Names

अक्विला

तथ्य:

अक्विला पंत प्रांतातील एक यहुदी ख्रिस्ती होता, जो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर होता.

  • अक्विला व प्रिस्किला काही काळ इटलीतील रोममध्ये राहिली होती परंतु नंतर रोमन सम्राट क्लौदी याने रोम सोडून जाण्यासाठी सर्व यहुद्यांना भाग पाडले.
  • त्यानंतर, अक्विला व प्रिस्किला यांनी करिंथला प्रवास केला, तिथे त्यांना प्रेषित पौल भेटला.
  • त्यांनी पौलासोबत तंबू बनवण्याचे काम केले आणि त्यांनी सुवार्ताप्रसार कार्यासाठीही त्याला मदत केली.
  • अक्विला व प्रिस्किल्ला हे दोघेही विश्वासनाऱ्यांना येशूबद्दल सत्य शिकवत होते; त्यातील एक जण अपुल्लो नावाचा प्रतिभावान शिक्षक होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अपुल्लो, करिंथ, रोम)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अजऱ्या

तथ्य:

जुन्या करारांमध्ये अजऱ्या नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • एक अजऱ्याला त्याच्या बाबेलमधील नावाने म्हणजेच अबेदनगो या नावाने चांगले ओळखले जाते. तो यहूदातील बऱ्याच इस्राएलांपैकी एक होता. ज्यांना नबुखदनेस्सरच्या सैन्याने पकडले आणि बाबेलमध्ये राहायला नेले. अजऱ्या व त्याचे सहकारी इस्राएली हनन्या व मीशाएल यांनी बाबेलच्या राजाची उपासना करण्यास नकार दिला, म्हणून त्याने त्यांना एका भयानक धगधगणाऱ्या भट्टीत दंड म्हणून फेकून दिले. परंतु परमेश्वराने त्यांना वाचवले आणि त्यांना काहीही इजा झाली नाही.
  • यहूदाचा राजा उज्जीया सुद्धा "अजऱ्या" म्हणून ओळखण्यात आले.
  • दुसरा अजऱ्या हा जुन्या करारामध्ये महायाजक होता.
  • संदेष्टा यिर्मया याच्या काळात अजऱ्या नावाच्या एका मनुष्याने इस्राएली लोकांना त्यांची जन्मभूमी सोडुन, देवाची आज्ञा मोडण्यास चुकीने उद्युक्त केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पाहा: बाबेल, दानीएल, हनन्या, मिशाएल, यिर्मया, उज्जीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अंत्युखिया

तथ्य:

नवीन करारामध्ये अंत्युखिया नावाची दोन शहरे होती. एक भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याजवळ असलेल्या सिरियामध्ये होते. दुसरा कलस्सै शहराच्या जवळ असलेल्या रोमन प्रांतामधील पिसिदियामध्ये होता.

  • सीरियातील अंत्युखिया येथील स्थानिक मंडळी ही पहिले ठिकाण होते जिथे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना "ख्रिस्ती" म्हटले गेले. मंडळीचा सुवर्तीकांना इतर देशांपर्यंत पोहचण्यासाठी पाठवण्यामध्येही सक्रिय सहभाग होता.
  • यरुशलेमच्या मंडळीतील नेत्यांनी, ख्रिस्ती बनण्यासाठी यहुदी कायदा पाळायची गरज नाही हे त्यांना समजण्यास मदत करण्यासाठी सीरियातील अंत्युखिया येथील मंडळीतील विश्वासूंना पत्र पाठविले.
  • सुवार्ता सांगण्यासाठी पौल, बर्णबा आणि योहान मार्क पिसिदीयातील अंत्युखिया येथे गेले. दुसऱ्या शहरातून काही यहुदी अडचण निर्माण करण्यासाठी आले, आणि त्यांनी पौलाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु खूप अशा दुसऱ्या लोकांनी, यहूदी आणि विदेशी दोन्हींनी शिक्षण ऐकून येशूवर विश्वास ठेवला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, कलस्सै, योहान मार्क, पौल, प्रांत, रोम, सीरिया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अथल्या

तथ्य:

यहुदाचा राजा यहोराम ह्याची अथल्या ही दुष्ट पत्नी होती. ती इस्राएलमधील दुष्ट राजा अम्रीची नात होती.

  • अथल्याचा मुलगा अहज्या हा यहोराम मेल्यानंतर राजा झाला.
  • जेंव्हा तिचा मुलगा अहज्या मेला, त्यानंतर अथल्याने राजाच्या उरलेल्या कुटुंबाला मारण्याचा कट आखला.
  • परंतु अथल्याचा छोटा नातू योवाश ह्याला त्याच्या चुलतीने लपवून ठेवल्यामुळे तो वाचला गेला. अथल्या ही सहा वर्षे सत्तेवर होती, नंतर तिला ठार केले आणि योवाश राजा झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहज्या, यहोराम, योआश, अम्री)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अदोनीया

व्याख्या:

अदोनीया हा दाविदाचा चौथा मुलगा होता.

  • अबशालोम आणि अम्नोन मेल्यानंतर अदोनीयाने इस्राएलचा राजा होण्यासाठी प्रयत्न केला.
  • परंतु, परमेश्वराने दावीदाचा मुलगा शलमोन राजा होईल असे अभिवचन दिले होते. त्यामुळे अदोनीयाच्या कटाचा नाश झाला आणि शलमोन राजा झाला.
  • ज्यावेळी अदोनीयाने दुसऱ्यांदा राजा होण्यासाठी प्रयत्न केला, त्यावेळी शलमोनाने त्याला जीवे मारले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, शलमोन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

  • Strong's: G138

अदोम, अदोमी, अदोमांच्या, इदोम

तथ्य:

अदोम हे एसावाचे दुसरे नाव होते. ज्या प्रांतात तो राहिला, ते सुद्धा "अदोम" म्हणून आणि नंतर "इदोम" म्हणून ओळखले गेले. "अदोमी" हे त्याचे वंशज होते.

  • अदोमाच्या प्रदेशाने त्याचे स्थान काळानुसार बदलले. हे मुख्यत्वे इस्रायलच्या दक्षिणेला स्थित होते आणि अखेरीस दक्षिणी यहूदामध्ये विस्तारले.
  • नवीन कराराच्या काळात, अदोमाने दक्षिणी यहूदाच्या अर्ध्या प्रांताला व्यापून टाकले. ग्रीक लोक त्याला "इदोम" असे म्हणत.
  • "इदोम" या शब्दाचा अर्थ "तांबडा" ज्याचा संदर्भ कदाचित, जेंव्हा एसाव जन्मला तेंव्हा त्याच्या शरीरावर तांबड्या रंगाचे केस होते, या तथ्याशी आहे. किंवा त्याचा संदर्भ कदाचित तांबड्या मसूराच्या शिजलेल्या सालीशी आहे, ज्याच्या बदल्यात त्याने आपला जेष्ठपणाचा हक्क विकला.
  • जुन्या करारामध्ये, अदोम देशाचा उल्लेख बऱ्याचदा इस्राएलाचा शत्रू म्हणून केला आहे.
  • ओबद्या नावाचे संपूर्ण पुस्तक अदोमच्या नाशाविषयी सांगते. जुन्या करारातील इतर संदेष्ट्यांनी अदोमाविषयी नकारात्मक भाविष्यवाण्या केल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शत्रू, जेष्ठत्व, एसाव, ओबद्या, संदेष्ट्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अंद्रिया

तथ्य:

अंद्रिया हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याच्या जवळचे शिष्य (ज्यांना नंतर प्रेषित असे म्हटले) होण्यासाठी निवडले.

  • अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता. ते दोघेही मच्छिमार होते.
  • पेत्र व अंद्रिया हे गलीलातील समुद्रात मासे धरत होते जेव्हा येशूने त्यांना त्याचे शिष्य होण्यासाठी बोलावले.
  • पेत्र व अंद्रिया हे दोघे येशूला भेटण्यापूर्वी ते बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे शिष्य होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, बारा

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अप्पोलोस

तथ्यः

अपोल्लस हा इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरातील यहूदी होता आणि लोकांना येशूविषयी शिकवण्याची त्यांची क्षमता होती.

  • अपोल्लस हिब्रू शास्त्रवचनांचे चांगले शिक्षण होते आणि एक कुशल वक्ता होता.
  • त्याला एफिससमधील अक्विला व प्रिस्किल्ला नावाच्या दोन ख्रिश्चनांनी शिकवले.
  • पौलाने यावर जोर दिला की तो आणि अपुल्लोस, तसेच इतर सुवार्तिक आणि शिक्षकसुद्धा लोकांना येशूवर विश्वास ठेवण्यास मदत करण्याच्या त्याच उद्देशाने प्रयत्न करीत आहेत.

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे])

(हे देखील पहा: [अक्विला], [इफिसस], [प्रिस्किल्ला], [देवाचे शब्द])

बायबल संदर्भ:

  • [१ करिंथकरास 01:13]
  • [१ करिंथकर 16:12]
  • [प्रे.कृ18:25]
  • [तितास पत्र 03:13]

शब्द डेटा:

  • मजबूत: G625

अबनेर

व्याख्या:

अबनेर जुन्या करारातील शौल राजाचा एक चुलत भाऊ होता.

  • अबनेर हा शौलाच्या सैन्यातील मुख्य सेनापती होता, ज्याने तरुण दाविदाची ओळख शौलाशी करून दिली ज्यावेळी तो मोठ्या गालाथ्याला मारून आला.
  • शौल राजा मरण पावला तेव्हा अबनेराने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ याला इस्राएलावर राजा नेमले, तर दाविदाला यहूदावर राजा म्हणून नेमले.
  • नंतर, दाविदाचा मुख्य सेनापती यवाबाने अबनेराला विश्वासघात करून मारले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अबशालोम

तथ्य:

अबशालोम हा दाविदाचा तिसरा मुलगा होता. तो त्याच्या देखण्या व तेजस्वी स्वभावासाठी प्रसिद्ध होता.

  • जेंव्हा अबशालोमाची बहिण तामार हिच्यावर अम्मोनाने बलात्कार केला तेंव्हा अबशालोमाने अम्मोनाला मारण्यासाठी योजना आखली.
  • अम्मोनाला मारल्यानंतर अबशालोम गशूर प्रांतात पळून गेला (जिथून त्याची आई माका होती) आणि तिथे तीन वर्षे राहिला. तेंव्हा दाविद राजाने त्याला यारुशलेमेस परत आणण्यासाठी निरोप पाठवला, परंतु दावीद राजाने त्याला त्याच्या उपस्थितीत येण्याची परवानगी दिली नाही.
  • अबशालोमाने काही लोकांना दावीद राजाच्या विरोधमध्ये वळवले आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केले.
  • दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबशालोमाबरोबर युद्ध केले आणि त्याचा वध केला. जेव्हा हे घडले तेव्हा दाविदाला खूप दुःखी वाटले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: गशूर, अम्मोन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अबीमलेख

तथ्य:

ज्यावेळी अब्राहाम व इसहाक हे कनान देशात राहत होते, त्यावेळी अबीमलेख हा पलीष्ट्यांच्या गरार राज्याचा राजा होता.

  • अब्राहामाने अबीमलेखला असे सांगून फसवले की सारा त्याची बायको नव्हे तर त्याची बहीण आहे.
  • अब्राहाम आणि अबीमलेखाने बैर-शेबा येथे विहिरीच्या मालकी हक्काविषयीचा करार केला.
  • बऱ्याच वर्षांनंतर इसहाकाने अबीमलेख आणि गरारमधील इतर माणसे यांना फसवून खंबीरपणे सांगितले की रिबका ही त्याची बायको नव्हे तर त्याची बहिण आहे.
  • अबीमलेख राजाने आधी अब्राहामला आणि नंतर इसहाकाला त्याच्याशी खोटे बोलण्याबद्दल दोष दिला.
  • अजून एक अबीमलेख नावाचा पुरुष होता जो गीदोनाचा मुलगा आणि योथानाचा भाऊ होता. काही भाषांतरे नावामाधील शब्द लेखनामध्ये (स्पेलिंगमध्ये) थोडासा बदल करून स्पष्ट करतात की तो अबीमलेख राजापासून वेगळा आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बैर-शेबा, गरार, गिदोन, योथाम, पालीष्टी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अबीया

तथ्य:

अबीया हा यहूदाचा राजा होता. त्याने ई. स. पूर्व 915 पासून 913 पर्यंत राज्य केले. तो रहबाम राजाचा मुलगा होता. जुन्या करारामध्ये अबीयाच्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती:

  • शामुवेलाचे मुलगे अबीया आणि योएल हे बैरशेबा येथे इस्राएल लोकांच्यासाठी न्यायनिवाड्याचे काम करीत होते. अबीया आणि त्याचा भाऊ अप्रामाणिक आणि लोभी असल्यामुळे, लोकांनी शमुवेलाला न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांच्या ऐवजी एक राजा नेमण्यास सांगितले.
  • अबीया दावीद राजाच्या कारकिर्दीमध्ये मंदिरातील एक याजक होता.
  • अबीया हा यराबाम राजाच्या मुलांपैकी एक होता.
  • अबीया हा एक मुख्य याजक होता जो जरुब्बाबेल बरोबर बाबेलच्या बंदिवासातून यरुशलेमला परतला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अब्याथार

व्याख्या:

दावीद राजाच्या काळात अब्याथार हा इस्राएलचा महायाजक होता.

  • शौल राजाने जेव्हा याजकांना ठार मारले तेव्हा अब्याथार पळून वाळवंटात दाविदाकडे गेला.
  • अब्याथार आणि सादोक नावाच्या आणखी एका महायाजकाने दावीदाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विश्वासाने त्याची सेवा केली.
  • दाविदाच्या मृत्यूनंतर, अब्याथारने शलमोनाऐवजी अदोनियाला राजा बनण्याच्या प्रयत्नात मदत केली.
  • या कारणास्तव, शलमोन राजाने अब्याथारला याजक पदावरून काढून टाकले.

(हे सुद्धा पहा सादोक, शौल, दावीद, शलमोन, अदोनीया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अब्राहाम, अब्राम

तथ्य:

अब्राम हा ऊर शहरातील एक खास्दी पुरुष होता ज्याला परमेश्वराने इस्राएल राष्ट्राचा पूर्वज म्हणून निवडला होता. परमेश्वराने त्याचे नाव "अब्राहाम" ठेवले.

  • "अब्राम" या शब्दाचा अर्थ "महान पिता" असे आहे.
  • "अब्राहाम" याचा अर्थ "पुष्कळांचा पिता."
  • परमेश्वराने अब्राहामाला अभिवचन दिले की त्याच्याकडे अनेक संतती असतील, जो एक महान राष्ट्र बनेल.
  • अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली. परमेश्वराने अब्राहामाला खास्दी देश सोडून कनान देशात आणले.
  • अब्राहाम आणि त्याची बायको सारा फारच वृद्ध होती आणि कनान देशात राहत असताना त्यांना एक पुत्र, इसहाक झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: कनान, खास्दी, सारा, इसहाक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 04:06 कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या संतानांना वतन म्हणुन देईन.

  • 05:04 मग देवाने अब्रामाचे बदलून अब्राहाम असे ठेवले, याचा अर्थ “पुष्कळांचा पिता.”

  • 05:05 एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असतांना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला.

  • 05:06 जेंव्हा इसहाक तरूण झाला तेंव्हा देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घे व त्याचे मला होमार्पण कर.”

  • 06:01 जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.

  • 06:04 ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे सोपवण्यात आली.

  • 21:02 देवाने अब्राहामास असे वचन दिले की त्याच्या द्वारे जगातील सर्व कुळे आशिर्वादीत होतील.

  • Strong's: H87, H85, G11


अमस्या

तथ्य:

ज्यावेळी अमस्याच्या वडिलांना योवाश राजाला मारण्यात आले त्या नंतर अमस्या यहुदा राज्याचा राजा झाला.

  • अमस्या राजाने यहुदावर एकोणतीस वर्षे राज्य केले, इ.स. पूर्व 796 पासून ते इ.स.पूर्व 767 पर्यंत.
  • तो एक चांगला राजा होता परंतु जेथे मूर्तींची पूजा केली जाते त्या उच्चस्थानांचा त्याने नाश केला नाही.
  • अमस्याने शेवटी आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या सर्व माणसांना जिवे मारले.
  • त्याने बंडखोर अदोमी लोकांचा पराभव केला आणि यहूदा राज्याच्या ताब्यात त्यांना परत आणले.
  • त्याने इस्राएलातील राजा योवाशला एका युद्धात आव्हान दिले, परंतु हरला गेला. यरुशलेमच्या तटबंदीचा काही भाग तुटला होता आणि मंदिरातील चांदीची सोन्याची भांडी चोरीला गेली होती.
  • काही काळानंतर अमस्या राजा यहोवापासून वळला आणि यरुशलेममधील काही ठराविक माणसांनी एकत्र येऊन कट रचुन त्याची हत्या केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: योवाश, अदोम)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अमालेक, अमालेकी

तथ्य:

अमालेकी एक भटक्या विमुक्त लोकांचा समूह होता जो कनानच्या दक्षिणेकडील भागात, नेगेव वाळवंटापासून अरब देशापर्यंत पसरला होता. या लोकांचा समूह अमालेक जो एसावचा नातू त्या पासून खाली आला होता

  • ज्यावेळी पासून इस्राएल लोक कनान देशात राहण्यास आले त्यावेळी पासून अमालेकी लोक त्याचे कडवट शत्रू होते.
  • कधीकधी "अमालेक" हा शब्द सर्व अमालेकींना सूचित करण्यासाठी लाक्षणिक अर्थाने वापरला जातो. (पहा: सिनेकडॉच
  • अमालेकी लोकांविरुद्धच्या एका लढाईत, जेव्हा मोशेने हात उंचावत होता तेव्हा इस्राएली लोकांची सरशी होत होती. जेव्हा तो थकले आणि हात खाली आले तेव्हा ते हारू लागले. जोपर्यंत इस्राएली सैन्याने अमालेकी लोकांना नष्ट केले नाही तोपर्यंत अहरोन आणि हूरने मोशेला त्याचे हात वर उंच ठेवण्यास मदत केली.
  • शौल राजा आणि दावीद राजा या दोघांनी ही अमालेकी लोकांविरुद्ध लष्करी मोहीम चालवली.
  • अमालेकी लोकांवर एक विजय मिळवल्यानंतर, शौलांनी काही लूट केली आणि अमालेकी राजाला ठार केले नाही. असे करून त्याला देवाने जी आज्ञा दिली होती ती त्याने मानिली नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा अरेबिया, दावीद, एसाव, नेगेव, शौल

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अमोरी, अमोऱ्यांचा

तथ्य:

अमोरी लोकांचा एक शक्तिशाली गट होता, जो नूहचा नातू कनानहून निघाला होता.

  • त्यांच्या नावाचा अर्थ "एक उंच" असा होतो, ज्याचा संदर्भ ते लोक डोंगराळ प्रदेशात जाऊन वास्तव्य करीत किंवा ते फार उंच असल्याचे ज्ञात होण्याशी आहे.
  • अमोरी लोक यार्देन नदीच्या दोन्ही बाजूच्या प्रदेशात राहात होते. आय शहरामध्ये अमोऱ्यांचे वास्तव्य होते.
  • परमेश्वर "अमोऱ्यांच्या पापांचा" संदर्भ देतो, ज्यामध्ये खोट्या देवांची उपासना आणि पापी व्यवहारांचा समावेश होता.
  • यहोशवाने अमोऱ्यांचा विनाश करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, कारण परमेश्वराने त्याला तशी आज्ञा दिली होती.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 15:07 काही काळानंतर, कनानामधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.

  • 15:08 पहाटेच त्यांनी अमोरी सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.

  • 15:09 त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.

  • 15:10 देवाने सुद्धा सूर्यास आकाशात एका जागी स्थिर राहाण्याची आज्ञा केली कारण इस्राएलांना अमो-यांचा पुर्णपणे नाश करण्यास वेळ मिळावा.

  • Strong's: H567,


अम्नोन

तथ्य:

अम्नोन हा दाविद राजाचा जेष्ठ मुलगा होता. त्यांची आई दाविद राजाची पत्नी अहीनवाम होती.

  • अम्नोनने त्याची सावत्र बहिण तामार जी अबशालोमाची बहिण होती तिच्यावर बलात्कार केला.

या कारणास्तव, अबशालोमाने अम्नोनाविरुद्ध कट रचुन त्याला मारले.

(हे सुद्धा पहा: दावीद, अबशालोम)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अम्मोन, अम्मोनी

तथ्य:

"अम्मोनी लोक" किंवा "अम्मोनी" हा कनान मधील लोकांचा एक गट होता. ते बेन-अम्मीचे वंशज होते, जो लोटाचा मुलगा होता तो त्याला त्याच्या लहान मुलीपासून झाला होता.

  • "अम्मोनी" या शब्दाचा संदर्भ विशेषतः अम्मोनी स्त्री साठी वापरला आहे. याचे भाषांतर "अम्मोनी स्त्री" असेही होऊ शकते.
  • अम्मोनी लोक यार्देन नदीच्या पूर्वेकडील भागात राहत होते आणि ते इस्राएल लोकांचे शत्रू होते.
  • एकदा, अम्मोनी लोकांनी इस्राएलांना शाप देण्याकरता बलाम नावाचा एक संदेष्टा भाड्याने घेतला, पण देवाने त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शाप, यार्देन नदी, लोट)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अम्री

तथ्य:

अम्री हा सैन्याचा सेनापती होता, जो इस्राएलाचा सहावा राजा बनला.

  • अम्री राजाने तिरसाच्या शहरामध्ये 12 वर्षे राज्य केले.

त्याच्या आधीच्या इस्राएलच्या सर्व राजांच्यांप्रमाणेच अम्री एक दुष्ट राजा होता, ज्याने इस्राएली लोकांचे अधिक मूर्तिपूजा करण्यास नेतृत्व केले.

  • अम्री हा अहाब राजाचा पिता सुद्धा होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, इस्राएल, यराबाम, तिरसा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अरबस्तान, अरब, अरबी

तथ्य:

अरब हे जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प आहे, जे सुमारे 3,000,000 चौरस किलोमीटर व्यापत आहे. हे इस्राएलच्या दक्षिणपूर्व स्थित आहे आणि ते लाल समुद्र, अरबी समुद्र आणि पारसाच्या खाडीच्या सीमेवर आहे.

  • "अरब" या शब्दाचा उपयोग अरबस्तानात राहणारा किंवा अरबस्तानशी जोडलेल्या एखाद्याच्या संदर्भात केला जातो.
  • अरबस्तानमध्ये राहणारे सर्वात जुने लोक शेमची नातवंडे होती. अरबस्तानच्या आधीच्या रहिवाश्यांमध्ये अब्राहामचा मुलगा इश्माएल आणि त्याचे वंशज तसेच एसावचे वंशज यांचा समावेश होतो.
  • वाळवंटी प्रदेश जेथे 40 वर्षांपर्यंत इस्राएली लोक भटकत होते ते अरबियामध्ये होते.
  • येशूवर विश्वास ठेवल्यानंतर प्रेषित पौलाने अरबियाच्या वाळवंटात काही वर्षे घालवली.
  • गलतीयातील ख्रिस्ती लोकांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, पौलाने उल्लेख केला की सिनाय पर्वत अरबस्तानमध्ये स्थित होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: एसाव, गलतीया, इश्माएल, शेम, सिनाय)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अराबात

तथ्य:

जुन्या करारामध्ये "अराबात" या शब्दाचा संदर्भ बर्याच मोठ्या वाळवंटी आणि मैदानी प्रदेशासाठी दिलेला आहे, जो यार्देन नदीच्या सभोवतालच्या खोऱ्यापासून आणि दक्षिणेस लाल समुद्राच्या उत्तर टोकापर्यंत पसरलेला आहे.

  • इस्राएलांनी मिसरहून कनान देशापर्यंत प्रवास करताना या वाळवंटातून प्रवास केला.
  • "अराबातचा समुद्र" ह्याचे "अरबात वाळवंटाच्या प्रदेशात स्थित समुद्र" असेही भाषांतर केले जाऊ शकते. या समुद्रास अनेकदा "क्षार समुद्र" किंवा "मृत समुद्र" म्हणून संबोधले जाते.
  • "अराबात" हा शब्द कोणत्याही वाळवंटाच्या प्रदेशाचा सामान्य संदर्भ असू शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: वाळवंट, लाव्हाळ्याचा समुद्र, यार्देन नदी, कनान, क्षार समुद्र, मिसर)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अराम, अरामी,

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये अराम नावाचे दोन पुरुष होते. हे कनान देशाच्या ईशान्य भागातील प्रांताचे देखील नाव होते, जिथे आधुनिक काळातील सीरिया स्थित आहे.

  • अराममधील रहिवाशांना "अरामी" म्हणून ओळखले जायचे आणि ते "अरामी" भाषा बोलायचे. येशू आणि त्याच्या काळातील इतर यहुदी देखील अरामी भाषेत बोलायचे.
  • शेमच्या मुलातील एकाचे नाव अराम होते. अजून एक अराम नावाचा एक मनुष्य होता जो रीबकाचा चुलतभाऊ होता. हे संभाव्य आहे की अराम प्रांताचे नाव या दोन मनुष्यांपैकी एकाच्या नावावरून ठेवण्यात आले.
  • अरम नंतर त्याचे ग्रीक नाव "सीरिया" या नावाने ओळखले जाऊ लागले.
  • "पदन अराम" या शब्दाचा अर्थ "अरामाचे मैदान" आहे आणि हे मैदान अरामच्या उत्तरी भागात वसलेले होते.
  • अब्राहामाचे काही नातेवाईक "पदन अराम" येथे स्थित असलेल्या हारान शहरात राहत होते.
  • जुना करारामध्ये, काहीवेळा "अराम" आणि "पदन अराम" या शब्दांचा संदर्भ एकाच प्रांताशी आहे.
  • "अराम नहराईम" या शब्दाचा अर्थ "दोन नद्यांचा अराम" असा होऊ शकतो. हा प्रांत मेसोपोटेमियाच्या उत्तरेकडील भागात आणि "पदन अराम" च्या पूर्वेस होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः मेसोपोटेमिया, पदन अराम, रिबका, शेम, सीरिया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अरारात

तथ्य:

पवित्र शास्त्रामध्ये "अरारत" हे नाव जमीन, राज्य, पर्वत रांग यांना देण्यात आले आहे.

  • "अरारातची जमीन" संभवत: आता सद्ध्याचा तुर्कस्तानच्या देशाचा पूर्व भाग आहे.
  • महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाचे पालट पडल्यानंतर नोहाचे तारू आश्रित झाले त्या पर्वताचे नाव अरारात म्हणून ओळखले जाते.
  • आधुनिक काळात, "अरारात पर्वत" नावाचे पर्वत बहुतेकदा "पवित्र शास्त्रामधील अरारातच्या पर्वतांचे" ठिकाण मानले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: तारू, नोहा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अर्तहशश्त

तथ्य:

अर्तहशश्त हा एक राजा होता जो इ.स. पूर्व 464 ते 424 इ.स.पूर्व काळात परसाच्या साम्राज्यावर राज्य करत होता.

  • अर्तहशश्त राजाच्या शासनकाळात, बाबेलमधील यहूदातील इस्राएल लोक हद्दपार झाले होते, जे त्या वेळी पारसाच्या ताब्यात होते.
  • अर्तहशश्तने एज्रा याजक व इतर यहुदी नेत्यांना बाबेल सोडून इस्राएलांना देवाचे नियमशास्त्र शिकवण्याकरता यरूशलेमेला परत जाण्याची परवानगी दिली.
  • नंतर याच काळात, अर्तहशश्तने त्याच्या प्यालेबरदार नहेम्या याला यरूशलेमला परत जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून त्या शहराच्या सभोवताली असलेल्या भिंतींच्या पुनर्बांधणीसाठी त्याने यहुद्यांचे नेतृत्व करावे.
  • बाबेल पारसाच्या शासनाखाली होता म्हणून अर्तहशश्तांना काहीवेळा "बाबेलचा राजा" असेही म्हंटले जाते.
  • लक्षात ठेवा की अर्तहशश्त ही हशश्त (अहश्वरोश) सारखीच व्यक्ती नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पहा: अहश्वरोश, बाबेल, प्यालेबरदार, एज्रा, नहेम्या, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अलिशिबा

तथ्य:

अलिशिबा ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई होती. तिच्या पतीचे नाव जखऱ्या होते.

  • जखऱ्या आणि अलिशिबा यांना कधीच मुलबाळ होऊ शकले नाही, परंतु त्यांच्या वृद्ध वयात देवाने जखऱ्याला वचन दिले की अलिशिबा त्याला एक मुलगा देईल.
  • देवाने त्याचे वचन पाळले, आणि लवकरच जखऱ्या आणि अलिशिबा ह्यांना गर्भधारणा झाली, आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी बाळाचे नाव योहान ठेवले.
  • अलिशिबा ही मरिया, येशूची आई हिची नातेवाईक सुद्धा होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: (बाप्तिस्मा करणारा) योहान, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अलीशा

तथ्य:

अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान, अलीशा हा इस्राएलचा संदेष्टा होता: अहाब, अहज्या, यहोराम, येहू, आहाज, आणि योशीया.

  • देवाने अलीशाला संदेष्टा म्हणून अभिषेकीत करण्यासाठी एलीया सादेष्ट्याला सांगितले.
  • जेंव्हा एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेण्यात आले, तेंव्हा इस्राएलच्या राजांसाठी अलीशा देवाचा संदेष्टा बनला.
  • अलीशाने पुष्कळ चमत्कार केले, ज्यामध्ये आरामाच्या महारोग्याला बरे करणे, आणि शुनेम येथील स्त्रीच्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा समावेश होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः एलीया, नामान, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अशेरा, अशेरा देवीचे स्तंभ, अष्टोरेथ

व्याख्या:

अशेरा ही एक देवीचे नाव होते जीची जुन्या करारानुसार कनानी लोकांच्या गटाने पूजा केली होती. "अष्टोरेथ" हे "अशेरा" चे दुसरे नाव असू शकते किंवा ते एखाद्या वेगळ्या देवीचे नाव असू शकते जे अतिशय समान होते.

  • "अशेरा देवीचे स्तंभ" हा शब्द त्या देवीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बनविलेल्या लाकडी प्रतिमा किंवा कोरीव झाडे यांच्याशी आहे.
  • अशेरा देवीचे स्तंभ बहुतेकदा खोट्या देवता बालच्या वेद्याजवळ स्थापन करण्यात आले होते, ज्याला अशेराचे पती म्हटले जाते. काही गटांनी बालची सूर्यदेवता म्हणून आणि अशेरा किंवा अष्टोरेथची चंद्रदेवता म्हणून पूजा केली.
  • परमेश्वराने इस्राएलांना अशेरा देवीच्या सर्व खोट्या प्रतिमा नष्ट करण्याची आज्ञा दिली.
  • गिदोन, आसा राजा आणि योशीया राजा यांसारख्या काही इस्राएली नेत्यांनी परमेश्वराची आज्ञा मानली आणि या मूर्तींचा नाश करण्यासाठी लोकांना नेतृत्व केले.
  • पण, शलमोन राजा, मनश्शे राजा आणि अहाब राजा यांसारख्या इतर इस्राएली नेत्यांनी लोकांना अशेरा देवीच्या स्तंभांतून मुक्त केले नाही आणि त्यांनी लोकांना मूर्तींची पूजा करण्यास प्रभावित केले.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, बाल, गिदोन, प्रतिमा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अश्दोद, अझोटोस

तथ्य:

अश्दोद हा पलिष्ट्यांच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक होते. हे कनानच्या नैऋत्य भागात भूमध्य सागरी किनारपट्टीत होते, ते गज्जी व याफो या शहरांच्या मध्ये अर्ध्या रस्त्यावर होते.

  • पलिष्ट्यांची खोटी देवता दागोनाचे मंदिर अश्दोदमध्ये होते.
  • परमेश्वराने अश्दोदच्या लोकांना शिक्षा केली जेव्हा पलिष्टी लोकांनी कराराच्या कोशाची चोरी केली व त्याला अश्दोद येथे मूर्तिपूजक मंदिरामध्ये ठेवले.
  • या शहराचे ग्रीक नाव अझोटोस होते. सुवार्तिक फिलीप्पाने सुवार्ता उपदेश दिलेल्या शहरांपैकी हे एक शहर होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: एक्रोनी, गथ, गज्जा, याफो, फिलिप्प, पलिश्ती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

  • Strong's: H795, G108

अश्शुर, अश्शुरी, अश्शुरी साम्राज्य

तथ्य:

इस्राएल लोक कनान देशात राहात असताना अश्शूर एक शक्तिशाली राष्ट्र होते. अश्शूरी साम्राज्य हा राष्ट्रांचा एक गट होता जो अश्शूरी राजाच्या अधिपत्याखाली होता.

  • अश्शूर राष्ट्र आताच्या इराकचा उत्तरी भाग असलेल्या प्रदेशात होते.
  • त्यांच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या वेळी अश्शूरी इस्राएल बरोबर लढले.
  • इ.स. पूर्व 722 मध्ये, अश्शूरी लोकांनी पूर्णपणे इस्रायलचे राज्य जिंकले आणि अश्शूरला जाण्यासाठी अनेक इस्राएली लोकांना भाग पाडले.
  • जे इस्राएली लोक मागे राहिले होते त्यांनी अश्शूरी लोकांनी ज्या लोकांना शोमरोनहून आणले होते त्या परदेशीयांबरोबर विवाह केला. इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

(हे सुद्धा पहा: शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:02 म्हणून देवाने त्या दोन्ही राज्यांना शिक्षा दिली, त्यांच्या शत्रूंना त्यांचा नाश करु दिला. अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.

  • 20:03 अश्शूरी लोकांनी सर्व नेत्यांस, श्रीमंतांस व कुशल कारागिरांस एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले.

  • 20:04 तेंव्हा __अश्शूराने __ इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले.

  • Strong's: H804, H1121


अष्कलोन

तथ्य:

पवित्र शास्त्राच्या काळात, अष्कलोन भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या पलिष्टी शहरांपैकी एक होते. आजही ते इस्राएलमध्ये अस्तित्वात आहे.

अष्कलोन हे पलिष्ट्यांच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक होते, ज्यामध्ये अश्दोद, एक्रोन, गथ, आणि गज्जा ही बाकीची चार शहरे होती.

  • जरी यहूदाच्या राज्याचा अष्कलोनच्या डोंगराळ प्रदेशावर कब्जा होता तरी इस्राएली लोकांना अष्कलोनवर पूर्णपणे विजय मिळवता आला नाही.
  • शेकडो वर्षांपर्यंत अष्कलोन पलिश्ती लोकांच्या ताब्यात होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः अशदोद, कनान, एक्रोन, गथ, गाज्जा, पलिश्ती, भूमध्य समुद्र

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


अहज्या

तथ्य:

दोन राजे होऊन गेले त्यांचे नाव अहज्या होते. एकाने इस्राएल राज्यावर तर दुसऱ्याने यहूदा राज्यावर राज्य केले.

  • यहूदाचा राजा अहज्या हा यहोरामचा मुलगा होता. त्याने एक वर्ष (इ.स. पूर्व 841) राज्य केले आणि त्यानंतर त्याला येहूने मारले. अहज्या याचा मुलगा योवाश याने त्याच्यानंतर राजा म्हणून जागा घेतली.
  • इस्राएलचा राजा अहज्या हा अहाब राजाचा मुलगा होता. त्याने दोन वर्षे (850-49 इ.स. पूर्व) राज्य केले. त्याच्या राजवाड्यामध्ये पडून झालेल्या जखमांमुळे तो मरण पावला आणि त्याचा भाऊ योराम राजा झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: येहू, अहाब, यराबाम, योवाश)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अहरोन

तथ्य:

अहरोन मोशेचा मोठा भाऊ होता. देवाने अहरोनाची इस्राएल लोकांसाठी पहिला महायाजक म्हणून निवड केली होती.

  • इस्राएल लोकांना जाऊ देण्यासाठीची बोलणी फारोशी करण्यासाठी अहरोनाने मोशेला मदत केली.
  • इस्राएली लोक वाळवंटातून प्रवास करत असताना इस्राएल लोकांच्यासाठी उपासनेसाठी मूर्ती बनवून अहरोनाने पाप केले.

देवाने अहरोनाला आणि त्याच्या संततीला याजक, इस्राएल लोकांसाठी याजक म्हणूनही नेमलं होत.

(भाषांतर सूचना: नाव कसे भाषांतर करायचे

(हे सुद्धा पहा: याजक, मोशे, इस्राएल)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 09:15 देवाने मोशे व__अहरोनास अगोदरच सांगून ठेवले की__ फारो हट्टीपणा करील.

  • 10:05 फारोने मोशे व__ अहरोनास बोलावून म्हटले__ की जर ते गोमाशांची पीडा दूर करतील तर मी इस्राएली लोकास मिसर देश सोडून जाऊ देईल.

  • 13:09 मोशेचा भाऊ __अहरोन व__अहरोनाचे संतान यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.

  • 13:11 म्हणून त्यांनी (इस्राएल लोकांनी) सोने आणून __त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते__अहरोनाकडे दिले.

  • 14:07 ते (इस्राएल लोक) मोशे व अहरोनावर भडकले व म्हणाले, "तुम्ही आम्हांस अशा भयानक ठिकाणी का आणिले?"

  • Strong's: H175, G2


अहश्वेरोश

तथ्य:

अहश्वेरोश हा परसाच्या प्राचीन साम्राज्यावर वीस वर्षांसाठी राजा होता.

  • या काळात निर्वासित यहुदी बाबेलमध्ये राहत होते, जे परसाच्या शासनाखाली आले होते.
  • या राजाचे आणखी एक नाव कदाचित हशश्त असू शकते.
  • रागाच्या भरामध्ये राणीला दूर पाठविल्यानंतर अहश्वरोश राजाने एस्तेर नावाच्या एका यहुदी स्त्रीची निवड केली जी त्याची नवीन पत्नी व राणी होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा बाबेल, एस्तेर, कुश, निर्वासन, पारसा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


अहाब

तथ्य:

अहाब हा एक अत्यंत दुष्ट राजा होता ज्याने 875 ते 854 इ.स.पूर्व काळातील उत्तरेकडील इस्राएल राष्ट्रावर राज्य केले.

  • अहाब राजाने इस्राएलाच्या लोकांना खोट्या देवांची उपासना करण्यास प्रभावित केले.
  • एलीया संदेष्टा याने अहाब याच्याशी सामना केला आणि त्याने त्याला सांगितले की अहाबामुळे इस्राएल लोकांनी केलेल्या पापांबद्दल साडेतीन वर्षे भयंकर दुष्काळ येईल.
  • अहाब आणि त्याची पत्नी ईजबेल यांनी इतर अनेक वाईट गोष्टी केल्या, ज्यात त्यांनी त्यांचा अधिकार वापरून निरपराध लोकांना मारण्याचा समावेश आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाल, एलीया, ईजबेल, इस्राएलाचे राज्य, यहोवा

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.

  • अहाब व त्याचे सैन्य एलीयास शोधत होते, पण त्यांना तो सापडला नाही.

  • साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.

  • Strong's: H256


अहीया

तथ्य:

जुन्या करारांमध्ये अहीया नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते. खालीलपैकी त्यातील काही पुरुष आहेत:

  • शौलाच्या वेळी अहीया हे याजकाचे नाव होते.
  • शलमोन राजाच्या काळात अहीया नावाचा एक पुरुष सचिव होता.
  • अहीया हा शिलो येथून संदेष्टा होता. त्याने असे भाकीत केले की इस्राएल राष्ट्राचे दोन राज्यांत विभाजन केले जाईल.
  • इस्राएलचा राजा बाशा याच्या वडिलांचे देखील नाव अहीया होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बाशा, शिलो)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


आदाम

तथ्य:

आदाम पहिला माणूस होता ज्याला परमेश्वराने निर्माण केले. तो आणि त्याची पत्नी हव्वा देवाच्या प्रतिमेत बनलेले होते.

  • देवाने आदामाला मातीतून निर्माण केले आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला.
  • आदामाचे नाव "लाल माती" किंवा "जमीन" या हिब्रू शब्दासारखेच आहे.
  • "आदाम" हे नाव "मानवजातीला" किंवा "मानवी स्थितीला" जुन्या करारांतील शब्दांप्रमाणे आहे.
  • सर्व लोक आदाम आणि हव्वा यांचे वंशज आहेत.
  • आदाम आणि हव्वा यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली. याने त्यांना परमेश्वरापासून विभक्त केले आणि जगात पाप व मरण आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मृत्यू, वंशज, हव्वा, परमेश्वराची प्रतिमा, जीवन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 01:09 मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू".

  • 01:10 या मनुष्याला आदाम हे नाव देण्यात आले. देवाने आदामाला राहण्यासाठी एक बाग निर्माण केली व त्याची काळजी घेण्यासाठी त्याला तेथे ठेवले.

  • 01:12 मग देव बोलला, “मनुष्य एकटा असणे हे बरे नाही". परंतु प्राण्यांमध्ये आदामासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही.

  • 02:11 मग देवाने आदाम व हव्वा यांना चर्मवस्त्रे करुन घातली.

  • 02:12 म्हणून देवाने आदाम व हव्वा यांना सुंदर बागेतून घालवून दिले.

  • 49:08 जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले.

  • 50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.

  • Strong's: H120, G76


आमोज

तथ्य:

आमोज हा यशया संदेष्ट्याचा पिता होता.

