Matthew 9

Matthew 9:1

येशूने पक्षघाती माणसाला बरे केले त्याच्या अहवालाची सुरुवात.

येशू तारवांत चढला

कदाचित शिष्य येशूच्या बरोबर गेले (पाहा यु डी बी ).

तारू

कदाचित ८:२२ मध्ये असेलेले तेच तारू असावे. केवळ गोंधळ टाळण्यासाठी स्पष्ट करा.

तो स्वत:च्या नगरांत आला

"जेथे तो राहात होता ते नगर"

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

ते....त्यांचे

ते ज्यांनी पक्षघाती माणसाला येशूकडे आणले. त्यामध्ये स्वत: पक्षघाती समावेश असू शकतो.

पुत्र

तो मनुष्य येशूचा खरा मुलगा नव्हता. येशू त्याच्याशी विनयशीलपणे बोलत होता. जर हे गोंधळात टाकीत असेल तर, त्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "माझ्या मित्रा" किंवा "हे तरुण माणसा" किंवा ते वगळू शकता.

तुझ्या पापांची क्षमा झाली आहे

"देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे" किंवा "मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे."

Matthew 9:3

येशू पक्षघाती माणसाला बरे करण्याचा अहवाल पुढे चालू.

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

आपआपसात

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की "त्यांच्या आपआपसात" "त्यांच्या मनात" किंवा "एकमेकांना" त्यांच्या बोलाण्याद्वारे.

दुर्भाषण करणे

केवळ देव करू शकणाऱ्या

याऱ्य गोष्टी येशू करण्याचा दावा करीत आहे असे शास्त्री लोकांना वाटले.

त्यांचे विचार ओळखले

ते काय विचार करीत होते हे येशूने अद्भुतरित्या ओळखले असावे किंवा ते तसे एकमेकांशी बोलत होते हे कदाचित त्यांनी पाहिले असावे.

तुम्ही आपल्या मनांत वाईट विचार का आणता?

शास्त्री लोकांची खरडपट्टी काढण्यासाठी येशूने अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही...तुमचे

बहुवचन

वाईट

हे फक्त चूक नव्हे तर हे नैतिक वाईट किंवा दुष्टपणा आहे.

कोणते सोपे आहे....?

येशूने हा प्रश्न शास्री लोकांना आठवण करून देण्यासाठी विचारला कारण त्यांचा असा विश्वास होता की त्या माणसाच्या पापामुळे त्याला पक्षघात झाला होता आणि जर त्याच्या पापांची क्षमा झाली तर तो पुन्हा चालू शकेल, आणि म्हणून जेव्हा त्याने पक्षघाती माणसाला बरे केले, तर शास्त्री लोकांना हे कळेल की तो पापांची क्षमा करू शकतो.(पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कोणते बोलणे सोपे, 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे' किंवा 'उठ आणि चालू लाग'?

"हे सोपे आहे का, 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे" किंवा असे बोलणे सोपे की 'उठ आणि चालू लाग'?"

तुझ्या पापांची क्षमा झाली आहे

ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "मी तुझ्या पापांची क्षमा करतो" (यु डी बी ) किंवा २) "देव तुझ्या पापांची क्षमा करतो." येथ "तुझ्या" हे एकवचनी आहे. (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

परंतु तुम्हांला समजावे म्हणून

"मी तुम्हांला सिद्ध करून दाखवीन" "तुम्हांला" हे बहुवचन आहे.

तुझे....तुला

हे एकवचन आहे.

तुझ्या घरी जा

दुसरीकडे जाण्यांस येशू त्या माणसाला मना करीत नाही. तो त्या माणसाला घरी जाण्याची संधी देत आहे.

Matthew 9:7

येथे पक्षघाती मनुष्याला बरे करण्याचा अहवाल समाप्त होतो. येशू नंतर जकातदाराला त्याचा शिष्य होण्यास पाचारण देतो.

गौरव

५:१६ मध्ये तुम्ही जो शब्द वापरला आहे तोच येथे पण वापरा.

