंवा "कुष्ठरोगाचा अंत झाला."

Matthew 8:4

येशू त्या कुष्ठरोग्यास बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

त्याला

ज्या माणसाला कुष्ठरोग होता त्याला

हे कोणाला सांगू नको

याजकाला अर्पण देतांना जरी त्याला सर्व सांगावे लागणार होते (पाहा यु डी बी ), येशूची इच्छा होती की जे कांही घडले ते त्याबद्दल त्याने कोणालाही सांगू नये. त्याचे असे भाषांतर होऊ शकत: "कोणालाही कांहीही सांगू नको" किंवा "मी तुला बरे केले हे कोणालाही सांगू नको" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

स्वत:स याजकाला दाखीव

यहूदी नियमशास्त्राच्या अनुसार बऱ्या झालेल्या व्यक्तीने त्याची त्वचा याजकाला दाखवावी म्हणजे तो त्याला किंवा तिला इतर लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी देई.

त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता, मोशेने नेमिलेले अर्पण वाहा

कुष्ठरोगापासून बऱ्या झालेल्या माणसाने याजकाला धन्यवादाचे अर्पण अर्पावे अशी मोशेच्या नियमशास्त्राची मागणी होती. याजक जेव्हा ते अर्पण स्वीकारतो तेव्हा याऱ्य तो व्यक्ती बरा झाला आहे हे लोकांना माहित होते.

त्यांना

हे शक्यतो उल्लेख करते १) याजकांचा किंवा २) सर्व लोकांचा किवा ३) येशूच्या टीकाकारांचा. शक्य असल्यास ह्या कोणत्याही गटाचा उल्लेख करू शकेल अशा एका सर्वनामाचा उपयोग करा. (पाहा: विशेषण)

Matthew 8:5

येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

त्याला...त्याला

येशूला

पक्षघात

रोगामुळे "हालचाल करण्यांस अक्षम"

येशूने त्याला म्हटले, "मी येऊन त्याला बरे करीन"

"येशूने शताधिपतिला म्हटले 'मी तुझ्या घरी येऊन तुझ्या चाकराला बरे करीन.'"

Matthew 8:8

येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

आपण माझ्या छपराखाली यावे

"तुम्ही माझ्या घरी यावे" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

शब्द मात्र बोला

"आज्ञा मात्र करा"

शिपाई

"कुशल योध्दा"

एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही

येशूच्या श्रोत्यांनी असा विचार केला असावा की इस्राएलातील यहूदी जे देवाचे लोक म्हणून दावा करतात, त्यांचाच विश्वास सर्वांपेक्षा मोठा आहे. येशूने म्हटले की ते चुकीचे होते आणि शताधिपतिचा विश्वासच सगळ्यांत मोठा होता.

Matthew 8:11

येशू रोमन शताधिपतिच्या चाकराला बरे करतो तो अहवाल पुढे चालू.

तुम्हांला

हा शब्द "जे त्याचे अनुसरण करीत होते" त्यांचा उल्लेख करीत आहे (८:१०) आणि म्हणून हा शब्द बहुवचनी आहे.

पूर्वेकडून व पश्चिमेकडून

हे उपलक्षण आहे: सगळीकडे पूर्व किंवा पश्चिम हा दिलेल्या बिंदूपासून नव्हे. ह्याचे असे भाषांतर होऊ शकत: "सगळीकडून" किंवा "दूर प्रत्येक दिशेपासून" (पाहा: उपलक्षण)

च्या पंक्तीस बसतील

त्या संस्कृतीमध्ये लोक जेवतांना मेजाच्या बाजूला पडतात. एक कुटुंब व मित्र म्हणून एकत्र मिळूनमिसळून राहण्यांस दाखविण्यासाठी संस्कृतीला सामीप्यमुलक लक्षणा म्हणून वापरले गेले आहे. ह्याचे असे भाषांतर होऊ शकत, "एक कुटुंब आणि मित्र म्हणून राहा" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

राज्याचे पुत्र बाहेर फेकले जातील

"राज्याच्या पुत्रांना देव बाहेर फेकील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

राज्याचे पुत्र

"चे पुत्र" हा वाक्यांश जे कांहीतरी मालकीचे आहेत त्यांचा उल्लेख करतो, ह्या बाबतीत देवाचे राज्य. येथे उपरोध सुद्धा आहे कारण "पुत्रांना" बाहेर फेकले जाईल आणि परक्यांचे स्वागत केले जाईल. ह्याचे असे भाषांतर होऊ शकते: "ते ज्यांनी देवाला त्यांच्यावर राज्य करण्याची अनुमती दिली पाहिजे होती" (पाहा यु डी बी ) (पाहा: वाक्प्रचार)