  • पवित्र शास्त्रामध्ये ह्याचा उल्लेख फक्त एकदाच होतो जेव्हा यशया "आमोजचा मुलगा" म्हणून नमूद केले आहे.
  • हे नाव आमोस संदेष्ट्याच्या नावापेक्षा वेगळे आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने लिहिले पाहिजे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: आमोस, यशया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


आमोस

तथ्य:

आमोस हा एक इस्राएली संदेष्टा होता. तो यहूदाचा राजा उज्जीयाच्या काळातील होता.

  • संदेष्टा म्हणून बोलवण येण्याआधी, आमोस मुळात प्रथम यहुदाच्या राज्यात राहणारा एक मेंढपाळ व अंजीराची शेती करणारा शेतकरी होता.
  • आमोसने इस्राएल राष्ट्रातील उत्तरेकडील समृद्ध राज्याबद्दल त्यांच्या लोकांच्या अन्यायकारक वागणुकीबद्दल भाकीत केले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अंजीर, यहूदा, इस्राएलाचे राज्य, मेंढपाळ, उज्जीया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


आय

तथ्य:

जुन्या कराराच्या काळात, आय हे बेथेलच्या दक्षिणेला असलेल्या एका कनानी शहराचे नाव होते आणि यरीहोच्या 8 किमी च्या अंतरावर उत्तर-पूर्व भागात होते.

  • यरीहोला पराभूत केल्यानंतर, यहोशवा याने इस्राएल लोकांना आय वर हल्ला करण्यासाठी नेले. परंतु ते सहजपणे पराभूत झाले कारण परमेश्वर त्यांच्याशी संतुष्ट नव्हता.
  • आखान नावाच्या एका इस्राएलीने यरीहोतून चोरी केली होती आणि परमेश्वराने त्याला व त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची आज्ञा दिली. मग परमेश्वराने इस्राएली लोकांना आय नगरातील लोकांना पराभूत करण्यात मदत केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथेल, यरीहो)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


आशिया

तथ्य:

पवित्र शास्त्राच्या काळात "आशिया" रोमन साम्राज्यातील प्रांताचे नाव होते. तो आताच्या तुर्की देश आहे त्याच्या पश्चिम बाजूला स्थित होता.

  • पौलाने आशियात जाऊन तेथे अनेक शहरांमध्ये सुवार्ता सांगितली. त्या शहरांपैकी इफिस आणि कलस्सै ही होती.
  • आधुनिक काळातील आशियाशी गोंधळ टाळण्यासाठी, "प्राचीन आशियातील प्रांत" किंवा "आशिया प्रांत" असे भाषांतर करणे आवश्यक आहे.
  • प्रकटीकरणमध्ये संदर्भित केलेले सर्व चर्च आशियातील रोमन प्रांतात होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: रोम, पौल, इफिस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


आशेर

तथ्य:

आशेर हा याकोबाचा आठवा मुलगा होता. त्याचे वंशज इस्राएलमधील बारा वंशांपैकी एक होते आणि या वंशाला "आशेर" असेही संबोधण्यात आले.

  • आशेरची आई लेआची दासी जिल्पा ही होती.
  • त्याच्या नावाचा अर्थ "आनंदी" किंवा "आशीर्वादित" असा होतो.
  • आशेर हे एका प्रांताचे सुद्धा नाव होते जो आशेरच्या वंशजांना इस्राएल लोक वतनाच्या देशात आल्यानंतर मिळाला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएल, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


आसा

तथ्य:

आसा एक राजा होता ज्याने यहूदाच्या राज्यांवर चाळीस वर्ष राज्य केले, ई.स.पूर्व 913 ते ई.स. पूर्व 873.

  • आसा राजा एक चांगला राजा होता ज्याने खोट्या देवतांच्या अनेक मुर्त्या काढून टाकल्या आणि इस्राएल लोकांना पुन्हा याहोवाची उपासना करण्यास कारणीभूत ठरला.
  • इतर राष्ट्रांच्या विरुध्द युद्ध लढताना यहोवाने आसाला यश मिळवून दिले.
  • नंतर त्याच्या कारकिर्दीत, आसा राजाने त्याचा यहोवावर असलेला भरवसा सोडला आणि एक रोगाने तो ग्रासला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


आसाफ

तथ्य:

आसाफ एक लेव्ही याजक होता आणि प्रतिभावंत संगीतकार होता, ज्याने दाविद राजाच्या स्तोत्रांसाठी संगीत दिले. त्याने स्वतःची स्तोत्रे देखील लिहिली.

  • आसाफला दाऊद राजाने मंदिरातील उपासनेसाठी गीतांची तरतूद करणाऱ्या तीन संगीतकारांपैकी एक म्हणून घोषित केले होते. यापैकी काही गाणी भविष्यवाण्या देखील होत्या.
  • आसाफाने आपल्या मुलांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी हे वाद्य वाजवण्याचे आणि मंदिरामध्ये भविष्य सांगण्याचे काम केले.
  • त्यामध्ये सतार, वीणा, रणशिंग आणि झांजा यासारख्या संगीत वाद्यांचा समावेश होता.
  • असे म्हंटले जाते की स्तोत्र 50 आणि 73-83 ही आसाफाने लिहिली. असेही होऊ शकते की त्यांच्यापैकी काही स्तोत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लिहिली असावीत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: वंश, वीणा, सतार, संदेष्टा, स्तोत्र, रणशिंग

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


आहाज

व्याख्या:

आहाज एक दुष्ट राजा होता ज्याने 732 ते 716 इ.स.पूर्व पर्यंत यहूदा राज्यावर राज्य केले. इस्राएल आणि यहूदामधील अनेक लोक बाबेलाला बंदिवान म्हणून नेण्यात आले त्याच्या सुमारे 140 वर्षांपूर्वीचे तो राजा होता.

  • तो यहूदावर राज्य करत असताना, आहाजाने अश्शूरी दैवतांची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली होती, ज्यामुळे लोक एकाच खऱ्या देवापासून, म्हणजेच यहोवापासून दूर गेले.
  • आहाज राजा तेव्हा 20 वर्षांचा होता जेंव्हा तो यहूदावर राज्य करू लागला आणि त्याने 16 वर्षे राज्य केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेल)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


इकुन्या

तथ्य:

इकुन्या हे सध्या तुर्कीचा देश असलेल्या दक्षिण मध्य भागातील एक शहर होते.

  • पौलाच्या पहिल्या सुवार्ता प्रसार दौऱ्यावर, त्याला व बर्णबाला यहुद्यांनी अंत्युखियाचे शहर सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतरते लोक इकुन्याला गेले.
  • मग इकुन्यामधील अविश्वासी यहुदी आणि विदेशी लोक, पौलाला व त्यांच्या सहकाऱ्यांना दगडमार करण्याची योजना आखत होते पण ते लुस्त्राच्या जवळच्या गावात पळून गेले.
  • त्यानंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही लोक लुस्त्र येथे आले आणि त्यांनी तिथल्या लोकांना पौलाला दगडमार करण्यासाठी हलवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, लुस्त्र, दगड)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इज्रेल, इज्रेलकर

व्याख्या:

इज्रेल हे मृत समुद्राच्या नैऋत्येला वसलेले, इस्साखारच्या कुळाच्या प्रदेशातील महत्वाचे शहर होते.

  • इज्रेल हे शहर मगिद्दो मैदानाच्या पश्चिमेकडील एका भागात होते, त्याला "इज्रेलचे खोरे" असेही म्हणतात.
  • इस्राएलच्या बऱ्याच राजांचे महल इज्रेल शहरामध्ये होते.
  • नाबोथाचा द्राक्षमळा हा अहाब राजाच्या महलाजवळ इज्रेलमध्ये होता. तेथे एलीया संदेष्ट्याने अहाबाविरुद्ध भविष्यवाणी केली.
  • अहाबाची दुष्ट पत्नी ईजबेल ही इज्रेलमध्ये मारली गेली.
  • या शहरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्यात अनेक युद्धांचा समावेश आहे.

(हे सुद्धा पहा: अहाब, एलीया, इस्साखार, ईजबेल, महल, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


इथिओपिया, इथिओपियाच्या

तथ्य:

इथिओपिया हा आफ्रिकेमध्ये मिसरच्या दक्षिणेस वसलेला, आणि त्याच्या पश्चिमी सीमेला नाईल नदी आणि पूर्वेला तांबड्या समुद्राने त्याची सीमा तयार केलेला असा देश आहे. इथिओपियामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला "इथिओपियाचा" असे म्हंटले जाते.

  • प्राचीन इथिओपिया हे मिसरच्या दक्षिणेस स्थित होते आणि त्याच्यामध्ये जी जमीन होती त्यामध्ये, आताच्या आफ्रिकी देशाचा भाग असलेल्या अनेक देशांचा समावेश होता, जसे की, सुदान, आधुनिक इथिओपिया, सोमालिया, केनिया, युगांडा, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, आणि चाड.
  • पवित्र शास्त्रामध्ये, इथिओपियाला काहीवेळा "कुश" किंवा "नुबिया" असे म्हंटले आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, इथिओपिया ("कुश") आणि मिसर ह्यांच्या देशांचा बऱ्याचदा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे, कारण कदाचित ते एकमेकांच्या समोर स्थित होते, आणि कदाचित त्यांच्या लोकांतील काहींचे पूर्वज एकच असावेत.
  • देवाने फिलिप्प सुवर्तीकाला वाळवंटात पाठवले, जिथे त्याने इथिओपियाच्या षंढाला येशूची सुवार्ता सांगितली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कुश, मिसर, षंढ, फिलिप्प)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इथ्रो, रगुवेल

तथ्य:

"इथ्रो" आणि "रगुवेल" ही दोन्ही नावे मोशेची पत्नी सिप्पोरा, हिच्या पित्याला संदर्भित करतात. जुन्या करारामध्ये "रगुवेल" नावाचे आणखी दोन मनुष्य होते.

  • जेंव्हा मोशे मिद्यानाच्या भूमीत मेंढपाळ होता, तेंव्हा त्याने मिद्यानी मनुष्य रगुवेल ह्याच्या मुलीशी विवाह केला.
  • नंतर रगुवेलाला "इथ्रो, मिद्यानाचा याजक" म्हणून संदर्भित केले. कदाचित "रगुवेल" हे त्याच्या कुळाचे नाव असू शकते.
  • जेंव्हा देव मोशेशी जळत्या झाडीद्वारे बोलला, तेंव्हा मोशे इथ्रोची मेंढरे चरित होता.
  • देवाने इस्राएली लोकांना मिसरातून सोडविल्याच्या काही काळानंतर, इथ्रो वाळवंटात इस्राएली लोकांच्या जवळ आला आणि त्याने मोशेला लोकांच्या प्रकरणांचा न्याय करण्याविषयी चांगला सल्ला दिला.
  • जेंव्हा त्याने इस्राएली लोकांसाठी मिसरमध्ये देवाने केलेल्या चमत्कारांबद्दल ऐकले, तेंव्हा त्याने देवावर विश्वास ठेवला.
  • एसावाच्या मुलांपैकी एकचे नाव रगुवेल होते.
  • अजून एक मनुष्य ज्याचे नाव रगुवेल होते, त्याचा उल्लेख इस्राएलाच्या वंशावळीत केला आहे, जो बाबेलाचा बंदिवास संपल्यानंतर पुनर्स्थापित होण्यासाठी यहुदाला परतला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बंदी, कुळ, वाळवंट, मिसर, एसाव, चमत्कार, मोशे, वाळवंट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इफिस, इफिसकर, इफिसकारांची

तथ्य:

इफिस हे एक प्राचीन ग्रीक शहर होते, जे सध्याच तुर्की देश आहे त्याच्या पश्चिमी किनारपट्टीवर स्थित होते.

  • अद्य ख्रिस्ती लोकांच्या काळात, इफिस हे शहर आशिया राजधानी होती, जो त्या काळी एक छोटा रोमी प्रांत होता.
  • त्याच्या स्थानामुळे, हे शहर व्यापाराचे आणि प्रवासाचे एक महत्वाचे केंद्र होते.
  • अर्तमी (डायना) देवीच्या उपासनेचे प्रसिद्ध मूर्तिपूजक मंदिर इफिसमध्ये स्थित होते.
  • पौल इफिसमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिला आणि त्याने तेथे काम केले आणि नंतर त्याने नवीन विश्वासणाऱ्यांचे नेतृत्व करण्याकरिता तीमथ्याला नियुक्त केले.
  • नवीन करारातील इफिसकरांस पत्र, हे पौलाने इफिस मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: आशिया, पौल, तिमोथी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इफ्ताह

तथ्य:

इफ्ताह हा गीलादचा एक योद्धा होता, ज्याने इस्राएलचे शास्ते म्हणून मार्गदर्शन केले.

  • इब्री लोकांस पत्रामधील 11 व्या अधिकारातील 32 व्या वाचनामध्ये इफ्ताहाची एक महत्वाचा नेता ज्याने, त्याच्या लोकांना शत्रूच्या तावडीतून सोडवले अशी प्रशंसा केलेली आहे.
  • त्याने इस्राएली लोकांना अम्मोनी लोकांच्या तावडीतून सोडवले आणि एफ्राइमी लोकांचा पराजय करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले
  • तथापि इफ्ताहाने, एक मूर्खपणाचा नवस केला, त्याचा परिणाम म्हणून त्याला स्वतःच्या मुलीचे बलीदान करावे लागले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहा: अम्मोन, सुटका करणे, एफ्राइम, शास्ते, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इफ्राथ, एफ्राथ, एफ्राथी,

तथ्य:

एफ्राथ हे इस्राएल मधील उत्तर भागातील प्रांताचे आणि शहराचे नाव होते. एफ्राथ या शहराला नंतर "बेथलेहेम" किंवा "एफ्राथ-बेथलेहेम" से संबोधण्यात आले.

  • एफ्राथ हे कालेबच्या एका मुलाचे नाव होते. एफ्राथ या शहराचे नाव कदाचित त्याच्या नंतर ठेवण्यात आले असावे.
  • जो मनुष्य एफ्राथ शहरातील रहिवासी होता, त्याला "एफ्राथी" असे म्हंटले जाते.
  • दाविदाचा पणजा, बवाज हा एफ्राथी होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथलहेम, बवाज, कालेब, दावीद, इस्राएल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • Strong's: H672, H673

इशाय

तथ्य:

इशाय हा दावीद राजाचा पिता आणि रुथ आणि बवाज यांचा नातू होता.

  • इशाय हा यहूदा वंशातील होता.
  • तो "एफ्राथी" होता, ह्याचा अर्थ तो एफ्राथ (बेथलेहेम) या गावचा रहिवासी होता.
  • यशाया संदेष्ट्याने इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल व त्याच्यातून निघालेल्या शाखेला फळ येईल. ह्याचा संदर्भ येशुशी आहे, जो इशायाचा वंशज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः बेथलेहेम, बवाज, वंशज, फळ, येशू, राजा, संदेष्टा, रूथ, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


इश्माएल, इश्माएली, इश्माएली लोक

तथ्य:

इश्माएल हा अब्राहाम आणि मिसरी दासी हगार ह्यांचा मुलगा होता. जुन्या करारामध्ये इश्माएल नावाचे बरेच इतर पुरुष होते.

  • "इश्माएल" नावाचा अर्थ "देव ऐकतो" असा होतो.
  • देवाने अब्राहामाचा मुलगा इश्माएल ह्याला आशीर्वाद देण्याचे वचन दिले, पण तो हा मुलगा नव्हता ज्याच्याबरोबर देवाने त्याचा करार स्थापन करण्याचे वचन दिले होते.
  • देवाने हगार आणि इश्माएल ह्यांची रक्षा केली जेंव्हा त्यांना वाळवंटात पाठेऊन दिले.
  • जेंव्हा इश्माएल पारानाच्या वाळवंटात राहता होता, तेंव्हा त्याने मिसरी मुलीशी लग्न केले.
  • इश्माएलचा मुलगा नथन्या हा यहुदाचा एक सेनानायक होता, ज्याने बाबेलाचा राजा नबुखद्नेसर ह्याने नियुक्त केलेल्या सुभेदाराला मारण्यासाठी लोकांच्या समूहाचे नेतृत्व केले.
  • जुन्या करारामध्ये इश्माएल नावाचे इतर चार पुरुष होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, बाबेल, करार, वाळवंट, मिसर, हगार, इसहाक, नबुखद्नेसर, पारान, सारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 05:02 यास्तव अब्रामाने हागारेशी विवाह केला. हागारेपासून अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले.

  • 05:04 मी इश्माएलचेही एक मोठे राष्ट्र करीन, पण माझा करार इसहाकाशी असेल.”

  • Strong's: H3458, H3459


इसहाक

तथ्य:

इसहाक हा अब्राहम आणि साराय यांचा एकुलता एक मुलगा होता. जरी ते फार वृद्ध होते, तरी देवाने त्यांना एक मुलगा देण्याचे वचन दिले होते.

  • इसहाक या नावाचा अर्थ "तो हसतो" असा होतो. जेंव्हा देवाने अब्राहामाला सांगितले की सारा एका मुलाला जन्म देईल, तेंव्हा अब्राहाम हसला कारण ते दोघेही फार वृद्ध होते. काही काळानंतर, ती बातमी ऐकली तेव्हा सारा देखील हसली.
  • परंतु देवाने त्याचे वचन पूर्ण केले आणि इसहाकाचा जन्म अब्राहम आणि सराय ह्यांच्या वृद्ध वयात झाला.
  • देवाने अब्राहमाला सांगितले की, जो करार त्याने अब्राहमाशी केला आहे तोच करार इसहाक आणि त्याच्या वंशाजांसाठी कायमस्वरूपाचा राहील.
  • जेंव्हा इसहाक तरुण होता, तेंव्हा देवाने अब्राहमाला इसहाकाचे बलीदान देण्याची आज्ञा करून, त्याच्या विश्वासाची परीक्षा घेतली.
  • इसहाकाचा मुलगा याकोब ह्याला बारा मुलगे होते, त्याचे वंशज नंतर इस्राएलाचे बारा वंश बनले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, वंशज, अनंतकाळ, परिपूर्ण, याकोब, सराय, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 05:04 “तुझी पत्नी साराय हीला पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल. त्याचे नाव इसहाक ठेव.

  • 05:06 जेंव्हा इसहाक तरूण झाला तेंव्हा देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घे व त्याचे मला होमार्पण कर.”

  • 05:09 इसहाकाच्या ठिकाणी देवाने एडका पुरविला होता.

  • 06:01 जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.

  • 06:05 इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती.

  • 07:10 मग इसहाक मरण पावला, आणि याकोब व एसावाने त्यास पुरले. * देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता __इसहाकाकडून__याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.

  • Strong's: H3327, H3446, G2464


इस्राएल, इस्राएली, याकोब

तथ्य:

याकोब हा इसहाक आणि रिबका यांच्या जुळ्या मुलातील लहान मुलगा होता.

  • याकोबाचे नाव म्हणजे "त्याने टाच पकडली" म्हणजे "त्याने फसवले" ही अभिव्यक्ती आहे. जसा याकोब जन्म घेत होता, तो त्याचा जुळा भाऊ एसाव ह्याच्या टाचांना धरून होता.
  • अनेक वर्षानंतर, देवाने याकोबाचे नाव इस्राएल मध्ये बदलले, ह्याचा अर्थ "त्याने देवाबरोबर संघर्ष केला" असा होतो.
  • याकोब चतुर आणि फसवा होता. त्याने त्याच्या मोठ्या भावाचे एसावचे पहिल्या अपत्याचा आशीर्वाद आणि वारसा हक्क मिळवण्याचे मार्ग शोधले.
  • एसाव रागात होता आणि त्याने त्याला मारण्याची योजना आखली, म्हणून याकोबने त्याचे मूळभूमी सोडली. परंतु, अनेक वर्षानंतर याकोब त्याच्या पत्नी आणि मुलांबरोबर कनानच्या देशास परत आला, जिथे त्याचा भाऊ एसाव राहा होता, आणि त्यांची कुटुंबे एकमेकांशेजारी शांतीने राहिली.
  • याकोबाला बारा मुलगे झाले. * त्याचे वंशज इस्राएलाचे बारा वंश बनले.
  • याकोबा नावाचा एक वेगळा माणूस मत्तयाच्या वंशावळीत योसेफाचा पिता म्हणून सूचीबद्ध आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, फसवणे, एसाव, इसहाक, इस्राएल, रिबका, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 07:01 ही मुले वाढत असतांना, याकोबाला घरीच राहायला आवडत असे, परंतु एसावाला शिकार करायला आवडत असे. याकोब रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.

  • 07:07 याकोब बरीच वर्षे रिबकेच्या नातेवाईकांबरोबर राहिला. या कालावधीमध्ये त्याने लग्न केले व त्यास बारा पुत्र व एक कन्या झाली. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.

  • 07:08 त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.

  • 07:10 देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.

  • 08:01 ब-याच वर्षांनंतर याकोब वयोवृद्ध झाला असतांना, त्याने आपला आवडता पुत्र, योसेफ, यास मेंढरांचे राखण करत असलेल्या आपल्या जेष्ठ भावांकडे त्यांचे कसेकाय चालले आहे हे पाहाण्यास पाठविले.

  • Strong's: H3290, G2384


इस्राएलाचे राज्य

तथ्य:

शलमोन राजा मरण पावल्यानंतर, इस्राएलाचे बारा गोत्र दोन राज्यांमध्ये विभागले गेले होते, तेव्हा इस्राएल राष्ट्राचा उत्तरेचा भाग हे इस्राएलाचे राज्य बनले होते.

  • उत्तरेकडील इस्राएलाच्या राज्यामध्ये दहा कुळे होती, आणि दक्षिणेकडील यहुद्यांच्या राज्यामध्ये दोन कुळे होती.
  • इस्राएल राष्ट्राची राजधानी शोमरोन होती. * हे यहुदाची राजधानी यरुशलेम पासून 50 किलोमीटर अंतरावर होते.
  • इस्राएलच्या राज्याचे सर्व राजे दुष्ट होते. त्यांनी लोकांना मूर्तींची आणि खोट्या देवांची उपासना करण्यास प्रभावित केले.
  • देवाने अश्शुराला इस्राएलावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. बऱ्याच इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये राहण्यासाठी बंदी करून नेण्यात आले.
  • अश्शूराने उरलेल्या इस्त्राएल राज्याच्या लोकांमध्ये राहण्यासाठी परराष्ट्रीय लोकांस आणिले. या परराष्ट्रीय लोकांनी इस्राएल लोकांशी अंतरवंशीय विवाह केले, आणि त्यांच्या वंशजांना शोमरोनी लोक असे म्हंटले गेले.

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, इस्राएल, यहूदा, यरुशलेम, शोमरोनाचे राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:08 इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.

  • 18:10 यहूदाचे राज्यइस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.

  • 18:11 इ‌स्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते.

  • 20:01 इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.

  • 20:02 अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.

  • 20:04 तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

  • Strong's: H3478, H4410, H4467, H4468


इस्साखार

तथ्य:

इस्साखार हा याकोबाचा पाचवा मुलगा होता. त्याच्या आईचे नाव लेआ होते.

  • इस्साखारचे कुळ हे इस्राएलच्या बारा कुळांपैकी एक होते.
  • इस्साखारच्या जमिनीच्या हद्दीला लागून नफताली, जबुलून, मनश्शे आणि गाद यांच्या घराण्यांच्या जमिनी होत्या.
  • हे गालील समुद्राच्या अगदी दक्षिणेस स्थित होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: गाद, मनश्शे, नफताली, इस्राएलाची बारा कुळे, जबुलून)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


ईजबेल

तथ्य:

इस्राएलचा राजा आहाब ह्याची ईजबेल ही दुष्ट पत्नी होती.

  • ईजबेलने आहाब आणि इतर इस्राएल लोकांवर मूर्तींची उपासना करण्यासाठी प्रभाव टाकला.
  • तिने बऱ्याच देवाच्या संदेष्ट्यांना देखील मारले.
  • नाबोथ नावाच्या एका निष्पाप मनुष्याला मारण्यास ईजबेल कारणीभूत झाली, जेणेकरून आहाब नाबोथाचा द्राक्षमळा चोरू शकेल.
  • ईजबेल शेवटी तिने केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे मारली गेली. एलीयाने ती कशी मरेल त्याविषयी सांगितले आणि त्याने भविष्य वर्तवल्याप्रमाणेच घडले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, एलीया, खोटे देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


ईयोब

तथ्य:

पवित्र शास्त्रामध्ये, ईयोब हा असा मनुष्य होता, ज्याचे वर्णन तो देवासमोर निर्दोष आणि नीतिमान होता असे केले आहे. भयंकर छळाच्या काळामध्ये सुद्धा, देवावर असलेल्या स्वतःच्या विश्वासाचे जतन करण्यासाठी ईयोब प्रसिद्ध आहे.

  • ईयोब उस नावाच्या भूमीत राहत होता, जे कनान भूमीच्या पश्चिमेस कुठेतरी वसलेले होते, शक्यतो अदोमी लोकांच्या प्रांताजवळ.
  • असा विचार आहे की, तो एसाव आणि याकोब ह्यांच्या काळात राहत होता, कारण ईयोबाचा एक मित्र तेमानी होता, जो एक लोकसमूह होता त्याचे नाव एसावाच्या नातावानंतर ठेवण्यात आले होते.
  • जुन्या कराराचे पुस्तक ईयोब आपल्याला, कसे ईयोब आणि इतरांनी त्याच्या छळात प्रतिसाद दिला हे सांगते. हे देव हा सार्वभौम निर्माता आणि सार्वभौमिक शासक म्हणून देवाचा दृष्टिकोनही देतो.
  • सर्व संकटे येऊन गेल्यानंतर, देवाने शेवटी ईयोबाला बरे केले आणि त्याला अधिक मुले व संपत्ती दिली.
  • ईयोबाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो फार वृद्ध झाला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, एसाव, पूर, याकोब, लोकसमूह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


उज्जीया, अजऱ्या

तथ्य:

  • उज्जीया यहुदाचा राजा वयाच्या 16 व्या वर्षी बनला आणि त्याने 52 वर्षे राज्य केले, जी एक विलक्षण मोठी कारकीर्द होती. उज्जीयाला "अजऱ्या" म्हणून सुद्धा ओळखले जाते.

  • उज्जीया राजा त्याच्या संघटीत आणि कुशल सैन्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने शहराच्या संरक्षणासाठी बुरुज बांधले आणि तीर आणि मोठे दगड मारण्यासाठी त्याने खासकरुन तयार केलेली युद्धरूपी शस्त्रे होती.

  • जितके दिवस उज्जीयाने देवाची सेवा केली, तितके दिवस त्याची भरभराट झाली. त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी, तो गर्विष्ठ बनला आणि त्याने मंदिरामध्ये धूप जाळला, ज्याची परवानगी फक्त याजाकालाच होती, असे करून देवाची आज्ञा मोडली.

  • या पापामुळे, उज्जीया कुष्टरोगाने आजारी पडला आणि त्याला त्याच्या कारकीर्दीच्या शेवटपर्यंत, इतर लोकांच्यापासून वेगळे राहावे लागले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: यहूदा, राजा, कुष्टरोग, कारकीर्द, बुरुज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


उरीया

तथ्य:

उरीया हा एक नीतिमान मनुष्य, आणि दावीद राजाचा एक उत्तम सैनिक होता. त्याला सहसा "उरीया हित्ती" असे संबोधित केले जाते.

  • उरीया ह्याला एक अतिशय सुंदर पत्नी होती तिचे नाव बेथशेबा होते.
  • दावीदाने उरीयाच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला, आणि ती दाविदापासून गर्भवती राहिली.
  • हे पाप झाकण्यासाठी, दावीदाने उरीयाला युद्धात मरावयास लावले. नंतर दावीदाने बेथशेबा हिच्याची विवाह केला.
  • अजून एक उरीया नावाचा मनुष्य, अहाज राजाच्या काळात याजक होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाज, बेथशेबा, दावीद, हित्ती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता. दाविदाने उरीयास युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले. परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. म्हणून दाविदाने उरीयास परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे उरीया युद्धात मारला जाईल.

  • उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.

  • Strong's: H223, G3774


ऊर

तथ्य:

खास्द्याच्या प्राचीन प्रदेशात, फरात नदीच्या किनाऱ्यावरील ऊर हे एक महत्वाचे शहर होते, जे मेसोपटेम्याचा भाग होते. हा प्रदेश सध्याचा आधुनिक देश इराक आहे तेथे स्थित होता.

  • अब्राहाम हा ऊर शहरापासून होता, आणि तेथूनच देवाने त्याला कनान देशाला जाण्यास निघण्यास सांगितले.
  • हारान, अब्राहामाचा भाऊ आणि लोटाचा भाऊ होता, तो ऊर मध्ये मरण पावला. कदाचित हे एक कारण आहे, ज्याने लोटाला अब्राहमसोबत ऊर शहर सोडण्यावर जोर दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, कनान, खास्दी, फरात नदी, हारान, लोट, मेसोपटेम्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एक्रोन, एक्रोनी

तथ्य:

एक्रोन हे पलीष्ट्यांच्या देशातील महत्वाचे शहर होते, जे भूमध्य समुद्रापासून नऊ मैल अंतरावर स्थित होते.

  • खोटे देव बाल-जबुब ह्याचे मंदिर एक्रोनामध्ये स्थित होते.
  • जेंव्हा पालीष्ट्यांनी कराराच्या कोशावर कब्जा केला, तेंव्हा त्यांनी तो अश्दोदला नेला आणि नंतर गथ आणि नंतर एक्रोन येथे नेला, कारण ज्या ज्या शहरामध्ये कराराचा कोश नेण्यात आला, त्या त्या शहरातील लोकांना देवाने आजारी पडण्यास आणि मरण्यास लावले. शेवटी पालीष्ट्यांनी कराराचा कोश इस्राएलाला परत पाठवून दिला.
  • जेंव्हा अह्ज्या राजा त्याच्या घराच्या छातावरून खाली पडला आणि जखमी झाला, त्यांने एक्रोनाच्या खोट्या देवाला बाल-जबुला पासून, तो या जखमांमुळे मरेल की नाही हे शोधून पाहुन पाप केले. या पापामुळे, यहोवा बोलला की तो खात्रीने मरेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहज्या, कराराचा कोश, अश्दोद, बाल-जबुल, खोटे देव, गथ, पलीष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एज्रा

तथ्य:

एज्रा हा इस्राएली याजक होता, आणि यहुदी कायद्यांचा तज्ञ देखील होता, ज्याची इस्राएली लोकांच्या इतिहासामध्ये नोंद, ज्याने इस्राएली लोकांना बाबेलच्या बंदिवासातून परत यरुशलेमला आणले, म्हणून केली गेली, जिथे इस्राएली लोक 70 वर्षे बंदिवासात होते.

  • एज्राचा हा इस्राएलाच्या इतिहासाचा भाग हा, पवित्र शास्त्राचे एज्रा या पुस्तकात नोंद केलेला आहे. त्याने कदाचित नहेम्याचे पुस्तक देखील लिहिले असावे, कारण ही दोन पुस्तके मूळतः एक पुस्तक होते.
  • जेंव्हा एज्रा यरुशलेमेस परत आला, तेंव्हा त्याने नियमशास्त्राची पुनःस्थापना केली, कारण इस्राएली लोकांनी शब्बाथच्या नियमांचे पालन करण्याचे थांबवले होते, आणि त्यांनी मूर्तीपूजक धर्माचा सराव करणाऱ्या स्त्रियांना बायको करून घेतले होते.
  • एज्राने मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी मदत देखील केली, ज्याचा बाबेली लोकांनी नाश केला होता, जेंव्हा त्यांनी यरुशलेमवर कब्जा केला.
  • जुन्या करारामध्ये एज्रा नावाच्या आणखी दोन मनुष्यांचा उल्लेख केलेला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेल, हद्दपार, नियमशास्त्र, नहेम्या, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एदेन, एदेन बाग

तथ्य:

प्राचीन काळी, एदेन हा असा प्रांत होता, जेथे देवाने पहिला मनुष्य आणि स्त्रीला राहण्यासाठी ठेवले होते.

  • जेथे आदाम आणि हव्वा राहिले, ती बाग, एदेनाचा फक्त एक भाग होती.
  • एदेन प्रदेशाचे अचूक स्थान निश्चित नाही, परंतु हिद्दकेल (टायग्रीस) व फरात नदी यातून वाहते.
  • "एदेन" हा एक हिब्रू शब्द आहे, त्याचा अर्थ "च्या मध्ये खूप आनंद घ्या" असा होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः आदम, फरात नदी, हव्वा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एन-गेदी

व्याख्या

एन-गेदी हे यहुदाच्या वाळवंटात यरुशलेमच्या दक्षिणपूर्व शहराचे नाव होते.

  • एन-गेदी हे मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित होते.
  • त्याच्या नावाचा एक भाग म्हणजे "झरा," ह्याचा संदर्भ पाण्याच्या झाऱ्याशी आहे जो, शहरामधून वाहत जाऊन समुद्राला मिळतो.
  • एन-गेदी हे त्याच्यामध्ये असलेल्या द्राक्षमळ्यासाठी आणि सुपीक जमिनीसाठी प्रसिद्ध होते. कदाचित सततच्या वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यामुळे हे असावे.
  • एन-गेदीमध्ये मजबूत किल्ले होते, जेथे दावीद पळून गेला, जेंव्हा शौल राजाने त्याचा पाठलाग केला.

(हे सुद्धा पहा: दावीद, वाळवंट, झरे, यहूदा, विश्रांती, मृत समुद्र, शौल, मजबूत किल्ला, द्राक्षांचा वेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एफ्राईम, एफ्राथी

तथ्य:

एफ्राईम हा योसेफाचा दुसरा मुलगा होता. * त्याचे वंशज, एफ्राथी यांनी, इस्राएलाच्या बारा कुळांपैकी एक कुळ स्थापन केले.

  • एफ्राईमचे कुळ हे त्या दहा कुळांपैकी एक होते, जे इस्राएलच्या उत्तरी भागात वसलेले होते.
  • काहीवेळा एफ्राईम हा शब्द, इस्राएलाच्या उत्तरेच्या संपूर्ण राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: सिनेकडॉक
  • "एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश" किंवा "एफ्राईमचे डोंगर" या शब्दांच्या संदर्भाच्या आधारावर, एफ्राईम हा वरवर पाहता एक खूप डोंगराळ किंवा टेकड्यांचा प्रदेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएलाचे राज्य, इस्राएलाची बारा कुळे)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


एलाजार

तथ्य:

जुन्या करारांमध्ये एलाजार नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • मोशेचा भाऊ अहरोन याचा एलाजार हा तिसरा मुलगा होता. * अहरोनाच्या मृत्युनंतर, एलाजार हा इस्राएलचा महायाजक बनला.
  • एलाजार हे दाविदाच्या "शूर सैनिकाचे" सुद्धा नाव होते.
  • दुसरा एलाजार हा येशुंच्या वंशाजांपैकी एक होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: अहरोन, महायाजक, दावीद, शूर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एलाम, एलामी

तथ्य:

एलाम हा शेमचा मुलगा आणि नोहाचा नातू होता.

  • एलामच्या वंशजांना "एलामी" म्हंटले गेले, आणि ते ज्या प्रांतात राहिले त्याला सुद्धा "एलाम" असे म्हंटले गेले.
  • एलामचा प्रांत हा टायग्रीस नदीच्या दक्षिणपूर्व भागात म्हणजेच आताच्या पश्चिम ईरान आहे त्या भागात स्थित होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: नोहा, शेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एलीया

तथ्य:

एलीया हा यहोवाचा सर्वात महत्त्वाचा संदेष्टा होता. इस्राएलाचे आणि यहूदाचे अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान एलीयाने भविष्यवाणी केली, ज्यामध्ये अहाब राजाचा देखील समावेश आहे.

  • देवाने एलीयाद्वारे अनके चमत्कार केले, ज्यामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा देखील समावेश आहे.
  • एलीयाने अहाब राजाला बाल नावाच्या खोट्या देवाची उपासना करण्याबद्दल दोष लावला.
  • त्याने बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
  • एलीयाच्या जीवनाच्या शेवटी, तो अद्याप जिवंत असतानाच देवाने त्याला अद्भूतरीत्या स्वर्गात नेले.
  • शेकडो वर्षांनंतर, एलीया आणि मोशेसोबत येशू डोंगरावर दिसला आणि ते यरुशलेममध्ये येशूच्या येणाऱ्या दुःखाबद्दल आणि मृत्यूबद्दल एकत्र बोलले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: चमत्कार, संदेष्टा, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:02 जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.

  • 19:02 एलीया अहाबास म्हणला, ‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.’’

  • 19:03 अहाब एलीयास जिवे मारु इच्छित होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले.

  • 19:04 परंतु त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही.

  • 19:05 साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली.

  • 19:07 मग एलीया बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका."

  • 19:12 तेंव्हा एलीया त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका!’’

  • 36:03 तेंव्हा मोशे व एलीया हे संदेष्टे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार होते.

  • Strong's: H452, G2243


एल्याकीम

तथ्य:

जुन्या करारांमध्ये एल्याकीम नावाचे दोन पुरुष होते.

  • एल्याकीम नावाचा एक माणूस हिज्कीया राजाचा व्यवस्थापक होता.
  • एल्याकीम नावाचा अजून एक मनुष्य योशीया राजाचा मुलगा होता. मिसरचा राजा फरो-नखो याने त्याला यहुदाचा राजा बनवले.

नखो याने एल्याकीम याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: हिज्कीया, यहोयाकीम, योशीया, फारो)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


एसाव

तथ्य:

इसहाक आणि रिबका ह्याच्या जुळ्या मुलांपैकी एसाव हा एक होता. तो त्या दोघांमधील पहिला जन्मणारा होता. याकोब हा त्याचा जुळा भाऊ होता.

  • कटोराभर अन्नासाठी एसावाने त्याचा जेष्ठत्वाचा हक्क याकोबाला विकला.
  • कारण एसाव हा प्रथम जन्मलेला होता, म्हणून त्याचे पिता इसहाक ह्याने त्याला विशेष आशीर्वाद देणे गरजेचे होते. परंतु इसहाकाने तो आशीर्वाद एसवाऐवजी याकोबाला देण्यासाठी त्याने त्याला फसवले. सुरवातीला एसाव हा याकोबावर इतका रागावला होता की, तो त्याला मारून टाकू इच्छित होता, पण नंतर त्याने त्याला माफ केले.
  • एसावाला अनेक मुले आणि नातवंडे होती, आणि या वंशजांनी कनानच्या भूमीत राहत असताना एक मोठा लोकसमूह स्थापन केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अदोम, इसहाक, याकोब, रिबका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 06:07 जेंव्हा रिबकेच्या मुलांचा जन्म झाला, तेंव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते, त्याचे नांव एसाव ठेवले.

  • 07:02 अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला ज्येष्ठत्वाचा (मोठ्या मुलाचा) हक्क देऊन टाकला.

  • 07:04 जेंव्हा इसहाकाने शेळीच्या केसास स्पर्श केला व त्याच्या कपड्यांचा वास घेतला, तेंव्हा तो एसावच आहे असे वाटून त्याने त्यास आशीर्वाद दिला.

  • 07:05 एसाव याकोबाचा द्वेष करू लागला कारण याकोबाने त्याचा जेष्ठत्वाचा अधिकार आणि आशीर्वाद सुदधा चोरला होता.

  • 07:10 परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.

  • Strong's: H6215, G2269


एस्तेर

तथ्य:

एस्तेर ही एक यहुदी स्त्री होती, जी यहुदी बाबेलाच्या बंदिवासात असतानाच्या काळात पारसाच्या राज्याची राणी बनली.

  • एस्तेरचे पुस्तक, आपल्याला कशी एस्तेर परासाचा राजा अहश्वेरोष ह्याची बायको बनली, आणि कसे देवाने तिचा उपयोग तिच्या लोकांना वाचवण्यासाठी करून घेतला ह्याची गोष्ट सांगते.
  • एस्तेर ही अनाथ होती, जीला तिचा भक्तिमान मोठा चुलत भाऊ मर्दखय ह्याने वाढवले.
  • तिच्या दत्तक वडिलांप्रतीच्या आज्ञाधारकपणाने, तिला देवाशी आज्ञाधारक राहण्यास मदत केली.
  • एस्तेरने देवाची आज्ञा मानिली आणि तिच्या लोकांना, यहुद्यांना वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला.
  • एस्तेरची कथा इतिहासाच्या घटनांवर देवाचे सार्वभौम नियंत्रण दाखवते, विशेषकरून देव कसा त्याच्या लोकांना वाचवतो आणि जे लोक त्याची आज्ञा पाळतात त्यांच्याद्वारे कसा काम करतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, बाबेल, मर्दखय, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


ओबद्या

तथ्य:

ओबद्या हा जुन्या करारातील संदेष्टा होता, ज्याने अदोमाच्या लोकांच्याविरुद्ध भविष्यवाणी केली, जे एसवाचे वंशज होते. जुन्या करारामध्ये ओबद्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती:

  • ओबद्याचे पुस्तक हे जुन्या करारातील सर्वात लहान पुस्तक आहे, आणि ते ओबद्याला देवाकडून मिळालेल्या दर्शनामधील भविष्यवाणीबद्दल सांगते.
  • ओबद्या केंव्हा जगला आणि त्याने केंव्हा भविष्यवाणी केली हे स्पष्ट नाही. ते कदाचित यहोराम, अहज्या, योवाश, आणि अथल्या हे यहुदामध्ये राज्य करत असलेल्या काळामध्ये असावेत. दानीएल, यहेज्केल, आणि यिर्मिया हे संदेष्ट्ये देखील त्याच काळात भविष्यवाणी करत असावेत.
  • ओबेद्या सुद्धा कदाचित त्याच्या नंतरच्या काळात जगला असावा, सिद्कीया राजाच्या आणि बाबेलाच्या बंदिवासाच्या काळात.
  • इतर मनुष्य ज्याचे नाव ओबद्या आहे, ज्यामध्ये एसावच्या वंशजांचा समावेश आहे,; एक गादी जे दाविदाचे अंगरक्षक बनले, अहाब राजाच्या राजवाड्यातले व्यवस्थापक, यहोशाफाट राजाचे शासकीय लोक, योशीया राजाच्या काळात एक मनुष्य ज्याने मंदिर दुरुस्त करण्यास मदत केली, आणि नहेम्याच्या काळात एक लेवी, जो पहारेकरी देखील होता.
  • ओबेद्या पुस्तकाचा लेखक या मनुष्यांपैकी एक असावा, असे असू शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, बाबेल, दावीद, अदोम, एसाव, यहेज्केल, दनीएल, देव, यहोशाफाट, योशीया, लेवी, शौल, सिद्कीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कनान, कनानी

तथ्य:

कनान हा हामचा मुलगा होता, जो नोहाच्या मुलांपैकी एक होता. कनानी हे लोक कनान चे वंशज होते.