एवढा अधिकार

पापांची क्षमा घोषित करण्याचा अधिकार.

मत्तय...त्याला...तो

मंडळीची परंपरा असे म्हणते की मत्तय हाच मात्तायाचे शुभवर्तमान ह्याचा लेखक आहे, परंतु मजकूर "त्याला" आणि "तो" ह्या सर्वनामांना "मला" आणि "मी" ह्या सर्वानामांमध्ये बदलण्याचे कांहीच कारण देत नाही.

त्याने त्याला सांगितले

"येशूने मात्तायाला सांगितले"

येशू तेथून जातांना

९:८ मधील "पाहा" ह्या शबाने सुरु झालेल्या घटनेचा परिचय देण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग केला गेला आहे. तुमच्या भाषेमध्ये असे करण्याचा जर मार्ग असेल तर तुम्ही तसे करण्याचा विचार करू शकता.

जवळून गेला

जाण्यासाठी साधारण शब्दाचा उपयोग करा. येशू वर चढून जात होता किंवा खाली उतरत होता किंवा तो कफर्णहूमाकडे जात होता किंवा कफर्ण हूमापासून जात होता हे स्पष्ट नाही.

तो उठून त्याच्या मागे गेला

"मत्तय उठून येशूच्या मागे गेला" एक शिष्य म्हणून (पाहा यु डी बी ) केवळ पुढील गंतव्यापर्यंतच नव्हे.

Matthew 9:10

मत्तय जकातदाराच्या घरांत ह्या घटनां घडल्या.

घर

ते कदाचित मात्तायाचे घर असावे (पाहा यु डी बी ), परंतु ते येशूचे सुद्धा घर असू शकते. ("येशू आणि त्याच्या शिष्यांबरोबर जेवला"). गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक असल्यास निर्देशित करा.

पाहा

"पाहा" हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये असे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी भाषेमध्ये अस उपयोग केला आहे, "एक मनुष्य होता तो..."

परुशी लोकांनी जेव्हा

याऱ्य पाहिले

"येशू जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवत आहे हे जेव्हा परुशी लोकांनी पाहिले"

Matthew 9:12

मत्तय जकातदाराच्या घरांत ह्या घटनां घडल्या.

जेव्हा येशूने हे ऐकले

"हे" हा शब्द येशू जकातदार आणि पापी लोकांच्याबरोबर का जेवतो ह्या प्रश्नाचा उल्लेख करते.

मजबूत शरीराचे लोक

"निरोगी लोक." (पाहा: रूपक))

वैद्य

"डॉक्टर" (यु डी बी )

जे लोक आजारी आहेत त्यांना एक पाहिजे

"जे लोक आजारी आहेत त्यांना डॉक्टरची गरज आहे"

तुम्ही जाऊन हे शिका

"तुम्ही ह्याचा अर्थ शिका"

तुम्ही जावे

सर्वनाम "तुम्ही" परुशी लोकांचा उल्लेख करतो.

Matthew 9:14

येशूचे शिष्य उपास करीत नाहीत ह्या सत्याविषयी बाप्तिस्मा करणारा योहानाच्या शिष्यांनी पश्न विचारला.

वऱ्हाडी दु:खी होऊ शकतात का....त्यांच्या?

हाड्यांबरोबर वर असतांना त्यांनी उपास करावा अशी कोणीहि अपेक्षा करीत नाहीत. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

वऱ्हाडी

येशूच्या शिष्यांसाठी हे रूपक आहे (पाहा: रूपक)

वर अजूनही त्यांच्याबरोबर आहे...जेव्हा वर त्यांच्यापासून काढून घेतल्या जाईल

"वर" हा येशू हे आणि तो अजूनहि जिवंत आहे आणि "तो अजूनहि त्याच्या शिष्यांबरोबर आहे" (पाहा: रूपक)

वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल

"कोणीतरी वराला घेउन जातील." ठार मारले जाण्यासाठी हे रूपक आहे (पाहा: रूपक, कर्तरी किंवा कर्मणी)

दु:खी व्हा

"शोक करा...दुख करा" (यु डी बी )

Matthew 9:16

योहानाच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे येशू पुढे चालू ठेवत आहे.