बाहेरील अंधारांत

जे देवाचा अस्वीकार करतात त्यांच्या उल्लेख ही अभिव्यक्ती करते. "देवापासून दूर गडद अंधारांत" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तू विश्वास ठेवल्या प्रमाणे तुला प्राप्त होवो

"त्याप्रमाणे मी तुझ्यासाठी करीन" ( पाहा:कर्तरी किंवा कर्मणी)

चाकर बरा झाला

"येशूने त्या चाकराला बरा केला" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याच घटकेस

"अगदी बरोबर त्याच वेळेस जेव्हा येशूने सांगितले की मी त्याला बरे करीन."

Matthew 8:14

येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

येशू आल्यावर

येशूचे शिष्य कदाचित त्याच्या बरोबर होते (त्याने ज्यांना कांही सूचना दिल्या, ८:१८ पाहा यु डी बी ), परंतु येशूने काय म्हटले आणि केले ह्यावर कथेचे लक्ष केंद्रित आहे चुकीचा अर्थ टाळण्यासाठी आवश्यक भासल्यास शिष्यांचा परिचय द्या.

पेत्राची सासू

"पेत्राच्या बायकोची आई:

तिचा ताप निघून गेला

जर तुमची भाषा मानवीकरणास समजत असेल की ताप हा स्वत:हून विचार करू शकतो किंवा कार्य करू शकतो, ह्याचे असेहि भाषांतर होऊ शकत "ती चांगली झाली" किंवा "येशूने तिला बरे केले" (पाहा: मानवीकरण)

उठली

"बिछान्यातून बाहेर उठली"

Matthew 8:16

येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवालयेथ समाप्त होतो.

संध्याकाळ

यु डी बी हे मार्क १:३० मधून असा संदर्भ देत की येशू कफर्णहूमास शब्बाथ दिवशी आला होता. कारण यहूदी शब्बाथ दिवशी काम करीत नाहीत किंवा प्रवास देखील करीत नाहीत, ते संध्याकाळ होईपर्यंत थांबले होते व नंतर त्यांनी लोकांना येशूकडे आणावयास सुरुवात केली होती. चुकीचा अर्थ टाळावयाचा असेल तरच शब्बाथाबद्दल उल्लेख करा नाहीतर करण्याची आवश्यकता नाही.

त्याने शब्दानेच भूतें घालविली

हा अतिशयोक्ती अलंकार आहे. येशू एका शब्दापेक्षा अधिक शब्द बोलला असावा. ह्याचे अशा प्रकारे भाषांतर होऊ शकत: "येशूला फक्त एकदाच बोलावे लागले आणि भूत त्या माणसाला सोडून गेले." (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले

"देवाने यशया संदेष्ट्याला यहूदी लोकांना जी भविष्यवाणी सांगावयास सांगितली होती ती येशूने पूर्ण केली." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जे यशयाच्या द्वारे सांगितले होते

"जे क यशयाने सांगितले होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले

"लोकांना रोगांपासून मुक्त करून त्यांना बे केले." (पाहा: प्रतिरूप)

Matthew 8:18

येशू त्याच्या अनुयायांकडून काय पेक्षा करतो हे स्पष्ट करीत हे.

तो....त्याला

हे शब्द ८:१९ मधील येशूचा उल्लेख करतात

त्याने सूचना दिल्या

"काय करावे हे त्याने त्यांना सांगितले"

मग

येशूने "सूचना दिल्यानंतर" परंतु तो तारूवर चढण्या अगोदर (पाहा यु डी बी )

जेथे कोठे

"कोणत्याहि ठिकाणी"

खोकडांस बिळें व आकाशातील पांखरांस कोटी आहेत

ह्या उपलक्षणातील प्राणी हे वन्य प्राण्यांच्या विविध श्रेणींचे प्रतिनिधित्व करतात (पाहा: उपलक्षण)

खोकडे (कोल्हे) हे कुत्र्यांसारखे दिसणारे प्राणी आहेत जे घरट्यातील पक्ष्यांना आणि इतर लहान प्राण्यांना खातात. जर तुमच्या क्षेत्रामध्ये खोकडे अज्ञात आहेत, तर कुत्र्यांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांच्या सामान्य संज्ञेचा वापर करा किंवा इतर केसाल प्राण्यांचा उल्लेख करा. (पाहा: अज्ञातांचे भाषांतर)

बिळें

खोकडे जमिनीत राहाण्यासाठी बिळें बनवितात. "खोकडांच्या" जागी तुम्ही ज्या प्राण्यांचा उल्लेख केला आहे ते जेथे राहातात त्यांच्या जागेचा उल्लेख करण्यासाठी उचित शब्दांचा वापर करा.