  • "कनान" किंवा "कनानची भूमी" हे शब्द यार्देन नदी आणि भूमध्य समुद्र ह्यांच्यामधील जमिनीला संदर्भित करतात. दक्षिणेस हे मिसरच्या सीमेपर्यंत आणि उत्तरेस अरामाच्या सीमेपर्यंत पसरले होते.
  • या भूमीत कनानी तसेच इतर अनेक लोकसमूहांनी वास्तव्य केले होते.
  • देवाने कनानची भूमी अब्राहमाला आणि त्याच्या वंशजांना इस्राएली लोकांना देण्याचे वचन दिले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हाम, वचनदत्त भूमी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 04:05 त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या कनान देशात जायला निघाला.

  • 04:06 कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या वंशजांना वतन म्हणुन देईन.

  • 04:09 तुझ्या वंशजांना मी कनान देश देईल.”

  • 05:03 मी तुला व तुझ्या वंशजांस कनान देश देईल व मी त्यांचा निरंतरचा देव होईन.

  • 07:08 त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.

  • Strong's: H3667, H3669, G2581, G5478


कफर्णहुम

तथ्य:

कफर्णहुम गालील समुद्राच्या वायव्य किनाऱ्यावर असलेले एक मासेमारीचे गाव होते.

  • येशू गालील प्रांतात शिकवत असताना, कफर्णहुम येथे राहिला.
  • त्याच्या शिष्यांतील बरेच लोक कफर्णहुम नगरातील होते.
  • येशूने सुद्धा या नगरामध्ये अनेक चमत्कार केले, ज्यामध्ये मेलेल्या मुलीला परत जिवंत करण्याचा समावेश होता.
  • कफर्णहुम हे तीन शहरांपैकी एक होते, ज्यांनी येशूला जाहीरपणे नाकारले, कारण त्यांच्या लोकांनी त्याला नाकारले आणि त्याच्या संदेशावर विश्वास ठेवला नाही. त्याने त्यांना इशारा दिला की देव त्यांच्या अविश्वासासाठी त्यांना शिक्षा करील.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: गालीली, गालील समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कयफा

तथ्य:

बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या आणि येशूच्या काळात, कयफा हा मुख्य याजक होता.

  • येशूची सुनावणी आणि शिक्षा देण्यामध्ये कयफाची महत्वाची भूमिका होती.
  • जेंव्हा पेत्र आणि योहान यांना एका लंगड्या मनुष्याला बरे केल्याबद्दल अटक केली, तेंव्हा हन्ना आणि कयफा हे मुख्य याजक पेत्र आणि योहानाची सुनावणी घेत होते.
  • कयफा हाच असे म्हणणारा होता की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा, एका मनुष्याने संपूर्ण राष्ट्रासाठी मरावे हे हिताचे आहे. येशू त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी कसा मरेल, हे त्याने भविष्यवाणीच्या रुपात बोलण्यासाठी देव त्याला कारणीभूत झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हन्ना, मुख्य याजक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


करिंथ, करिंथकर

तथ्य:

करिंथ हे ग्रीक देशातील अथेन्स शहरापासून 50 मैल पश्चिमेस असलेले एक शहर होते. * करिंथकर हे करिंथमध्ये राहणारे लोक होते.

  • करिंथ हे आद्य ख्रिस्ती मंडळ्यापैकी एका मंडळीचे स्थान होते.
  • नवीन करारातील पुस्तके, 1 करिंथकरांस आणि 2 करिंथकरांस ही पौलाने करिंथमध्ये राहणाऱ्या लोकांना लिहिलेली पत्रे होती.
  • त्याच्या पहिल्या सुवार्ताप्रसार यात्रेदरम्यान, पौल करिंथमध्ये अंदाजे 18 महिने थांबला.
  • पौल करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्कील्ला या विश्वासुंना भेटला.
  • इतर आद्य मंडळीतील पुढारी करिंथ बोरोबर जोडले गेलेले, त्यामध्ये तीमोथ्यी, तीत, अपुल्लो, आणि सीला यांचा समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अपुल्लो, तीमोथ्यी, तीत)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


करेथी

तथ्य:

करेथी हा एक लोकसमूह होता, जो कदाचित पलीष्टी लोकांचा एक भाग होता. काही आवृत्या हे नाव "करेथी (Cherethites)" असे लिहितात.

  • "करेथी" आणि "पलेथी" या दावीदाच्या सैन्यातील सैनिकांच्या विशेष तुकड्या होत्या, ज्यांनी विशेषकरून स्वतःला दाविदाचे अंगरक्षक म्हणून समर्पित केले होते.
  • यहोयादचा मुलगा बनाया, दाविदाच्या प्रशासकीय दलाचा सदस्य, हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
  • अबशालोमाने बंड केल्यामुळे जेंव्हा दाविदाला यरुशलेमेस पळून जावे लागले, तेंव्हा करेथी दावीदाबरोबर राहिले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पाहा: अबशालोम, बनाया, दावीद, पलिष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कर्नेल्य

तथ्य:

कर्नेल्य हा एक विदेशी किंवा यहुदी नसलेला मनुष्य होता, जो रोमी सैन्यामध्ये शाताधीपती या पदावर होता.

  • तो देवाला नियमितपणे प्रार्थना करायचा आणि गरिबांना देण्यामध्ये खूप उदार होता.
  • जेंव्हा कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबाने प्रेषित पेत्राने स्पष्ट केलेला शुभसंदेश ऐकला, तेंव्हा ते लोक येशूचे विश्वासणारे बनले.
  • कर्नेल्याच्या घराण्याचे लोक, हे पहिले यहुदी नसलेले लोक होते, जे विश्वासणारे बनले.
  • ह्याने येशुंच्या अनुयायांना दाखवून दिले की, येशू सर्वांना वाचवण्यासाठी आला, त्यामध्ये विदेशी (परराष्ट्रीय) लोकांचा देखील समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः प्रेषित, विश्वास, परराष्ट्रीय, शुभसंदेश, ग्रीक, शाताधीपती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कर्मेल, कर्मेल डोंगर

तथ्य:

"कर्मेल पर्वत" म्हणजे एका पर्वतरांगाचा भाग, जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर शारोनच्या मैदानाच्या उत्तरेकडील बाजूस स्थित होते. त्याचे सर्वात उंच शिखर 546 मीटर उंच आहे.

  • "कर्मेल" नावाचे एक गाव यहूदामध्ये मृत समुद्राच्या दक्षिणेस स्थित होते.
  • श्रीमंत जमीनदार नाबाल आणि त्याची बायको अबीगईल, कर्मेल गावाच्या जवळ राहत होते, जेथे दावीद आणि त्याच्या माणसांनी नाबालच्या मेंढपाळांचे संरक्षण केले.
  • कर्मेल डोंगरावर, एलीया बालच्या संदेष्ट्यांना एका परीक्षेत आव्हान दिले; त्याने हे सिद्ध झाले की यहोवा एकच खरा देव आहे.
  • तो केवळ एक डोंगर नव्हता हे स्पष्ट करण्यासाठी, "कर्मेल डोंगर" ह्याचे भाषांतर, "कर्मेल पर्वतरांगांवरील डोंगर" किंवा "कर्मेल पर्वतरांगा" असे केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाल, एलीया, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कलस्सै, कलस्सैकरांस

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, कलस्सै हे शहर रोमी प्रांताच्या फ्रुगीया या भागात होते, आताचा तुर्की देश आहे, त्याचा दक्षिणपश्चिमी भाग. * कलस्सैकर हे कलस्सैमध्ये राहणारे लोक होते.

  • भूमध्य समुद्रापासून सुमारे 100 मैल अंतर्देशीय स्थित, कलसै हे इफिस आणि फरात नदी ह्यांच्यामधील एक महत्वाचा व्यापारी मार्ग होते.
  • रोममध्ये तुरुंगात असताना, पौलाने कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांच्यामधील चुकीच्या शिक्षणाला ठीक करण्यासाठी, "कलस्सैकरांस" पत्र लिहिले.
  • जेंव्हा पौलाने हे पत्र लिहिले, तेंव्हा त्याने कलस्सै येथील मंडळीला भेट दिलेली नव्हती, पण त्याने तेथील विश्वासणाऱ्यांच्या बद्दल, त्याचा सहकारी, एपफ्रास ह्याच्याकडून ऐकले होते.
  • एपफ्रास हा कदाचित ख्रिस्ती कामकरी होता, ज्याने कलस्सै येथे मंडळी सुरु केली होती.
  • फिलेमोनाला पत्र, हे पौलाने कलस्सै येथील गुलामाच्या मालकाला उद्देशून लिहिलेले पत्र होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इफिस, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


काईन

तथ्य:

काईन आणि त्याचा लहान भाऊ हाबेल हे आदाम आणि हव्वा ह्यांचे पहिले मुलगे होते, ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.

  • काईन हा शेतकरी होता, ज्याने अन्न पिकांचे उत्पादन केले, तर हाबेल हा कळप राखणारा होता.
  • काईनाने त्याचा भाऊ हाबेल ह्याला मत्सराने मारून टाकले, कारण देवाने हाबेलचे अर्पण स्वीकार केले पण त्याने काईनचे अर्पण स्वीकार केले नाही.
  • ह्याची शिक्षा म्हणून, देवाने त्याला एदेन बागेपासून दूर पाठवून दिले आणि त्याला सांगितले की इथून पुढे जमीन त्याच्यासाठी पिके उत्पन्न करणार नाही.
  • देवाने काईनाच्या कपाळावर एक खून केली, ते ह्याचे चिन्ह होते की, तो भटकत असताना इतर लोकांच्याकडून मारले जाण्यापासून देव त्याला वाचवील.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः आदाम, अर्पण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कादेश, कादेश-बर्णा, मरीबोथ कादेश

तथ्य:

कादेश, कादेश-बर्णा, आणि मरीबोथ कादेश या सर्व नावांचा संदर्भ इस्राएलाच्या महत्वाच्या शहराशी येतो, जे इस्राएलाच्या दक्षिणी भागात, एदोमाच्या प्रांताजवळ स्थित होते.

  • कादेश शहर हे मरुहीरवळीचे ठिकाण होते, असे ठिकाण जिथे सीन वाळवंटाच्या मध्येच पाणी आणि सुपीक जमीन होती.
  • मोशेने कादेश-बर्णा येथून कनानच्या भूमीत बारा हेर पाठवले.
  • वाळवंटात भटकत असताना इस्राएली लोकांनीसुद्धा कादेश येथे तंबू लावला होता.
  • कादेश-बर्णा या ठिकाणी मिर्याम मेली होती.
  • मरीबोथ कादेश हे ठिकाण होते, जेथे मोशेने देवाची आज्ञा मोडली, आणि इस्राएली लोकांच्यासाठी पाणी मिळवताना, देवाने सांगितल्याप्रमाणे खडकाला बोलण्याच्या ऐवजी त्याने खडकावर काठी आपटली.
  • "कादेश" हे नाव इब्री शब्दापासून येते, आणि त्याचा अर्थ "पवित्र" किंवा "वेगळा केलेला' असा होतो.

(भाषांतर सूचना: अनोळखी नावांचे भाषांतर कसे करावे

(हे सुद्धा पहा: वाळवंट, एदोम, पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


काना

व्याख्या:

काना हे एक गालील प्रांतातील गाव होते, जे नासरेथच्या उत्तरेला नऊ मैलावर वसलेले होते.

  • बारा शिष्यांपैकी एक नथनेल ह्याचे काना हे मूळ गाव होते.
  • येशू काना येथील लग्न समारंभात उपस्थित होता, आणि तेथे त्याने त्याचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस करून केला.
  • त्यानंतर काही कालांतराने, येशू काना येथे परत आला आणि तेथे तो कफर्णहुमच्या एका अधिकाऱ्याला भेटला, जो येशूला त्याच्या मुलाला बरे करण्याची विनंती करत होता.

(हे सुद्धा पहा: कफर्णहूम, गालील, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कालेब

तथ्य:

कालेब हा मोशेने कनान देशाची पाहणी करण्याकरिता पाठवलेल्या बारा इस्राएली हेरांपैकी एक होता.

  • त्यांने आणि यहोशवाने लोकांना सांगितले की, कनानी लोकांना पराभूत करण्यासाठी देव आपल्याला मदत करेल ह्यावर लोकांनी विश्वास ठेवावा.
  • यहोशवा आणि कालेब हे त्यांच्या पिढीतील एकमेव पुरुष होते, ज्यांना कनान देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली.
  • हेब्रोनची भूमी त्याला व त्याच्या कुटुंबाला मिळावी अशी कालेबाने विनंती केली. त्याला माहित होते की, तिथे राहणाऱ्या लोकांना पराभूत करण्यासाठी देव त्याला मदत करेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हेब्रोन, यहोशवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 14:04 जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.
  • 14:06 लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो. देव तुमच्या वतीने आज लढणार आहे!"
  • 14:08 फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षांवरील लोक या जंगलामध्येच मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश होणार नाही.”

जेणेकरून ते त्या देशात शांततेने राहू शकतील.

  • Strong's: H3612, H3614

किद्रोन खोरे

तथ्य:

किद्रोन खोरे हे एक खोल दरी आहे, जी यरुशलेम शहराच्या बाहेर, पूर्वेकडील भिंत आणि जैतुनाचा डोंगर ह्यांच्या मध्ये आहे.

  • हे खोरे सुमारे 1000 मीटर खोल आणि 32 किलोमीटर लांब आहे.
  • जेंव्हा दावीद राजा, त्याचा मुलगा अबशालोम ह्यापासून पळून गेला, तेंव्हा तो जैतुनाच्या डोंगरावर जाण्यासाठी, किद्रोन खोऱ्यामधून गेला.
  • यहुद्यांचा राजा योशीया आणि असा राजा ह्यांनी आज्ञा दिली की, खोट्या देवतांचे उच्च स्थाने आणि वेद्या ह्यांचा नाश करून त्या जाळून टाका आणि त्यांची राख किद्रोन खोऱ्यात नेऊन टाका.
  • हिज्कीया राजाच्या कारकिर्दीत, याजकांनी मंदिरामधून काढलेल्या सर्व अशुद्ध वस्तूंना किद्रोनच्या खोऱ्यात फ्हेकून देण्यात आले.
  • दुष्ट राणी अथल्या हिला, तिने केलेल्या वाईट कृत्यांमुळे किद्रोन खोऱ्यात मारण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अबशालोम, असा, अथल्या, दावीद, खोटे देव, हिज्कीया, उच्च स्थाने, योशीया, यहूदा, जैतुनाचा डोंगर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


किलिकिया

तथ्य:

किलिकिया हा एक छोटा रोमी प्रांत होता, जो आता तुर्कीचा आधुनिक काळातील भाग आहे त्याच्या अग्नेयेस वसलेला आहे. त्याच्या सीमेवर एजियन समुद्र आहे.

  • प्रेषित पौल हा तार्सस शहराचा नागरिक होता, जे किलिकियामध्ये वसलेले होते.
  • दिमिश्काच्या वाटेवर येशुबरोबर सामना झाल्यानंतर, पौलाने किलिकीयामध्ये बरीच वर्षे घालवली.
  • किलिकीयामधील काही यहुदी हे त्या यहुद्यांपैकी होते, ज्यांनी स्तेफनाचा विरोध केला आणि त्याला दगडमार करून जीवे मारण्यासाठी इतर लोकांना प्रभावित केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः पौल, स्तेफन, तार्सस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कुप्र

तथ्य:

कुप्र हे भूमध्य समुद्रातील एक बेट आहे, जे आताचा तुर्की देश आहे त्याच्या दक्षिणेस सुमारे 64 किलोमीटरवर आहे.

  • बर्णबा हा कुप्रचा रहिवासी होता, म्हणून हे कदाचित शक्य आहे की, त्याचा चुलत भाऊ मार्क म्हंटलेला योहान सुद्धा तिथलाच असेल.
  • पौल आणि बर्णबा या दोघांनी त्यांच्या पहिल्या सुवार्ता प्रसार यात्रेच्या सुरवातीला कुप्रच्या बेटावर संदेश दिला. मार्क म्हंटलेला योहान त्या यात्रेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आला.
  • नंतर, बर्णबा आणि मार्क यांनी कुप्रला परत भेट दिली.
  • जुन्या करारामध्ये, कुप्र ह्याचा उल्लेख देवदारूच्या झाडांचा समृद्ध स्त्रोत असा केला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, मार्क म्हंटलेला योहान, समुद्र)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


कुरेने

तथ्य:

कुरेने हे भूमध्य समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावरील एक ग्रीक शहर होते, जे क्रेते बेटाच्या थेट दक्षिणेकडे होते.

  • नवीन कराराच्या वेळी, यहुदी आणि ख्रिस्ती दोघेही कुरेनेमध्ये राहत होते.
  • कुरेने हे शहर पवित्र शास्त्रामधील कदाचित बऱ्यापैकी माहित असलेले शहर असावे, कारण शिमोन नावाच्या ज्या मनुष्याने येशूचा वधस्तंभ वाहिला, त्याचे ते मूळ शहर होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: क्रेते)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कुश

तथ्य:

कुश हा नोहाचा मुलगा हाम ह्याचा जेष्ठ मुलगा होता. * तो निम्रोदचा पूर्वज देखील होता. त्याच्या दोन भावांची नावे मिस्राईम आणि कनान अशी होती.

  • जुन्या कराराच्या काळात, "कुश" हे इस्राएलच्या दक्षिण भागात असलेल्या मोठ्या प्रांताचे नाव होते. हे संभाव्य आहे की या प्रांताचे नाव हामचा मुलगा कुश ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले.
  • वेगवेगळ्या वेळी, कुशच्या प्राचीन प्रांताने जो भाग व्यापला होता, त्यामध्ये कदाचित सध्याच्या युगातील, सुदान, मिस्र, इथिओपिया आणि शक्यतो सौदी अरबच्या काही भागांचा समावेश होता.
  • अजून एक कुश नावाच्या मनुष्याचा उल्लेख स्तोत्रांमध्ये केलेला आहे. तो एक बन्यामीनी होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अरब, कनान, मिस्र, इथिओपिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


केदार

तथ्य:

केदार हा इश्माएलचा दुसरा मुलगा होता. हे एक महत्वाचे शहर देखील होते, ज्याचे नाव कदाचित त्या मनुष्यानंतर ठेवण्यात आले.

  • केदार शहर हे अरबस्तानच्या उत्तरी भागात आणि पलीष्ट्यांच्या सीमारेषेच्या जवळ स्थित होते. पवित्र शास्त्राच्या काळात, ते त्याच्या महान कार्याबद्दल आणि सुंदरतेबद्दल प्रसिद्ध होते.
  • केदारच्या वंशजांनी एक मोठा लोकसमूह तयार केला, त्यांना सुद्धा "केदार" असे म्हंटले गेले.
  • "केदारच्या तंबूसारखी काळी" या वाक्यांशाचा संदर्भ शेळीच्या काळ्या केसापासून बनवलेल्या तंबूत राहणाऱ्या केदारच्या लोकांशी येतो.
  • हे लोक शेळ्या आणि मेंढरे वाढवत होते. ते उंटांचा देखील वापर दळणवळणासाठी करत होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "केदारचे वैभव" या वाक्यांशाचा संदर्भ त्या शहराशी आणि त्याच्या लोकांच्या महत्तेशी येतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अरबस्तान, शेळी, इश्माएल, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


केदेश

तथ्य:

केदेश हे कनानी शहर होते, ज्याला इस्राएल लोकांनी त्यांच्या ताब्यात घेतले, जेंव्हा त्यांनी कनानच्या भूमीत प्रवेश केला.

  • हे शहर इस्राएलच्या उत्तरी भागात स्थित होते, जे नफताली वंशाला दिलेल्या जमिनीच्या भागात होते.
  • केदेश हे त्या शहरांपैकी एक होते, ज्यांना लेवी याजाकांना राहण्याची जागा म्हणून निवडले होते, कारण त्यांना राहण्यासाठी स्वतःची अशी जागा नव्हती.
  • ह्याला "आश्रयाचे शहर" म्हणून सुद्धा वेगळे केले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: कनान, हेब्रोन, लेवी, नफताली, याजक, शेखेम, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कैसर

तथ्य:

"कैसर" हा शब्द एक नाव किंवा शीर्षक आहे, ज्याचा उपयोग रोमी साम्राज्याच्या अनेक शासकांनी केला. * पवित्र शास्रामध्ये, या नावाचा संदर्भ तीन वेगवेगळ्या रोमी शासकांशी येतो.

  • ज्या पहिल्या रोमी शासकाचे नाव कैसर होते तो "औगुस्त कैसर" होता, तो जेंव्हा येशूचा जन्म झाला त्यावेळी शासन करीत होता.
  • सुमारे तीन वर्षानंतर, जेंव्हा बाप्तिस्मा करणारा योहान उपदेश करीत होता, त्यावेळी तीबिर्य कैसर हा रोमी साम्राज्याचा शासक होता.
  • जेंव्हा येशूने लोकांना सांगितले की, जे कैसराचे ते कैसरला द्या आणि जे देवाचे ते देवाला द्या, तेंव्हासुद्धा तीबिर्य कैसर हा रोमवर शासन करीत होता.
  • जेंव्हा पौलाने कैसराजवळ याचना केली, ह्याचा संदर्भ रोमी सम्राट, नेरो ह्याच्याशी होता, त्याला सुद्धा "कैसर" हे शीर्षक देण्यात आले होते.
  • जेंव्हा "कैसर" ह्याचा उपयोग स्वतः शीर्षक म्हणून होत असेल तर, त्याचे भाषांतर: "सम्राट" किंवा "रोमी शासक" असे केले जाऊ शकते.
  • कैसर औगुस्त किंवा तीबिर्य कैसर या नावामध्ये, "कैसर" अशा प्रकारे लिहायला हवे की, राष्ट्रीय भाषेत त्याला लिहिता येईल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: राजा, पौल, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कैसरीया, फिलीप्पाच्या कैसरीया

तथ्य:

कैसरीया हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्वाचे शहर होते, जे कर्मेल पर्वतापासून सुमारे 39 किलोमीटर अंतरावर होते. फिलीप्पाच्या कैसरीया हे शहर इस्राएलाच्या उत्तरपूर्व भागामध्ये, हर्मोन पर्वताजवळ स्थित होते.

  • या शहरांचे नाव कैसर, जो रोमी साम्राज्यावर राज्य करीत होता, त्याच्यासाठी ठेवले होते.
  • येशूच्या जन्माच्या काळी, किनाऱ्यावरील कैसरीया हे यहुदियाच्या रोमी प्रांताची राजधानी बनले.
  • प्रेषित पेत्राने परराष्ट्रीयांना कैसरीयामध्ये संदेश दिला.
  • पौल कैसरीया पासून तार्ससास गेला, आणि त्याच्या दोन सुवार्ता प्रसाराच्या यात्रेदरम्यान तो या शहरातून सुद्धा गेला.
  • सुरीयामधील फिलीप्पाच्या कैसरीया या भागाच्या सभोवताली येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रवास केला. दोन्ही शहरांचे नाव हेरोद फिलिप्प यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कैसर, परराष्ट्रीय, समुद्र, कर्मेल, हर्मोन पर्वत, रोम, तार्सस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कोरह, कोरही, कोरहाची

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये कोरह नावाचे तीन मनुष्य होते.

  • एसावच्या मुलांपैकी एकाचे नाव कोरह होते. तो आपल्या समाजातील एक नेता बनला.
  • कोरह हे लेवीचा वंशज देखील होता, आणि म्हणून तो मंदिरात याजक म्हणून सेवा करत होता. त्याच्या मनामध्ये मोशे आणि अहरोन ह्याच्याविषयी मत्सर निर्माण झाला आणि त्याने मनुष्यांच्या एका समूहाचे त्यांच्याविरुद्ध बंड करण्यासाठी नेतृत्व केले.
  • कोरह नावाच्या तिसऱ्या मनुष्याचा उल्लेख यहुदाचा वंशज म्हणून केले आहे.

(हे सुद्धा पहा: अहरोन, अधिकार, कालेब, वंश, एसाव, यहूदा, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कोरेश

तथ्य:

कोरेश हा एक परासाचा राजा होता, ज्याने सुमारे 550 इ.स.पू. मध्ये परसाच्या साम्राज्याला लष्करी विजयाद्वारे स्थापन केले. इतिहासामध्ये त्याला महान कोरेश म्हणून सुद्धा ओळखले जाते.

  • कोरेश राजाने बाबेल शहर जिंकले, ज्यामुळे निर्वासित झालेल्या इस्रायेली लोकांची सुटका झाली.
  • कोरेशाने ज्या राष्ट्रांना जिंकले त्या राष्ट्रातील लोकांप्रती त्याच्या सहनशील वृत्तीबद्दल तो ओळखला जात होता. त्याच्या यहुद्याप्रतीच्या दयाळूपणामुळे, हद्दपार झाल्यानंतर यरुशलेमच्या मंदिराच्या पुनर्बांधणीकडे वाटचाल झाली.
  • दानीएल, एज्रा आणि नहेम्या हे जगत असतानाच्या काळात कोरेश राज्य करीत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पहा: दानीएल, दयरावेश, एज्रा, नहेम्या, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


क्रेत, क्रेतीय

तथ्यः

क्रेत हे ग्रीसच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापासून दूर असलेले एक बेट आहे. या बेटावर राहणारा एक “क्रेतीय” म्हणजे तो.

  • प्रेषित पौल आपल्या मिशनरी प्रवासादरम्यान क्रेत बेटावर गेला.
  • ख्रिस्ती जंणाना शिकवण्यासाठी आणि तेथील मंडळीसाठी पुढारी नेमण्यास मदत करण्यासाठी पौलाने आपला सहकारी तीत याला क्रेतवर सोडले.

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]

बायबल संदर्भ:

  • [प्रेषितांची कृत्ये 02:11]
  • [प्रेषितांची कृत्ये 27:08]
  • [आमोस 09:7-8]
  • [तीतास पत्र 01:12]

शब्द डेटा:

  • मजबूत: G2912, G2914

क्षार समुद्र, मृत समुद्र

तथ्य:

क्षार समुद्र (ज्याला मृत समुद्र असे देखील म्हणतात) हा दक्षिणी इस्राएलाच्या पश्चिमेस आणि मवाबाच्या पूर्वेच्या मध्ये स्थित होता.

  • यार्देन नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन क्षार समुद्रास मिळते.
  • कारण तो इतर समुद्राहून लहान आहे, म्हणून त्याला "क्षार सरोवर" असे देखील म्हंटले जाऊ शकते.
  • या समुद्रात क्षारांचे (किंवा "मिठाचे") जास्त प्रमाणात केंद्रीकरण असल्यामुळे, त्याच्या पाण्यात कोणीही जगू शकत नाही. त्याच्यात वनस्पती आणि प्राण्यांच्या असलेल्या कमतरतेमुळे त्याचे नाव "मृत समुद्र" असे पडले.
  • जुन्या करारामध्ये, या समुद्राला "अराबाताचा समुद्र" आणि "नेगेवचा समुद्र" असेही म्हंटले जाते, कारण त्याचे स्थान अराबाताच्या आणि नेगेवच्या जवळ आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अम्मोन, अराबात, यार्देन नदी, मवाब, नेगेव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


खास्दी, खास्द्यांच्या

तथ्य:

खास्दी हे मेसोपटेम्या किंवा बाबेल ह्यांच्या दक्षिणी भागातील एक प्रांत होता. * जे लोक या प्रांतामध्ये राहत होते, त्यांना "खास्दी" असे म्हंटले गेले.

  • ऊर हे शहर, ज्या शहराचा अब्राहाम रहिवासी होता, ते खास्दी या प्रांतात स्थित होते. ह्याला बऱ्याचदा "खास्द्यांचे ऊर" म्हणून संदर्भित केले जाते.
  • राजा नबुखदनेस्सर हा अनेक खास्द्यांपैकी एक होता, जो बाबेलाचा राजा बनला.
  • अनेक वर्षानंतर, सुमारे ई. स. पूर्व 600 मध्ये, "खास्दी" या शब्दाचा अर्थ "बाबेली" असा झाला.
  • दानीएलच्या पुस्तकात, "खास्दी" या शब्दाचा संदर्भ विशिष्ठ प्रकारच्या मनुष्यांच्या वर्गाशी येतो, जे उच्चशिक्षित आणि ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, बाबेल, शीनार, ऊर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गज्जा

तथ्य:

पवित्र शास्त्राच्या काळात, गज्जा हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एक समृद्ध पलिष्टी शहर होते, जे अश्दोदपासून 38 किलोमीटर अंतरावर होते. हे पलीष्ट्यांच्या पाच मोठ्या शहरांपैकी एक होते.

  • त्याच्या स्थानामुळे, गज्जा हे महत्वाचे समुद्रातील बंदर होते, जिथे अनेक वेगवेगळ्या लोकसमूहांच्यामध्ये आणि राष्ट्रांमध्ये व्यवसायिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम चालत असत.
  • गज्जाच्या पट्ट्यामध्ये आजही गज्जा हे एक मुख्य शहर आहे, जो एक जमिनीचा प्रांत आहे जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे, त्याच्या उत्तर आणि पूर्व सीमेला इस्राएल तर दक्षिण सीमेला मिसर आहे.
  • गज्जा हे शहर होते, जिथे पलीष्ट्यांनी शमसोनाला पकडल्यानंतर घेऊन गेले.
  • फिलिप्प सुवर्तीक हा गज्जाकडे जाणाऱ्या वाळवंटाच्या रस्त्यावरून जात होता, जेंव्हा तो इथिओपियाच्या षंढाला भेटला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अश्दोद, फिलिप्प, पलीष्टी, इथिओपिया, गथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गथ, गथच्या, गीत्ती

तथ्य:

गथ हे पलीष्ट्यांच्या पाच मोठ्या शहरांपैकी एक होते. हे एक्रोनच्या उत्तरेस आणि अश्दोद आणि अश्कालोन ह्यांच्या पूर्वेस स्थित होते.

  • पलीष्टी योद्धा गल्याथ, हा गथ या शहराचा रहिवासी होता.
  • शमुवेलाच्या काळात, पलीष्ट्यांनी इस्राएलामधून कराराच्या कोशाची चोरी केली आणि ते त्याला त्यांच्या मूर्तीपूजक मंदिरात अश्दोद येथे घेऊन गेले. नंतर त्याला गथ येथे नेण्यात आले, आणि नंतर एक्रोनाला नेले. परंतु देवाने त्या शहरातील लोकांना रोग पाठवून शिक्षा केली, म्हणून त्यांनी त्याला परत इस्राएलाला पाठवून दिले,
  • जेंव्हा दावीद शौल राजापासून निसटून गेला, तेंव्हा तो गथ येथे पळून गेला आणि तेथे तो त्याच्या दोन बायका आणि सहाशे मनुष्य जे त्याचे निष्ठावान अनुयायक होते, त्यांच्याबरोबर थोडा काळ राहिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अश्दोद, अश्कलोन, एक्रोन, गज्जा, गल्याथ, पलीष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गब्रीएल

तथ्य:

  • गब्रीएल हे देवाच्या एका दूताचे नाव होते. त्याला जुना आणि नवा करार दोन्हीमध्ये, त्याच्या नावाने बऱ्याचदा उल्लेखण्यात आले आहे.

  • देवाने गब्रीएलाला, दानीएल संदेष्ट्याने बघितलेल्या दृष्टांताचा अर्थ सांगण्यासाठी पाठवले.

  • अजून एका वेळी, दानीएल प्रार्थना करत असताना, गब्रीएल देवदूत त्याच्या जवळ उडत उडत आला आणि त्याने भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टींबद्दल भविष्यवाणी केली. दानीएलाने त्याचे वर्णन एक "मनुष्य" असे केले.

  • नवीन करारामध्ये याची नोंद केलेली आहे की, गब्रीएल देवदूत जखऱ्या जवळ आला आणि त्याने भविष्यवाणी केली, की त्याच्या वृद्ध पत्नीला, अलीशिबेला एक मुलगा. योहान, होईल.

  • त्याच्या सहा महिन्यानंतर, गब्रीएलाला मरीयेकडे हे सांगण्यासाठी पाठवण्यात आले की, देव तिला चमत्कारिकरित्या गर्भ धारण करण्यास सक्षम करेल आणि जो पुत्र होईल तो "देवाचा पुत्र" असेल. गब्रीएलाने मरीयेला त्याचे नाव "येशू" ठेवण्यास सांगितले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: देवदूत, दानीएल, अलिशिबा, (बाप्तिस्मा करणारा) योहान, मरिया, संदेष्टा, देवाचा पुत्र, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गमोरा

तथ्य:

गमोरा हे शहर सिदोमाच्या सुपीक खोऱ्यात वसलेले होते, जिथे अब्राहामाचा भाचा लोट ह्याने राहायचे ठरवले.

  • गमोरा आणि सिदोम ह्याचे निश्चित स्थान माहित नाही, पण काही अशा खुणा आहेत, त्यामुळे ते कदाचित मृत समुद्राच्या थेट दक्षिणेस, सिद्दीम खोऱ्याच्या जवळ स्थित असावे.
  • त्या प्रदेशात अनेक राजे युद्ध करत होते, जिथे सिदोम आणि गमोरा स्थित होते.
  • जेंव्हा लोटचे कुटुंब सिदोम आणि इतर शहरांच्या वाद्विवादामध्ये सापडले, तेंव्हा अब्राहम आणि त्याच्या मनुष्यांनी त्यांना सोडवले.
  • त्याच्या नंतर अगदी थोड्या काळात, सिदोम आणि गमोरा ह्यांचा नाश, त्यांच्यात राहत असलेल्या लोकांच्या दुष्टतेमुळे देवाकडून करण्यात आला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, बाबेल, लोट, मृत समुद्र, सिदोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गरार

तथ्य:

​गरार हे कनान भूमीतील एक शहर आणि प्रांत होते, जे हेब्रोनाच्या नैऋत्येला आणि बैरशेबाच्या वायव्येला स्थित होते.

  • जेंव्हा अब्राहम आणि सारा गरारच्या प्रांतात स्थायिक झाले, तेंव्हा अबीमलेक राजा गरारवर राज्य करीत होता.
  • इस्राएली लोक कनान देशात रहात असतानाच्या काळात, गरार प्रांतात पलिष्टी लोकांनी वर्चस्व गाजवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अबीमेलेख, बैरशेबा, हेब्रोन, पलिष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गलती, गलतीकरांस

तथ्य:

नवीन करारामध्ये, गलती हा मोठा रोमी प्रांत होता, जो आताचा तुर्की देश आहे त्याच्या मध्य भागात स्थित होते.

  • गलती या देशाच्या काही भागाच्या सीमेलगत काळा समुद्र होता, जो त्याच्या उत्तरेस होता. याच्या सीमेलगत आशिया, बिथूनिया, कप्पदुकिया, किलिकिया, आणि पाम्फुलिया हे प्रांत होते.
  • प्रेषित पौलाने गलती प्रांतामध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांना पत्र लिहिले. या पत्राला नवीन करारामधील पुस्तक "गलतीकरांस पत्र" असे म्हटले गेले.
  • गलतीकरांस पत्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे तारण हे कृपेद्वारे होते, कृत्यांद्वारे नाही, ह्यावर भर देणे हे आहे.
  • तिथे असलेल्या परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांना, यहुदी ख्रिस्ती लोक, काही विशिष्ठ यहुदी नियम पाळणे गरजेचे आहे, असे चुकीचे शिक्षण देत होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: आशिया, विश्वास, किलीकिया, शुभ वार्ता, पौल, काम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गल्याथ

तथ्य:

गल्याथ हा पलीष्टी सैन्यातील खूप उंच आणि खूप मोठा सैनिक होता, ज्याला दावीदाने मारले.

  • गल्याथ हा दोन ते तीन मीटरच्या दरम्यान उंच होता. त्याला सहसा त्याच्या मोठ्या आकारामुळे राक्षस म्हणून संदर्भित केले.
  • जरी गल्याथाकडे उत्तम शस्त्रे होती आणि तो दावीदापेक्षा खूप उंच होता, तरी देवाने गल्याथाला हरवण्यासाठी ताकद आणि क्षमता दिली.
  • दाविदाने गल्याथवर विजय मिळवून दिल्याचा परिणाम म्हणून, इस्राएली लोकांना पलीष्टी लोकांवर विजयी घोषित केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, पलिष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गशूर, गशूरी

व्याख्या:

दावीद राजाच्या काळात, गशूर हे एक छोटे राज्य होते, जे गालील समुद्राच्या पूर्वेला, इस्राएल आणि आराम या दोन देशांमध्ये वसलेले होते.

  • दावीद राजाने गशुरच्या राजाची मुलगी माका हिच्याशी लग्न केले, आणि तिने एका पुत्राला जन्म दिला, त्याचे नाव अबशालोम.
  • स्वतःचा सावत्र भाऊ अम्नोन ह्याला मारल्यानंतर, अबशालोम यरुशलेमपासून गशूरला ईशान्येस, जवळपास 140 किलोमीटरचे अंतर पळून गेला. तो तेथे तीन वर्ष राहिला.

(हेही पाहा: अबशालोम, अम्नोन, अराम, गालील समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गाद

तथ्य:

गाद हा याकोबाच्या मुलांपैकी एक होता. याकोबाचे नाव इस्राएल असे सुद्धा ठेवण्यात आले.

  • गादचे घराणे इस्राएलच्या बारा वंशापैकी एक बनले.
  • पवित्र शास्त्रामध्ये, अजून एक गाद नावाचा मनुष्य होता, जो संदेष्टा होता, आणि त्याने इस्राएल लोकांची शिरगणती केल्याबद्दल दाविदावर दोष लावला.
  • बल्गाद आणि मिगदाल्गाद या दोन शहरांच्या मूळ नावात दोन शब्द आहेत, आणि काहीवेळा ते "बाल गाद" आणि "मिगदल गाद" असेही लिहिले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शीरगणना, संदेष्टा, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गालील समुद्र, गनेसरेत सरोवर, किनेरेथचा समुद्र, तीबिर्याचा समुद्र

तथ्य:

"गालीलचा समुद्र" हा पश्चिमी इस्राएलचा सरोवर आहे. जुन्या करारामध्ये, ह्याला "किनेरेथचा समुद्र" असे म्हंटले गेले.

  • या सरोवराचे पाणी यार्देन नदीच्या द्वारे दक्षिणेस खाली वाहते आणि ते मृत समुद्राला जाऊन मिळते.
  • नवीन कराराच्या काळात, कफर्णहूम, बेथसैदा, गनेसरेत, आणि तीबिर्या ही काही गावे होती जी गालीलाच्या समुद्रावर स्थित होती.
  • येशूच्या जीवनातील अनेक घटना, या गालीलच्या समुद्राजवळ घडल्या.
  • गालीलच्या समुद्राला "तीबिर्याचा समुद्र" आणि "गनेसरेत सरोवर" म्हणून देखील संदर्भित केले जाते.
  • या शब्दाचे भाषांतर, "गालील प्रांतातील सरोवर" किंवा "गालीली सरोवर" किंवा "तीबीर्याच्या (गनेसरेत) जवळचे सरोवर" असे देखील केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कफर्णहूम, गालील, यार्देन नदी, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गालील, गालीली, गालीलातील

तथ्य:

गालील हा शोमरोनाच्या उत्तरेस असलेला, इस्राएलाचा सर्वात उत्तरी भाग होता. "गालीली" हा एक मनुष्य होता, जो गालीलमध्ये राहत होता किंवा जो गालीलात राहत होता.

  • नवीन कराराच्या काळात, गालील, शोमरोन आणि यहूदा हे इस्राएलाचे तीन मुख्य प्रांत होते.
  • गालील हे त्याच्या पश्चिमेस असलेल्या मोठ्या सरोवराने वेढलेले होते, त्याला "गालीलचा समुद्र" असेही म्हंटले जाते.
  • येशू गालीलमधील नासरेथ या गावामध्ये राहिला आणि वाढला.
  • येशूचे बहुतेक चमत्कार आणि शिक्षण हे गालीलच्या प्रांतात घडले.

(हे सुद्धा पहा: नासरेथ, शोमरोन, गालीलचा समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:10 यशया संदेष्टा म्हणाला की मसिहा गालिलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.

  • 26:01 सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळविल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आपण राहत असलेल्या गालील या ठिकाणी परत आला.

  • 39:06 शेवटी, लोक म्हणाले, ‘‘आम्हास ठाऊक आहे की तू येशूबरोबर होतास कारण तुम्ही दोघेही गालील प्रदेशातील आहात".

  • 41:06 तेव्हां देवदूत त्यां स्त्रियांना म्हणाला, "जा, आणि शिष्यांना सांगा, 'येशू मरणातून उठला आहे व तो तुमच्यापुढे गालीलास जात आहे.'"