कोणीही नव्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावीत नाहीत

जुनी परंपरा माहित असलेले लोक नवीन परंपरा स्वीकारण्यास उत्सुक नसतात ( पाहा: रूपक)

वस्त्र

"कपडे"

ठिगळ

"नवीन कापडाचा तुकडा" फाटलेल्या कापडाला झाकण्यासाठी उपयोगांत आणला जातो.

Matthew 9:17

योहानाच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे येशू पुढे चालू ठेवत आहे.

कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालीत नाहीत

योहानाच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हे रूपक किंवा दाखला आहे, तो प्रश्न असा, "आम्ही व परुशी पुष्कळ उपास करितो, पण आपले शिष्य उपास का करीत नाहीत?" (पाहा: रूपक)

लोक घालीत नाहीत

"कोणीहि ओतीत नाहीत" (यु डी बी ) किंवा "लोक कधीच घालीत नाहीत"

नवीन द्राक्षरस

"नवीन द्राक्षरस" जो अजून आंबला नाही त्याचा हा उल्लेख करतो. तुमच्या क्षेत्रामध्ये जर द्राक्ष अपरिचित असतील तर फळासाठी सर्वसाधारण शब्दाचा उपयोग करा.

जुने बुधले

अनेक वेळेला उपयोगांत आणल्या गेलेल्या बुधल्यांचा येथे उल्लेख केला आहे.

बुधले

ह्या पिशव्या आहेत ज्या प्राण्यांच्या चर्मापासून बनविल्या जातात. त्यांना "द्राक्षारसाच्या पिशव्या" किंवा "चर्माच्या पिशव्या" म्हणू शकता. (यु डी बी ).

चर्म फुटून जाईल

जेव्हा याऱ्य नवीन द्राक्षारस आंबतो तेव्हा याऱ्य तो विस्तारतो, ते फुटून बाहेत येतात कारण ते पुन्हा ताणू शकत नाहीत.

नष्ट होतात

"बिघडतात" (यु डी बी ).

नवीन बुधले

"नवीन बुधले" किंवा "चर्माच्या नवीन पिशव्या" ज्याचा कधीच उपयोग केला नाही अशा चर्माच्या पिशव्यांचा उल्लेख हे करते.

Matthew 9:18

यहूदी अद्खीकाऱ्याच्या मुलीला येशू चमत्कारिकरित्या बरे करतो तो अहवाल येथे सुरु होतो.

ह्या गोष्टीं

येशूने योहानाच्या शिष्यांना उपसाबद्दल जे उत्तर दिले त्याचा हा उल्लेख करीत आहे.

पाहा

हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये मार्ग असेल.

त्याच्या पाया पडला

यहूदी संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीला मान देण्याची ही पद्धत होती.

येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल

हे असे दर्शविते की येशुमध्ये त्याच्या मुलीला परत जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे असा त्या यहूदी अधिकाऱ्याला असा विश्वास होता.

त्याचे शिष्य

"येशूचे शिष्य"

Matthew 9:20

यहूदी अधिकाऱ्याच्या मुलीला बरे करण्यास जात असतांना येशू एका दुसऱ्या स्त्रीला कसे बरे करतो ह्याचे हे वर्णन आहे.

पाहा

हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये मार्ग असेल.

तीव्र रक्तस्राव होत होता

"गंभीर रक्तस्राव होत होता" कदाचित तिच्या गर्भातून रक्तस्राव होत असावा, तरीहि त्यासाठी ती कांही सामान्य वेळ नव्हती. कांही संस्कृतीमध्ये ह्या अवस्थेचा उल्लेख करण्याचे विनयशील मार्ग आहेत. (पाहा: शिष्टोक्ति)

मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन

ते वस्त्र तिला बरे करील असा तिचा विश्वास नव्हता. येशू तिला बरे करील असा तिचा विश्वास होता. (पाहा: मानवीकरण)

वस्त्र

"झगा"

परंतु

"त्या ऐवजी." जे कांही होईल असे त्या स्त्रीला वाटत होते ते झाले नाही.