डोके टेकावयास जागा नाही

"झोपण्यासाठी त्याची स्वत:ची जागा नाही" (पाहा: वाक्प्रचार)

Matthew 8:21

येशू त्याच्या अनुयायांकडून काय पेक्षा करतो हे स्पष्ट करीत हे.

मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या

ही विनयशील विनंती आहे. यहूदी लोकांची अशी पद्धत होती की ज्या दिवशी लोक मरत त्या दिवशीच त्यांना पुरले जात असे, त्या माणसाचा बाप कदाचित अजून जिवंत असावा आणि तो मनुष्य त्याच्या बाप मरेपर्यंत कांही दिवस कदाचित कांही वर्षे त्याची काळजी घेण्यासाठी "पुरणे" हा शब्द शिष्टोक्ती म्हणून वापरतो (पाहा यु डी बी ). जर त्याचा बाप अगोदरच मेला असता तर, त्याने कांही तासांसाठी जाण्याची परवानगी मागितली असती. आवश्यकता असल्यास चुकीचा अर्थ टाळण्यासाठी खास निर्देश करा के बाप मेला होता किंवा नव्हता. (पाहा: शिष्टोक्ती)

मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे

ह्याचा अर्थ थोडक्यांत सांगणे, संपूर्ण विधान नव्हे, म्हणून थोडे शब्द वापरून शक्य होईल तितके थोडक्यांत स्पष्ट करा,. मनुष्याच्या विनंतीमध्ये ज्या अर्थाचा शब्द तुम्ही वापरला तोच येथे देखील वापरा.

पुरू.......दे

त्या मनुष्याच्या त्याच्या बापाच्या प्रती जबाबदारीला नाकारण्याचा हा एक मजबूत मार्ग आहे. "मेलेल्यांना पुरू दे" किंवा "मेलेल्यांना पुरण्याची परवानगी दे" ह्यांपेक्षाहि मजबूत. "मृतांनी स्वत: त्यांच्या मेलेल्यांना पुरण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय न सोडणे."

मृतांना....त्यांच्या स्वत:च्या मेलेल्यांना

"मेलेले" हे जे देवाच्या राज्याच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी रूपक आहे (पाहा: यु डी बी ; रूपक). "त्यांच्या स्वत:चे मेलेले" जे राज्याच्या बाहेर आहेत त्यांच्या नातेवाईकांचा हे उल्लेख करत जे प्रत्यक्षांत मरतात.

Matthew 8:23

येशू वादळाला शांत करतो ह्याचा अहवाल येथे सुरु होतो.

तारवांत चढला

"येशू तारवांत चढला"

त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले

८:२२ मध्ये तुम्ही "शिष्य" आणि "मागे जाणे" ह्यासाठी जे शब्द वापरले तेच येथे सुद्धा वापरा.

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

समुद्रांत मोठे वादळ उठले

"एक मोठे वादळ समुद्रांत उठले."

जेणेकरून तारू लाटांनी झांकून गेले

"जेणेकरून लाटांनी तारू झांकले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याला जागे केले, आणि म्हणाले, "आम्हांला वांचवा"

"आम्हांला वांचवा" ह्या शब्दांनी त्यांनी त्याला उठविले नाही. त्यांनी प्रथम "त्याला उठविले" आणि मग म्हटले, "आम्हांला वांचवा'"

आम्ही मारणार आहोत

"आम्ही मरू लागलोत"

Matthew 8:26

येशू वादळ शांत करतो तो अहवाल येथे समाप्त होतो.

त्यांना

शिष्यांना

तुम्ही...तुम्ही

बहुवचन

तुम्ही का भिता...?