  • Strong's: H1551, G1056, G1057


गिदोन

तथ्य:

गिदोन हा एक इस्राएली मनुष्य होता, ज्याला देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सोडवण्यासाठी उभारले होते.

  • गिदोन जगण्याच्या काळामध्ये, मिद्यानी नावाचा लोकसमूह इस्राएल लोकांवर सतत हल्ला करून त्यांच्या पिकांचे नुकसान करत असे.
  • जरी गिदोन घाबरलेला होता, तरी देवाने त्याचा उपयोग, मिद्यानी लोकांच्या विरुद्ध लढून त्यांना पराजित करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी केला.
  • गिदोनाने देवाची आज्ञा मानत खोटे देव बाल आणि अशेरा ह्यांच्या वेद्या पाडून टाकल्या.
  • त्याने इस्राएल लोकांचे नेतृत्व फक्त त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठीच नाही केले तर यहोवा, एकच खरा देव ह्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठीसुद्धा त्यांना उत्साहित केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाल, अशेरा, सोडवणे, मिद्यान, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:05 यहोवाचा एक दूत येऊन गिदोनाला म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे. जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव.’’

  • 16:06 गिदोनाच्या पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनास ती वेदी तोडण्यास सांगितले.

  • 16:08 ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनाने इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले.

  • 16:08 गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.

  • 16:10 32,000 इस्त्रायली सैनिक गिदोनकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत.

  • 16:12 मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली.

  • 16:15 लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते.

  • 16:16 मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.

  • Strong's: H1439, H1441


गिबा

तथ्य:

गिबा हे शहर यरुशलेमच्या उत्तरेला आणि बेथेल शहराच्या दक्षिणेला स्थित होते.

  • गिबाची भूमी बन्यामिनाच्या कुळाची होती.
  • हे बन्यामीन आणि इस्राएल यांच्यातील विशाल लढाईच्या जागेवर होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहाः बन्यामीन, बेथेल, यरुशलेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गिर्गाशी

तथ्य:

गिर्गाशी हा लोकांचा एक समूह होता, जो गालील समुद्राच्या जवळ कनानच्या भूमीत राहत होता.

  • ते हामचा मुलगा कनान याचे वंशज होते, आणि म्हणून "कनानी" असे ओळखले जाणाऱ्या अनेक लोकसमूहांपैकी ते एक होते.
  • देवाने इस्राएल लोकांना वचन दिले की, तो त्यांना गिर्गाशी आणि इतर कनानी लोकसमूहांना हरविण्यास मदत करेल.
  • इतर कनानी लोकांप्रमाणेच, गिर्गाशी लोकांनी सुद्धा खोट्या देवांची उपासना केली आणि त्या उपासनेचा भाग म्हणून त्यांनी अनैतिक गोष्टी सुद्धा केल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, हाम, नोहा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गिलाद, गिलादी

व्याख्या:

गिलाद हे यार्देन नदीच्या पूर्वेस असलेल्या डोंगराळ भागाचे नाव होते, जिथे इस्राएल वंशातील गाद, रऊबेन, आणि मनश्शे हे वंश राहत होते.

  • या प्रांताला "गिलादचा डोंगराळ प्रदेश" किंवा "गिलाद पर्वत" असेही संदर्भित केले जाते.
  • जुन्या करारामध्ये "गिलाद" हे अनेक मनुष्यांचे नाव देखील होते. या मनुष्यांपैकी एक मनश्शेचा नातू होता. अजून एक गिलाद हा इफ्ताहचा पिता होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: गाद, इफ्ताह, मनश्शे, रऊबेन, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गीबोन, गीबोनी, गीबोनांच्या

तथ्य:

गीबोन हे एक शहर होते, जे यरुशलेमेच्या उत्तर पश्चिमेस 13 किलोमीटर अंतरावर स्थित होते. गीबोनमध्ये राहणाऱ्या लोकांना गीबोनी असे म्हंटले जात होते.

  • जेंव्हा गीबोनाच्या लोकांनी ऐकले की, कसे इस्राएली लोकांनी यरीहो आणि आय शहरांचा नाश केला, तेंव्हा ते घाबरले.
  • म्हणून गीबोनी लोक इस्राएलाच्या पुढाऱ्यांजवळ गील्गाल येथे आले, आणि त्यांनी असे सोंग केले की, ते दूर देशाचे लोक आहेत.
  • इस्राएली पुढारी फसले गेले आणि त्यांनी गीबोनाच्या लोकांच्याबरोबर करार केला की, ते त्यांना संरक्षण देतील आणि त्यांचा नाश करणार नाहीत.

(हे सुद्धा पहा: गील्गाल, यरीहो, यरुशलेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 15:06 परंतु गिबोनी नावाचा कनानमधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहतात.

  • 15:07 काही काळानंतर, कनानमधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.

  • 15:08 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व गिबोन्यांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले.

  • Strong's: H1391, H1393


गील्गाल

तथ्य:

गील्गाल हे यरीहोच्या उत्तरेस असलेले आणि कनानमध्ये प्रवेश करताना यार्देन नदी पार केल्यानंतर इस्राएली लोकांनी तळ दिलेले पहिले गाव होते.

  • गील्गालमध्ये पोहोचल्यावर यहोशवाने कोरड्या नदीच्या पात्रातून घेतलेल्या बारा दगडांना तिथे स्थापित केले, जे त्याने नदी पार करताना उचलले होते.
  • गील्गाल हे शहर होते, ज्यात एलिया आणि अलीशा हे राहत होते, कारण जेंव्हा एलियाला स्वर्गात उचलण्यात आले, तेंव्हा त्यांनी यार्देन नदी पार केली होती.

जुन्या करारामध्ये, गील्गाल नावाची इतर अनेक ठिकाणे देखील होती.

  • "गील्गाल" या शब्दाचा अर्थ "दगडांचे वर्तुळ" असा होतो, कदाचित त्याचा संदर्भ अशा ठिकाणाशी येतो, जिथे वेद्यांना गोलाकार पद्धतीने बांधण्यात आले होते.
  • जुन्या करारामध्ये, हे नाव नेहमी "गील्गाल" असे आलेले आढळते. हे कदाचित असे सूचित करते की, हे फक्त एका विशिष्ठ ठिकाणाचे नाव नव्हते, तर हे एका विशिष्ठ प्रकारच्या जागेचे वर्णन होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: एलिया, अलीशा, यरीहो, यार्देन नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गुलगुथा

तथ्य:

"गुलगुथा" हे एका जागेचे नाव आहे, जिथे येशूला वधस्तंभावर चढविण्यात आले होते. हे नाव अरामी शब्दापासून येते, ज्याचा अर्थ "कवटी" किंवा "कवटीची जागा" असा होतो.

  • गुलगुथा यरुशलेम शहराच्या शहर भिंतींच्या बाहेर कुठेतरी जवळपास स्थित होते. ते कदाचित जैतुन डोंगराच्या उतारावर कुठेतरी स्थित असावे.
  • पवित्र शास्त्राच्या काही जुन्या इंग्रजी आवृत्त्यामध्ये, गुलगुथा ह्याचे भाषांतर "कालवरी", असे केले आहे, हा शब्द लॅटिन शब्द "कवटी" यापासून येतो.
  • बऱ्याच पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या असा शब्द वापरतात जो "गुलगुथा" या सारखा आहे किंवा त्याचा उच्चार तसा आहे, कारण ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये आधीपासूनच स्पष्ट करण्यात आला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अरामी, जैतून पर्वत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गेथशेमाने

तथ्य:

जैतुनाच्या डोंगराजवळ, किद्रोनच्या खोऱ्याच्या मागे, यरुशलेमच्या पूर्वेला गेथशेमाने नावाची जैतुनाच्या झाडांची बाग होती.

  • गेथशेमाने बाग ही अशी जागा होती, जिथे येशू आणि त्याचे शिष्य गर्दीपासून एकटे दूर जाऊन आराम करत.
  • यहुदी पुढाऱ्यांकडून पकडला जाण्याच्या पूर्वी, गेथशेमाने या ठिकाणी येशूने फार दुःखी होऊन प्रार्थना केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: यहूदा इस्कीर्योत, किद्रोन खोरे, जैतून पर्वत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


गोशेन

व्याख्या:

गोशेन हे एका सुपीक प्रांताचे नाव होते, जे नाईल नदीच्या बाजूला मिसराच्या उत्तरील भागात होते.

  • जेंव्हा योसेफ मिसर देशात अधिकारी होता, तेंव्हा त्याचा पिता आणि भाऊ आणि त्यांची कुटुंबे, कनानमधील दुष्काळापासून वाचण्यासाठी गोशेन प्रांतात येऊन राहिले.
  • ते आणि त्यांचे वंशज गोशेनमध्ये 400 वर्षांहून चांगले जीवन जगले, पण नंतर त्यांना मिसरच्या फारोच्या गुलामीत जाण्यास भाग पाडले.
  • अखेर देवाने मोशेला इस्राएल लोकांची मदत करण्यासाठी आणि त्यांना गोशेन प्रांतातून आणि गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पाठवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, दुष्काळ, मोशे, नाईल नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


ग्रीक, ग्रीक भाषा बोलणारे

तथ्य:

"ग्रीक" हा शब्द ग्रीक देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला संदर्भित करतो, हे ग्रीक देशाच्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा म्हणतात. ग्रीक ही भाषा संपूर्ण रोमी साम्राज्यामध्ये सुद्धा बोलली जात होती. "ग्रीक भाषा बोलणारा" ह्याचा अर्थ "ग्रीक-बोलणारा" असा होतो.

  • रोमी साम्राज्यातील यहुदी नसलेले बरेच लोक ग्रीक भाषा बोलत होते, म्हणून नवीन करारामध्ये परराष्ट्रीयांना अनेकदा "ग्रीक" म्हणून संदर्भित केले आहे, विशेषकरून जेंव्हा यहूद्यांच्या विरोधात सांगताना.
  • "ग्रीक भाषा बोलणारे यहुदी" या वाक्यांशाला, "इब्री भाषा बोलणारे यहुदी" जे फक्त इब्री किंवा कदाचित अरामी बोलतात, त्याच्या विरुद्ध मध्ये ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुद्यांसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
  • "ग्रीक भाषा बोलणारे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "ग्रीक-बोलणारे" किंवा "ग्रीक संस्कृतीचा" किंवा "ग्रीक" ह्यांचा समावेश होतो.
  • जेंव्हा यहुदी नसलेल्यांचा संदर्भ दिला जातो, तेंव्हा "ग्रीक" ह्याचे भाषांतर "परराष्ट्रीय" असे केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, परराष्ट्रीय, ग्रीक, इब्री, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


ग्रीस, ग्रीसच्या

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, ग्रीस हा रोमी साम्राज्यातील प्रांत होता.

  • आधुनिक काळातील ग्रीस देशाप्रमाणे, हे द्वीपकल्पावर स्थित होते, ज्याच्या सिमालगत भूमध्य समुद्र, एजिएन समुद्र, आणि आयोनीयन समुद्र होते.
  • प्रेषित पौलाने ग्रीस मधील अनेक शहरांना भेट दिली, आणि तेथील करिंथ, थेस्सलनिका, आणि फिलीप्पै आणि कदाचित इतर शहरामध्ये मंडळ्या स्थापन केल्या.
  • जे लोक ग्रीस देशाचे रहिवासी आहेत त्यांना "ग्रीक" असे म्हंटले जाते, आणि त्यांची भाषा ही "ग्रीक" आहे. * रोमी प्रांतातील इतर लोक सुद्धा ग्रीक भाषा बळात होते, ज्यामध्ये अनेक यहुद्यांचा समावेश होता.
  • काहीवेळा "ग्रीक" या शब्दाचा उपयोग परराष्ट्रीयांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: करिंथ, परराष्ट्रीय, ग्रीक,इब्री, फिलीप्पै, थेस्सलनिका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जक्कय

तथ्य:

जक्कय हा यरीहोमधील जकातदार होता, जो येशूला पाहण्यासाठी एका झाडावर चढला, कारण येशूच्या सभोवती लोकांचा मोठा जमाव होता.

  • जेंव्हा जक्कयाने येशूवर विश्वास ठेवला, तेंव्हा तो पूर्णपणे बदलला.
  • त्याने त्याच्या लोकांना फसवण्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेपैकी आर्धी गरिबांना देण्याचे वचन दिले.
  • त्याने असे सुद्धा वचन दिले की, तो लोकांना चारपट पैसे परत करेल, जे त्याने लोकांच्याकडून त्यांच्या करापेक्षा जास्त वसूल केले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: विश्वास, वचन, पश्चात्ताप, पाप, कर, जकातदार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जख-या (नवा करार)

तथ्य:

नवीन करारामध्ये, जख-या हा यहुदी याजक होता, जो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप बनला.

  • जख-याने देवावर प्रेम केले आणि त्याची आज्ञा पाळली.
  • अनेक वर्षापर्यंत, जख-या आणि त्याची पत्नी, अलिशिबा, ह्यांनी मुलासाठी कळकळीची प्रार्थना केली, पण त्यांना एकही मुलबाळ झाले नाही. नंतर जेंव्हा ते अतिशय म्हातारे झाले, तेंव्हा देवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यांना एक मुलगा दिला.
  • जख-याने भविष्य =वाणी केली की, त्याचा मुलगा योहान हा एक संदेष्टा होईल, जो येणाऱ्या मसिहा विषयी घोषणा करेल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, अलिशिबा, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • अचानक एके दिवशी जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला. जख-या व त्याची पत्नी, अलीशिबा, हे धार्मिक लोक होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते.

  • देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे.’’ त्याचे नाव तूम्ही योहान असे ठेवा.

  • लगेच जखर्या मुका झाला.

  • तेंव्हा देवाने जखर्यास पुन्हा बोलण्याची अनुमति दिली.

  • Strong's: G2197


जखऱ्या (जुना करार)

तथ्य:

जखऱ्या हा एक संदेष्टा होता, ज्याने पारसाचा राजा दारयावेश पहिला ह्याच्या कारकीर्दीच्या वेळी भविष्यवाणी केली. जुन्या करारातील जखऱ्या नावाच्या पुस्तकात त्याच्या भविष्यवाण्या समाविष्ट आहेत, ज्यामध्ये त्याने निर्वासित झालेल्या लोकांना मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी परत येण्याचे आवाहन केले होते.

  • ज्या कालावधीत एज्रा, नहेम्या, जरुब्बाबेल आणि हग्गय जगले, जखऱ्या सुद्धा त्याच कालावधीत जगत होता. जुन्या कराराच्या काळात, मारण्यात आलेल्या शेवटच्या संदेष्ट्यांपैकी एक म्हणून येशूने जखऱ्याचा उल्लेख केला.
  • अजून एक जखऱ्या नावाचा मनुष्य, हा दाविदाच्या काळात मंदिराच्या द्वारपाळाचे काम करत होता.
  • यहोशाफाट ह्याच्या मुलांपैकी एका मुलाचे नाव जखऱ्या होते, ज्याला त्याचा भाऊ यहोरामने मारून टाकले.
  • जखऱ्या हे एका याजकाचे नाव होते, जेंव्हा त्याने इस्राएली लोकांना त्यांच्या मूर्तीची उपासना करण्याबद्दल दोष दिला, तेंव्हा त्यांनी त्याला दग्द्मार केला.
  • जखऱ्या राजा हा यराबामचा मुलगा होता आणि त्याला मारून टाकण्याच्या पूर्वी, त्याने इस्राएलावर फक्त सहा महिनेच राज्य केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: दरयावेश, एज्रा, यहोशाफाट, यराबाम, नहेम्या, जरुब्बाबेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जबुलून

तथ्य:

जबुलून हा याकोब आणि लेआला झालेला शेवटचा मुलगा होता, आणि इस्राएलाच्या बारा कुळांपैकी ते एका कुळाचे नाव होते.

  • इस्राएलाच्या जबुलून कुळांना मृत समुद्राच्या थेट पश्चिमेला जमीन देण्यात आली होती.
  • काहीवेळा "जबुलून" या नावाचा, जिथे इस्राएलातील या कुळाचे लोक राहत होते, त्या जागेला सूचित करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, लेआ, मृत समुद्र, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जब्दी

तथ्य:

जब्दी हा एक गालील मधील एक कोळी होता, जो त्याच्या मुलांमुळे, याकोब आणि योहान, जे येशूचे शिष्य होते, ओळखला जातो. त्यांना नवीन करारामध्ये सहसा "जब्दीचे मुलगे" म्हणून ओळखले जाते.

  • जब्दीचे मुलगे सुद्धा कोळी होते, आणि त्याच्याबरोबर मासे पकडण्याचे काम करत.
  • याकोब आणि योहानाने त्यांचे त्यांचा पिता जब्दी याच्याबरोबरचे मासेमारीचे काम सोडले आणि ते येशूच्या पाठीमागे गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शिष्य, कोळी, जब्दीचा मुलगा,, (प्रेषित) योहान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जरुब्बाबेल

तथ्य:

जुन्या करारांमध्ये जरुब्बाबेल नावाचे दोन इस्राएली मनुष्य होते.

  • यापैकी एक यहोयाकीम आणि सिद्कीया याच्या वंशातला होता.
  • जेंव्हा पारसाचा राजा कोरेश ह्याने बाबेलाच्या बंदिवासातून इस्राएली लोकांची सुटका केली, तेंव्हा शल्तीएलचा मुलगा, एक दुसरा जरुब्बाबेल हा यहूदा वंशाचा मुख्य होता.
  • जरुब्बाबेल आणि महायाजक यहोशवा हे त्या लोकांपैकी होते, जे देवाच्या मंदिराची व वेदीची पुनर्बांधणी करण्यासाठी मदत करत होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: बाबेल, बंदिवास, कोरेश, एज्रा, महायाजक, यहोयाकीम, यहोशवा, यहूदा, नहेम्या, पारस, सिदकिया).

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


जैतून डोगंर

व्याख्या:

जैतून डोंगर हा एक पर्वत किंवा मोठी टेकडी आहे, जे यरुशलेम शहराच्या पूर्व बाजूस वसलेले होते. हे सुमारे 787 मीटर उंच आहे.

  • जुन्या करारामध्ये, या पर्वताला काहीवेळा "यरुशलेमच्या पूर्वेकडे असलेला डोंगर" असे संदर्भित केले आहे.
  • येशू आणि त्याचे शिष्य जैतुनाच्या डोंगरावर प्रार्थना आणि आराम करण्यासाठी गेलेल्याच्या बऱ्याच घटना नवीन करारामध्ये नमूद केल्या आहेत.
  • येशूला गेथशेमानी बागेमध्ये अटक केली, जी जैतुनाच्या डोंगरावर स्थित होती.
  • ह्याचे भाषांतर "जैतुनाचा पर्वत" किंवा "जैतुनाच्या झाडाचा डोंगर" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: नावांचे भाषांतर करा)

(हे सुद्धा पहा: गेथशेमाने, जैतून)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


तांबडा समुद्र

तथ्य:

"तांबडा समुद्र" हे मिसर आणि अरब ह्यांच्यातील पाण्याचे नाव होते. ह्याला आता "तांबडा समुद्र" असे म्हणतात.

  • तांबडा समुद्र लांब आणि अरुंद आहे. हा सरोवर किंवा नदीपेक्षा मोठा आहे, पण तो एका महासागरापेक्षा खूप लहान आहे.
  • जेंव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघाले तेंव्हा त्यांना तांबडा समुद्र पार करावयाचे होते. देवाने तेथे चमत्कार केला आणि पाण्याला दोन भागामध्ये विभागले. जेणेकरून लोक कोरड्या भूमीवरून चालत पलीकडे जाऊ शकले.
  • कनानची भूमी या समुद्राच्या उत्तरेस होती.
  • ह्याचे भाषांतर "वेळूचा समुद्र" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अरब.कानान, मिसर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • जेव्हा इस्राएलांनी मिसरी सैन्य त्यांचा पाठलाग करतांना पाहिले तेव्हा त्यांना समजले की ते आता मिसरी सैन्य आणि तांबड्या समुद्राच्या मध्ये अडकले आहेत

  • मग देव मोशेस म्हणाला, "लोकांना तांबड्या समुद्राकडे जाण्यास सांग."

  • तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.

  • Strong's: H3220, H5488, G2063, G2281


तामार

तथ्य:

जुन्या करारांमध्ये तामार नावाच्या बऱ्याच वेगवेगळ्या स्त्रिया होत्या. * जुन्या करारामध्ये हे अनेक शहरांचे किंवा इतर ठिकाणांचे नावसुद्धा आहे.

  • तामार ही यहूदाची सून होती. तिने पेरेसाला जन्म दिले, जो येशुंचा पूर्वज होता.

दावीद राजाच्या मुलींपैकी एकीचे नाव तामार होते; ती अबशालोमाची बहिण होती. तिचा सावत्र भावाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला भ्रष्ट करून सोडले.

  • अबशालोम ह्याला एक मुलगी सुद्धा होती तिचे नाव तामार होते.
  • "हजझोन तामार" नावाचे शहर हे मृत समुदारच्या किनाऱ्याशी पश्चिम किनाऱ्याजवळ असलेल्या एनगेदी शहरासारखेच होते. एक "बाल तामार" देखील आहे आणि "तामार" या शब्दाचा संदर्भ अशा ठिकाणाचे सामान्य संदर्भ आहे, जे शहरांपासून भिन्न असू शकतात.

(हे सुद्धा पहा: अबशालोम, पूर्वज, अम्मोन, दावीद, पूर्वज, यहूदा, मृत समुद्र)

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तार्शिस

तथ्य:

जुन्या करारांमध्ये तार्शिस नावाचे दोन मनुष्य होते. हे एका शहराचे नाव देखील होते.

  • याफेथाच्या नातावांपैकी एकाचे नाव तार्शिस होते.
  • तार्शिस हे अहश्वेरोष राजाच्या एका सुज्ञ मनुष्याचे देखील नाव होते.
  • तार्शिस शहर हे खूप भरभराटीचे बंदर असलेले शहर होते, ज्याची जहाजे मौल्यवान वस्तू विकत घेण्यासाठी, विकण्यासाठी, किंवा व्यापारासाठी घेऊन जात होती.
  • हे शहर सोर शहराबरोबर संबंधित होते, आणि एक फुनिकी शहर आहे असे समजले जाते जे कदाचित स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील, कदाचित इस्राएल पासून थोड्या अंतरावर असेल.
  • जुन्या करारातील संदेष्टा योना, निनवेला उपदेश करायला जाण्याची देवाची आज्ञा पाळण्याऐवजी, तार्शिस शहरास जाणाऱ्या जहाजात चढला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: एस्तेर, याफेथ, योना, निनवे, फेनिके, सुज्ञ पुरुष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तार्सस

तथ्य:

किलीकीयाच्या रोमी प्रांतातील जिथे आताची दक्षिण मध्य तुर्की आहे, तार्सस हे समृध्द शहर होते.

  • तार्सस हे एका मोठ्या नदीच्या बाजूला होते आणि भूमध्य समुद्राच्या अगदी जवळ होते, त्यामुळे हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
  • एके काळी ते किलीकीयाची राजधानी होते.
  • नवीन करारामध्ये, तार्सस हे प्रेषित पौलाचे मूळ गाव म्हणून प्रसिद्ध होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः किलिकिया, पौल, प्रांत, समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तिरसा

तथ्य:

तिरसा हे एक महत्वाचे कनानी शहर होते, ज्याला इस्राएली लोकांनी जिंकले. हे गिलादच्या एका मुलीचे नावदेखील होते, जो मनश्शेचा वंशज होता.

  • मनश्शेच्या गोत्राने व्यापलेल्या प्रांतामध्ये तिरसा हे शहर स्थित होते. हे शहर शेखेम शहरापासून उत्तरेला 10 मैल अंतरावर होते, असा समाज आहे.
  • काही वर्षानंतर, इस्राएलच्या चार राजांच्या कारकीर्दीच्या काळात, तिरसा हे शहर उत्तरी इस्राएल राज्याची, तात्पुरती राजधानी बनले.
  • मनश्शेच्या नातींपैकी एकीचे नाव तिरसा हे होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे, त्यांना जमिनीचा एक भाग देण्यास सांगितले, आणि सामान्यत: रिवाजाप्रमाणे मुलांना वारसाहक्क मिळतो, पण त्याला वारसाहक्काचे कोणतेही मुलगे नव्हते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, वारस, इस्राएलाचे राज्य, मनश्शे, शेखेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तीत

तथ्यः

तीत हा एक यहूदीतर होता. त्याला पौलाने सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेण्याचे प्रशिक्षण दिले.

पौलाने तीताला लिहिलेले पत्र हे नवीन कराराच्या पुस्तकांपैकी एक आहे.

  • या पत्राद्वारे पौलाने तीताला क्रेतीय बेटावरील मंडळीसाठी वडील म्हणून नेमण्याची सूचना केली.
  • ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या इतर काही पत्रांत पौलाने तीत याचा उल्लेख केला जो त्याला उत्तेजीत करून आनंदित केले.

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]

(हे देखील पहा: [नियुक्त करा], [विश्वास ठेवा], [मंडळी], [सुंता करणे], [क्रेत], [वडील], [प्रोत्साहित करा], [शिकवण द्या], [सेवा कर])

बायबल संदर्भ:

  • [२ तीमथ्य 04:10]
  • [गलतीकरास 02: 1-2]
  • [गलतीकरास 02: 3-5]
  • [तीतास पत्र 01:04]

शब्द डेटा:

  • मजबूत: G5103

तीमथ्या

तथ्य:

तीमथ्या हा लुस्त्रा येथील तरुण पुरुष होता. त्याने नंतर अनेक सेवाकरी यात्रेमध्ये पौलाला सोबत दिली आणि विश्वासनाऱ्यांच्या नवीन समुदायाची काळजी घेण्यास मदत केली.

  • तीमथ्याचे वडील ग्रीक होते, पण त्याची आजी लोईस आणि त्याची आई युनीक या दोघी यहुदी होत्या आणि येशूच्या विश्वासनाऱ्या होत्या.
  • वडील आणि पौल ह्यांनी तीमथ्याला, त्याच्या डोक्यावर हात ठेवून आणि त्याच्यासाठी प्रार्थना करून औपचारिकरित्या सेवेसाठी नियुक्त केले होते.
  • नवीन करारामध्ये लिहिलेली दोन पुस्तके (I तीमथ्या आणि 2 तीमथ्या) ही पौलाने लिहिलेली पत्रे आहेत, जी तीमथ्याला स्थानिक मंडळीचा तरुण पुढारी म्हणून मार्गदर्शन करतात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः नियुक्त करणे, विश्वास, मंडळी, ग्रीक, सेवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तुखीक

तथ्यः

शुभवर्तमानात तुखीक हा पौलाचा एक सहकारी सेवक होता.

  • तुखीक पौलाबरोबर त्याच्या एका मिशनरी प्रवासासाठी आशिया दौर्‍यावर गेला.
  • पौलाने त्याला “प्रिय” आणि “विश्वासू” असे वर्णन केले.
  • तुखीकाने पौलाची पत्रे इफिसस व कल्लैस्से येथे दिले.

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे])

(हे देखील पहा: [आशिया], [प्रिय मित्र], [कल्लैस्से], [इफिस], [विश्वासू], [सुर्वाता], [सेवक])

बायबल संदर्भ:

  • [2 तीमथ्य 04:11-13]
  • [कल्लैस्सेकरास 04:09]
  • [तीतास पत्र 03:12]

शब्द डेटा:

  • मजबूत: G5190

तुबाल

तथ्य:

जुन्या करारांमध्ये तुबाल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • एक तुबाल नावाचा मनुष्य हा याफेथाच्या मुलांपैकी एक होता.
  • एक मनुष्य ज्याचे नाव "तुबाल-काइन" होते, तो लामेखाचा मुलगा आणि काइनाचा वंशज होता.
  • यशया आणि यहेज्केल या संदेष्ट्यांनी उल्लेख केलेल्या लोकांच्या गटाचे नाव सुद्धा तुबाल होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: काइन, वंश, यहेज्केल, यशया, याफेथ, लामेख, लोकसमूह, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


तेरह

तथ्य:

तेरह हा नोहाचा मुलगा शेम ह्याचा वंशज होता. तो अब्राहम, नाहोर, आणि हारान यांचा पिता होता.

  • तेरह त्याचा मुलगा अब्राहम, त्याचा भाचा लोट, आणि अब्राहमाची पत्नी साराय यांना घेऊन, त्याचे ऊर येथील घर सोडून कनान देशास जाण्यास निघाला.
  • कनानला प्रवास करीत असताना, तेरह आणि त्याचे कुटुंब मेसोपटेम्या (अराम नईराईम) येथील हारान शहरामध्ये बरीच वर्षे राहिला. तेरह वयाच्या 205 व्या वर्षी हारान मध्ये मरण पावला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, कनान, हारान, लोट, मेसोपटेम्या, नाहोर, सारा, शेम, ऊर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


त्रोवासास

तथ्य:

त्रोवसास हे शहर एक बंदर होते, जे प्राचीन रोमी प्रांतातील आशियाच्या उत्तरपूर्व किनाऱ्यावर स्थित होते.

  • पौल वेगवेगळ्या प्रांतात सुवार्ता प्रचार करायला जातेवेळी, त्याने त्रोवसासला कमीतकमी तीन वेळा भेट दिली.
  • त्रोवसासमधील एका घटनेमध्ये, पौलाने रात्री उशिरापर्यंत संदेश दिला, आणि युतुख नावाचा एक मनुष्य ते ऐकत असताना झोपी गेला. कारण तो उघडी असलेल्या खिडकीत बसला होता, आणि युतुख वारू खाली पडला आणि तो मेला. देवाच्या सामर्थ्याद्वारे, पौलाने त्या तरुण मनुष्याला जिवंत केले.
  • जेंव्हा पौल रोममध्ये होता, तेंव्हा त्याने तीमथ्याला त्याची गुंडाळी आणि घड्याळ आणायला सांगितले, जर तो त्रोवसासमध्ये मागे विसरून आला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: आशिया, उपदेश, प्रांत, उठवणे, रोम, चर्मपात्रांची गुंडाळी, तीमथ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


थेस्सलनीका, थेस्सलनीकाकर, थेस्सलनीकाकरांस

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, थेस्सलनीका हे, प्राचीन रोमी साम्राज्यातील मासेदोनिया या शहराची राजधानी होते. त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना "थेस्सलनीकाकर" असे म्हणत होते.

  • थेस्सलनीका शहर हे महत्वाचे सागरी बंदर होते, आणि जो मोठा रस्ता रोम आणि रोमी साम्राज्याच्या पूर्व भागास जोडत होता, त्याच्या बाजूला स्थित होते.
  • पौलाने, सीला आणि तीमथ्या ह्यांच्याबरोबर, त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या दुसऱ्या यात्रेदरम्यान त्यांनी थेस्सलनीका शहराला भेट दिली आणि ह्याचा परिणाम म्हणून तेथे एक मंडळी स्थापन झाली. नंतर पौलाने त्याच्या तिसऱ्या सुवार्ता प्रसारच्या यात्रेदरम्यान सुद्धा या शहराला भेट दिली.
  • पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिस्ती लोकांना दोन पत्रे लिहिली. या पत्रांचा (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र आणि थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र) समावेश नवीन करारात केला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मासेदोनिया, पौल, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


थोमा

तथ्य:

थोमा हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याच्या जवळचे शिष्य नंतर प्रेषित होण्यासाठी निवडले. त्याला "दिदुम" म्हणून सुद्धा ओळखले जाते, ज्याचा अर्थ "जुळा" असा होतो.

येशूच्या मृत्युच्या आधी, त्याने शिष्यांना सांगितले की, तो पित्याच्या घरी त्यांच्यासाठी जागा तयार करावयास जात आहे, जेणेकरून ते नेहमी त्याच्याबरोबर असतील. थोमाने त्याला विचारले, आम्हाला तर हे ही ठाऊक नाही की, तुम्ही कोठे जात आहात, तर तेथे जाण्याचा मार्ग आम्हास कसा कळेल.

  • येशू मरून पुन्हा जिवंत उठल्यानंतर, थोमाने म्हंटले की, जो पर्यंत मी येशूला पुन्हा बघत नाही आणि त्याला केलेल्या घावामध्ये मी माझे बोट घालत नाही, तोपर्यंत मी, येशू खरोखर जिवंत उठला आहे असा विश्वास ठेवणार नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, देव जो पिता, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दलीला

तथ्य:

दलीला एक पलिष्टी स्त्री होती, जिच्यावर शमशोनाने प्रेम केले, पण ती त्याची पत्नी नव्हती.

  • दलीलाने शमशोनापेक्षा पैश्यावर जास्त प्रेम केले.
  • पलिष्टी लोकांनी शमशोनाला जाळ्यात ओढून, त्याला कसे कमकुवत केले जाऊ शकते हे काढून घेण्यासाठी दलीलाला लाच दिली. जेंव्हा त्याची शक्ती गेली, पलिष्टी लोकांनी त्याला बंदीवान केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: लाच, पलिष्टी, शमशोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दान

तथ्य:

दान हा याकोबाचा पाचवा मुलगा होता आणि इस्राएलाच्या बारा कुळांपैकी एक होता. कनानच्या उत्तरी भागात, जेथे या कुळाने वस्ती केली होती, त्या भागाला सुद्धा हेच नाव देण्यात आले होते.

  • अब्राहमाच्या काळात, दान नावाचे एक शहर होते, जे यरुशलेमच्या पश्चिमेस स्थित होते.
  • काही वर्षानंतर, इस्राएल लोक वचनदत्त भूमीमध्ये प्रवेश करण्याच्या काळात, एक वेगळे शहर ज्याचे नाव दान होते ते यरुशलेमेपासून 60 मैल उत्तरेला वसवण्यात आलेले होते.
  • "दानांच्या कुळातील" ह्याचा संदर्भ दानच्या वंशजांशी आहे, जे या कुळातील सदस्य देखील होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, यरुशलेम, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दानीएल

तथ्य:

दानीएल हा एक इस्राएली संदेष्टा होता, ज्याला तो तरुण असताना बाबेलाचा राजा नबूखद्नेस्सर ह्याच्याद्वारे सुमारे ई. स. पूर्व 600 मध्ये बंदिवान म्हणून नेण्यात आले.

  • यहूदातील इतर अनेक इस्राएली लोक बाबेलामध्ये 70 वर्षे बंदिवान असण्याच्या काळात हे होते.
  • दानीएलाला बेल्टशस्सर हे बाबेली नाव देण्यात आले होते.
  • दानीएलहा सन्माननीय आणि नीतिमान तरुण पुरुष होता, जो देवाची आज्ञा पाळत होता.
  • देवाने दानीएलाला बाबेलाच्या राजासाठी अनेक स्वप्नांचे किंवा दर्शनांचे अर्थ लावण्यास सक्षम केले.
  • या क्षमतेमुळे आणि त्याच्या सन्माननीय चारित्र्यामुळे, दानीएलाला बाबेलाच्या साम्राज्यामध्ये उच्च नेतृत्वाचे पद देण्यात आले होते.
  • अनेक वर्षानंतर, दानीएलाच्या शत्रूंनी बाबेलच्या राजाला, राजाची सोडून इतर कोणाचीही उपासना करण्यास बंदी करण्याचा नियम बनवण्यास लावून फसवले. दानीएलाने देवाची प्रार्थना करणे चालू ठेवले, त्यामुळे त्याला अटक करून सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले. पण देवाने त्याला सोडवले आणि त्याला काहीही इजा होऊ दिली नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे

(हे सुद्धा पहा: बाबेल, नबूखद्नेस्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दारयावेश

तथ्य:

दारयावेश हे पारसाच्या बऱ्याच राजांचे नाव होते. हे शक्य आहे की "दारयावेश" हे नावापेक्षा एक शीर्षक आहे.

  • "दारयावेश मेदी" या राजाला, दनीएल या संदेष्ट्याने देवाची उपासना केल्याबद्दल, शिक्षा म्हणून त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यासाठी फसविण्यात आले.
  • "पारसी राजा दारयावेश" याने, एज्रा आणि नहेम्या याच्या काळात यरुशलेममधील मंदिराच्या पुनर्बांधणीची सोय करण्यासाठी मदत केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहाः पारस, बाबेल, दनीएल, एज्रा, नहेम्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दाविदाचे घराणे

तथ्य:

"दाविदाचे घराणे" या अभिव्यक्तीचा संदर्भ, दावीद राजाच्या कुटुंबाशी आणि वंशजांशी आहे.

  • याचे भाषांतर "दाविदाचे वंशज" किंवा "दाविदाचे कुटुंब" किंवा "दावीद राजाचे कुळ" असेही होऊ शकते.
  • कारण येशू दाविदाच्या वंशातून आला होता, म्हणून तो "दाविदाच्या घराण्यातला होता.
  • काहीवेळा, "दाविदाचे घर" किंवा "दाविदाचे घराणे" ह्यांचा संदर्भ त्याच्या घरातील लोक जे अजूनही जिवंत आहेत याच्याशी असतो.
  • इतर वेळी, ही संज्ञा अतिशय सामान्य असते आणि तिचा संदर्भ दाविदाच्या सर्व वंशजांशी आहे, ज्यामध्ये जे आधीच मेले आहेत त्यांचा देखील समावेश होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, वंशज, घर, येशू, राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दाविदाचे शहर

तथ्य:

"दाविदाचे शहर" हे यरुशलेम आणि बेथेलहेम यांच्यासाठीचे दुसरे नाव होते.

  • जेंव्हा दावीद इस्राएलावर राज्य करत होता तेंव्हा तो यरुशलेममध्ये राहत होता.
  • बेठेलेहेममध्ये दाविदाचा जन्म झाला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, बेथलेहेम, यरुशलेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


दावीद

तथ्य:

दावीद हा इस्राएलचा दुसरा राजा होता आणि त्याने देवावर प्रेम आणि त्याची सेवा केली. स्तोत्रसंहिता या पुस्तकाचा तो मुख्य लेखक होता.

  • जेंव्हा दावीद तरुण मुलगा होता, जो आपल्या कुटुंबाची मेंढरे चारीत असे, देवाने त्याला इस्राएलचा नंतरचा राजा होण्यासाठी निवडले.
  • दावीद महान योद्धा बनला आणि त्याने त्याच्या शत्रूबरोबरच्या युद्धात इस्राएली सैन्यांचे नेतृत्व केले. त्याने गल्याथ नावाच्या पलीष्ट्याला हरवले हे सर्वज्ञात आहे.
  • शौल राजाने दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याला वाचवले, आणि शौलाच्या मृत्युनंतर त्याला राजा बनवले.
  • दाविदाने भयानक पाप केले, पण त्याने पश्चाताप केला आणि देवाने त्याला माफ केले.
  • येशू, मसिहा, त्याला "दाविदाचा पुत्र" असे म्हणण्यात आले, कारण तो दावीद राजाचा वंशज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहाः गल्याथ, पलिष्टी, शौल

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:02 देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली तरुणांस राजा होण्यास निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.

  • 17:03 दाविद एक महान योद्धा व पुढारी झाला. दाविद लहान असतानाच त्याने गल्याथ नावाच्या एका राक्षसी मुनष्याबरोबर युद्ध केले. गल्याथ हा एक प्रशिक्षित, बलाढय व तीन मीटर उंचीचा सैनिक होता!

  • 17:04 लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूल शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले.

  • 17:05 देवाने दाविदास आशीर्वादित केले व तो यशस्वी झाला. दाविदाने अनेक युद्ध केले व देवाने त्यास इस्त्रायलांच्या शत्रूस पराजित करण्यास सहाय्य केले.

  • 17:06 दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होतो ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील.

  • 17:09 दाविदाने न्यायाने व विश्वासूपणाने अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. * तथापी, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.

  • 17:13 दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठिण प्रसंगी देखिल देवाच्या आज्ञा पाळल्या.

  • Strong's: H1732, G1138


दिमिष्क

तथ्य:

दिमिष्क ही अराम देशाची राजधानी आहे. हे आजही त्याच ठिकाणी स्थित आहे, जिथे पवित्र शास्त्राच्या काळात स्थित होते.

  • दिमिष्क हे जगातील सर्वात जुन्या आणि सतत वास्तव्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
  • अब्राहमाच्या काळात, दिमिष्क हे अराम राज्याची राजधानी होते (सध्याच्या सिरीया देशात स्थित).
  • संपूर्ण जुन्या करारादरम्यान, दिमिष्कचे रहिवासी आणि इस्राएलाचे रहिवासी ह्यांच्यामधील परस्परसंवादाचे अनेक संदर्भ आहेत.
  • पवित्र शास्त्रातील बऱ्याच भविष्यवाण्यांनी दिमिष्कच्या नाशाचे भाकीत केले आहे. या भविष्यवाण्या कदाचित पूर्ण झाल्या असाव्या, जेंव्हा अश्शुरी लोकांनी जुन्या कराराच्या काळात या शहराचा नाश केला, किंवा कदाचित भविष्यातही, या शहराचा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे.
  • नवीन करारामध्ये, परुशी शौल (नंतर पौल म्हणून ओळखला गेला) हा ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्काच्या वाटेने निघाला असता, येशूने त्याला समोरून दर्शन दिले आणि येशू तो विश्वासी बनण्यास कारणीभूत झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, अश्शुरी, विश्वास, सिरीया (अराम))

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


देवाचा मनुष्य

तथ्य:

"देवाचा मनुष्य" ही अभिव्यक्ती यहोवाच्या संदेष्ट्याला संदर्भित करण्याची आदरयुक्त पद्धत आहे. ते प्रभूच्या दूताला सूचित करण्यासाठी देखील वापरला जातो.