मुली

ती सरी येशूची खरी मुलगी नव्हती. येशू तिच्याशी विनयशीलपणे बोलत होता. जर हे गोंधळात टाकणारे आहे. ह्याचे असे सुद्धा भाषांतर करू शकतो "हे तरुण स्त्री" किंवा वगळले जाऊ शकते.

Matthew 9:23

येशू यहूदी अधिकाऱ्याच्या मुलीला बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

अधिकाऱ्याचे घर

हे यहूदी अधिकाऱ्याचे घर होते.

पांवा

हे लांब पोकळ असे संगीत वाद्य आहे ज्यांत वरून किंग एका टोकापासून हवा फुंकून वाजविले जाते.

पांवा

वाजविणारे

"पांवा वाजविणारे लोक"

दूर व्हा

येशू अनेक लोकांना सांगत होता, तुमच्या भाषेत जर बहुवचनी आज्ञा असेल तर त्याचा उपयोग करा.

मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे

येशू येथे झोपेचं प्रतिमेचा उपयोग करीत हे कारण तिचा मृत्यू फक्त थोड्या वेळेसाठी होता, आणि त्याला हे माहित होते की तो तिला पुन्हा जिवंत करणार आहे (पाहा शिष्टोक्ति)

Matthew 9:25

येशू यहूदी अधिकाऱ्याच्या मुलीला बरे करण्याचा अहवाल येथे समाप्त होतो.

मग लोकसमुदायाला बाहेर लाविल्यावर

"येशूने जमावाला बाहेर घालविल्यानंतर" किंवा "त्या कुटुंबाने लोकांना बाहेर घालवून दिल्यानंतर"

ती उठली

"बिछान्यावर उठून बसली" ८:१५ मध्ये जसे आहे तीच कल्पना येथे देखील आहे.

हे वर्तमान त्या अवघ्या देशांत पसरले

हे मानवीकरण म्हणजे हे वर्तमान पसरण्याचे कारण म्हणजे लोकांनी इतर दुसऱ्या लोकांना त्याबद्दल सांगितले. "त्या देशांतील सर्व लोकांनी त्याबद्दल ऐकले (यु डी बी ) किंवा "ज्या लोकांनी ती मुलगी जिवंत झाली हे पाहिले होते त्यांनी त्या देशांतील प्रत्येकाला त्याबद्दल सांगितले (पाहा; मानवीकरण)

Matthew 9:27

येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करतो त्याचा अहवाल येथे सुरु. # येशू तेथून जात असताना

येशू तो देश सोडत होता

जात असतांना

येशू वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जात होता हे स्पष्ट नाही. जाण्यासाठी साधारण शब्दाचा उपयोग करा.

दाविद्पुत्र

येशू हा प्रत्यक्षांत दाविदाचा पुत्र नव्हता, म्हणून त्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "दाविदाचा वंशज" (यु डी बी ). तथापि, "दाविदाचा पुत्र" हे मसिहा शीर्षक दिले गेले होते (पाहा २१:९), आणि लोक कदाचित येशूला त्याच शीर्षकाने संबोधित करीत होते.

जेव्हा

याऱ्य येशू घरांत गेला तेव्हा याऱ्य

हे घर बहुतेक येशूचे असावे (यु डी बी ) किंवा ९:१० मध्ये असलेले असावे.

होय, प्रभू

होय, प्रभू तू आम्हांला बरे करशील असा आमचा विश्वास आहे."

Matthew 9:29

येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करतो हा अहवाल येथे समाप्त होतो.