येशू शिष्यांना अलंकारयुक्त प्रश्न विचारून त्यांचे वाक्ताडन करीत आहे. त्याचा अर्थ "तुम्ही भिऊ नये" (पाहा यु डी बी ) किंवा "तुम्हांला भिण्याचे कांहीच कारण नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

अहो तुम्ही अल्पविश्वासी

"तुम्ही" बहुवचन आहे.६:३० मध्ये तुम्ही जसे ह्याचे भाषांतर केले तसेच येथे करा.

हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे, कि वारे व समुद्रहि ह्याचे ऐकतात?

हा अलंकारयुक्त प्रश्न हे दाखवितो की शिष्यांना सुद्धा आश्चर्यांत पडले होते. ह्याचे असे भाषांतर होऊ शकते "वारे आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात, हा कोणत्या प्रकारच मनुष्य आहे?" किंवा "इतर माणसांपेक्षा असा हा विपरीत मनुष्य आम्ही पाहिला नाही! वारे आणि लाटां देखील ह्याचे ऐकतात!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

वारे आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात

लोक व प्राणी ऐकतात किंवा न ऐकतात ह्यात कांही आश्चर्य नाही, परंतु वारे व लाटांनी ऐकणे ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे मानवीकरण असे वर्णन करते की नैसर्गिक घटक देखील मानवासारखे ऐकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात. (पाहा: मानवीकरण)

Matthew 8:28

दोन भूतग्रस्तांना येशू बरे करतो हा अहवाल येथे सुरु होतो.

पलीकडे जाणे

"गालील समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाणे."

गदरेकरांच्या देशांत

गदारा शहरांत राहाणाऱ्याना गदरेकर हे नाव दिले होते. (पाहा: नावांचे भाषांतर)

ते..अतिशय हिंसक होते की कोणी प्रवासी त्या वाटेने प्रवास करू शकत नव्हता

त्या दोन माणसांना धरलेली ती भूतें भयंकर धोकादायक होती की त्या क्षेत्रातून कोणीहि जाऊ शकत नव्हते.

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

हे देवाच्या पुत्रा, तुझा आमचा काय संबंध?

हा पहिला अलंकारयुक्त प्रश्न फार खुनशी आहे (पाहा: यु डी बी , अलंकारयुक्त प्रश्न)

देवाचा पुत्र

येशू कोण आहे ह्यामुळे त्याचे स्वागत आम्ही करीत नाही हे दाखविण्यासाठी भूतें ह्या शीर्षकाचा उपयोग करतात.

नेमलेल्या सामायापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस का?

हा दुसरा अलंकारयुक्त प्रश्न देखील खुनशी आहे आणि ज्याचा अर्थ "देवाने आम्हांला शिक्षा करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरविलेली आहे, त्या अगोदर तू आम्हांला शिक्षा करून देवाची आज्ञा मोडू नकोस." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

Matthew 8:30

दोन भूतग्रस्तांना येशू बरे करतो हा अहवाल पुढे चालू राहातो.

आता

हे असे दाखविते की कथा पुढे चालू राहाण्या अगोदर लेखकाला वाचकांना जे कांही सांगावयाचे आहे ते सांगेल. येशू तेथे येण्यागोदर डुकरे तेथे होतीच (पाहा: घटनांचा क्रम)

तू जर आम्हांला काढीत असलास

ह्याचा अर्थ असा सुद्धा होतो की, "जर तू आम्हांला काढत आहेस तर"

आम्हांला

अपवर्जक (पाहा: अपवर्जक)

त्यांना

त्या माणसांतील भूते.

ती भूतें बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली

"भुतांनी त्या माणसाला सोडून दिले व ते प्राण्यांमध्ये शिरले."

पाहा

येथे "पाहा" हा शब्द आपल्याला येणाऱ्या एका आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्यासाठी सावध करीत आहे.

कड्यावरून खाली पडला

"धडक धावत जाऊन कड्यावरून खाली पडला"

पाण्यांत बुडून मेला

"बुडाला"

Matthew 8:33

दोन भूतग्रस्त माणसांना येशू बरे करतो त्याचा अहवाल येथे समाप्त होतो.

डुकरे चारणारी माणसे

"डुकरांची काळजी घेणारी माणसे'

भूतांद्वारे नियंत्रण केल्या जाणाऱ्या माणसांचे काय झाले

येशूने भूत नियंत्रित माणसांचे काय केले.

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

सर्व नगर

ह्याचा अर्थ अनेक लोक, किंवा सर्वाधिक लोक, आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

हद्द

"नगर आणि त्याच्या सभोवतीचा भूभाग"