  • जेंव्हा एका संदेष्याला संदर्भित करतात, तेंव्हा ह्याचे भाषांतर "मनुष्य जो देवाचा आहे" किंवा "मनुष्य ज्याला देवाने निवडले आहे" किंवा "मनुष्य जो देवाची सेवा करतो" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा एका दुताला संदर्भित करतात, तेंव्हा त्याचे भाषांतर "देवाचा संदेश वाहक" किंवा "तुझा दूत" किंवा "देवा पासूनचे स्वर्गीय अस्तित्व, जो मनुष्यासारखा दिसतो" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः देवदूत, सन्मान, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नफताली

तथ्य:

नफताली हा याकोबाचा सहावा मुलगा होता. * त्याच्या वंशजांनी नफतालीच्या कुळाला स्थापन केले, जे इस्राएलाच्या बारा कुळापैकी एक होते.

  • काहीवेळा "नफताली" या नावाचा उपयोग, जिथे या कुळाचे लोक राहत होते, त्या जागेला सूचित करण्यासाठी सुद्धा केला जातो. (पहा: सिनेकडॉक)
  • नफताली या कुळाची जमीन इस्राएलाच्या उत्तरी भागात दान आणि आशेर या कुळांच्या समोर स्थित होती, आणि त्याची पूर्वेची सीमा ही किन्नेरेथ समुद्राची पश्चिमी किनारपट्टी होती.
  • या कुळाचा उल्लेख जुना आणि नवा करार दोन्हीमध्ये करण्यात आला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: आशेर, दान, याकोब, गालीलचा समुद्र, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नबुखदनेस्सर

तथ्य:

नबुखदनेस्सर हा बाबेल साम्राज्याचा राजा होता, ज्याच्या शक्तिशाली सैन्याने अनेक लोकसमूहांना आणि राष्ट्रांना काबीज केले होते.

  • नबुखदनेस्सराच्या नेतृत्वाखाली, बाबेली सैन्याने यहुदाच्या राज्यावर हल्ला केला आणि ते जिंकले, आणि यहुदातील बऱ्यापैकी लोकांना बंदिवान म्हणून बाबेलाला घेऊन गेले. बंदिवानांना जबरदस्तीने 70 वर्षापर्यंत, "बाबेलातील हद्दपार केलेले" या नावाने तेथे राहण्यास भाग पाडले.
  • हद्दपार केलेल्यांपैकी एक, दानीएल, ह्याने नबुखदनेस्सर राजाच्या काही स्वप्नांचा अर्थ सांगितला.
  • आणखी तीन इस्राएली बंदिवान, हनन्या, मीशाएल, आणि अजऱ्या ह्यांना आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आले, जेंव्हा त्यांनी नबुखदनेस्सराने बनवलेल्या प्रचंड सोन्याच्या मूर्तीपुढे झुकण्यास नकार दिला.
  • नबुखदनेस्सर राजा हा खूपच उद्धट होता आणि त्याने खोट्या देवांची उपासना केली. जेंव्हा त्याने यहूदावर विजय मिळवला, तेंव्हा त्याने यरुशलेमच्या मंदिरामधील अनेक सोन्याची आणि चांदीची भांडी चोरून नेली.
  • कारण नबुखदनेस्सर हा घमंडी होता आणि खोट्या देवांची उपासना करण्यापासून माघारी वळण्यास त्याने नकार दिला, म्हणून याहोवा त्याला सात वर्षापर्यंत निराधार होऊन, प्राण्यांसारखे जगण्यास कारणीभूत झाला. सात वर्षानंतर, देवाने नबुखदनेस्सराची पुनर्रचना केली, जेंव्हा त्याने स्वतःला नम्र केले आणि एकाच देवाची, यहोवाची स्तुती केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: उद्धट, अजऱ्या, बाबेल, हनन्या, मीशाएल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:06 सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.

  • 20:06 यहूदाचा राजा नबुखद्नेस्सराचा सेवक बनण्यास तयार झाला व प्रतिवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासही तयार झाला.

  • 20:08 यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल शासन म्हणून नबुखद्नेस्सरच्या सैनिकांनी यहूदाच्या राजाच्या मुलांचा त्याच्या समोर वध केला व यहूदाच्या राजाचे डोळे फोडून त्यास आंधळे केले.

  • 20:09 नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.

  • Strong's: H5019, H5020


नहुम

तथ्य:

ज्यावेळी दुष्ट राजा मनश्शे यहूदावर राज्य करीत होता, त्यावेळी नहुम हा संदेष्टा होता, ज्याने संदेश दिला.

  • नहुम हा एल्कोश गावचा रहिवाशी होता, जे यरुशलेम पासून 20 मैलावर होते.
  • जुन्या करारातील नहुम या पुस्तकामध्ये, त्याने अश्शुरी लोकांचे शहर निनवेच्या नाशाविषयी केलेल्या भविष्यवाणींच्या नोंदी आढळतात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, मानश्शे, संदेष्टा, निनवे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नहेम्या

तथ्य:

नहेम्या हा इस्राएली होता, ज्याला बाबेलाच्या साम्राज्यामध्येसक्तीने नेण्यात आले, जेंव्हा इस्राएलाच्या लोकांना आणि यहूदाच्या लोकांना बाबेली लोकांनी बंदी करून नेले.

  • जेंव्हा तो परसाचा राजा अर्तहशश्त ह्याचा प्यालेबरदार होता, तेंव्हा नहेम्याने राजाला यरुशलेमेस जाण्याची परवानगी मागितली.
  • नहेम्याने इस्राएली लोकांचे नेतृत्व यरुशलेमेचे कोट बांधून काढण्यात केले, ज्याला बाबेलाच्या लोकांनी पडून नष्ट केले होते.
  • राजाच्या महालात परतण्याच्या पूर्वीपर्यंत, बारा वर्षापर्यंत नहेम्या हा यरुशलेमचा शासक होता.
  • जुन्या करारातील पुस्तक नहेम्या, हे नहेम्याचे कोट पुन्हा बांधून काढण्याचे कार्य आणि यरुशलेममधील लोकांवर त्याने केलेले शासन ह्याची गोष्ट सांगते.
  • जुन्या करारामध्ये नहेम्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती: ज्या नहेम्याबद्दल बोलले जात होते, ते वेगळे करण्याकरिता सहसा त्याच्या वडिलांचे नाव त्याच्याबरोबर जोडले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अर्तहशश्त, बाबेल, यरुशलेम, मुलगा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नाथान

तथ्य:

नाथान हा देवाचा विश्वासू संदेष्टा होता, जेंव्हा दावीद इस्राएल चा राजा होता, तेंव्हा तो जगला.

  • जेंव्हा दावीदाने उरीया ह्याच्या विरुद्ध गंभीर पाप केले, तेंव्हा देवाने नाथानाला दाविदाचा विरोध करण्यास पाठवून दिले.
  • जरी दावीद राजा होता, तरीही नाथानाने दाविदाला दोष लावला.
  • जेंव्हा नाथानाने त्याचा विरोध केला, तेंव्हा दावीदाने त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, विश्वासू, संदेष्टा, उरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:07 परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’

  • 17:13 दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले.

  • Strong's: H5416, G3481


नामान

तथ्य:

जुन्या करारामध्ये, नामान हा अराम राजाच्या सैन्याचा सेनापती होता.

  • नामानाला भयंकर त्वचेचा रोग होता, ज्याला कुष्टरोग असे म्हणतात, जो बरा होऊ शकत नव्हता.
  • नामानाच्या घरातील एका यहुदी दासीने त्याला अलीशा संदेष्ट्याकडे जाऊन त्याला स्वतःला बरे करण्याबद्दल विचारण्यास सांगितले.
  • अलीशाने नामानाला यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले. जेंव्हा नामानाने ऐकले, तेंव्हा देवाने त्याला त्याच्या रोगापासून बरे केले.
  • ह्याचा परिणाम म्हणून नामान एकाच देवावर, यहोवावर, विश्वास ठेवू लागला.

नामान नावाचे इतर दोन मनुष्य हे याकोबाचा मुलगा बन्यामीन ह्याचे वंशज होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, यार्देन नदी, कुष्टरोग, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता.

  • सुरुवातीस नामानास राग आला व असे करण्यास तो तयार झाला नाही, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटले. परंतु नंतर त्याने आपले मन बदलले व त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली

  • त्याने फक्त नामानाचा कुष्ठरोग बरा केला, तो इस्राएलाच्या शत्रूंचा सेनापती होता.’’

  • Strong's: H5283, G3497


नासरेथ, नासोरी

तथ्य:

उत्तरी इस्राएल मधील गालील प्रांतातील नासरेथ हे एक गाव होते. हे यरुशलेमेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर होते, आणि पायी तेथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते पाच दिवस लागत.

  • योसेफ आणि मरिया हे नासरेथ गावाचे होते, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे त्यांनी येशूला वाढीवले. म्हणून तर येशूला "नासोरी" म्हणून ओळखले जाते.
  • नासरेथमध्ये राहणाऱ्या अनेक यहुद्यांनी येशूच्या शिक्षणाचा आदर केला नाही, कारण तो त्यांच्यामध्ये वाढला होता, आणि तो एक साधारण मनुष्य आहे असा ते विचार करीत.
  • एकदा, जेंव्हा येशू नासरेथमधील मंदिरात शिकवत होता, तेंव्हा तिथल्या यहुद्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, कारण तोच मसिहा आहे असा त्याने दावा केला आणि त्याला नाकारल्याबद्दल त्याने त्यांना दोष लावला.
  • जेंव्हा नाथानएलने ऐकले की येशू नासरेथ या गावचा आहे, तेंव्हा त्याने जी टिप्पणी केली त्यावरून असे सूचित होते की, ते शहर अतिशय उच्च असे नव्हते.

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, गालील, योसेफ, मरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:04 योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दावीद हा बेथलेहेम गावाचा होता.

  • 26:02 येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला.

  • 26:07 नासरेथातील लोकांनी येशूला पकडून ओढत डोंगराच्या कडयावरुन फेकून त्यास जीवे मारावे म्हणून नेले.

  • Strong's: G3478, G3479, G3480


नाहोर

तथ्य:

नाहोर हे अब्राहामाच्या दोन नातेवाईकांचे नाव होते, एक त्याचे आजोबा आणि दुसरा त्याचा भाऊ.

  • अब्राह्माचा भाऊ नाहोर हा इसहाकाची पत्नी रीबकाचा आजोबा होता.
  • "नाहोरचे नगर" या वाक्यांशाचा अर्थ "नाहोर नावाचे शहर" किंवा "जिथे नाहोर राहत होता ते शहर" किंवा "नाहोरचे शहर" असा होऊ शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, रिबका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


निनवे, निनवेचे लोक

तथ्य:

निनवे ही अश्शूर देशाची राजधानी होती. "निनवेचे लोक" हे निनवेमध्ये राहणारे लोक होते.

  • देवाने योना संदेष्ट्याला निनवेच्या लोकांना त्यांच्या दुष्ट कृत्यांपासून वळण्याची सूचना देण्यासाठी पाठवले. त्या लोकांनी पश्चाताप केला आणि देवाने त्यांचा नाश केला नाही.
  • अश्शुरी लोकांनी नंतर देवाची सेवा करणे थांबवले. त्यांनी एस्रयेलाचे राज्य जिंकले आणि त्यातील लोकांना निनवेला नेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, योना, पश्चाताप, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


निर्माण कर्ता

तथ्य:

सर्वसाधारणपणे, एक "निर्माणकर्ता" म्हणजे जो तयार करतो किंवा गोष्टी बनवतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, काहीवेळा "निर्माणकर्ता" हा शब्द यहोवाच्या नावासाठी किंवा शीर्षकासाठी वापरतात, कारण त्यांचे सर्व काही निर्माण केले आहे.
  • सहसा या संज्ञा "त्याच्या" किंवा "माझे" किंवा "आपल्या" या शब्दांच्याबरोबर एकत्रित केल्या जातात.

भाषांतर सूचना

  • "निर्माणकर्ता" या शब्दाचे भाषांतर "निर्माता" किंवा "देव जो निर्माण करतो" किंवा "असा एक ज्याने सर्वकाही बनवले" असे केले जाऊ शकते.
  • "त्याचा निर्माता" या वाक्यांशाचे भाषांतर "असा एक ज्याने त्याला निर्माण केले आहे" किंवा "देव, ज्याने त्याला निर्माण केले" असे केले जाऊ शकते.
  • "तुझा निर्माता" किंवा "माझा निर्माता" या भाषांतर सुद्धा अशाच प्रकारे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: निर्माण, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नील नदी (नाईल नदी), मिसराची नदी, नाईल

तथ्य:

नाईल ही ईशान्येकडीलच्या आफ्रिकेतील सर्वात लांब आणि रुंद नदी आहे. ही विशेषकरून मिसरची मुख्य नदी म्हणून प्रसिद्ध आहे.

  • नाईल नदी मिसरमधून उत्तरेला वाहते आणि भूमध्य समुद्राला जाऊन मिळते.
  • नाईल नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सुपीक जमिनीमध्ये पिकांची वाढ चांगली होते.
  • अधिकतर मिसरी लोक नाईल नदीच्या किनाऱ्याला राहत होते, कारण धान्य पिकासाठी लागणाऱ्या पाण्याचा तो एक महत्वाचा स्त्रोत होता.
  • इस्राएल लोक गोशेनच्या प्रांतात राहिले, जो अतिशय सुपीक होता, कारण तो नाईल नदीच्या किनाऱ्याला स्थित होता.
  • जेंव्हा मोशे बालक होता, तेंव्हा त्याच्या पालकांनी त्याला फारोच्या माणसांपासून वाचवण्यासाठी एका लाव्हाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये ठेवून नाईल नदीमध्ये सोडले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, गोशेन, मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:04 त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.

  • 09:04 फारोने पाहिले की इस्राएल लोकांना पुष्कळ मुले होत आहेत, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएलांच्या पुत्र संतानांस नाईल नदीमध्ये फेकून द्यावे.

  • 09:06 जेंव्हा त्या बाळाचे आईवडिल त्यास लपवू शकले नाही, तेंव्हा त्यांनी त्या बाळास मृत्युपासून वाचविण्यासाठी त्याला एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ती नाईल नदीच्या तीरावर लव्हाळ्यात ठेवली.

  • 10:03 देवाने नाईल नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही.

  • Strong's: H2975, H4714, H5104


नेगेव

तथ्य:

नेगेव हा इस्राएलाच्या दक्षिणी भागातील आणि मृत समुद्राच्या दक्षिण पश्चिमेकडील वाळवंटी प्रांत आहे.

  • मूळ शब्दाचा अर्थ "दक्षिण" असा आहे, आणि काही इंग्रजी आवृत्त्या त्याला या प्रकारे भाषांतरीत करतात.
  • हे कदाचित ह्यामुळे असेल की, "दक्षिण" हे त्या जागी स्थित नसावे, जिथे आजचे नेगेव वाळवंट आहे.
  • जेंव्हा अब्राहम कादेश या शहरामध्ये राहत होता, तेंव्हा तो नेगेव किंवा दक्षिणी प्रांतात होता.
  • जेंव्हा रिबका योसेफाला भेटायला आणि त्याची बायको बनण्यास निघाली, तेंव्हा तो नेगेव मध्ये राहत होता.
  • यहुदी गोत्र यहूदा आणि शिमोन हे दक्षिणी प्रांतात राहत होते.
  • ,नेगेव प्रांतातील सर्वात मोठ्या शहराचे नाव बैरशेबा होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, बैरशेबा, इस्राएल, यहूदा, कादेश, मृत समुद्र, शिमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


नोहा

तथ्य:

जेंव्हा देवाने सर्व दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी जगभर पूर पाठवला त्या काळामध्ये, नोहा हा मनुष्य होता, जो 4000 वर्षापूर्वी जगला. देवाने नोहाला एक अवाढव्य तारू बांधण्यास सांगितले, ज्यामध्ये तो आणि त्याचे कुटुंब राहू शकेल, जेंव्हा पुराचे पाणी पृथ्वीला आच्छादून टाकेल.

  • नोहा हा एक धार्मिक मनुष्य होता, ज्याने सर्वामध्ये देवाची आज्ञा पाळली.
  • जेंव्हा देवाने नोहाला अवाढव्य जहाज कसे बांधायचे हे सांगितले, तेंव्हा नोहाने अगदी देवाने सांगितले त्याच प्रकारे तारू बांधले.
  • तारूच्या आतमध्ये, नोहा आणि त्याचे कुटुंब सुरक्षित राहिले, आणि नंतर त्यांची मुले आणि नातवंडे ह्यांनी ही पृथ्वी भरून टाकली.
  • पुरानंतर जन्मलेला प्रत्येकजण नोहाचा वंशज आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वंशज, तारू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 03:02 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.

  • 03:04 नोहाने देवाची आज्ञा पाळली. त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले.

  • 03:13 दोन महिन्यानंतर देव नोहास म्हणाला, “ तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका !” मग नोहा व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.

  • Strong's: H5146, G3575


पंत

तथ्य:

रोमन साम्राज्याच्या काळात आणि आद्य मंडळींच्या काळात पंत हा रोमी प्रांत होता. तो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याला लागून स्थित होता, आताच्या तुर्की देश आहे त्याच्या उत्तर बाजूला स्थित आहे.

  • प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, जेंव्हा पंत प्रांतातील लोक यरुशलेममध्ये होते, तेंव्हा पेंटीकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रथम प्रेषितांवर आला.
  • अक्विला नावाचा एक विश्वासु पंतचा रहिवासी होता.
  • जेंव्हा पेत्राने ख्रिस्ती लोकांना लिहिले, जे वेगवेगळ्या प्रांतात विखुरले होते, तेंव्हा त्याने बऱ्याच प्रांतापैकी पंत या प्रांताचा उल्लेख केला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अक्विल्ला, पेंटीकॉस्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पदन अराम

तथ्य:

पदन अराम हे एका प्रांताचे नाव आहे, जिथे अब्राहामाचे कुटुंब कनानच्या भूमीत स्थलांतरित होण्यापूर्वी राहत होते. ह्याचा अर्थ "अरामचे मैदान" असा होतो.

  • जेंव्हा अब्राहामाने कनानला जाण्यासाठी पदन अराममधील हारान सोडले, तेंव्हा त्याच्या कुटुंबातील राहिलेल्यांपैकी बरेचजण हरानमध्येच थांबले.
  • अनेक वर्षानंतर, अब्राहामाचा सेवक त्याच्या नातलागांमधून इसहाकसाठी बायको शोधण्यास पदन अराम येथे गेला, आणि तेथे त्याला रिबका सापडली, जी बथूवेलची नात होती.
  • इसहाक आणि रिबकाचा मुलगा याकोब ह्यानेसुधा पदन अरामला प्रवास केला, आणि रिबकाचा भाऊ लाबान जो हरानमध्ये राहत होता, त्याच्या दोन मुलींना बायको करून घेतले.
  • अराम, पदन अराम, आणि अराम-नाहराईम हे सर्व एकाच प्रांताचे भाग आहेत आणि सध्याचा सिरीया देश आहे तिथे स्थित होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, अराम, बथूवेल, कनान, हरान, याकोब, लाबान, रिबका, सिरीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


परिज्जी

तथ्य:

​कनान देशामध्ये राहणाऱ्या अनेक लोकसमुहापैकी परिज्जी हा एक गट होता. या समूहाबद्दल, जसे की त्यांचे पूर्वज कोण होते किंवा कनान मधील कोणत्या भागात ते राहिले या बद्दल खूपच कमी माहिती आहे.

  • जुन्या करारातील शास्ते या पुस्तकात परिज्जी लोकांचा उल्लेख बऱ्याच वेळा आला आहे, जिथे असे नमूद केले आहे की, परिज्जी लोकांनी इस्राएल लोकांच्या बरोबर अंतरवंशीय विवाह केला आणि त्यांना खोट्या देवांची उपासना करण्यासाठी प्रभावित केले.
  • पेरेशाच्या कुळाला "पेरेशी" असे म्हणतात, हा परिज्जी समूहापासून पासून एक वेगळा समूह होता, ह्याची नोंद करा. हे स्पष्ट करण्यासाठी ह्यांच्या नावाची अक्षरे वेगवेगळी वापरणे गरजेचे आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, खोटे देव)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


पलीष्टी

तथ्य:

पलीष्टी हा एक लोकसमूह होता, ज्याने व्यापलेल्या प्रांताला पलीष्ट्यांचा देश असे म्हंटले जाते, जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर होता. त्यांच्या नावाचा अर्थ "समुद्राचे लोक" असा होतो.

  • तेथे पाच मुख्य पलीष्टी शहरे होती: अश्दोद, अश्क्लोन, एक्रोन, गथ, गज्जा.
  • अश्दोद हे शहर पलीष्ट्यांच्या देशाच्या उत्तरी भागात होते, तर गज्जा हे शहर दक्षिणी भागात होते.
  • इस्राएली लोकांच्याबरोबर बरेच वर्षे युद्ध करणारे असे म्हणून कदाचित पलीष्टी प्रसिद्ध होते.
  • शिमसोन हा शास्ता पलीष्टी लोकांच्या विरुद्धातील सुप्रसिद्ध योद्धा होता, जो देवापासून मिळालेल्या त्याच्या अलौकिक ताकदीचा उपयोग करत होता.
  • दावीद राजाने बऱ्याचदा पलीष्टी लोकांच्या विरुद्धच्या युद्धात नेतृत्व केले, ज्यामध्ये तो तरुण असताना त्याने पलीष्टी योद्धा गल्याथला हरवल्याचा समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः अशदोद, अश्कलोन, दावीद, एक्रोन, गथ, गज्जा, गल्याथ, क्षार समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पलेशेथ

व्याख्या:

पलेशेथ हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या कनान देशातील एक मोठ्या प्रांताचे नाव आहे.

  • हा प्रदेश उत्तरेकडील याफोपासून दक्षिणेकडे गज्जापर्यंत पोहोचण्यासाठी, अत्यंत सुपीक किनारपट्टीवर स्थित होता. तो जवळपास 64 किलोमीटर लांब आणि 16 किलोमीटर रुंद होता.
  • पलेशेथ हे पालीष्ट्यांनी व्यापलेले होते, एक शक्तिशाली लोकांचा समूह, जो इस्राएल लोकांचा सततचा शत्रू होता.

(हे सुद्धा पहा: पलिष्टी, गज्जा, याफो)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पारसाचा (पर्शिया, इराण), परसाचे लोक

व्याख्या:

पर्शिया हा देश होता, जे एक शक्तिशाली साम्राज्यदेखील बनले ज्याची स्थापना महान कोरेश ह्याने इ. स. पूर्व 550 मध्ये केली. परसाचा देश बाबेलच्या आणि अश्शूरच्या दक्षिणपूर्व प्रांतात आणि आताचा इराण देश आहे तेथे स्थित होता.

  • पर्शियाच्या लोकांना पारसाचे लोक (पारसी) असे म्हणतात.
  • कोरेश राजाच्या आदेशानुसार, बाबेलमध्ये बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांना मुक्त करून त्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, आणि यरुशलेममधील मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली, त्यासाठ लागणारा निधी पारसाच्या साम्राज्यातून पुरविला गेला.
  • जेंव्हा एज्रा आणि नहेम्या हे यरुशलेमची भिंत बांधण्यासाठी, युशालेमला परत आले, तेंव्हा अर्तहशश्त राजा हा पारसाच्या साम्राज्याचा शासक होता.
  • जेंव्हा एस्तेरने अर्तहशश्त राजाशी लग्न केले, तेंव्हा ती पारसाच्या साम्राज्याची राणी बनली.

(हे सुद्धा पहा: अहश्वेरोष, अर्तहशश्त, अश्शुर, बाबेल, कोरेश, एस्तेर, एज्रा, नहेम्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पारान

तथ्य:

पारान हा मिसराच्या पश्चिमेस आणि कनानच्या भूमीच्या दक्षिणेस असलेला वाळवंटी किंवा माळरान क्षेत्र होते. तेथे पारान पर्वत देखील होता, जे कदाचित सीनाय पर्वताचे दुसरे नाव असावे.

  • साराने अब्राहामाला हगार आणि तिच्या पुत्राला दूर पाठविण्यास सांगितल्यानंतर ते दोघे पारानच्या माळरानात राहायला गेले.
  • जेंव्हा मोशेने इस्राएली लोकांना मिसर मधून बाहेर काढले, तेंव्हा ते पारानच्या माळरानामधून गेले.
  • तो पारानच्या माळरानातील कादेश-बर्णा होता, जिथून मोशेने बारा मनुष्यांना कनानच्या भूमीला हेरून त्याचा वृतांत परत आणण्यास पाठविले.
  • त्सीनचे माळरान हे पारानच्या उत्तरेस होते, आणि सीनचे माळरान हे पारानच्या दक्षिणेस होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, वाळवंट, मिसर, कादेश, सिनाय)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पिलात

तथ्य:

पिलात हा रोमी प्रांतातील यहुदियाचा सुभेदार होता, ज्याने येशूला मृत्युदंड देण्याचे घोषित केले.

  • कारण पिलात हा सुभेदार होता, म्हणून गुन्हेगारांना मृत्युदंड देण्याचा त्याला अधिकार होता.
  • पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळावे अशी यहुदी धर्मपुढाऱ्यांची इच्छा होती, म्हणून ते खोटे बोलले आणि त्यांनी सांगितले की येशू एक गुन्हेगार होता.
  • पिलातला हे लक्षात आले होते की, येशू दोषी नव्हता, परंतु त्याला जमावाची भीती वाटत होती आणि त्याला त्यांना खुश करायचे होते, म्हणून त्याने आपल्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळून मारणे, सुभेदार, दोष, यहुदिया, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:09 दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले. त्यांना आशा होती की पिलात येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल. पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?’’

  • 39:10 पिलाताने विचारले, ‘‘सत्य काय आहे?’’

  • 39:11 येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ * परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ यावर पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’

  • 39:12 जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.

  • 40:02 पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.

  • 41:02 पिलात म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा."

  • Strong's: G4091, G4194


पेत्र, शिमोन पेत्र, केफा

तथ्य:

पेत्र हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. तो एक आद्य मंडळीचा महत्वाचा नेता होता.

  • येशूने त्याला त्याचा शिष्य म्हणून बोलावण्याच्या पूर्वी, पेत्राचे नाव शिमोन होते.
  • नंतर, येशूने सुद्धा त्याचे नाव "केफा" असे ठेवले, ज्याचा अर्थ अरामी भाषेत "दगड" किंवा "खडक" असा होतो. पेत्र या नावाचा सुद्धा अर्थ ग्रीक भाषेत "दगड" किंवा "खडक" असा होतो.
  • देवाने लोकांना बरे करण्यासाठी आणि येशूबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी पेत्रामार्फत कार्य केले.
  • नवीन करारातील दोन पुस्तके, ही पेत्राने सह विश्वासुंना उत्साहित करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी लिहिलेली पत्रे आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शिष्य, प्रेषित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 28:09 पेत्र त्याला म्हणू लागला, "पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत." याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?’’

  • 29:01 एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’ सात वेळा काय?’’

  • 31:05 तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, ‘‘प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या.’’ येशूने पेत्रास म्हटले, ‘‘ये!’’

  • 36:01 एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले.

  • 38:09 पेत्राने उत्तर दिले, ‘‘जरी सर्वांनी तुला सोडिले, तरी मी तुला सोडणार नाही!’’ * तेंव्हा येशू पेत्रास म्हणाला, ‘‘सैतानाने तुम्हा सर्वांचा नाश करायचे ठरविले आहे, परंतू मी तुम्हासाठी प्रार्थना केली आहे, पेत्रा, अशासाठी की तुमचा विश्वास डळमळू नये. तरीदेखिल आज रात्री, कोबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.’’

  • 38:15 सैनिक येशूला पकडत असतांना, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला.

  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.

  • 44:08 पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे.

  • Strong's: G2786, G4074, G4613


पोटीफर

तथ्य:

मिसरमधील फारोच्या काळात, योसेफाला काही इश्माएली लोकांना दास म्हणून विकले जाण्याच्या काळात पोटीफर एक महत्त्वाचा अधिकारी होता.

  • इश्माएली लोकांच्याकडून पोटीफराने योसेफाला विकत घेतले आणि त्याला त्याच्या घराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले.
  • जेंव्हा योसेफावर चुकीचे वर्तन केल्याचा दोष लावला गेला, तेंव्हा पोटीफराने योसेफाला तुरुंगात टाकले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, योसेफ, फारो)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पौर, पौर पर्वत, बाल पौर

व्याख्या:

"पौर" आणि "पौर पर्वत" ह्याचा संदर्भ एका पर्वताशी आहे, जो मृत समुद्राच्या ईशान्येस, मवाबाच्या प्रांतामध्ये स्थित आहे.

  • "बेथ पौर" हे एका शहराचे नाव आहे, जे कदाचित त्या पर्वतावर किंवा त्याच्या जवळ वसलेले आहे. ही ती जागा आहे, जेथे देवानं मोशेला वचनयुक्त जमीन दाखवल्याच्या नंतर मोशे मरण पावला.
  • "बाल पौर" हा मवाबी लोकांचा खोटा देव होता, ज्याची उपासना ते पौर पर्वतावर करत. इस्राएली लोकांनी सुद्धा या मूर्तीची उपासना करण्यास सुरवात केली, आणि देवाने त्याबद्दल त्यांना शिक्षा केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: बाल, खोटे देव, मवाब, मृत समुद्र, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


पौल, शौल

तथ्यः

पौल हा सुरुवातीच्या मंडळीचा पुढारी होता, ज्यास येशूने इतर अनेक लोकसमूहात सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले होते.

  • पौल एक यहूदी होता जो रोमन शहरातील तार्सस शहरात जन्मला होता आणि म्हणूनच तो रोमी नागरिक होता.
  • पौलाला त्याच्या मूळ यहूदी नावानेच शौल म्हटले गेले.
  • शौल यहुदी धार्मिक पुढारी झाला आणि ख्रिस्ती बनलेल्या यहुदींना त्यांनी अटक केली कारण त्याला वाटले की येशूवर विश्वास ठेवून ते देवाचा अनादर करीत आहेत.
  • येशूने शौलाला अंधुक प्रकाशात प्रगट केले आणि ख्रिश्चनांना त्रास देणे थांबवण्यास सांगितले.
  • शौलने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्याविषयी त्याच्या इतर यहुदी लोकांना शिकवायला सुरुवात केली.
  • नंतर, देवाने शौलाला यहूदी नसलेल्या लोकांना येशूविषयी शिकवण्यासाठी पाठविले आणि रोमी साम्राज्याच्या वेगवेगळ्या शहरे व प्रांतांमध्ये चर्च सुरू केले. यावेळी त्याला “पौल” नावाच्या रोमन नावानेच ओळखले जाऊ लागले.
  • या शहरांमधील चर्चमधील ख्रिस्ती लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी पौलाने पत्रेही लिहिली. यातील कित्येक पत्रे नवीन करारामध्ये आहेत

(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]

(हे देखील पहा: [ख्रिश्चन], [यहूदी पुढारी, [रोम]]

बायबल संदर्भ:

  • [१ करिंथकर 01:03]
  • [कृत्ये 08:03]
  • [कृत्ये 09:26]
  • [प्रेषितांची कृत्ये 13:10]
  • [गलतीकर 01:01]
  • [फिलेमोन 01:08]

बायबलमधील कथांमधील उदाहरणे:

  • __ [45:06] __शौल नावाच्या तरूणाने स्तेफनला ठार मारलेल्या आणि त्याच्यावर दगडफेक करत असताना त्यांच्या वस्त्राचे रक्षण करणाऱ्या लोकांशी सहमती दर्शविली.
  • __ [46:01] शौल_ हा स्तेफनला ठार मारणाऱ्या लोंकाच्या कपड्यांचा पहारा करणारा तरुण होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून त्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला.
  • __ [46:01] __शौल दिमीष्कच्या मार्गावर जात असताना आकाशातून एक चमकणारा प्रकाश त्याच्या सभोवताली चमकला आणि तो जमिनीवर पडला. कोणीतरी असे म्हणत आहे हे त्याने ऐकले, “__शौला__शौला तु माझा छळ का केला? ”
  • __ [46:05]__ म्हणून हनन्या शौला कडे गेला आणि त्याच्यावर आपले हात ठेवले आणि म्हणाला, "येशू, जो या मार्गाने येथे तुला दिसला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे म्हणजे पुन्हा तुला दृष्टी यावी व तू पवीत्र आत्म्याने भरावे लगेच शौलाला पुन्हा दृष्टी आली आणि हनन्याने त्याला बातिस्मा दिला.
  • [46:06] लगेचच शौलाने दिमीष्कातील यहुद्यांना प्रचार करण्यास सुरुवात केली की, “येशू हा देवाचा पुत्र आहे!”
  • __[46:09] बर्नबा आणि __शौल या नव्या विश्वासणाऱ्यांना येशूविषयी आणि मंडळीला बळकट करण्यासाठी शिकवण्यासाठी तेथे गेले (अन्तूखीयाला).
  • __[47:01]__शौल संपूर्ण रोमन साम्राज्यात फिरत असताना, त्याने त्याचे रोमन नाव “पौल” वापरायला सुरुवात केली.
  • __[47:14] __पौल आणि इतर ख्रिस्ती पुढारी, येशूविषयीची सुवार्ता लोकांना शिकवत आणि सुर्वाता सांगत अनेक शहरांमध्ये फिरले.

शब्द डेटा:

  • मजबूत: G3972, G4569

प्रिस्कील्ला

तथ्य:

प्रिस्कील्ला आणि तिचा नवरा अक्विल्ला हे यहुदी ख्रिस्ती होते, ज्यांनी पौलाच्या सुवार्तेच्या कामात, त्याच्याबरोबर काम केले.

  • प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला ह्यांनी रोम सोडले कारण, सम्राटाने तिथल्या ख्रिस्ती लोकांना ते शहर सोडण्याची सक्ती केली.
  • पौल करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्कील्ला ह्यांना भेटला. ते राहुट्या (तंबू) बनवणारे होते, आणि पौल त्यांच्या कामात सामील झाला.
  • जेंव्हा पौलाने सुरियाला जाण्यासाठी करिंथ सोडले, तेंव्हा प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला त्याच्याबरोबर गेले.
  • सुरिया येथून, ते तिघे इफिसला गेले. जेंव्हा पौलाने इफिस सोडले, तेंव्हा प्रिस्कील्ला आणि अक्विल्ला हे तिथेच मागे राहिले आणि तेथे सुवार्ता सांगण्याचे काम त्यांनी सुरु ठेवले.
  • त्यांनी इफिसमध्ये विशेषकरून अपुल्लो नावाच्या मनुष्याला शिकवले, ज्याने येशूवर विश्वास ठेवला होता, आणि तो प्रतिभासंपन्न वक्ता आणि शिक्षक होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: विश्वास, ख्रिस्ती, करिंथ, इफिस, पौल, रोम, सुरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


फरात नदी, नदी

तथ्य:

फरात हे चारपैकी एका नदीचे नाव आहे, ज्या एदेन बागेतून वाहतात. हीच ती नदी आहे, जिचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा केलेला आहे.

  • सध्याच्या युगातील फरात नदी ही मध्य पूर्व देशात स्थित आहे, आणि आशियामधील सर्वात मोठी आणि महत्वाची नदी आहे.
  • हिद्दकेल नदीबरोबर, फरात नदी एका प्रदेशाच्या सीमारेषा तयार करते, ज्याचे नाव मेसोपटेम्या होते.
  • प्राचीन शहर ऊर, जिथून अब्राहम आला, ते फरात नदीच्या मुखाजवळ होते.
  • ही नदी, ज्या देशाला, देवाने अब्राहामाला देण्याचे वचन दिले होते, त्याच्या सीमारेषेपैकी एक सीमारेषा तयार करते (उत्पत्ति 15:18)
  • काहीवेळा फरत नदीला फक्त "नदी" असे म्हंटले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


फारो, मिसरचा राजा

तथ्य:

प्राचीन काळी, ज्या राजाने मिसर देशावर राज्य केले त्याला फारो असे म्हणत.

  • सर्व मिळून, 300 पेक्षा अधिक फारोंनी 2000 पेक्षा अधिक वर्षापर्यंत राज्य केले.
  • हे मिसरी राजे खूप शक्तिशाली आणि श्रीमंत होते.
  • ह्यातील बऱ्याच फारोंचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
  • बऱ्याचदा या शीर्षकाचा उपयोग शीर्षक म्हणून करण्याऐवजी नाव म्हणून केला आहे. या प्रकरणामध्ये, हे मोठ्या अक्षरात लिहिले जाते जसे की, "फारो (Pharaoh)."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • एके रात्री, फारो, ज्याला मिसरी लोक त्यांचा राजा म्हणत होते, त्याला दोन चिंताजनक स्वप्ने पडली.

  • योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.

  • म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.

  • मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे.

  • या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.

  • Strong's: H4428, H4714, H6547, G5328


फिनहास

तथ्य:

जुन्या करारांमध्ये फिनहास नावाचे दोन मनुष्य होते.

  • अहरोनाच्या नातावांपैकी एका याजक नातवाचे नाव फिनहास होते, ज्याने इस्राएलमधील खोट्या देवांच्या उपासनेला तीव्र विरोध केला.
  • फिनहासने इस्राएली लोकांना मरीपासून वाचवले, जीला देवाने, इस्राएली लोकांनी, मिद्यानी स्त्रियांना बायको करून घेतले आणि त्यांच्या खोट्या देवांची उपासना केली म्हणून पाठवले होते.
  • बऱ्याच घटनांमध्ये, फिनहास मिद्यानी लोकांचा नाश करण्यासाठी इस्राएली सैन्याबरोबर गेला.
  • दुसरा मनुष्य ज्याचे नाव फिनहास होते, ज्याचा उल्लेख जुन्या करारामध्ये करण्यात आल, तो एली याजकाचा दुष्ट मुलगा, शमुवेल संदेष्ट्याच्या काळात होता.

फिनहास आणि त्याचा भाऊ हफनी हे दोघेही मारले गेले, जेंव्हा पलीष्ट्यांनी इस्राएलावर हल्ला केला आणि कराराचा कोश चोरून नेला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: कराराचा कोश, यार्देन नदी, मिद्यान, पलीष्टी, शमुवेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


फिलिप्प, प्रेषित (प्रेषित फिलिप्प)

तथ्य:

प्रेषित फिलिप्प हा येशुंच्या मूळ बारा शिष्यांपैकी एक होता. तो बेथसैदा या गावाचा रहिवासी होता.

  • फिलिप्प येशूला भेटवण्यास नथनेलाला घेऊन आला.
  • येशूने फिलीप्पाला जवळपास 5000 लोकांच्यासाठी अन्नाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न केला.
  • शेवटच्या वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी येशूने त्याच्या शिष्याबरोबर खाल्ले, त्याने त्यावेळी देव जो पिता ह्याच्याबद्दल गोष्टी सांगितल्या. फिलिप्पाने येशूला पित्याला दाखविण्याबद्दल विचारले.
  • काही भाषा गोंधळ टाळण्यासाठी फिलिप्पच्या नावाला फिलिप्प (सुवर्तिक) ह्याच्या नावापेक्षा वेगळ्या शब्दात लिहिण्यास पसंती दर्शवितात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: फिलिप्प)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


फिलिप्प, सुवार्तिक

तथ्य:

यरुशलेममधील आद्य ख्रिस्ती मंडळीमधील, फिलिप्प हा गरीब आणि गरजू ख्रिस्ती लोकांची विशेषकरून विधवांची काळजी घेण्याकरिता निवडलेल्या सात पुढाऱ्यांपैकी एक होता.

  • देवाने फिलीप्पाचा उपयोग, यहूदा आणि गालीलाच्या अनेक वेगवेगळ्या गावातील लोकांच्यामध्ये त्याची सुवार्ता गाजवण्यासाठी केला, त्याच्यामध्ये इथोपियाच्या मनुष्य ज्याला तो यरुशलेमेपासून गज्जाला जाणाऱ्या वाळवंटाच्या रस्त्यावर भेटला, त्याचा समावेश होतो.
  • वर्षानंतर, जेंव्हा पौल आणि त्याचे सहकारी त्यांच्या यरुशलेमेच्या परतीच्या प्रवासावेळी त्याच्या घरी राहिले, तेंव्हा फिलिप्प कैसरीयामध्ये राहत होता.
  • बबरेच पवित्र शास्त्रातील पंडित असा विचार करतात, की फिलिप्प सुवर्तिक हा तोच समान मनुष्य नसावा, जो त्या नावाचा येशूचा प्रेषित होता. काही भाषा, या दोन पुरुषांच्या नावांसाठी थोडी वेगळी अक्षरे वापरण्यास प्राधान्य देतात ज्याने ते स्पष्ट होते की ते वेगवेगळे पुरुष आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: फिलिप्प)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


फिलिप्पै, फिलीप्पैकर

तथ्य:

फिलिप्पै हे प्राचीन ग्रीकच्या उत्तरी भागातील मासेदोनियामधील एक मोठे शहर आणि रोमी वसाहत होते.

  • पौल आणि सीला ह्यांनी फिलिप्पै येथील लोकांना येशुबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी या शहरास प्रवास केला.
  • फिलिप्पैमध्ये असताना, पौल आणि सीला ह्यांना अटक झाली, पण देवाने त्यांना अद्भूतरीत्या बाहेर काढले.
  • नवीन करारातील पुस्तक फिलिप्पैकरांस हे एक पत्र आहे, जे प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील मंडळीतील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले आहे.
  • एक वेगळे शहर कैसरीया फिलिप्पै, जे हेर्मोन पर्वताजवळ, इस्राएलाच्या ईशान्येकडील भागात स्थित होते ह्याची नोंद घ्या.