त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले

त्याने एकाचे वेळेस दोघांच्या डोळ्यांना स्पर्श केला हे स्पष्ट नाही किंवा त्याच्या उजवी हाताने प्रथम एकाच्या डोळ्यांना स्पर्श केला व नंतर दुसऱ्याच्या डोळ्यांना केला. प्रथेप्रमाणे डाव्या हाताचा उपयोग अशुद्ध गोष्टींसाठी केला जात असे, त्याने त्याच्या उजव्या हाताचा उपयोग करण्याची अधिक शक्यता आहे. तो त्यांना स्पर्श करीत असतांना तो बोलत होता किंवा त्याने प्रथम त्यांना स्पर्श केला व नंतर तो बोलला हे स्पष्ट नाही.

त्यांना दृष्टी आली

"देवाने त्यांच्या डोळ्यांना बरे केले" किंवा "ते दोन आंधळे पाहू शकत होते" (पाहा कर्तरी किंवा कर्मणी)

परंतु

"त्याऐवजी." येशूने त्यांना जे सांगितले होते ते त्यांनी केले नाही.

ही पातमी पसरली

"त्यांना काय झाले हे त्यांनी पुष्कळ लोकांना सागितले"

Matthew 9:32

येशू त्याच्या स्वत:च्या गावांत लोकांना बरे करतो हा अहवाल पुढे चालू.

पाहा

हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये मार्ग असेल.

मुका

बोलू न शकणारा

मुक्याला वाचा आली

"मुका मनुष्य बोलू लागला" किंवा "जो मनुष्य मुका होता तो बोलू लागला" किंवा "तो मनुष्य, जो मुका राहिला नव्हता, बोलू लागला."

लोकसमुदाय आश्चर्यचकित झाला

"लोकांना आश्चर्य वाटले"

असे कधीहि पाहण्यांत आले नव्हते

ह्याचा अर्थ असा होऊशाकतो "असे कधी घडले नव्हते" किंवा "कोणीहि असे कधी केले नव्हते."

हा भूतें काढतो

"तो भूतांना सोडून जाण्याची सक्ती करतो." सर्वनाम "तो" हे येशूचा उल्लेख करते.

Matthew 9:35

हा विभाग गालील क्षेत्रामधील येशूच्या शिकवण, प्रचार कार्य आणि आरोग्य सेवेच्या कार्याचा सारांश पुरवितो.

सर्व नगरें

"अनेक नगरें" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

नगरें...गांवे

"मोठी गांवे....लहान गांवे" किंवा "मोठी नगरें...लहान नगरें"

सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी

"प्रत्येक रोग व प्रत्येक दुखणी." "रोग आणि "दुखणी" हे दोन शब्द दाट संबंधित आहेत परंतु शक्यतो ते दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांचे भाषांतर केले पाहिजे. "रोगामुळे" एखादा व्यक्ती आजारी पडतो. "आजार" हा रोगामुळे आलेली शारीरिक दुर्बलता आणि दुखणे होय.

ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते

"लोकांचा कोणीहि पुढारी नव्हता" (पाहा: उपमा)

Matthew 9:37

मागील विभागांत येशू त्याच्या शिष्यांना लोकसमुदायाच्या गरजांच्या प्रती त्याचं शिष्यांचा कसा प्रतिसाद असावा हे सांगण्यासाठी तो पिका बद्दलच्या भाषा अलंकाराचा उपयोग करीत आहे.

पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत

हे रूपक लोकांचा मोठा जमाव जो देवावर विश्वास ठेवील आणि त्याच्या राज्यांत त्यांचा समावेश होईल अशा लोकांची तुलना शेतातल्या पिकाशी आणि जे इतरांना देवाविषयी सागतील त्यांची तुलना मजूरांशी करीत आहे. रूपकाचा महत्वाचा मुद्दा हा आहे की मोठ्या लोकसमुदायाला देवाविषयी सांगणारे फारच थोडे आहेत. (पाहा: रूपक)

पीक

"पिकलेल्या अन्नाचा संग्रह"

मजूर

"कामकरी"

पिकाच्या धन्याची प्रार्थना करा

"प्रभूची प्रार्थना करा. तोच पिकाचा प्रभारी आहे"