(हे सुद्धा पहा: कैसरीया, ख्रिस्ती, मंडळी, मासेदोनिया, पौल, सीला)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र शिला हे फिलिप्पी नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
  • दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सिला यांची सुटका केली व फिलिप्पी शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले.

Strong's: G5374, G5375


फेनिके

तथ्य:

प्राचीन काळात, फेनिके हा कनान मधील श्रीमंत देश होता, जो भूमध्य किनाऱ्याच्या बाजूला, इस्राएलच्या उत्तरेला स्थित होता.

  • फेनिके या देशाने व्यापलेला जमिनीचा प्रदेश होता, तो आताच्या लेबनान देशाचा पश्चिम प्रांत आहे.
  • नवीन कराराच्या काळात, सोर हे शहर फेनिके देशाची राजधानी होते. सिदोन हे अजून एक फेनिके देशाचे महत्वाचे शहर होते.
  • फेनिकेचे लोक, त्यांच्या लाकडीकामाच्या कौशल्याचा उपयोग करून, त्यांच्या देशाच्या मुबलक गंधसरू वृक्ष वापरून, एक महाग जांभळ्या रंगाच्या निर्मितीसाठी आणि समुद्रातून प्रवास आणि व्यापार करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे सुप्रसिद्ध होते. ते अत्यंत कुशल नौका बांधणारे सुद्धा होते.
  • फेनिकेच्या लोकांनी तयार केलेल्या वर्णमाला या सर्वात जुन्या वर्णमालांपैकी एक होत्या. त्यांच्या वर्णमालाचा उपयोग सर्वत्र केला जात होता, कारण व्यापाराद्वारे त्यांचा संबंध अनेक लोकसमूहाशी येत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः गंधसरू, जांभळा, सिदोन, सोर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बथशेबा

तथ्य:

बथशेबा ही दाविद राजाच्या सैन्यातील एक सैनिक उरीया याची पत्नी होती. उरीया मरण पावल्यानंतर बथशेबा दाविदाची पत्नी आणि शलमोनाची आई बनली.

  • दावीदाने बथशेबेशी तिचे उरीयाशी लग्न झाले असतानाही व्यभिचार केला.
  • जेव्हा बथशेबा दाविदापासून त्याच्या बाळाची गर्भवती झाली तेव्हा दाविदाने उरीयाला लढाईत मारले जाऊ दिले.
  • नंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले आणि तिने त्यांच्या मुलास जन्म दिला.
  • दाविदाला त्याच्या पापाबद्दलची शिक्षा म्हणून परमेश्वराने त्या मुलाचा जन्म झाल्यापासून अनेक दिवसांनंतर त्याचा मृत्यू घडवून आणला.
  • नंतर, बथशेबाने आणखी एका मुलाला शलमोनाला जन्म दिला जो मोठा होऊन दाविदा नंतर राजा झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, शलमोन, उरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:10 एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली. तिचे नाव बथशेबा होते.

  • 17:11 काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.

  • 17:12 बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता.

  • 17:13 उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.

  • 17:14 नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.

  • Strong's: H1339


बथूवेल

तथ्य:

बथूवेल हा अब्राहमचा भाऊ नाहोर याचा मुलगा होता.

  • बथूवेल हा रिबका आणि लाबान यांचा पिता होता.
  • बथूवेल नावाचे एक गावही होते, जे कदाचित दक्षिणेकडील यहुदामध्ये स्थित होते, जे बैरशेबा गावाच्या जवळ होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बैरशेबा, लाबान, नाहोर, रिबका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बनाया

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये बनाया नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • यहोयादचा मुलगा बनाया हा दाविदाच्या ताकदवर मनुष्यांपैकी एक होता. तो एक कुशल योद्धा होता आणि दाविदाच्या अंगरक्षकाचा प्रमुख म्हणून नेमला गेला होता.
  • जेंव्हा शलमोनाला राजा बनवले, बनायाने त्याला त्याच्या शत्रूंना उलथून लावण्यास मदत केली. अखेरीस तो इस्राएली सैन्याचा सेनापती बनला.
  • जुन्या करारातील इतर मनुष्य ज्यांचे नाव बनाया होते त्यामध्ये तीन लेवी : एक याजक, एक संगीतकार, आणि एक असाफचा वंशज यांचा समावेश होता.

(हे सुद्धा पहाः असाफ, यहोयाद, लेवीय, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बन्यामीन, बन्यामिनी

तथ्य:

याकोब आणि राहेल यांना झालेल्या लहान मुलाचे नाव बन्यामीन होते. त्याच्या नावाचा अर्थ, "माझ्या उजव्या हाताचा मुलगा."

  • तो आणि त्याचा भाऊ योसेफ हेच राहेलीचे मुलगे होते, जी बन्यामीनाला जन्म दिल्यानंतर मेली.
  • बन्यामीनाचे वंशज, इस्राएलाच्या बारा वंशाजांपैकी एक बनले.
  • शौल राजा हा इस्राएलाच्या बन्यामीन वंशातला होता.
  • प्रेषित पौल सुद्धा बन्यामीन वंशातला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएल, याकोब, योसेफ, पौल, राहेल, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बरब्बा

तथ्य:

येशूला अटक करण्यात आली तेव्हा बरब्बा यरुशलेममध्ये कैदी होता.

  • बरब्बा हा रोमन सरकारच्या विरोधात खून आणि बंडखोर असे गुन्हे करणारा गुन्हेगार होता.
  • जेव्हा पंतय पिलाताने बरब्बा किंवा येशू या दोघांपैकी एकाला सोडण्याची घोषणा केली तेव्हा लोकांनी बरब्बाला निवडले.
  • म्हणून पिलाताने बरब्बाला सोडून दिले, परंतु येशूला दोषी ठरवून ठार मारण्यासाठी दिले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: पिलात, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बर्णबा

तथ्य:

प्रेषितांच्या काळात वास्तव्य करणाऱ्या आद्य ख्रिस्ती लोकांपैकी बर्णबा एक होता.

  • बर्णबा हा कुप्र बेटावर जन्मलेला लेवी वंशातील इस्राएली होता.
  • जेंव्हा शौल (पौल) ख्रिस्ती बनला, तेव्हा बर्णबा याने इतर विश्वासू बांधवांना त्याला एक बंधू म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.
  • बर्णबा आणि पौलाने येशूविषयी सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये एकत्र प्रवास केला.
  • त्याचे नाव योसेफ होते, परंतु त्याला "बर्णबा" असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ "बोधाचा मुलगा" असा होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्ती, कुप्र, शुभ वार्ता, लेवी, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणाऱ्याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला.

  • बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले. आय

  • एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले.

  • Strong's: G921


बर्थलमय

तथ्य:

बर्थलमय हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.

  • इतर प्रेषितांबरोबरच, बर्थलमयला लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आणि येशूच्या नावाने चमत्कार करण्यासाठी पाठविले गेले.
  • ज्यांनी येशूला स्वर्गात परतताना पाहिले तेव्हा तो देखील त्यांच्यापैकी एक होता.
  • काही आठवड्यानंतर, यरुशलेममधील इतर प्रेषितांबरोबर पेन्टेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शुभवर्तमान, पवित्र आत्मा, चमत्कार, पेंटीकॉस्ट, बारा

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बलाम

तथ्य:

बलाम हा मूर्तिपूजक संदेष्टा होता, ज्याला बालाक राजाने इस्राएल राष्ट्राला शाप देण्याकरता भाड्याने नियुक्त केले, त्यावेळी इस्राएल लोक मवाबाच्या उत्तरेस असलेल्या यार्देन नदीच्या जवळ तळ देऊन कनानमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत होते.

  • बलाम हा पथोर नगराचा रहिवाशी होता. जे फरात नदीच्या काठी, जवळपास मवाबापासून 400 मैल दूर अंतरावर वसलेले होते.
  • मिद्यानी राजा, बालाक, इस्राएल लोकांच्या संख्येला आणि ताकदीला खूप घाबरला होता, म्हणून त्याने बलामाला इस्राएल लोकांना शाप देण्यासाठी नियुक्त केले.
  • जसा बलाम इस्राएल कडे प्रवासासाठी निघाला, परमेश्वराचा एक दूत त्याच्या रस्त्यामध्ये उभा राहिला म्हणून बलामाची गाढवी थांबली. परमेश्वराने बालामाच्या गाढवीला बलामाशी बोलण्याची क्षमता दिली.
  • परमेश्वराने बलामाला इस्राएल लोकांस शाप देण्याची परवानगी दिली नाही, त्याउलट परमेश्वराने बलामास त्यांना आशीर्वाद देण्याची आज्ञा केली.

नंतर मात्र, बलामाने इस्राएल लोकांना बाल-पौराची उपासना करण्यास प्रभावित करून त्यांच्यावर दुष्टता आणली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: आशीर्वाद, कनान, शाप, गाढव, फरात नदी, यार्देन नदी, मिद्यान, मावाब, पौर).

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बवाज

तथ्य:

बवाज हा एक इस्राएली मनुष्य होता, जो रुथचा पती, दावीद राजाचा पणजा, आणि येशू ख्रिस्ताचा पूर्वज होता.

  • जेंव्हा शास्ते इस्राएलमध्ये होते तेंव्हाच्या काळात बवाज राहत होता.
  • तो नामी नावाच्या इस्राएली स्त्रीचा नातेवाईक होता, जी तिचा पती आणि मुलगे मवाबामध्ये मेल्यानंतर इस्राएलला परत आली होती.
  • बवाजाने नामीची विधवा असलेली सून रुथ हिची "सुटका" केली, आणि तिच्याशी लग्न करून, तिला पती आणि मुलांबरोबर भवितव्य दिले.
  • कसे येशूने आपल्याला पापापासून वाचवले आणि सोडवले, याचे चित्र तो पाहत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मावाब, सुटका, रुथ)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


बाबेल

तथ्य:

मेसोपोटेमियाच्या दक्षिणेच्या भागात शिनार नावाच्या एका क्षेत्रामध्ये बाबेल हे एक प्रमुख शहर होते. शिनारला नंतर बाबेल असे संबोधले गेले.

  • बाबेलचे नगर हे हामचा नातू निम्रोद याने स्थापन केले, त्याने शिनार या भागावर राज्य केले.
  • शिनारचे लोक गर्विष्ठ झाले आणि त्यांनी स्वर्गात पोहोचण्यासाठी उंच बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याला "बाबेलचा बुरुज" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • कारण बुरुज बांधणाऱ्या लोकांनी परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे सगळीकडे पसरण्यास नकार दिला, देवाने त्यांचे बोलणे एकमेकांना समजू नये म्हणून त्यांच्या भाषेचा घोटाळा केला. यामुळे त्यांना पृथ्वीवरील अनेक ठिकाणी राहायला जाणे भाग पडले.
  • "बाबेल" या शब्दाचा मूळ अर्थ "गोंधळ (घोटाळा)" आहे, तेथे परमेश्वराने लोकांच्या भाषेमध्ये घोटाळा केला त्यावरून हे नाव त्या ठिकाणाला पडले आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेल, हाम, मेसोपोटामिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बाबेल, बाबेलास, बाबेली

तथ्य:

बाबेल हे शहर बाबेलच्या प्राचीन भागाची राजधानी होते, जे बाबेल साम्राज्याचा भाग होते.

  • बाबेल हे फरात नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर होते. शेकडो वर्षापूर्वी याच भागात बाबेलचा बुरूज बांधला गेला होता.
  • कधीकधी "बाबेल" हा शब्द संपूर्ण बाबेल साम्राज्याला सूचित करतो. उदाहरणार्थ, "बाबेलच्या राजाने" केवळ बाबेल शहरावर नव्हे तर संपूर्ण साम्राज्यावर राज्य केले.
  • बाबेलाचे लोक शक्तिशाली लोक होते ज्यांनी यहूदाच्या राज्यावर आक्रमण केले आणि 70 वर्षांपर्यंत लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून ठेवले.
  • या प्रांताच्या भागाला "खास्द्यांचा देश" आणि तिथल्या लोकांना "खास्दी" म्हणून ओळखण्यात आले. याचा परिणाम म्हंणून "खास्दी" हा शब्द वारंवार बाबेलला संदर्भित किंवा सूचित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: सिनेकडॉक
  • नवीन करारामध्ये, "बाबेल" हा शब्द कधीकधी मूर्तीपूजक व इतर पापी वर्तणुकीशी संबंधित असलेली ठिकाणे, लोक आणि विचारशील तत्वांचा उल्लेख करण्यासाठी रूपक म्हणून वापरला जातो.
  • "मोठी नगरी बाबेल" किंवा "बाबेलचे पराक्रमी शहर" हा वाक्यांश प्राचीन शहर बाबेल सारख्याच मोठ्या, समृद्ध आणि पापी अशा एखाद्या शहरासाठी किंवा राष्ट्रासाठी रूपक अर्थाने सूचित करण्यासाठी वापरले जाते. (पहा: रूपक

(हे सुद्धा पहा: बाबेल, खास्दी, यहूदा, नबुखद्नेस्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:06 सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्राएल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.

  • 20:07 परंतु काही वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली. त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.

  • 20:09 नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.

  • 20:11 त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला

  • Strong's: H3778, H3779, H8152, H894, H895, H896, G897


बारुख

तथ्य:

जुन्या करारांमध्ये बारुख नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • एक बारुख जो (जाक्कायाचा पुत्र होता) त्याने यरुशलेमेची भिंत बांधण्यास नहेम्याला मदत केली.
  • नहेम्याच्या कारकिर्दीत, अजून एक बारुख (जो कोल-होज चा पुत्र होता) नावाचा सरदार होता ज्याने भिंत बांधून पूर्ण झाल्यानंतर यरुशलेमेत वस्ती केली.
  • अजून एक वेगळा बारुख जो (नरीयाचा मुलगा) यिर्मया संदेष्ट्याचा मदतनीस होता, ज्याने त्याला विविध व्यावहारिक कार्यांत मदत केली जसे, देवाने यिर्मयाला दिलेल्या संदेशांना लिहून काढणे आणि नंतर त्या संदेशांना लोकांना वाचून दाखवणे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शिष्य, यिर्मया, यरूशलेम, नहेम्या, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बाल

तथ्य:

"बाल" म्हणजे "प्रभु" किंवा "स्वामी" हे कनानी लोकांद्वारे उपासना केल्या गेलेल्या पहिल्या खोट्या देवाचे नाव होते.

  • तेथे अनेक स्थानिक खोट्या देवतांची देखील "बाल" अशी नावे होती, त्यापैकी "बाल पौर" हे एक नाव होते. कधीकधी हे सर्व देव एकत्रितपणे "बाल" म्हणून ओळखले जातात.
  • काही लोकांची नावे अशी होती ज्यात "बाल" हा शब्द समाविष्ट होता.
  • बालच्या उपासनेत लहान मुलांचा बळी देणे व वेश्यांचा उपयोग करणे यासारख्या वाईट दुष्कृत्यांचा समावेश होता.
  • इस्राएल लोकांनी त्यांच्या इतिहासादरम्यान वेगवेगळ्या कालखंडात, त्यांच्याभोवती असलेल्या मूर्तिपूजक राष्ट्रांचे अनुकरण करत इस्राएली लोक बालच्या उपासनेत गंभीरपणे सामील झाले होते.
  • राजा अहाबाच्या कारकीर्दीत, परमेश्वराचा संदेष्टा एलीया याने बालचे अस्तित्व नाही आणि यहोवा केवळ एकच खरा देव आहे हे लोकांसमोर सिद्ध करण्यासाठी एक परीक्षा दिली. याचा निष्कर्ष म्हणून, बालच्या संदेष्ट्यांचा नाश झाला आणि लोकांनी पुन्हा यहोवाची उपासना करण्यास सुरुवात केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, अशेरा, एलीया, खोटे देव, वेश्या, यहोवा

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:02 अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बाल देवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले.

  • 19:06 तेंव्हा इस्त्रायलाच्या राज्यातील सर्व लोक, बाल देवतेच्या 450 संदेष्टयांसहित कर्मेल डोंगराकडे आले. एलीया लोकांस म्हणाला,‘‘तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ? जर याव्हे हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा! जर बाल देव असेल, तर त्याची सेवा करा!”

  • 19:07 मग एलीया बाल देवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका.

  • 19:08 मग बाल देवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,‘‘बाल देवता, आमचे ऐका!’’

  • 19:12 तेंव्हा लोकांनी बाल च्या संदेष्ट्यांना पकडले. नंतर एलीयाने त्यांना दूर नेऊन मारून टाकले.

  • Strong's: H1120, G896


बालजबूल

तथ्य:

बालजबुल हे सैतानाचे किंवा दुष्टाचे दुसरे नाव आहे. काहीवेळा त्याला "बालजबुल (Beelzebub)" असे सुद्धा लिहितात.

  • या शब्दाचा शब्दशः अर्थ "माशांचा देव" ज्याचा अर्थ "भूतांवरचा शासक" असा होतो. परंतु या शब्दाचे भाषांतर करण्यापेक्षा, मूळ शब्दाच्या अगदी जवळ असलेल्या शब्दाचा उपयोग करून भाषांतर करणे चांगले.
  • ह्याचे भाषांतर, "बालजबुल दुष्ट" असे केले जाऊ शकते, जेणेकरुन हे स्पष्ट होईल की, ते कोणास संदर्भित केले जात आहे.
  • हे नाव खोटे देव एक्रोनच्या "बाल-जबूब" ह्याच्या नावाशी संबंधित आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: भुत, एक्रोन, सैतान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बाशा

तथ्य:

बाशा इस्राएलमधील दुष्ट राजांपैकी एक होता ज्याने इस्राएली लोकांना मूर्तीपूजा करण्यास प्रभावित केले.

  • ज्यावेळी आसा याहुद्यांचा राजा होता, त्यावेळी बाशा इस्राएलचा तिसरा राजा होता ज्याने चोवीस वर्षे राज्य केले.
  • तो एक लष्करी सेनापती होता, ज्याने पूर्वीचा राजा, नादाब याचा वध केला आणि राजा बनला.
  • बाशाच्या कारकिर्दीत इस्राएल व यहूदा या राज्यांमध्ये अनेक युद्धे झाली, विशेषत: यहूदाच्या आसा राजाबरोबर.
  • बाशाच्या अनेक पापांमुळे अखेरीस परमेश्वराने त्याला मारून त्याच्या पदावरून दूर केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः आसा, खोटे देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बाशान

तथ्य:

बाशान नावाचा जमिनीचा एक प्रांत होता जो गालील समुद्राच्या पूर्वेस होता. त्यां व्यापलेल्या भागात आताचे सिरीया आणि गोलानच्या उंच रांगा आहेत.

  • जुन्या करारामधील अश्रयांचे नगर ज्याचे नाव "गोलान" होते, ते बाशानाच्या प्रांतात स्थित होते.
  • बाशान हा एक खूप सुपीक प्रदेश होता जो त्याच्यात असणाऱ्या ओकच्या झाडांसाठी आणि कुरणात चारणाऱ्या प्राणी (गाय किंवा मेंढ्या) यासाठी ओळखला जात होता.
  • उत्पत्ति 14 मध्ये नमूद करण्यात आले आहे की बाशान हे अनेक राजे व त्यांच्या राष्ट्रांदरम्यानच्या युद्धाचे ठिकाण होते.
  • मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएलांच्या वाळवंटातील भटकंती दरम्यान, त्यांनी बाशान प्रदेशाचा भाग ताब्यात घेतला.
  • काही वर्षानंतर, शलमोन राजाने त्या प्रांतातून पुरवठा मिळवला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, ओक, गलील समुद्र, सीरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बिरुया

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, बिरुया हे मासेदोनियाच्या अग्नेयेस, थेस्सलनीकापासून जवळपास 80 किलोमीटर दक्षिणेस असलेले एक समृद्ध ग्रीक शहर होते.

  • पौल व सीला हे बिरुया शहरात पळून गेले, कारण त्यांच्या सहख्रिस्ती लोकांनी त्यांना काही यहूदी लोकांपासून वाचण्यास मदत केली, ज्यांनी थेस्सलनीकामध्ये त्यांना त्रास दिला होता.
  • जेंव्हा बिरुयामधील लोकांनी पौलाचा संदेश ऐकला, तेंव्हा त्यांनी वचनांमध्ये शोधून पहिले की, जे काही तो बोलत आहे ते बरोबर आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मासेदोनिया, पौल, सीला, थेस्सलनीका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बेथ-शेमेथ

तथ्य:

बेथ-शेमेथ हे कनानी शहराचे नाव होते, जे यरुशलेम पासून जवळपास 30 किलोमीटर पश्चिमेस होते.

  • यहोशवाच्या नेतृत्वाच्या काळात, इस्राएल लोकांनी बेथ-शेमेथ वर कब्जा केला.
  • बेथ-शेमेथ या शहराला लेवी याजकांना राहण्यासाठी वेगळे करण्यात आले होते.
  • जेव्हा पलिष्टी लोक कब्जा करून नेलेला कराराचा कोश यरुशलेमकडे परत आणत होते, तेव्हा बेथ-शेमेश हे पहिले शहर होते, जेथे ते कराराबरोबर थांबले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: कराराचा कोश, कनान, यरूशलेम, यहोशवा, लेवीय, पलीष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बेथलेहेम, एफफ्राथ

तथ्य:

बेथलेहेम हे इस्राएलमधील यरुश्लेम शहराच्या बाजूचे लहान शहर होते. हे "एफफ्राथ" या नावाने सुद्धा ओळखले जाते, जे कदाचित त्याचे मूळ नाव आहे.

  • बेथलेहेम या शहराला "दाविदाचे शहर" असेही म्हणतात, कारण दावीद राजाचा जन्म तेथे झाला होता.
  • मीखा संदेष्ट्याने सांगितले होते की, मनश्शे हा "बेथलेहेम एफफ्राथ" येथू येईल.
  • या भविष्यवाणीची पूर्तता अनेक वर्षांनी, येशू बेथलेहेमात जन्मल्यानंतर झाली.
  • बेथलेहेम या नावाचा अर्थ "भाकरीचे घर" किंवा "अन्नाचे घर" असा होतो.

(हे सुद्धा पहा: कालेब, दावीद, मीखा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता.

  • यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल. मीखा संदेष्टयाने सांगितले की मसिहा बेथलेहेम नगरामध्ये जन्मास येईल.

  • योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.

  • आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’

  • Strong's: H376, H672, H1035, G965


बेथानी

तथ्य:

बेथानी गाव यरुशलेमच्या पूर्वेस सुमारे 2 मैलांवर असलेल्या जैतून पर्वताच्या पूर्वेकडील उताऱ्याच्या पायथ्याशी वसलेले होते.

  • यरीहो ते यरुशलेम या दोघांना जोडणाऱ्या रस्त्याच्या जवळ बेथानी होते.
  • येशूने अनेकदा बेथानी गावाला भेट दिली, जिथे त्याचे जवळचे मित्र लाजर, मार्था, आणि मरिया राहत होते.
  • येशूने लाजराला मरणातून जिथे उठवले, ती जाग बेथानी म्हणून विशेषरित्या प्रसिद्ध आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: यरीहो, यरूशलेम, लाजर, मार्था, मरीया (मार्थाची बहीण), जैतून पर्वत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बेथेल

तथ्य:

बेथेल हे यरुशलेमच्या उत्तरेस वसलेले कनान मधील शहर होते. त्याला सुरवातीला लूज असे म्हंटले जात होते.

  • देवाचे वचन पहिल्यांदा मिळाल्यानंतर, अब्रामाने (अब्राहामाने) बेथेल जवळ देवासाठी एक वेदी बांधली. त्या वेळेपर्यंत, प्रत्यक्षात त्या शहराचे नाव बेथेल हे नव्हते, पण ते सामान्यपणे "बेथेल" असे संदर्भित केले जाते, जे बऱ्यापैकी प्रसिद्ध होते.
  • जेंव्हा याकोब त्याच्या भावापासून पाळला, तेंव्हा त्याने त्या शहराजवळ एक रात्र घालवली आणि तो त्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या जमिनीवर झोपला. जेंव्हा तो झोपेत होता, त्याने एक स्वप्न पहिले, ज्यामध्ये त्याने पहिले की स्वर्गदूत एका शिडीच्या सहाय्याने स्वर्गात वर आणि खाली करत होते.
  • जोपर्यंत याकोबाने तिचे नाव "बेथेल" ठेवले नाही, तोपर्यंत त्या शहराला हे नाव नव्हते. * हे स्पष्ट करण्यासाठी, काही भाषांतरे, अब्राहमच्या परिच्छेदामध्ये त्याच बरोबर (नाव बदलण्याच्या आधी) जेंव्हा याकोब तेथे आला, तेंव्हा त्याचे भाषांतर "लूज (नंतर बेथेल असे म्हंटले गेले)" असे करतात.
  • जुन्या करारामध्ये बेथेल ह्याचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे, आणि हे असे ठिकाण आहे जिथे अनेक महत्वाच्या घटना घडल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, वेदी, याकोब, यरुशलेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


बैरशेबा

तथ्य:

जुन्या कराराच्या काळात, बैरशेबा हे शहर, यरुशलेमेच्या नैऋत्येस सुमारे 45 मैलावर एका वाळवंटी प्रदेशात, ज्याला आताच्या काळात नेगेव असे म्हणतात, तिथे वसलेले होते.

  • बेरशेबाच्या आसपासचे वाळवंट हे माळरान होते जेथे अब्राहामाने आपल्या तंबूतून घालवून दिल्यावर हागार व इश्माएल भटकत राहिले.
  • या शहराच्या नावाचा अर्थ "शपथेची विहीर" असा होतो. जेंव्हा अब्राहामाने, अबीमलेख राजाच्या मनुष्यांना त्याच्या हद्दीतील विहीर बंद करण्यासाठी शिक्षा न करण्याची शपथ घेतली तेंव्हा त्या जागेला हे नाव पडले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अबीमलेख, अब्राहाम, हागार, इश्माएल, यरुशलेम, शपथ घेणे)

===== पवित्र शास्त्रातील संदर्भ:=====


मत्तय, लेवी

तथ्य:

मत्तय हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याचे प्रेषित होण्यासाठी निवडले. त्याला लेवी म्हणून सुद्धा ओळखले जायचे, अल्फियसचा मुलगा.

  • लेवी (मत्तय) हा येशूला भेटण्यापूर्वी कफर्णहुमचा जकातदार होता.
  • मत्तयाने एक शुभवर्तमान लिहिले, जे त्याच्या नावाने आहे.
  • लेवी नावाच्या इतर अनेक पुरुषांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, लेवीय, जकातदार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मनश्शे

तथ्य:

जुन्या करारांमध्ये मनश्शे नावाचे पाच वेगवेगळे पुरुष होते:

  • मनश्शे हे योसेफाच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव होते.

  • मनश्शे आणि त्याचा छोटा भाऊ एफ्राईम या दोघांना योसेफाचा पिता याकोब ह्याने दत्तक घेतले होते, ज्याने त्याच्या वंशजांना इस्राएलाच्या बारा कुळांमध्ये असण्याचा विशेषाधिकार दिला.

  • मनश्शेच्या वंशजांनी इस्राएलाच्या कुळांपैकी एक कुळ बनवले.

  • मनश्शेच्या कुळाला बऱ्याचदा "मनश्शेचे अर्धे कुळ" असे संबोधले जाते, कारण त्याच्या कुळातील काही भाग हा कनानच्या भूमीत, यार्देन नदीच्या पश्चिमेला स्थायिक झाला. * त्या कुळाचा उर्वरित भाग यार्देन नदीच्या पूर्वेला स्थायिक झाला.

  • यहूद्यांच्या राजांपैकी एका राजाचे नाव मनश्शे होते.

  • मनश्शे राजा हा दुष्ट राजा होता, ज्याने स्वतःच्या मुलांचे खोट्या देवांसमोर होमार्पण म्हणून बलिदान केले.

  • देवाने मनश्शे राजाला शत्रू सैन्याच्या हातामध्ये देऊन त्याला शिक्षा केली. मनश्शे देवाकडे वळला आणि जिथे जिथे मूर्तींची उपासना होत होती त्या सर्व वेद्यांचा त्याने नाश केला.

  • मनश्शे नावाचे दोन मनुष्य एज्राच्या काळात राहत होती. त्या मनुष्यांना त्यांच्या मूर्तिपूजक पत्नींना घटस्फोट देणे गरजेचे होते, ज्यांनी त्यांना खोट्या देवांची उपासना करण्यासाठी प्रभावित केले होते.

  • अजून एक मनश्शे हा काही दानच्या लोकांचा आजोबा होता, जे खोट्या देवांचे याजक होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वेदी, दान, एफ्राईम, एज्रा, खोटे देव, याकोब, यहूदा, मूर्तिपूजक, इस्राएलाची बारा कुळे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मरिया (मार्थाची बहिण)

तथ्य:

मरिया ही बेथानी येथील स्त्री होती, जी येशूचे अनुसरण करत होती.

  • मरीयेला एक बहिण होती तिचे नाव मार्था आणि एक भाऊ होता त्याचे नाव लाजर होते, आणि ते दोघेही येशूचे अनुसरण करत होते.
  • एके वेळी येशूने म्हंटले की, मरीयेने जो चांगला तो वाटा निवडला, जेंव्हा तिने मार्थेप्रमाणे जेवण बनवण्यासाठी चिंतातूर होण्यापेक्षा, येशू काय शिकवीत होता हे ऐकणे निवडले.
  • येशूने मरिया हिचा भाऊ लाजर ह्याला मरणातून पुन्हा जिवंत केले.
  • त्यानंतर काही काळाने, जेंव्हा येशू बेथानी येथील कोणाएकाच्या घरी जेवत असताना, मरीयेने त्याची उपासना करण्यासाठी म्हणून मौल्यवान सुगंधी अत्तर त्याच्या पायावर ओतले.
  • असे केल्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली आणि म्हणाला की, ती माझे शरीर दफनविधीसाठी तयार करत आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथानी, धूप, लाजर, मार्था)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मरिया मग्दालीया

तथ्य:

मरिया मग्दालीया ही अनेक स्त्रियांपैकी एक होती, ज्यांनी येशुंवर विश्वास ठेवला आणि त्याच्या सेवेमध्ये त्याच्या मागोमाग जात होती. तिच्यातून येशूने सात भुते काढली होती, जी तिच्यावर नियंत्रण करीत होती, ह्यासाठी ती ओळखली जात होती.

  • मरिया मग्दालीया आणि इतर स्त्रियांनी येशूला आणि त्याच्या शिष्यांना आधार देऊन मदत केली.

तिचा उल्लेख त्या स्त्रियांपैकी एक म्हणून केला आहे, ज्यांनी येशूला तो मरणातून उठल्यानंतर पहिल्यांदा पहिले.

  • जेंव्हा मरिया मग्दालीया रिकाम्या कबरेच्या बाहेर उभी होती, तेंव्हा तिने येशूला तिथे उभे राहिलेले पहिले आणि त्याने तिला सांगितले की, जा आणि इतर शिष्यांना सांग की, तो जिवंत उठला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: भुत, भूतग्रस्त)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मरीया, येशूची आई

तथ्य:

मरीया नासरेथ शहरात राहणारी एक तरुण स्त्री होती जी योसेफ नावाच्या एका पुरुषाशी विवाह करण्यास वचनबद्ध झाली होती. देवाने मसिहा, देवाचा पुत्र येशू याची माता होण्यासाठी मरीयाची निवड केली.

  • मरीया कुमारी असतानादेखील, पवित्र आत्मा चमत्कारिक रीतीने ती गर्भवती राहण्यासाठी निमित्त झाला.
  • एका देवदूताने मरीयाला सांगितले की तिच्याकडे जन्मलेला मुलगा देवाचा पुत्र आहे आणि तिने त्याचे नाव येशू असे ठेवले पाहिजे.
  • मरीयेने देवावर प्रेम केले आणि तो तिच्यासाठी दयाळू झाला म्हणून तिने त्याची स्तुती केली.
  • योसेफाने मरीयेशी विवाह केला, पण बाळाचा जन्म होईपर्यंत ती एक कुमारी राहिली.
  • मेंढपाळ आणि मागी लोकांनी बाळ येशुबद्दल ज्या अद्भुत गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींबद्दल मरीयेने फार गांभीर्याने विचार केला.
  • मरीया आणि योसेफ हे बाळ येशूला मंदिरात समर्पित करण्यासाठी घेऊन गेले. नंतर हेरोद राजाने बाळाला मारण्याच्या रचलेल्या कटातून सुटका करून घेण्यासाठी, ते त्याला मिसरास घेऊन गेले. अखेरीस ते नासरेथकडे परत आले.
  • येशू प्रौढ असताना, जेंव्हा त्याने काना येथील लग्नात पाण्याचा द्राक्षरस केला, तेंव्हा मरीया त्याच्यासोबत होती.
  • शुभवर्तमाने असेही नमूद करतात की, क्रुसावर येशू मरत असताना मरीया तेथे होती. त्याने आपला शिष्य योहान याला, आपल्या आईप्रमाणे तिची काळजी घेण्यास सांगितले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: काना, मिसर, महान हेरोद, येशू, योसेफ, देवाचा पुत्र, कुमारी).

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:04 जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तेंव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील मरीयेस अचानक प्रकट झाला. ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो परात्पर परमेश्वराचा पुत्र असून सर्वकाळ राज्य करिल.’’

  • 22:05 देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.’’ देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर मरीयेने विश्वास ठेविला.

  • 22:06 देवदूताच्या भेटीनंतर लगेच मरीया अलीशिबा हीस भेटण्यास गेली मरीयेचे हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली.

  • 23:02 देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस. तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे.

  • 23:04 योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.

  • 49:01 देवाच्या एका दूताने मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले.

  • Strong's: G3137


मर्दखय

तथ्य:

मर्दखय हा एक यहुदी मनुष्य पारसाच्या देशात रहात होता. तो त्याची चुलतबहिण एस्तेरचा संरक्षक होता, जी नंतर पारसाचा राजा अहश्वेरोश याची पत्नी बनली.

  • शाही राजवाड्यात काम करत असताना, मर्दखयने राजा अहश्वेरोशाचा वध करण्यासाठी एकत्र जमून योजना करणाऱ्या पुरुषांना ऐकले. त्याने हे वृत्त सांगितले आणि राजाचे प्राण वाचले.
  • काही काळानंतर, मार्दखायला हे सुद्धा कळाले की, पारसाच्या राज्यातील सर्व यहुद्यांना मारण्याची योजना बनवली जात आहे. त्याने एस्तेरला आपल्या लोकांना वाचवण्यासाठी राजाकडे आवाहन करण्याचा सल्ला दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, बाबेल, एस्तेर, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मलकीसदेक

तथ्य:

ज्यावेळी अब्राहम जिवंत होता, त्यावेळी मलकीसदेक हा शालेम (नंतरचे "यरुशलेम") नावाच्या शहराचा राजा होता.

  • मलकीसदेकच्या नावाचा अर्थ "नितीमत्वाचा राजा" आणि त्याचे शीर्षक "शालेमचा राजा" ह्याचा अर्थ "शांतीचा राजा" असा होतो.
  • त्याला "परात्पर देवाचा याजक" असे म्हटले आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये मलकीसदेकाचा पहिल्यांदा उल्लेख, जेंव्हा अब्राहाम त्याचा भाचा लोट ह्याला शक्तिशाली राजांच्या हातातून सोडवून परत येत होता, तेंव्हा तो अब्राहमाला भाकर आणि द्राक्षरस घेऊन भेटायला आला असा केलेला आहे. अब्राहामाने मलकीसदेकाला त्याच्या लुटीतील दहावा भाग दिला.
  • नवीन करारामध्ये, मलकीसदेकाचे वर्णन असा कोणीतरी ज्याला आई किंवा वडील कोणी नाहीत असे केले आहे. त्याला एक याजक आणि राजा असे नाव दिले गेले जो पुन्हा राज्य करील.
  • नवीन करारसुद्धा असे म्हणतो की, येशू हा मलकीसदेकाप्रमाणे युगानयुग याजक आहे. इस्राएली याजक म्हणून येशू लेवी वंशातून उतरला नाही. त्याचे याजकपण थेट देवाकडून होते, जसे मलकीसदेकाचे होते.

पवित्र शास्त्रातील त्याच्या या वर्णनाच्या आधारावर, मलकीसदेक हा एक मानवी याजक होता, ज्याला देवानेसुधा येशूचे प्रतिनिधित्व किंवा त्याच्याकडे निर्देश करण्यासाठी निवडले होते, शांती आणि धार्मिकतेचा सार्वकालिक राजा आणि महान महायाजक.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, सार्वकालिक, महायाजक, यरुशलेम, लेवी, याजक, धार्मिक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मलाखी

तथ्य:

यहूदा राज्यासाठी असलेला संदेष्ट्यांपैकी मलाखी एक होता. ख्रिस्त पृथ्वीवर असण्याच्या 500 वर्षे आधी तो होता.

  • बाबेलाच्या बंदिवासातून परत आल्यानंतर, इस्राएलांचे मंदीर पुन्हा बांधले जात असण्याच्या काळामध्ये मलाखीने भविष्यवाणी केली.
  • मलाखी असण्याच्या काळाच्या जवळपास एज्रा आणि नहेम्या हे दोघेही होते.
  • मलाखीचे पुस्तक हे जुन्या करारातील शेवटचे पुस्तक आहे.
  • जुन्या करारातील इतर संदेष्ट्याप्रमाणे, मलाखीने सुद्धा लोकांना त्यांच्या पापाबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी आणि परत यहोवाची उपासना करण्यासाठी आवाहन केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पाहा: बाबेल, बंदीवास, एज्रा, यहुदा, नहेम्या, संदेष्टा, पश्चात्ताप, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मवाब, मवाबी, मवाबांच्या

तथ्य:

‌‌‌मवाब हा लोटच्या मोठ्या मुलीचा मुलगा होता. हे जमिनीचे नाव देखील पडले, जिथे तो आणि त्याचे कुटुंब राहत होते. "मवाबी" या शब्दाचा संदर्भ, अशा मनुष्याशी येतो, जो मवाबाचा वंशज आहे, किंवा जो मवाब देशामध्ये राहतो.

  • मवाब देश मृत समुद्राच्या पूर्वेस स्थित होता.
  • मवाब हे बेथलेहेम गावापासून दक्षिणपूर्व दिशेस होते, जिथे नओमीचे कुटुंब राहत होते.
  • बेथलेहेममधील लोकांनी रुथला "मवाबी" असे म्हंटले, कारण ती मवाब देशात राहणारी स्त्री होती. * या शब्दाचे भाषांतर "मवाबी स्त्री" किंवा "मवाब देशातील स्त्री" असे देखील केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथलेहेम, यहुदिया, लोट, रुथ, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


महान हेरोद

तथ्य:

जेंव्हा येशूचा जन्म झाला त्यावेळी महान हेरोद हा यहुदावर राज्य करत होता. तो अनेक अदोमी राज्यांच्यापैकी पहिला होता, ज्याचे नाव हेरोद होते, ज्याने रोमी सम्राटाच्या भागांवर राज्य केले.

  • त्यांच्या पूर्वजांनी यहुदी धर्म स्वीकारला आणि त्याला यहुद्यांसारखे वाढवले.
  • कैसर औगुस्त ह्याने त्याचे नाव "हेरोद राजा" ठेवले, जरी तो खरा राजा नव्हता तरीही. त्याने यहुदातील यहुद्यांवर 33 वर्षापर्यंत राज्य केले.
  • महान हेरोद हा त्याने बांधण्यास सांगितलेल्या सुंदर इमारतींसाठी आणि यरुशलेममधील यहुदी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या हुकुमासाठी प्रसिद्ध आहे.
  • हेरोद हा अतिशय क्रूर राजा होता आणि त्याने पुष्कळ लोकांना मारले. जेंव्हा त्याने ऐकले की, "यहूद्यांच्या राजाचा" बेथेलहेमात जन्म झाला आहे, तेंव्हा त्याने त्या गावातील सर्व मुलांना मारून टाकले.

त्याचा मुलगा हेरोद अंतिपा आणि हेरोद फिल्लीप्प आणि त्याचा नातू हेरोद अग्रीप्पा हे रोमी शासक बनले. त्याचा पणतू हेरोद अग्रीप्पा II ("अग्रीप्पा राजा" असे म्हंटले), ह्याने यहुदाच्या संपूर्ण प्रांतावर राज्य केले.

(पहा: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हेरोद अंतिपा, यहूदा, राजा, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


माका

तथ्य:

  • माका हा अब्राहामचा भाऊ नाहोर ह्याच्या मुलांपैकी एक होता. जुन्या करारातील इतर मनुष्यांचे देखील हे नाव होते.

  • माका किंवा बेथ माका हे शहर, इस्राएलच्या उत्तरेस फार दूरवर नफताली वंशाच्या ताब्यात असलेल्या प्रांतात वसलेले होते.

  • हे एक महत्त्वाचे शहर होते आणि अनेक प्रसंगी शत्रूंनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

  • माका हे नाव अनेक स्त्रीयांचे होते, ज्यामध्ये दावीदाचा मुलगा अबशालोम ह्याच्या आईचा समावेश होता.

  • आसा राजाने आपली आजी माका हिला राणी होण्यापासून काढून टाकले कारण तिने अशेराची उपासना करण्यास प्रोत्साहन दिले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: आसा, आशेर, नाहोर, नफताली, इस्राएलाचे बारा वंशांज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • Strong's: H4601

मार्क म्हंटलेला योहन

तथ्य:

मार्क म्हंटलेला योहान, हा "मार्क" म्हणून सुद्धा परिचित होता, जो पौलाबरोबर त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या प्रवासामध्ये सोबत असणाऱ्या मनुष्यांपैकी एक होता. तो बहुधा मार्कच्या शुभवर्तमानाचा लेखक आहे.

  • मार्क म्हंटलेला योहानाने त्याचा भाऊ बर्णबा आणि पौल यांच्याबरोबर त्यांच्या सुवार्ताप्रसाराच्या प्रवासामध्ये सोबत दिली.
  • जेंव्हा पेत्राला तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते, तेंव्हा सर्व विश्वासी एकत्र मिळून मार्क म्हंटलेल्या योहानाच्या आईच्या घरी प्रार्थना करत होते.
  • मार्क हा प्रेषित नव्हता, पण त्याला पौल आणि पेत्र या दोघांनी शिकवले होते, आणि त्याने त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्याबरोबर काम केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बर्णबा, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मार्था

तथ्य:

मार्था ही बेथानी येथील स्त्री होती, जी येशूचे अनुसरण करत होती.

  • मार्थेला एक बहिण होती तिचे नाव मरिया आणि एक भाऊ होता त्याचे नाव लाजर होते, आणि ते दोघेही येशूचे अनुसरण करत होते.
  • एक वेळ जेंव्हा येशूने त्यांच्या घरी भेट दिली, तेंव्हा मार्थेची जेवणावळीच्या तयारीसाठी तारांबळ उडाली असता, तिची बहिण मरिया मात्र येशुजवळ बसून तो शिकवत होता ते ऐकत होती.
  • जेंव्हा लाजर मेला, मार्थेने येशूला सांगितले की, ती येशू हाच देवाचा पुत्र आणि मसिहा आहे असा विश्वास करते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: लाजर, मरीया (मार्थाची बहीण))

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मासेदोनिया

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, मासेदोनिया हे रोमी प्रांत होते, जे प्राचीन ग्रीसच्या उत्तरेस स्थित होते.

  • पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेली काही मासेदोनियातील शहरे बिरुया, फिलिप्पै आणि थेस्सलनिका ही आहेत.
  • दर्शनाद्वारे, देवाने पौलाला मासेदोनियातील लोकांना सुवार्ता घोषित करण्यास सांगितले.
  • पौल आणि त्याचे सहकारी मासेदोनियाला गेले आणि तेथील लोकांना त्यांनी येशुबद्दल सांगितले आणि नवीन विश्वासनाऱ्यांना त्यांच्या विश्वासात वाढण्यास मदत केली.
  • पवित्र शास्त्रामध्ये, पौलाने मासेदोनियातील फिलिप्पै आणि थेस्सलनिका या शहरातील विश्वासनाऱ्यांना लिहिलेली पत्रे आढळतात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: विश्वास, बिरुया, विश्वास, सुवार्ता, ग्रीस, फिलिप्पै, थेस्सलनीका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मिद्यान, मिद्यानी

तथ्य:

मिद्यान हा अब्राहाम आणि त्याची पत्नी कटूरा ह्यांचा मुलगा होता. हे कनान भूमीच्या दक्षिणेला आणि उत्तरी अरबी वाळवंटामध्ये स्थित असलेल्या प्रांताचे आणि लोकसमूहाचे देखील नाव होते. त्या समूहातील लोकांना "मिद्यानी" असे म्हणत.

  • जेंव्हा मोशेने पहिल्यांदा मिसर सोडले, तेंव्हा तो मिद्यानच्या प्रांतात गेला, जिथे तो जिथ्रोच्या मुलींना भेटला आणि त्याने त्यांच्या कळपांना पाणी पाजण्यास त्यांना मदत केली. नंतर मोशेने जिथ्रोच्या मुलींपैकी एकीशी विवाह केला.
  • योसेफाला गुलामांच्या मिद्यानी व्यापाऱ्यांच्या समूहाने मिसरला नेले.
  • अनेक वर्षानंतर, मिद्यानी लोकांनी इस्राएली लोक कनानच्या भूमीत असताना त्यांच्यावर हल्ला केला आणि छापा टकला. गिदोनाने त्यांना हरवण्यासाठी इस्राएली लोकांचे नेतृत्व केले.
  • आताच्या युगातील अरबी कुळातील अनेकजण या समुहाचे वंशज आहेत.

(हे सुद्धा पहा: अरब, मिसर, कळप, गिदोन, जिथ्रो, मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:03 पण नंतर इस्त्राएल लोकांना देवाचा विसर पडला व ते पुन्हा मूर्तिपूजा करू लागले. मग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकांद्वारे त्यांचा पराभव केला.

  • 16:04 आता इस्त्राएली खूप भयभीत झाले व आपण मिघान्यांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुहेमध्ये राहू लागले.

  • 16:11 त्या सैनिकाचा मित्र म्हणाला,‘‘ हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य __ मिद्यानी__ सैन्यांचा पराभव करील असा होतो!’’

  • 16:14 देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले.

  • Strong's: H4080, H4084, H4092


मिर्याम

तथ्य:

मिर्याम ही अहरोन आणि मोशे ह्यांची मोठी बहिण होती.

  • जेंव्हा ती तरुण होती, तेंव्हा मिर्यामच्या आईने तिला तिचा लहान भाऊ मोशेवर लक्ष ठेवण्याची सूचना दिली होती, ज्याला लव्हाळ्याच्या टोपलीमध्ये नाईल नदीत सोडले होते. जेंव्हा फारोच्या मुलीला ते बाल सापडले आणि तिच्यासाठी त्या बाळाची देखभाल करणाऱ्या कोणाला तरी शोधात असता, मिर्यामने तिच्या आईला ते करण्यासाठी आणले.
  • जेंव्हा इस्राएली लोक मिसऱ्यांच्या तावडीतून तांबडा समुद्र पार करून सुटले, तेंव्हा मिर्यामने इस्राएली लोकांचे आनंदाच्या आणि आभार प्रदर्शनाच्या नाचात नेतृत्व केले.
  • अनेक वर्षानंतर, जसे इस्राएली लोक वाळवंटातून भटकत होते, मिर्याम आणि अहरोनाने मोशेबद्दल अपशब्द वापरले, कारण त्याने कुशी लोकातील एका स्त्रीला बायको करून घेतले.
  • तिच्या मोशेविरुद्धच्या बंडखोर बोलण्यामुळे, देवाने तिला कुष्टरोगाने आजारी पडण्यास भाग पडले. पण जेंव्हा मोशेने तिच्यासाठी मध्यस्थी केली तेंव्हा देवाने तिला बरे केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहरोन, कुश, मध्यस्थी, मोशे, नाईल नदी, फारो, बंड)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मिसर, मिसरी, मिसऱ्यांच्या

तथ्य:

मिसर कनान देशाच्या नैऋत्य दिशेला अफ्रिकेच्या ईशान्य भागातील एक देश आहे. मिसरी हा असा मनुष्य आहे, जो मिसर देशात राहतो.

  • प्राचीनकाळी, मिसर एक शक्तिशाली आणि समृद्ध देश होता
  • प्राचीन मिसर दोन भागांमध्ये विभागलेला होता, खालचा भाग (उत्तरी भाग, जिथे नाईल नदीचा प्रवाह खाली समुद्राकडे वाहत जातो) आणि वरचा भाग (दक्षिणी भाग). जुन्या करारामध्ये, या भागांना मूळ भाषेच्या मजकुरात "मिसर" आणि "पथ्रोस" असे संदर्भित केले गेले आहे.
  • अनेक वेळा, जेंव्हा कनानमध्ये फारसे अन्न नव्हते, तेव्हा इस्राएली कुटुंबप्रमुखांनी आपल्या कुटुंबासाठी अन्न विकत घेण्यासाठी मिसरला प्रवास केला.
  • कित्येक शेकडो वर्षांपर्यंत इस्राएली मिसरमध्ये गुलाम म्हणून होते.
  • महान हेरोदापासून वाचण्यासाठी योसेफ आणि मरिया हे येशू बाळासोबत मिसरला निघून गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: महान हेरोद, योसेफ, नाईल नदी, कुटुंबप्रमुख)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:04 त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता.

  • 08:08 योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.

  • 08:11 मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसरात पाठवतो.

  • 08:14 जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह मिसरात आला व ते सर्व तेथे राहू लागले.

  • 09:01 योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते.

  • Strong's: H4713, H4714, G124, G125


मिस्पा

तथ्य:

मिस्पा या नावाच्या बऱ्याच गावांचा उल्लेख जुन्या करारामध्ये केला आहे. ह्याचा अर्थ "टेहाळणी करण्याची जागा" किंवा "बुरुज"

  • जेंव्हा शौलाने दावीदाचा छळ सुरु केले, तेंव्हा त्याने त्याच्या कुटुंबाला मिस्पामध्ये, मोआब राजाच्या संरक्षणाखाली ठेवले.
  • एक शहर मिस्पा हे यहूदा आणि इस्राएल राज्यांच्या मध्ये वसलेले होते. ते एक प्रमुख लष्करी केंद्र होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: दावीद, यहूदा, इस्राएलाचे राज्य, मोआब, शौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मीखा

तथ्य:

मिखा हा यहुदाचा संदेष्टा येशूच्या सुमारे 700 वर्षापूर्वी होता, जेंव्हा यशया संदेष्टा सुद्धा यहुदामध्ये सेवा करत होता. अजून एक मिखा नावाचा मनुष्य शास्तेंच्या काळात राहत होता.

  • मीखाचे पुस्तक जुन्या कराराच्या समाप्तीजवळ आहे.
  • मीखाने अश्शुरी लोकांच्याकडून शोमरोनाच्या नाशाविषयी भविष्यवाणी केली.
  • मीखाने यहुदाच्या लोकांवर देवाची आज्ञा न पाळण्याबद्दल दोष लावला आणि त्यांना चेतावणी दिली की, त्यांचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करतील.
  • त्याची भविष्यवाणी देवामधील आशेच्या संदेशाने समाप्त होते, देव जो विश्वासू आहे आणि त्याच्या लोकांना वाचवतो.
  • शास्तेंच्या पुस्तकात, मीखा नावाच्या मनुष्याची गोष्ट सांगितली आहे, जो एफ्राइममध्ये राहत होता, आणि ज्याने चांदीची मूर्ती बनवली. एक तरुण याजक, जो त्याच्याबरोबर राहण्यास आला होता, त्याने ती मूर्ती आणि इतर वस्तू चोरून, त्या घेऊन तो दानी लोकांच्या समूहासोबत निघून गेला. * कालांतराने, दानी लोक आणि तो याजक लईश या शहरामध्ये स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी ती चांदीची मूर्ती उपासना करण्यासाठी स्थापन केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अशुशुरी, दान, एफ्राइम, खोटे देव, यशाया, यहूदा, शास्ते, लेवी, याजक, संदेष्टा, शोमरोन, चांदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

{{tag>publish ktlink}

  • Strong's: H4316, H4318

मीखाएल

तथ्य:

मीखाएल हा देवाच्या सर्व आज्ञाधारक देवदुतांचा मुख्य आहे. तो एकमेव असा दूत आहे ज्याला विशेषरित्या देवाचा "आद्यदेवदूत" म्हणून संदर्भित करण्यात आले आहे.

  • "आद्यदेवदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "प्रमुख देवदूत" किंवा "शासन करणारा देवदूत" असा होतो.
  • मीखाएल हा योद्धा आहे, जो देवाच्या शत्रुंबरोबर युद्ध करतो आणि देवाच्या लोकांना वाचवतो.
  • त्याने इस्राएली लोकांचे परसाच्या सैन्याविरुद्ध लढाईसाठी नेतृत्व केले. दानीएलच्या पुस्तकात आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे, शेवटच्या दिवसात तो इस्राएली सैन्याचे नेतृत्व दुष्ट शक्तींच्या विरुद्धच्या शेवटच्या युद्धात करेल.
  • पवित्र शास्त्रामध्ये मीखाएल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते. बऱ्याच पुरुषांना "मीखाएलचा मुलगा" म्हणून ओळखले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: देवदूत, दानीएल, दूत, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मीशाएल

तथ्य:

जुन्या करारांमध्ये मीशाएल नावाचे तीन मनुष्य होते.

  • मीशाएल नावाचा एक मनुष्य होता जो अहरोनाचा चुलतभाऊ होता. जेंव्हा अहरोनाचे मुलगे, जसे देवाने त्यांना धूप चढवण्याची आज्ञा केली होती, त्या पद्धतीने धूप न चढवल्यामुळे देवाकडून मारले गेले, तेंव्हा त्याच्या मृत शरीरांना इस्राएली लोकांच्या तंबूच्या बाहेर नेण्याचे काम मीशाएल आणि त्याच्या भावाला देण्यात आले होते.
  • अजून एक मनुष्य ज्याचे नाव मीशाएल होते, तो एज्राच्या बाजूला उभा होता, जेंव्हा पुन्हा शोध लावलेल्या नियमशास्त्राचे जाहीरपणे वाचन करण्यात आले.
  • इस्राएली लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून नेण्याच्या काळात, एक तरुण मनुष्य ज्याचे नाव मीशाएल होते, त्याला सुद्धा बंदी करून सक्तीने बाबेलमध्ये राहण्यासाठी घेऊन गेले. बाबेली लोकांनी त्याला "मेशख" हे नाव दिले. त्याने त्याचे सहकारी, अजऱ्या (अबेद्नगो) आणि हनन्या (शद्रख) ह्यांच्याबरोबर मिळून, राजाच्या मूर्तीची उपासना करण्यास नकार दिला आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पाहा: अहरोन, अजऱ्या, बाबेल, दानीएल, हनन्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मेदी

तथ्य:

मेदी हे एक प्राचीन साम्राज्य अश्शुरी आणि बाबेलाच्या पूर्व भागात आणि एलाम आणि परसाच्या उत्तरेला होते. * जे लोक मेदी नगरामध्ये राहत होते, त्यांना "मेदी" असे म्हंटले गेले.

  • मेदी साम्राज्य सध्याचे तुर्की, इराण, सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान आहेत तो सर्व भाग व्यापत होते.
  • मेदी लोकांचे परसाशी जवळचे संबंध होते, आणि या दोन साम्राज्यांनी आपले सैन्य बाबेलावर कब्जा करण्यासाठी एकत्र केले.
  • जेंव्हा दानीएल संदेष्टा बाबेलात राहत होता, तेंव्हा मेदीच्या दयरावेश राजाने बाबेलावर आक्रमण केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: अश्शुरी, बाबेल, कोरेश, दानीएल, दायरावेश, एलाम, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मेशेख

तथ्य:

जुन्या करारांमध्ये मेशेख नावाचे दोन पुरुष होते.

  • एक मेशेख हा याफेथाचा मुलगा होता.
  • दुसरा मेशेख हा शेमचा नातू होता.
  • मेशेख हे एका जमिनीच्या प्रांताचे नाव देखील होते, जे कदाचित या दोघांपैकी कोणाच्या एकानंतर ठेवले गेले असावे.

मेशेखाचा प्रांत आताच्या तुर्की देश आहे, त्याच्या भागात स्थित असू शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः याफेथ, नोहा, शेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मेसोपटेम्या, अराम नईराईम

तथ्य:

मेसोपटेम्या हे क्षेत्र हिद्दकेल आणि फरात नदीच्या मधील जमिनीवर होते. त्याचे स्थान आताच्या आधुनिक इराक देशांच्या प्रदेशात आहे.

  • जुन्या करारामध्ये, या प्रदेशाला "अराम नईराईम" असे म्हंटले जात होते.
  • "मेसोपटेम्या" ह्याचा अर्थ "नद्यांमधील" असा होतो. * "अराम नहराईम" या शब्दाचा अर्थ "दोन नद्यांचा अराम (उगम)" असा होऊ शकतो.
  • अब्राहाम कनान देशात जाण्याआधी ऊर आणि हारान नावाच्या मेसोपटेम्याच्या शहरात राहत होता.
  • बाबेल हे मेसोपटेम्या मधील आणखी एक महत्वाचे शहर होते.
  • "खास्दी" म्हंटलेला प्रांत सुद्धा मेसोपटेम्याचा भाग होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: अराम, बाबेल, खास्दी, फरात नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मोफ

व्याख्या:

मोफ हे नाईल नदीच्या काठावरील मिसरचे प्राचीन शहर होते.

  • मोफ हे शहर मिसरच्या खालच्या भागात नाईल नदीच्या दक्षिणेकडील मुखाच्या त्रिभुज प्रदेशात स्थित होते, जिथली माती फार सुपीक होती आणि पिके भरपूर होती.

त्याची सुपीक माती आणि वरच्या आणि खालच्या मिसराच्या मधील महत्वाचे स्थान, या कारणामुळे मोफ शहर हे व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर बनले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: मिसर, नाईल नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मोलख

तथ्य:

मोलख हे एका खोट्या देवताचे नाव होते, ज्याची कनानी लोक उपासना करत. इतर शब्दलेखन "मोलख (Molach)" आणि "मोलख (Molek)" आहेत.

  • ज्या लोकांनी मोलेखाची उपासना केली, त्यांनी त्यांच्या मुलांचे बलीदान अग्नीने केले.
  • काही इस्राएल लोकांनी सुद्धा एक खऱ्या देवाची, यहोवाची उपासना करण्याची सोडून मोलेखाची केली. त्यांनी मोलेखाच्या उपासकांच्या वाईट कृत्यांचे अनुसरण केले, त्यामध्ये त्यांच्या मुलांचे बलीदान करण्याचा समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: कनानी, वाईट, खोटे देव, देव, खोटे देव, बलीदान, खरे, उपासना, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


मोशे

तथ्य:

मोशे हा सुमारे 40 वर्षे इस्राएल लोकांचा संदेष्टा आणि पुढारी होता.

  • जेंव्हा मोशे बालक होता, तेंव्हा त्याच्या पालकांनी त्याला मिसरी फारोपासून वाचवण्यासाठी एका लाव्हाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये ठेवून नाईल नदीमध्ये सोडले. मोशेची बहिण मरिया ही त्याला पाहायला तेथे होती. जेंव्हा मोशे फारोच्या कन्येला सापडला तेंव्हा त्याला वाचवण्यात आले आणि तिने त्याला तिचा मुलगा म्हणून वाढवण्यासाठी राजमहालात नेले.
  • देवाने इस्राएली लोकांना मिसरच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी व त्यांना वचनदत्त देशात नेण्यासाठी मोशेला निवडले.
  • मिसरमधून बाहेर पडल्यावर आणि वाळवंटात भटकत असताना देवाने मोशेला दहा आज्ञा लिहिलेल्या दोन दगडी पाट्या दिल्या.
  • त्याच्या जीवनाचा शेवट होत असताना, मोशेने वचनदत्त देश पहिले, पण तो त्यात जाऊन राहू शकला नाही, करण त्याने देवाची आज्ञा मानिली नाही.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मरिया, वचनदत्त भूमी, दहा आज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • एके दिवशी मेंढरे चारत असतांना, मोशेने एक झुडूप जळत असतांना पाहिले.
  • 12:05 मोशेने इस्राएलास सांगितले, "भिऊ नका! देव तुमच्या वतीने आज लढणार आहे व तुमचे तारण करणार आहे.”
  • 12:07 देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठी उभारण्यास व तो समुद्र दुभागण्यास सांगितले.
  • 12:12 जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.
  • 13:07 मग देवाने या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या.

\

  • Strong's: H4872, H4873, G3475

यबुस, यबुसी

तथ्य:

यबुसी हा लोकांचा समूह कनानच्या भूमीत राहत होता. ते हामचा मुलगा कनान याचे वंशज होते.

  • यबुसी लोक यबुस शहरात राहत होते, आणि नंतर ज्यावेळी दावीद राजाने त्यावर कब्जा केला, त्यावेळी त्याचे नाव बदलून यरुशलेम असे ठेवण्यात आले.
  • शालेमाचा राजा मलकीसदेक, कदाचित यबुसी वंशाचा होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, हाम, यरुशलेम, मलकीसदेक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यराबाम

तथ्य:

सुमारे 900-910 इ.स.पू. मध्ये नबाटाचा मुलगा यराबाम हा उत्तरेकडील इस्राएलाच्या राज्याचा पहिला राजा होता. आणखी एक यराबाम, जो योशीयाचा मुलगा होता, त्याने 120 वर्षानंतर इस्राएलावर राज्य केले.

  • शलमोनानंतर नाबाटाचा मुलगा यराबाम राजा बनेल आणि तो इस्राएलाच्या दहा कुळांवर राज्य करेल अशी भविष्यवाणी यहोवाने दिली.
  • जेंव्हा शलमोन मेला, तेंव्हा इस्राएलाच्या उत्तरेकडील दहा कुळांनी शलमोनाचा मुलगा रह्बाम ह्याच्या विरुद्ध बंड केले आणि त्याच्या जागी यराबाम ह्याला राजा केले आणि रहाबाम याला दक्षीणेकडील दोन कुळांवर यहूदा आणि बन्यामीन ह्यांच्यावर राजा म्हणून ठेवले.
  • यराबाम हा एक दुष्ट राजा होता, त्याने त्याच्या लोकांना यहोवाची उपासना करण्यापासून दूर नेले आणि त्याऐवजी उपासना करण्यासाठी त्यांच्यापुढे मूर्तींना उभे केले. इस्राएलाच्या इतर राजांनी सुद्धा यराबामचे अनुसरण केले आणि ते सुद्धा त्याच्यासारखेच दुष्ट होते.
  • जवळजवळ 120 वर्षांनंतर, आणखी एक राजा यराबाम, हा उत्तरेकडील इस्राएल राष्ट्रावर राज्य करू लागला. हा यराबाम हा योशीया राजाचा मुलगा होता आणि तो सुद्धा आधी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या राजांसारखाच दुष्ट होता.
  • इस्राएलाच्या दुष्टाईनंतरही, देवाने त्यांच्यावर दया केली आणि या यराबामला जमीन मिळवण्यासाठी आणि त्याच्या क्षेत्रासाठी सीमा स्थापन करण्यासाठी त्याला देवाने मदत केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: खोटे देव, इस्राएलाचे राज्य, यहूदा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:08 इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले.

  • 18:09 यराबामाने देवाविरुध्द बंड पुकारले व लोकांना पापात पाडिले. यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या व त्यांची पूजा करु लागल्या.

  • Strong's: H3379


यरीहो

तथ्य:

यरीहो हे कानानच्या भूमीतील एक शक्तिशाली शहर होते.. हे यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि मृत समुदारच्या उत्तरेस स्थित होते.

  • जसे सर्व कनानी लोकांनी केले, तसेच यरीहोच्या लोकांनीसुद्धा खोट्या देवाची उपासना केली.
  • यरीहो हे कनानच्या भूमीतील पहिले शहर होते, ज्यावर देवाने इस्राएली लोकांना कब्जा करण्यास सांगितले.
  • जेंव्हा यहोशवाने यरीहोविरुद्ध इस्राएलाचे नेतृत्व केले, तेंव्हा देवाने शहराला हरवण्यामध्ये मदत करण्यासाठी मोठा चमत्कार केला.

(हे सुद्धा पहा: कनान, यार्देन नदी, यहोशवा, चमत्कार, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन हेरांस हेरगिरी करण्यास पाठविले.

  • यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.

  • मग यरीहो शहराच्या भिंती कोसळल्या. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला.

  • Strong's: H3405, G2410


यरुशलेम

तथ्य:

यरुशलेम हे मूळचे कनानी शहर होते, जे नंतर इस्रायलमधील सर्वात महत्वाचे शहर ठरले. ते मृत समुद्राच्या पश्चिमेला 34 किलोमीटर आणि बेथेलहेमच्या उत्तरेस स्थित आहे. ते शहर आजही इस्रायलची राजधानी आहे.

  • "यरुशलेम" हे नाव प्रथम यहोशवाच्या पुस्तकात नमूद केले आहे. जुन्या करारामध्ये या शहरासाठी असणाऱ्या दुसऱ्या नावांमध्ये "शालेम" "यबुसचे शहर" आणि "सियोन" यांचा समवेश आहे. "यरुशलेम" आणि "शालेम" या दोन्ही नावांचा मूळ अर्थ "शांती" असा होतो.
  • यरुशलेम हा मूळतः एक यबुसाचा किल्ला होता ज्याचे नाव "सियोन" होते, ज्यावर दावीद राजाने कब्जा केला आणि त्याला त्याचे राजधानी शहर बनवले.
  • ते यरुशलेम मध्ये होते त्यात दाविदाचा मुलगा शलमोन याने पहिले मंदिर यरुशलेममध्ये मोरिया पर्वतावर बांधले, जो तोच पर्वत होता ज्यावर अब्राहमने त्याचा मुलगा इसहाक याचे देवाला अर्पण केले होते. बाबेली लोकांनी मंदिराचा पाडाव केल्यानंतर, मंदिर पुन्हा बांधण्यात आले.
  • मंदिर यरुशलेममध्ये असल्याकारणाने, महत्वाचे यहुदी सन तिथेच साजरे केले जातात.
  • लोक सहसा यरुशलेमकडे जाताना "वर" जाण्याचा उल्लेख करतात, कारण ते पर्वतावर वसलेले आहे.

(हे सुद्धा पहा: बाबेल, ख्रिस्त, दावीद, यबुसी, येशू, शलमोन, मंदिर, सियोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:05 दाविदाने यरुशलेम जिंकली व तिला आपली राजधानी बनविली.

  • 18:02 आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले.

  • 20:07 त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.

  • 20:12 अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.

  • 38:01 येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.

  • 38:02 येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो.

  • 42:08 "धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा करतील. ते यरूशलेमेपासून या संदेशास आरंभ करतील, मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे हा संदेश घेऊन जातील.

  • 42:11 येशूच्या पुनरूत्थानानंतर चाळीस दिवसांनी येशूने शिष्यांस सांगितले, "जोपर्यंत माझा पिता तुम्हास सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा तुम्हावर पाठवत नाही, तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका."

  • Strong's: H3389, H3390, G2414, G2415, G2419


यवाब

व्याख्या:

दावीदाच्या संपूर्ण राजवटीत, यवाब हा दाविद राजाचा एक महत्वाचा सेनापती होता.

  • दावीद राजा होण्यापूर्वी पासून, यवाब त्याच्या एकनिष्ठ अनुयायांपैकी एक होता.
  • नंतर, दावीद इस्राएलावर राज्य करण्याच्या काळामध्ये, यवाब हा दाविदाच्या सैन्याचा सेनापती बनला.
  • यवाब हा दाविदाचा भाचा देखील होता, कारण त्याची आई ही दाविदाच्या बहिणींपैकी एक होती.
  • जेंव्हा दाविदाचा मुलगा अबशालोम याने, त्याचे राज्य घेण्याच्या इच्छेने त्याचा विश्वासघात केला, तेंव्हा राजाला वाचवण्यासाठी यावाबाने अबशालोमाला ठार मारले.

यवाब हा खूप आक्रमक योद्धा होता, आणि त्याने इस्राएलाच्या अनेक शत्रूंना ठार मारले.

(हे सुद्धा पहा: अबशालोम, दावीद)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


यशया

तथ्य:

यशया हा एक देवाचा संदेष्टा होता, त्याने यहूदाचे चार राजे राज्य करण्याच्या काळात भविष्यवाणी केली: उज्जीया, योथाम, अहाज, आणि हिज्कीया.

  • हिज्कीयाच्या कारकिर्दीदरम्यान, जेंव्हा अश्शूरी लोक जेव्हा शहरावर हल्ला करत होते, त्या काळात तो यरुशलेममध्ये राहात असे.
  • जुन्या करारातील यशया नावाचे पुस्तक, हे पवित्र शास्त्रातील अनेक मोठ्या पुस्तकांपैकी एक आहे.
  • यशयाने अनेक भविष्यवाण्या लिहिल्या, त्या तो जिवंत असतानाच खऱ्या झाल्या.
  • यशया त्याने मसिहाबद्दल लिहिलेल्या भविष्यवाणींसाठी प्रसिद्ध आहे, त्या 700 वर्षानंतर जेंव्हा येशू पृथ्वीवर राहत होता, त्यावेळी पूर्ण झाल्या.
  • येशू आणि त्याच्या शिष्यांनी यशयाच्या भविष्यवाण्यांचा उल्लेख, लोकांना मसिहाबद्दल शिकवताना उदाहरणादाखल केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाज, अश्शुरी, ख्रिस्त, हिज्कीया, योथाम, यहूदा, संदेष्टा, उज्जीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:09 यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.

  • 21:10 यशया संदेष्टा म्हणाला की मसिहा गालीलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.

  • 21:11 यशया संदेष्टयाने हेही भाकित केले की मसिहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल.

  • 21:12 यशयाने भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील.

  • 26:02 त्यांनी त्यास यशया संदेष्टयाच्या ग्रंथाची गुंडाळी वाचण्यासाठी दिली. येशूने ती गुंडाळी उघडून त्यातील कांही भाग लोकांसमोर वाचला.

  • 45:08 जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असताना ऐकले.

  • 45:10 फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की यशया संदेष्टा हे मसिहाविषयी लिहित आहे.

  • Strong's: H3470, G2268


यहुदीया

तथ्य:

"यहुदीया" या शब्दाचा संदर्भ प्राचीन इस्राएलाच्या जमिनीच्या भागाशी येतो. हे काहीवेळा एका अरुंद अर्थाने आणि इतर वेळी व्यापक अर्थाने वापरले जाते.

  • काहीवेळा "यहुदीया" या शब्दाचा उपयोग अरुंद अर्थाने मृत समुद्राच्या दक्षिणेस स्थित असलेल्या प्राचीन इस्राएलाच्या दक्षिण भागात असलेल्या प्रांताला संदर्भित करण्यासाठी केला जातो. काही भाषांतरे या प्रांताला "यहूदा" असे संबोधतात.
  • इतर वेळी, "यहुदीया" ह्याचा उपयोग व्यापक अर्थाने केला जातो आणि त्याचा संदर्भ प्राचीन इस्राएलच्या सर्व प्रांताशी येतो, ज्यामध्ये गालील, शोमरोन, पेरीया, इदोम आणि यहूदा ह्यांचा समावेश होता.
  • जर भाषांतरकार हा भेद स्पष्ट करू इच्छित असतील तर, "यहुदीया" ह्याचे व्यापक अर्थाने भाषांतर "यहुदीया देश" आणि अरुंद अर्थाने त्याचे भाषांतर "यहुदीया प्रांत" किंवा "यहूदा प्रांत" असे केले जाऊ शकते, कारण हा प्राचीन इस्राएलाचा भाग होता जिथे यहूदाचे कुळ आधीपासून राहत होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: गालील, इदोम, यहूदा, शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहूदा

तथ्य:

यहूदा हा याकोबाच्या मोठ्या मुलांपैकी एक होता. लेआ त्याची आई होती. * त्याच्या वंशजांना "यहूदाचे गोत्र" असे म्हंटले जाते.

  • तो यहुदाच होता, ज्याने त्याच्या भावांना, त्यांचा छोटा भाऊ योसेफ ह्याला मरण्यासाठी खोल खड्ड्यात सोडून देण्याऐवजी त्याला विकण्यास सांगितले.
  • दावीद राजा आणि त्याच्यानंतरचे सर्व राजे हे यहूदाचे वंशज होते. येशू हा सुद्धा यहुदाचा वंशज होता.
  • जेंव्हा शलमोनाची कारकीर्द संपली, तेंव्हा इस्राएलाचे राष्ट्र विभागले गेले, आणि यहूदाचे राज्य हे दक्षिणेकडील राज्य होते.
  • नवीन करारांतील प्रकटीकरणाच्या पुस्तकात, येशूला "यहुदाचा सिंह" असे म्हंटले गेले आहे.
  • "ज्यु" आणि "यहुदिया" हे शब्द "यहूदा" या नावापासून आले आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, ज्यु, यहूदा, यहुदिया, इस्राएलाचे बारा गोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहूदा इस्कार्योत

तथ्य:

यहूदा इस्कार्योत हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. हा तोच होता ज्याने यहुदी पुढाऱ्यांसाठी येशूचा विश्वासघात केला.

  • "इस्कार्योत" या नावाचा अर्थ "करीयोथ येथून" असा होऊ शकतो, कदाचित यहूदा त्या शहरात वाढला असे सूचित करतो.
  • यहूदा इस्कार्योताने प्रेषितांच्या पैशाचे व्यवस्थापन केले व नियमितपणे स्वत:साठी वापरण्याकरता त्यापैकी काही चोरले.
  • धार्मिक पुढाऱ्यांना, त्यांना येशूला अटक करता यावी म्हणून तो कुठे होता हे सांगून यहुदाने येशूचा विश्वासघात केला.
  • धार्मिक नेत्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी दोषी ठरवल्यानंतर, यहुदाने येशूचा विश्वासघात केला म्हणून त्याने पश्चात्ताप केला, म्हणून त्याने विश्वासघाताचा पैसा यहुदी पुढाऱ्यांना परत केला आणि नंतर आत्महत्या केली.
  • अजून एक प्रेषित ज्याचे देखील नाव यहूदा होते, तो येशुंच्या भावांपैकी एक होता. येशूचा भाऊ याला "यहूदा" म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: प्रेषित, विश्वासघात, यहुदी पुढारी, याकोबाचा मुलगा यहूदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 38:02 येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी बोलतो.

  • 38:03 तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.

  • 38:14 यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला. * यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी,’’ आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

  • 39:08 दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.

  • Strong's: G2455, G2469


यहूदा, यहूदाचे राज्य

तथ्य:

यहूदाचे कुळ हे इस्राएलाच्या बारा कुळातील सर्वात मोठे कुळ होते. यहूदाचे राज्य हे यहूदा आणि बन्यामीन या कुळांनी बनले होते.

  • शलमोन राजा मेल्यानंतर, इस्राएल राष्ट्र दोन राज्यात विभागले गेले: इस्राएल आणि यहूदा. यहूदाचे राज्य हे दक्षिणेकडील राज्य होते, आणि ते मृत समुद्राच्या पश्चिमेस स्थित होते.
  • यहूदा राज्याची राजधानी इस्राएल होते.

यहुदाच्या आठ राजांनी यहोवाची आज्ञा मानिली आणि लोकांनी त्याची उपासना करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले. यहुदाचे इतर राजे हे दुष्ट होते, आणि त्यांनी लोकांचे नेतृत्व मूर्तींची उपासना करण्याकडे केले.

  • अश्शुरी लोकांनी इस्राएल (उत्तरेकडील राज्य) लोकांना हरवल्यानंतर, बाबेली लोकांनी यहुदावर कब्जा मिळवला. बाबेली लोकांनी शहर आणि मंदीर नाश केले, आणि यहूदाच्या बर्यापैकी लोकांना बाबेलाला घेऊन गेले.

(हे सुद्धा पहा: यहूदा, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:07 केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली. ही दोन गोत्रे मिळून यहूदाचे राज्य झाले.\

  • 18:10 यहूदाचे राज्य व इस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.

  • 18:13 यहूदाचे राजे हे दाविदाच्या वंशातील होते. त्यांपैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले व ख-या देवाची उपासना केली. परंतु यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली.

  • 20:01 इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.

  • 20:05 यहूदा राज्यातील लोकांनी पाहिले की, इस्त्रायल राज्यातील लोकांना अविश्वास व आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे शासन केले आहे. पण तरीही त्यांनी मूर्तिपूजा केली व कनानी दैवतांचीही उपासना केली.

  • 20:06 सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.

  • 20:09 नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.

  • Strong's: H4438, H3063


यहेज्केल

तथ्य:

हद्दपार केलेल्या काळात, जेंव्हा अनेक यहुद्यांना बाबेलास नेण्यात आले, तेंव्हा यहेज्केल हा देवाचा संदेष्टा होता.

  • जेंव्हा यहेज्केल यहुदाच्या राज्यात राहणारा एक याजक होता, तेंव्हा बाबेली सैन्याने त्याला व इतर अनेक यहुद्यांना पकडले होते.
  • वीस वर्षे, तो व त्याची बायको बाबेलामधील एका नदीजवळ राहत होते, आणि यहूदी लोक देवाचा संदेश त्याच्याकडून ऐकण्यासाठी तिथे येत होते.
  • इतर गोष्टींबरोबरच, यहेज्केलने यरूशलेमेचे व मंदिराचे नाश व पुनर्वसन यांच्या बद्दल भविष्यवाणी केली.
  • त्याने मशीहाच्या भावी राज्याविषयी देखील भविष्यवाणी केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेली, ख्रिस्त, हद्दपार, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहोयाकीम

तथ्य:

यहोयाकीम यहूदा राज्यावर राज्य करणारा एक दुष्ट राजा होता. त्याची सुरवात इ. स. पूर्व. 608 ला झाली. तो योशिया राजाचा मुलगा होता. त्याचे नाव मूलतः एल्याकीम होते.

  • मिसरचा राजा नखो याने एल्याकीम याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले आणि त्याला यहुदाचा राजा केला.
  • नखोने यहोयाकीमला मिसराला उच्च कर भरण्यासाठी भाग पाडले.
  • नंतर नबुखद्नेस्सर राजाने जेंव्हा यहुदावर आक्रमण केले, यहोयाकिम हा त्यातला एक होता, ज्यांना त्याने बाबेलाला बंदी म्हणून नेले.
  • यहोयाकिम हा दुष्ट राजा होता, ज्याने यहूदाला याहोवापासून दूर नेले. यिर्मिया संदेष्ट्याने त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बाबेल, एल्याकीम, यिर्मिया, यहूदा, नबुखद्नेस्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहोयाखीन

तथ्य:

यहोयाखीन हा एक राजा होता ज्याने यहुदावर राज्य केले.

  • जेंव्हा यहोयाखीन 18 वर्षांचा होता, तेंव्हा तो राजा बनला. त्याने फक्त तीन महिने राज्य केले, आणि त्यानंतर त्याला बाबेली सैन्याने बंदीवान केले आणि बाबेलला घेऊन गेले.
  • त्याच्या त्या छोट्याश्या कारकिर्दीमध्ये, त्याने आपला आजोबा मनश्शे राजा आणि आपला पिता यहोयाकीम राजा यांच्यासारखीच दुष्ट गोष्टी केल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: बाबेल, यहोयाकीम, यहुदा, मनश्शे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहोयाद

तथ्य:

यहोयाद हा एक याजक होता, ज्याने अहज्या राजाच्या मुलाला योवाशला, तो राजा म्हणून घोषित करण्याच्या योग्य वयाचा होईपर्यंत, त्याला लपवून आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मदत केली.

  • यहोयादाने तरुण योवाशचे रक्षण करण्यासाठी शेकडो अंगरक्षकांची व्यवस्था केली, कारण त्याला मंदिरात लोकांकडून राजा घोषित केले होते.
  • यहोयादाने लोकांचे त्या खोट्या दैवतांच्या सर्व वेद्यांपासून मुक्त होण्यासाठी नेतृत्व केले.
  • यहोयाद याजकाने, त्याच्या उर्वरित आयुष्यभर, योवाश राजाला देवाची आज्ञा पाळण्यासाठी आणि लोकांवर शहाणपणाने राज्य चालवण्यासाठी मदत केली.
  • अजून एक मनुष्य यहोयाद हा बनायाचा पिता होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: अहज्या, बाल, बनाया, योवाश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहोराम, योराम

तथ्य:

जुन्या करारांमध्ये "यहोराम" हे दोन राजांचे नाव होते. दोन्ही राजे "योराम" या नावाने ओळखले जातात.

  • एक राजा योरम ह्याने यहुदाच्या राज्यावर आठ वर्षापर्यंत राज्य केले. तो यहोशाफाट राजाचा पुत्र होता. हा तो राजा आहे ज्याला अतिशय सामान्यपणे यहोराम म्हणून ओळखले जाते.
  • दुसरा राजा यहोराम ह्याने इस्राएलाच्या राज्यावर बारा वर्षासाठी राज्य केले. तो अहाब राजाचा पुत्र होता.
  • जेंव्हा यिर्मया, दानीएल, ओबेद्या, आणि यहेज्केल हे संदेष्ट्ये यहुदाच्या राज्यात भविष्यवाणी करण्याच्या काळात, यहोराम राजा राज्य करीत होता.
  • जेंव्हा त्याचा पिता यहोशाफाट यहूदावर राज्य करीत होता, त्यावेळी सुद्धा यहोराम राजा राज्य करीत होता.
  • काही भाषांतरे कदाचित सातत्याने "यहोराम" या नावाचा उपयोग इस्राएलाच्या राजाचा उल्लेख करण्यासाठी आणि "योराम" या नावाचा उपयोग यहुदाच्या राजाचा उपयोग करण्यासाठी करू शकतात.
  • हे स्पष्ट करण्याच्या अजून एका पद्धतींमध्ये प्रत्येकाच्या नावाबरोबर त्याच्या पित्याचे नाव जोडले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, यहोशाफाट, योराम, यहूदा, इस्राएलाचे राज्य, ओबद्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यहोशवा

तथ्य:

पवित्र शास्त्रामध्ये यहोशवा नावाचे अनेक वेगवेगळे पुरुष होते. सर्वज्ञात असलेला यहोशवा हा नुनाचा मुलगा, जो मोशेचा मदतनीस होता, आणि जो नंतर देवाच्या लोकांचा महत्वाचा नेता बनला.

  • वचनदत्त भूमीची हेरगिरी करण्यास मोशेने पाठवलेल्या बारा जणांपैकी यहोशवा एक होता.
  • कालेबबरोबरच, यहोशवाने इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याबद्दल आणि कनानी लोकांवर विजय मिळवण्यासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे आवाहन केले.
  • मोशे मेल्यानंतर, बऱ्याच वर्षांनी, देवाने इस्राएल लोकांचे नेतृत्व वचनदत्त भूमीत करण्यासाठी यहोशवाला नियुक्त केले.
  • कनानी लोकांविरुद्धच्या सर्वात प्रथम आणि सर्वात प्रसिद्ध लढाईत, यहोशवाने इस्राएलांचे यरीहो शहराला पराभूत करण्यासाठी नेतृत्व केले.
  • जुन्या करारातील यहोशवा नावाच्या पुस्तकात, यहोशवाने वचनदत्त भूमीचा कब्जा घेण्यासाठी कसे इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, आणि इस्राएलातल्या प्रत्येक गोत्राला, त्या भूमीत राहण्यासाठी कसा त्याने प्रांत नेमून दिला याविषयी सांगितले आहे.
  • योसादाकाचा मुलगा यहोशवा ह्याचा उल्लेख हग्गय आणि जखऱ्या या पुस्तकात आला आहे; तो एक महायाजक होता, ज्याने यरुशलेमेची पडलेली भिंत पुन्हा बांधण्यास मदत केली.
  • यहोशवा नावाच्या इतर अनेक पुरुषांचा उल्लेख वंशावळीत आणि पवित्र शास्त्रामधील इतर ठिकाणी नमूद केलेला आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: कनान, हग्गय, यरीहो, मोशे, वचनदत्त भूमी, जखऱ्या

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 14:04 जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.

  • 14:06 लगेच कालेब आणि __यहोशवा __ हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.

  • 14:08 लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.

  • 14:14 मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी यहोशवाची निवड केली.

  • 14:15 यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.

  • 15:03 यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.

  • Strong's: H3091, G2424


यहोशाफाट

तथ्य:

जुन्या करारांमध्ये यहोशाफाट नावाचे कमीत कमी दोन पुरुष होते.

  • यहोशाफाट राजा हा, या नावाने माहित असलेला व्यक्ती आहे, जो यहूदाच्या राज्यावर राज्य करणारा चौथा राजा होता.
  • त्याने यहूदा आणि इस्राएल यामध्ये शांती पुनर्संचयीत केली, आणि खोट्या देवांच्या वेद्या नष्ट केल्या.
  • दुसरा यहोशाफाट हा दावीद आणि शलमोन ह्यांच्यासाठी "नोंदी ठेवणारा अधिकारी" होता. * त्याच्या कामामध्ये, राजाने सही करावयाची कागपत्रे लिहून देणे आणि राज्यामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनांची नोंद ठेवण्याचा समावेश होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वेदी, दावीद, खोटे देव, इस्राएल, यहूदा, याजक, शलमोन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


याकोब (अल्फीचा मुलगा)

तथ्य:

याकोब, अल्फीचा मुलगा, हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.

  • त्याचे नाव येशुंच्या शिष्यांच्या यादीमध्ये, मत्तय, मार्क, आणि लुकच्या शुभवर्तमानामध्ये दिलेले आहे.
  • त्याचा उल्लेख प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये सुद्धा केला आहे, आकरा प्रेषितांपैकी एक, जो येशू स्वर्गामध्ये परत गेल्यानंतर यरुशलेममध्ये एकत्र जमून प्रार्थना करत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, याकोब (येशूचा भाऊ), याकोब (जब्दीचा मुलगा), बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


याकोब (जब्दीचा मुलगा)

तथ्य:

याकोब, जब्दीचा मुलगा, हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. त्याला एक लहान भाऊ, त्याचे नाव योहान हे होते, तो सुद्धा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.

  • याकोब आणि योहान त्यांचा पिता जब्दीबरोबर मासेमारीचे काम करत होते.
  • याकोब आणि योहान ह्यांना "गर्जनेचे पुत्र" हे टोपणनाव दिले होते, कदाचित त्याचे कारण त्यांना लवकर राग येत असेल.
  • पेत्र, याकोब आणि योहान हे येशुंचे जवळचे शिष्य होते आणि ते त्याच्याबरोबर अद्भुत घटनेचे साक्षीदार होते, जसे की जेंव्हा येशू पर्वताच्या शिखरावर एलिया आणि मोशेबरोबर होता आणि जेंव्हा येशूने मेलेल्या छोट्या मुलीला पुन्हा जिवंत केले.
  • ज्या याकोबाने पवित्र शास्त्रामध्ये पुस्तक लिहिले, त्याच्यापेक्षा हा वेगळा याकोब होता. काही भाषांना त्यांची नावे कदाचित वेगळ्या प्रकारे लिहून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की ते दोन वेगवेगळे मनुष्य होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, एलिया, याकोब (येशूचा भाऊ), याकोब (अल्फीचा मुलगा), मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


याकोब (येशूचा भाऊ)

तथ्य:

  • याकोब हा मरिया आणि योसेफाचा मुलगा होता. तो येशूचा लहान अर्धा भाऊ होता.

  • येशूचे इतर अर्ध्या भावांची नावे योसेफ, यहूदा आणि शिमोन अशी होती.

  • येशूच्या जीवनकाळात, याकोब आणि त्याच्या भावांनी येशू हाच मसिहा आहे यावर विश्वास ठेवला नाही.

  • नंतर, येशू मरणातून जिवंत उठल्यानंतर, याकोबाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि यरुशलेममधील एका मंडळीचा पुढारी बनला.

  • नवीन करारातील याकोबाचे पुस्तक, हे याकोबाने अशा ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे, जे लोक छळापासून वाचण्यासाठी इतर देशात पळून गेले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, मंडळी, याकोबाचा मुलगा यहूदा, छळ)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


याकोबाचा मुलगा यहूदा

तथ्य:

याकोबाचा मुलगा यहूदा हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. हा व्यक्ती यहूदा इस्कर्योत नाही ह्याची नोंद घ्या.

  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा एकाच नावाच्या मनुष्यांना, ते कोणाचे मुलगे आहेत, ह्याचा उल्लेख करून वेगळे केले जात होते. इथे यहूदाला "याकोबाचा मुलगा" असे ओळखले जाते.
  • अजून एक यहूदा नावाचा मनुष्य येशूचा भाऊ होता. त्याला "यहूदा" म्हणूनसुद्धा ओळखले जाते.
  • नवीन करारातील पुस्तक "यहूदा" हे कदाचित येशूचा भाऊ यहूदा ह्याने लिहिले असावे, कारण लेखक स्वतःची ओळख "याकोबाचा भाऊ" अशी करून देतो. याकोब हा येशूचा अजून एक भाऊ होता.
  • हे सुद्धा शक्य आहे की, यहूदा हे पुस्तक येशूचा शिष्य यहूदा, याकोबाचा मुलगा, ह्याने लिहिले असावे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे देखील पहा: याकोब (जब्दीचा मुलगा), यहूदा इस्कर्योत, पुत्र, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यापो

तथ्य

पवित्र शास्त्राच्या काळात, यापो शहर शारोनच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भूमध्य समुद्राच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते.

  • यापोची प्राचीन जागा सध्याचे जाफां शहराचे स्थान आहे तेथे होती, जे आता तेल अवीव शहराचा भाग आहे.
  • जुन्या करारामध्ये, यापो हे शहर होते, जेथून योनाला तार्सिसला जाण्यासाठी जहाज मिळाले.
  • नवीन करारामध्ये, एक ख्रिस्ती स्त्री, जिचे नाव तबिता होते, यापोमध्ये मेली, आणि पेत्राने तिला परत जिवंत केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: समुद्र, यरूशलेम, शारोन, तार्सिस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


याफेथ

तथ्य:

याफेथ हा नोहाच्या तीन मुलांपैकी एक होता.

  • सर्व पृथ्वीला झाकून टाकणाऱ्या सर्वत्र आलेल्या पुराच्या काळात, याफेथ आणि त्याचे दोन भाऊ त्यांच्या बायकांसोबत, नोहाबरोबर तारूमध्ये होते.
  • नोहाच्या मुलांचा क्रम "शेम, हाम, आणि याफेथ" असा होता. हे असे सूचित करते की, याफेथ हा सर्वात लहान भाऊ होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः तारू, पूर, हाम, नोहा, शेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


यार्देन नदी, यार्देन

तथ्य:

यार्देन नदी, ही नदी आहे जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, एक देशाच्या पश्चिम सीमेस तयार करते, ज्याला कनान असे संबोधले जाते.

  • आज, यार्देन नदी इस्राएलाला यार्देन नदीच्या पूर्वेकडे आणि तिच्या पश्चिमेकडे असे वेगळे करते.
  • यार्देन नदी गालीलाच्या समुद्रातून वाहते, आणि नंतर ती मृत समुद्रात जाऊन संपते.
  • जेंव्हा यहोशवाने इस्राएलाचे नेतृत्व कानानमध्ये जाण्यासाठी केले, तेंव्हा त्यांना यार्देन नदी पार करायची होती. सामान्यपणे ती पार करण्यास खूप खोल होती. पण देवाने चमत्कारिकरित्या तिला वाहण्यापासून थांबवले, आणि ते नदीच्या पात्रातून चालत जाऊ शकले.
  • बऱ्याचदा पवित्र शास्त्रामध्ये यार्देन नदीला "यार्देन" असे संदर्भित केले आहे.

(हे सुद्धा पहा: कनान, मृत समुद्र, गालीलाचा समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 15:02 इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते.

  • 15:03 यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.

  • 19:14 अलीशाने नामानास यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले.

  • Strong's: H3383, G2446


यिर्मया

तथ्य:

यिर्मिया हा यहुदाच्या राज्यातील देवाचा संदेष्टा होता. जुन्या करारातील यिर्मिया नावाच्या पुस्तकात त्याच्या भविष्यवाण्या समाविष्ट आहेत.

  • इतर संदेष्ट्याप्रमाणेच, यिर्मियालासुद्धा इस्राएलच्या लोकांना ताकीद द्यावी लागली की, देव त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा करणार आहे.
  • यिर्मियाने असे भाकीत केले की, बाबेली लोक यरुशलेमवर कब्जा करतील, त्यामुळे यहूदाचे काही लोक संतप्त झाले. म्हणून त्यांनी त्याला एका खोल, कोरड्या विहिरीत मारण्यासाठी टाकले. परंतु यहुदाच्या राजाने त्याच्या सेवकांना यिर्मीयाला विहिरीतून बाहेर काढण्याची आज्ञा दिली.
  • यिर्मियाने लिहिले की, त्याच्या लोकांच्या बंडाच्या आणि त्रासाचे खोल दुःख व्यक्त करण्यासाठी, त्याची अशी इच्छा आहे की, त्याचे डोळे हे "अश्रूंचा वाहता झरा" असावेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेल, यहूदा, संदेष्टा, बंड, त्रास, विहीर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:17 एकदा त्यांनी यिर्मया संदेष्टयास मरण्यानाठी कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले. * विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो रुतला, परंतु नंतर राजाला त्याची दया आली व यिर्मया मरण्यापुर्वी त्याला बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा दिली.

  • 21:05 यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल.

  • Strong's: H3414, G2408


येहू

तथ्य:

जुन्या करारांमध्ये येहू नावाचे दोन मनुष्य होते.

  • हनानीचा पुत्र, येहू हा इस्राएलचा राजा अहाब आणि यहुदाचा राजा यहोशाफाट ह्यांच्या काळातील संदेष्टा होता.
  • यहोशाफाटचा मुलगा (किंवा वंशज) येहू हा इस्राएली सैन्यात सुभेदार होता, ज्याला अलीशा संदेष्ट्याच्या सांगण्यावरून राजाने नियुक्त केले होते.
  • येहू राजाने दोन दुष्ट राजांना, इस्राएलाचा राजा योराम आणि यहुदाचा राजा अहज्या ह्यांना मारले.
  • येहू राजाने संस्थापक राजा अहाब ह्याच्या सर्व नातेवाईकांना मारले आणि त्याने दुष्ट राणी ईजबेल हिलासुद्धा मारले.
  • येहू राजाने शोमरोनातील बाल देवतेची सर्व स्थळे नष्ट केली आणि बाल देवतेच्या सर्व संदेष्ट्यांना ठार मारले.
  • येहू राजाने फक्त एका खऱ्या देवाची यहोवाची उपासना केली, आणि त्याने इस्राएलावर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, अहज्या, बाल, अलीशा, यहोशाफाट, येहू, ईजबेल, योराम, यहूदा, शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योएल

तथ्य:

योएल हा एक संदेष्टा होता, जो कदाचित यहूदाचा राजा योवाश याच्या कारकीर्दीत राहत होता. जुन्या करारामध्ये, योएल नावाचे इतर अनेक पुरुष देखील होते.

  • योएलचे पुस्तक जुन्या कराराच्या शेवटच्या विभागातील बारा लघु भविष्यसूचक पुस्तकांपैकी एक आहे.
  • योएल संदेष्ट्यांबद्दल आपल्याकडे असलेली एकमेव वैयक्तिक माहिती ही आहे की, त्याच्या वडिलांचे नाव पथूएल होते.
  • पेंटीकॉस्टच्या दिवशीच्या आपल्या प्रवचनात, प्रेषित पेत्राने योएलच्या पुस्तकातील शब्द उद्धृत केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: योवाश, यहूदा, पेंटीकॉस्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योथाम

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये योथाम नावाचे तीन मनुष्य होते.

  • योथाम नावाचा एक मनुष्य जो, गिदोन ह्याचा सर्वात छोटा मुलगा होता. योथाम ह्याने त्याचा मोठा भाऊ अबीमलेख ह्याला हरवण्यासाठी मदत केली, ज्याने त्याच्या उरलेल्या सर्व भावांना मारून टाकले होते.
  • योथाम नावाचा अजून एक मनुष्य, हा त्याचा पिता उज्जीया (अजऱ्या) मेल्यानंतर यहुदाचा राजा झाला, त्याने यहुदावर सोळा वर्षे राज्य केले.
  • त्याच्या पित्याप्रमाणेच, योथाम राजाने देवाची आज्ञा पाळली आणि तो एक चांगला राजा होता.
  • तथापि, त्याने मुर्त्यांची उपासना करण्याच्या स्थानांचा नाश न केल्यामुळे, यहूदाचे लोक नंतर पुन्हा देवापासून दूर गेले.
  • योथाम हा, मत्तयच्या पुस्तकात नोंद केलेल्या येशू ख्रिस्ताच्या वंशावळीतील पूर्वजांपैकी एक आहे.

(हे सुद्धा पहा: अबीमलेख, अहाज, गीदोन, उज्जीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योना

व्याख्या:

योना हा एक जुन्या करारातील इब्री संदेष्टा होता.

  • योनाचे पुस्तक, जेंव्हा देवाने योनाला निनवेच्या लोकांना संदेश देण्यासाठी पाठवले, तेंव्हा काय झाले ह्याची गोष्ट सांगते.
  • योनाने निनवेला जाण्यास नकार दिला आणि त्याऐवजी तर्शिसास जाणाऱ्या जहाजात जाऊन चढला,
  • देवाने एक मोठे वादळ आणून त्या जहाजाला पूर्णपणे व्यापून टाकले.
  • त्याने त्या जहाज चालवणाऱ्या माणसांना सांगितले की, तो देवापासून दूर पळून जात होता, आणि त्याने त्यांना त्याला समुद्रात फेकून देण्यास सुचविले. जेंव्हा त्यांनी तसे केले तेंव्हा वादळ शांत झाले.
  • योनाला एका महाकाय माश्याने गिळले, आणि तो त्या माश्याच्या पोटामध्ये तीन दिवस आणि तीन रात्री होता.
  • त्यानंतर योना निनवेला गेला आणि तिथल्या लोकांना त्याने संदेश दिला आणि ते त्यांच्या पापापासून वळले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, निनवे, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योनाथान

तथ्य:

जुन्या करारांमध्ये योनाथान नावाचे कमीत कमी दहा पुरुष होते. या नावाचा अर्थ "याहोवाने दिले आहे" असा होतो.

  • दाविदाचा परममित्र योनाथान, हा पवित्र शास्त्रामधील या नावाचा सर्वात प्रसिद्ध मनुष्य होता. हा योनाथान हा शौल राजाचा सर्वात मोठा मुलगा होता.

जुन्या करारामध्ये उल्लेखलेल्या योनाथान या नावाच्या मनुष्यामध्ये, मोशेचा वंशज; दावीद राजाचा भाचा; अनेक याजक, ज्यामध्ये अब्याथारचा मुअलाचा समावेश होता; आणि ज्याच्या घरामध्ये संदेष्टा यिर्मया कैदेत होता, तो एक जुना कराराचा लेखक यांचा समावेश होता.

(हे सुद्धा पहाः नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्याथार, दाऊद, मोशे, यिर्मया, याजक, शौल, लेखक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योराम

तथ्य:

योराम हा अहाबाचा मुलगा, इस्राएलाचा राजा होता. त्याला कधीकधी "यहोराम" असेही म्हंटले जाते.

  • यहुद्यांचा राजा यहोराम राज्य करीत असतानाच्या काळात, योराम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
  • योराम हा दुष्ट राजा होता, ज्याने खोट्या देवांची उपासना केली आणि इस्राएल लोकांना पाप करण्यास कारणीभूत झाला.
  • एलीया आणि ओबेद्या संदेष्ट्ये असण्याच्या काळात देखील योरम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
  • जेंव्हा दावीद राजा होता, तेंव्हा अजून एक मनुष्य ज्याचे नाव योराम होते, जो तोवू हमाथ राजाचा मुलगा होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अहाब, दावीद, एलीया, हमाथ, यहोराम, इस्राएलाचे राज्य, यहूदा, ओबद्या, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योवाश

तथ्य:

जुन्या करारांमध्ये योवाश नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • एक योवाश हा इस्राएली लोकांना सोडवणारा गिदोन ह्याचा पिता होता.
  • अजून एक योवाश नावाचा मनुष्य हा याकोबाच्या लहान मुलगा, बन्यामीन ह्याचा वंशज होता.
  • सर्वत प्रसिद्ध असलेला योवाश हा वयाच्या सातव्या वर्षी यहुदाचा राजा बनला. तो यहुदाचा राजा, अहज्याचा मुलगा होता, ज्याचा खून केला.
  • जेंव्हा योवाश खूप लहान मुलगा होता, तेंव्हा त्याच्या चूलतीने त्याला दूर ठिकाणी नेऊन, जोपर्यंत तो राजाचा मुकुट घालण्याच्या योग्य होत नाही, तोपर्यंत त्याला लपवून ठेवून मारण्यापासून वाचवले.
  • योवाश राजा हा चांगला राजा होता, ज्याने प्रथम देवाची आज्ञा मानिली. पण त्याने उंच स्थाने काढून टाकली नाहीत, आणि इस्राएली लोकांनी परत मुर्त्यांची उपासना सुरु केली.
  • ज्यावेळी यहोआश राजा इस्राएलावर राज्य करत होता, त्याच काळात योवाश राजा यहुदावर राज्य करत होता. हे दोन वेगवेगळे राजा होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहज्या, वेदी, बन्यामीन, खोटे देव, गिदोन, उंच स्थाने, खोटे देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योशीया

तथ्य:

योशीया हा एक धार्मिक राजा होता, ज्याने यहुदाच्या राज्यावर एकतीस वर्षे राज्य केले. त्याने यहूदाच्या लोकांना पश्चात्ताप करून यहोवाची उपासना करण्याकडे त्यांचे नेतृत्व केले.

  • त्याचा पिता रजा अमोन ह्याला मारल्यानंतर, वयाच्या आठव्या वर्षी योवाश यहुदाचा राजा बनला.
  • त्याच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी, योवाश राजाने महायाजक हिल्कीया ह्याला देवाच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा दिली. हे पूर्ण करून होत असताना, नियमांचे पुस्तक सापडले.
  • जेंव्हा योवाशला नियमांचे पुस्तक वाचून दाखवण्यात आले, तेंव्हा कसे त्याचे लोक देवाच्या आज्ञा मोडत होते, ह्याबद्दल तो दुःखी झाला. त्याने मूर्त्यांच्या उपासनेची सर्व स्थाने नष्ट करण्याची आणि त्या खोट्या देवांच्या सर्व याजाकांना ठार मारण्याची आज्ञा दिली.
  • त्याने लोकांना पुन्हा वल्हांडणाचा सण साजरा करण्यास सुरवात करण्याची आज्ञा दिली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: खोटे देव, यहूदा, नियम, वल्हांडण, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


योसेफ (जुना करार)

तथ्य:

योसेफ हा याकोबाचा अकरावा आणि त्याची आई राहेल हिचा पहिला मुलगा होता.

  • योसेफ त्याच्या पित्याचा प्रिय पुत्र होता.
  • त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते आणि त्यांनी त्याला गुलामीसाठी विकले.
  • मिसरमध्ये असताना, येसेफावर खोटा दोष लावला आणि त्याला तुरुंगात टाकले.
  • त्याच्या इतक्या अडचणीतूनही, योसेफ देवाशी विश्वासू राहिला.
  • देवाने त्याला मिसरमध्ये दुसऱ्या स्थानाच्या सत्तेच्या जागेवर नेले आणि त्याचा उपयोग जेंव्हा लोकांच्याकडे थोडके अन्न शिल्लक होते, तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी केला. मिसरमधील लोकांची, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील लोकांची उपासमार होण्यापासून वाचले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, याकोब)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:02 आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले.

  • 08:04 त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले.

  • 08:05 तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.

  • 08:07 देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले.

  • 08:09 योसेफाने लोकांना सुकाळातील सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले.

  • 09:02 योसेफाने केलेल्या कामगिरीचा मिसरी लोकांना विसर पडला.

  • Strong's: H3084, H3130, G2500, G2501


योसेफ (नवीन करार)

तथ्य:

योसेफ हा येशूचा जगिक पिता होता आणि त्याने त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. तो एक नीतिमान मनुष्य होता, ज्याने सुतार म्हणून काम केले.

  • योसेफ मरिया नावाच्या यहुदी स्त्रीशी वाग्दत्त झाला होता, जेंव्हा ते संलग्न झाले होते, तेंव्हा देवाने मरीयेला येशू मसिहाची आई होण्याकरिता निवडले.
  • देवदुताने योसेफाला सांगितले की, पवित्र आत्मा मरिया गर्भवती राहण्यासाठी अद्भूतरीत्या कारणीभूत झाला, आणि ते मारीयेचे बाळ देवाचे पुत्र होते.
  • येशूचा जन्म झाल्यानंतर, देवदुताने योसेफाला ताकीद दिली की, बाळाला आणि मरीयेला घेऊन हेरोदापासून वाचण्यासाठी मिसरास पळून जा.
  • योसेफ आणि त्याचे कुटुंब नंतर गालील प्रांतातील नासरेथ शहरात राहिले, जेथे त्याने जगण्यासाठी सुतारकाम केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, गालील, येशू, नासरेथ, देवाचा पुत्र, कुमारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:04 ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते.

  • 23:01 मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मीक पुरुषाबरोबर झाले होते. मरीया गरोदर असल्याचे ऐकून त्याला कळले की, हे बाळ त्याचे नव्हे. तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली.

  • 23:02 देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस. तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. व त्याचे नाव येशू (अर्थात, ‘देव तारितो’) असे ठेव, कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.’’

  • 23:03 तेंव्हा योसेफाने मरीयेशी विवाह केला व आपली पत्नी म्हणून तिचा स्विकार केला, परंतु त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तो तिच्यापाशी निजला नाही.

  • 23:04 योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.

  • 26:04 येशू म्हणला,‘‘ हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.’’ तेंव्हा सर्व आश्चर्य करु लागले. ‘‘हा योसेफाचा पुत्र ना?’’ ते म्हणू लागले.

  • Strong's: G2501


योहान (प्रेषित)

तथ्य:

योहान हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक आणि येशूच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता.

  • योहान आणि त्याचा भाऊ याकोब हे एका कोळ्याचे ज्याचे नाव जब्दी होते, त्याचे मुलगे होते.
  • येशूच्या जीवनाबद्दलचे शुभवर्तमान जे त्याने लिहिले, त्यामध्ये योहान स्वतःला "येशूने ज्यावर प्रेम केले तो शिष्य" असे संदर्भित करतो. हे असे सूचित करताना दिसते की, योहान हा येशूचा विशेष जवळचा मित्र होता.
  • प्रेषित योहानाने नवीन करारातील पाच प्पुस्तके लिहिली: योहानाचे शुभवर्तमान, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण, आणि इतर विश्वासुंना लिहिलेली तीन पत्रे.
  • प्रेषित योहान हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा वेगळा व्यक्ती होता, हे लक्षात ठेवा.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, प्रकट, याकोब (जब्दीचा मुलगा), योहान (बाप्तिस्मा करणारा), जब्दी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 36:01 एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले. (य़ोहान नावाचा शिष्य व ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला ते दोघे एकच व्यक्ती नाहीत.) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले.

  • 44:01 एके दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.

  • 44:06 मंदिरातील पुढारी पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकून संतापले. म्हणून त्यांनी त्यांस धरून तुरुंगात टाकले.

  • 44:07 दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले. त्यांनी पेत्र व योहान यांना विचारले, "तुम्ही कोणत्या शक्तिद्वारे या पांगळ्या मनुष्यास बरे केले?"

  • 44:09 हे ऐकून धार्मिक पुढा-यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेत्र व योहान सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यांच्यासमोर मोठ्या धाडसाने बोलत होते. परंतु ते येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. मग त्यांनी पेत्राला व योहानाला धमकावले व जाऊ दिले.

  • Strong's: G2491


योहान (बाप्तिस्मा करणारा)

तथ्य:

योहान जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र होता. कारण "योहान" हे एक सामान्य नाव होते, त्याला सहसा "बाप्तिस्मा करणारा योहान" असे म्हंटले जाते, जेणेकरून तो इतर योहान नावाच्या लोकांपासून वेगळा आहे हे दिऊन येईल, जसे की प्रेषित योहान.

  • योहान एक संदेष्टा होता, ज्याला देवाने मसिहावर विश्वास ठेवण्याकरिता आणि त्याचे अनुकरण करण्याकरिता लोकांना तयार करण्यास पाठवले होते.
  • योहानाने लोकांना स्वतःची पापे कबूल करून, देवाकडे वळण्यासाठी आणि पाप करणे थांबवण्यासाठी सांगितले, म्हणजे ते मासिहाचा स्वीकार करण्यासाठी तयार होतील.
  • योहानाने लोकांना पाण्याने बाप्तिस्मा दिला, हे ह्याचे चिन्ह होते की, ते त्यांनी केलेल्या पापांबद्दल खिन्न आहेत आणि ते त्यापासून परत फिरत आहेत.
  • योहानाला "बाप्तिस्मा करणारा योहान" असे म्हंटले गेले, कारण त्याने अनेक लोकांना बाप्तिस्मा दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाप्तिस्मा, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:02 देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे.’’ त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मसिहाच्या आगमनासाठी लोकांची तयारी करील !’’

  • 22:07 अलीशिबेने आपल्या पुत्रास जन्म दिल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या व अलीशिबेने त्याचे नाव योहान असे ठेविले.

  • 24:01 योहान, जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र, मोठा होऊन एक संदेष्टा बनतो. तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या केसापासून बनविलेली होती.

  • 24:02 योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यांस प्रचार केला,‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’

  • 24:06 दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.’’

  • Strong's: G910 G2491


रऊबेन

तथ्य:

रऊबेन हा याकोबाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. त्याच्या आईचे नाव लेआ होते.

  • जेंव्हा त्याचे भाऊ, त्याचा लहान भाऊ योसेफ याला मारण्याची योजना बनवत होते, तेंव्हा त्याने त्यांना योसेफाला मारण्याऐवजी एका खड्ड्यामध्ये टाकण्यास सांगून त्याचे प्राण वाचवले.
  • रऊबेन योसेफाला सोडवण्यासाठी परत आला होता, पण तोपर्यंत त्याच्या भावांनी त्याला दास म्हणून, जवळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना विकून टाकले होते.
  • रऊबेनचे वंशज हे इस्राएलच्या बारा कुळांपैकी एक बनले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, योसेफ, लेआ, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रब्बा

व्याख्या:

रब्बा हे अम्मोनी लोकांचे सर्वात महत्वाचे शहर होते.

  • अम्मोनी लोकांच्याविरुद्ध युद्धामध्ये, इस्राएल लोकांनी बऱ्याचदा रब्बा शहरावर हल्ला केला.
  • इस्राएलचा राजा दावीद याने रब्बावर आपल्या शेवटच्या विजयांपैकी एक म्हणून कब्जा केला.
  • आताच्या युगातील अम्मान यार्दन हे शहर जिथे आहे, तेथे आधी रब्बा हे शहर स्थित होते.

(हे सुद्धा पहाः अम्मोनी, दावीद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रामा

तथ्य:

रामा हे इस्राएलांचे प्राचीन शहर होते, जे यरुशलेम पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर होते. * हा तो प्रांत होता, जिथे बन्यामिनाचे वंश राहत होते.

  • रामा येथे राहेलने बन्यामिनाला जन्म देताना स्वतःचा प्राण सोडला.
  • जेंव्हा इस्राएल लोकांना बाबेलाला बंदिवान म्हणून नेण्यात आले, तेंव्हा त्यांना बाबेलाला नेण्याच्या पूर्वी पहिल्यांदा रामा येथे आणण्यात आले.
  • रामा येथे शमुवेलाच्या आई आणि वडीलांचे घर होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बन्यामीन, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रामोथ

तथ्य:

यार्देन नदीच्या जवळील, गिलादच्या डोंगराळ प्रदेशातील रामोथ हे महत्वाचे शहर होते. त्याला रामोथ गिलाद असेही म्हंटले जाते.

  • रामोथ हे शहर गाद या इस्राएली कुळाचे होते, आणि त्याला संरक्षक शहर हे म्हणून नियक्त केले होते.
  • इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ येथे अरामच्या राजावर हल्ला केला. त्या युद्धामध्ये अहाब मारला गेला.
  • काही काळानंतर, अहज्या राजा आणि योरम राजा ह्यांनी रामोथ हे शहर अरामच्या राजाकडून घेण्याचा प्रयत्न केला.
  • रामोथ गिलाद येथे येहूला इस्राएलावर राजा म्हणून नियुक्त करण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, अहज्या, अराम, गाद, यहोशाफाट, येहू, योराम, यार्देन नदी, यहूदा, आश्रयस्थान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


राहाब

तथ्य:

जेंव्हा इस्राएलाने शहरावर हल्ला केला, तेंव्हा राहाब ही एक स्त्री होती, जी यरीहोमध्ये राहत होती. ती एक वेश्या होती.

  • राहाब हिने इस्राएलाच्या दोन हेरांना लपवले होते, जे इस्राएल लोकांनी यरीहोवर हल्ला करण्यापूर्वी, त्या शहराची टेहळणी करण्यासाठी गेले होते. तिने त्या हेरांना परत सुखरूप इस्राएलाच्या तंबूत परतण्यासाठी मदत केली.
  • राहाब यहोवावर विश्वास ठेवू लागली.
  • जेंव्हा यरीहोचा पाडाव केला, तेंव्हा ती आणि तिचे कुटुंब वाचले गेले, आणि ते सर्वजन इस्राएलमध्ये राहण्यास आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएल, यरीहो, वेश्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली. तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा रहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.

  • देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला. त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले.

  • Strong's: H7343, G4460


राहाबाम

तथ्य:

शलमोन राजाच्या मुलांपैकी राहाबाम हा एक मुलगा होता, आणि शलमोन मेल्यानंतर तो इस्राएल राष्ट्राचा राजा बनला.

  • त्याच्या राज्याच्या सुरवातीला, राहाबाम त्याच्या लोकांशी क्रूरतेने वागला, म्हणून इस्राएलाच्या दहा कुळांनी त्याच्याविरुद्ध बंड केले आणि उत्तरेस "इस्राएलाचे राज्य" स्थापन केले.
  • रहाबाम दक्षिणेकडील यहुदाच्या राज्याचा राजा म्हणून राज्य करत राहिला, ज्यामध्ये राहिलेल्या दोन कुलांचा, यहूदा आणि बन्यामीन ह्यांचा समावेश होता.
  • राहाबाम हा एक दुष्ट राजा होता, ज्याने यहोवाची आज्ञा मानिली नाही, पण खोट्या देवांची उपासना केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएलाचे राज्य, यहूदा, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:05 शलमोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहोबाम हा राजा झाला. रहोबाम हा मूर्ख मनुष्य होता.

  • 18:06 रहोबामाने मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.’’

  • 18:07 इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली.

  • Strong's: H7346, G4497


राहेल

तथ्य:

राहेल ही याकोबाची पत्नी होती. ती आणि तिची बहिण लेआ या लाबानाच्या, याकोबाच्या मामाच्या मुली होत्या.

  • राहेल ही योसेफ आणि बन्यामीन यांची आई होती, त्यांचे वंशज इस्राएलाची दोन कुळे बनली.
  • बऱ्याच वर्षांकरिता, राहेल मुलाला जन्म देण्यास सक्षम नव्हती. नंतर देवाने तीला योसेफाला जन्म देण्यास सक्षम केले.
  • बऱ्याच वर्षांनंतर, बन्यामीन नावाचा मुलगा झाला तेव्हा राहेलचा मृत्यू झाला आणि याकोबाने बेथलेहेमजवळ तिला दफन केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः बेथलेहेम, याकोब, लाबान, लेआ, योसेफ, इस्राएलाच्या बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रिबका

तथ्य:

रिबका ही अब्राह्माचा भाऊ नाहोर याची नात होती.

  • देवाने रिबकेला इसहाकची पत्नी होण्याकरिता निवडले.
  • रिबका अराम-नहाराईम हा प्रांत जिथे ती राहत होती, तो सोडून अब्राहामाच्या दासाबरोबर नेगेव प्रांतात जिथे इसहाक राहत होता गेली.
  • बऱ्याच काळापर्यंत रिबकेला काही मुलबाळ नव्हते, परंतु शेवटी देवाने तिला जुळी मुले एसाव आणि याकोब देऊन आशीर्वादित केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, अराम, एसाव, इसहाक, याकोब, नाहोर, नेगेव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी, देवबाप त्या सेवकास रिबकाकडे घेऊन येतो. ती आब्राहमच्या भावाची नात होती.

  • देव रिबकेस म्हणाला, "तुझ्या पोटातील दोन मुलांद्वारे दोन राष्ट्रे होतील.

  • ही मुले वाढत असतांना, याकोब रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.

  • इसहाक आपला आशीर्वाद एसावास देऊ इच्छित होता. परंतु असे करण्यापूर्वी रिबका आणि याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असल्याचे ढोंग करून इसहाकास फसविले.

  • परंतु रिबकेने एसावच्या योजनेबद्दल ऐकले. म्हणून तिने याकोबास आपल्या दूर देशी असलेल्या नातेवाईकाकडे राहाण्यास पाठवले.

  • Strong's: H7259


रीम्मोन

तथ्य:

रीम्मोन हे एका मनुष्याचे आणि पुष्कळ ठिकाणांचे नाव होते, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आहे. हे एका खोट्या देवतेचे देखील नाव होते.

  • रीम्मोन नावाचा एक मनुष्य, जो बन्यामीनी होता, आणि तो जुबुलून मधील बैरोथ या शहराचा रहिवासी होता. या मनुष्याच्या मुलाने ईश-बोशेथ, योनाथानचा पांगळा मुलगा ह्याचा खून केला.
  • रीम्मोन हे यहुदातील दक्षिणी भागातील, बन्यामीनी गोत्राने व्यापलेल्या प्रांतातील एक गाव होते .
  • "रीम्मोनचा खडक" हे बन्यामीनी लोकांचे एक सुरक्षित ठिकाण होते, जेथे ते युद्धामध्ये मारले जाण्यापासून वाचण्यासाठी पळून जात होते.
  • रीम्मोन पेरेस हे यहुदियाच्या वाळवंटातले माहित नसलेले स्थान होते.
  • आरामाचा सेनापती नामान ह्याने रीम्मोन येथील खोट्या देवाच्या मंदिराबद्दल सांगितले, ज्याची आरामाचा राजा उपासना करत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बंयामीन, यहुदिया, सुरिया (अराम), जुबुलून)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रुथ

तथ्य:

रुथ ही एक मवाबी स्त्री होती, जी अशा काळात राहत होती, जेंव्हा शास्ते इस्राएली लोकांचे नेतृत्व करत होते. तिने मवाबमध्ये एका इस्राएली पुरुषाशी लग्न केले, जेंव्हा शास्ते इस्राएली लोकांचे नेतृत्व करीत होते, तेंव्हा तो दुष्काळामुळे त्याच्या कुटुंबासहित तेथे राहायला गेला होता.

  • रुथचा नवरा मेला, आणि काही कालांतराने तिने, तिची सासू नामी हिच्याबरोबर तिच्या मुळगावी, इस्राएल मधील बेथलेहेम येथे जाण्यासाठी मवाब सोडले.
  • रुथ ही नामीशी एकनिष्ठ होती, आणि तिला अन्न पुरवण्यासाठी तिने कठोर परिश्रम केले.
  • तिने स्वतःला इस्राएलाचा एक खरा देव, ह्याच्या सेवेसाठी समर्पित केले.
  • रुथने बवाज नावाच्या इस्राएली मनुष्याशी लग्न केले, आणि एक मुलाला जन्म दिला, जो पुढे जाऊन दावीद राजाचा आजा बनला. कारण दावीद राजा येशूचा पूर्वज होता, म्हणून रुथ सुद्धा त्याची पूर्वज होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथलहेम, बवाज, दावीद, शास्ते)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


रोम, रोमी

तथ्य:

नवीन कराराच्या काळात, रोम हे शहर रोमी साम्राज्याचे केंद्र होते. आता ते सध्याचा आधुनिक देश इटलीची राजधानी आहे.

  • रोमी सम्राट, इस्राएलासाहित, भूमध्य सागराच्या भोवतालच्या सर्व प्रदेशांवर शासन करत होता.
  • "रोमी" या शब्दाचा संदर्भ त्या क्षेत्राशी संबंधित असलेले काहीही जे रोमी शासनाच्या नियंत्रणामध्ये आहे ह्याच्याशी आहे, त्यामध्ये रोमी नागरिक आणि रोमी अधिकारी ह्यांचा समावेश आहे.
  • प्रेषित पौलाला कैदी म्हणून रोम शहरात नेण्यात आले, कारण त्याने येशुबद्दलच्या सुवार्तेचा प्रचार केला होता.
  • नवीन करारातील रोमकरांस पत्र, हे पौलाने रोम मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.

(हे सुद्धा पहाः सुवार्ता, समुद्र, पिलात, पौल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:04 जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले.

  • 32:06 तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’ तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)

  • 39:09 दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले.

  • 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’

  • Strong's: G4514, G4516


लबानोन

तथ्य:

लबानोन हा एक सुंदर डोंगराळ प्रदेश होता, जो इस्राएलाच्या उत्तरेला, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून स्थित होता. पवित्र शास्त्राच्या काळात, हा प्रदेश सरुंच्या झाडांनी जसे की, गंधसरू आणि देवदारु यांनी घनदाट होता,

  • शलमोन राजाने मंदीर बांधण्यासाठी उपयोगात येणाऱ्या गांधसरुंच्या झाडांना कापण्यासाठी लबानोनला कामकरी पाठवले.
  • पूर्वीचे लबानोन हे फिनीशियाच्या लोकांचे होते, जे व्यापारी उद्योगासाठी लागणाऱ्या जहाजांचे कुशल कारागीर होते.
  • सोर आणि सीदोन ही शहरे लबानोन मध्ये स्थित होती. ही तीच शहरे होती, ज्यामध्ये मौल्यवान जांभळ्या रंगाचा पहिल्यांदा वापर केला गेला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः गंधसरू, देवदारु, सरू, फिनीशिया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


लाजर

तथ्य:

लाजर आणि त्याच्या बहिणी, मरिया आणि मार्था, हे येशूचे विशेष मित्र होते. येशू सहसा बेथानी येथे त्यांच्या घरी त्यांच्यासोबत राहिला.

  • लाजर हा त्याला कबरेमध्ये पुरून अनेक दिवस झाल्यानंतरसुद्धा त्याला येशूने मृतांमधून उठवले या तथ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.
  • ह्यामुळे यहुदी पुढारी येशूवर रागावले आणि त्याने हा चमत्कार केला म्हणून त्याचा द्वेष करू लागले, आणि ते येशू व लाजर या दोघांनाही मारण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू लागले.
  • येशूनेसुद्धा एका गरीब भिकारी आणि श्रीमंत मनुष्याची गोष्ट सांगितली, ज्यामध्ये त्या भिकाऱ्याला "लाजर" असे नाव दिले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: भिकारी, यहुदी पुढारी, मार्था, मरिया, उठवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 37:01 एके दिवशी, लाजर खूप आजारी असल्याची बातमी येशूला कळली. लाजर व त्याच्या दोन बहिणी मरीया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते.

  • 37:02 येशू म्हणाला, ‘‘आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे.’’

  • 37:03 येशूच्या शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘प्रभुजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो बरा होईल.’’ तेंव्हा येशूने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘लाजर मेला आहे.

  • 37:04 जेंव्हा येशू लाजर राहत असलेल्या गावी आला, तेंव्हा लाजर मरुन चार दिवस झाले होते.

  • 37:06 येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे?’’

  • 37:09 मग येशूने मोठयाने हाक मारली, ‘‘लाजरा, बाहेर ये!’’

  • 37:10 तेव्हा लाजर चालत बाहेर आला! त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले होते.

  • 37:11 परंतु यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा द्वेष करु लागले, व येशू आणि लाजर यांना जीवे मारण्यासाठी योजना आखू लागले.

  • Strong's: G2976


लाबान

तथ्य:

जुन्या करारामध्ये, लाबान हा याकोबाचा मामा आणि सासरा होता.

  • याकोब पदन अरामामध्ये लाबानाच्या घराण्यासोबत राहिला आणि लाबानाच्या मुलींशी लग्न करण्याच्या लाबानाच्या अटीनुसार याकोबाने त्याची शेरडे आणि मेंढरे राखली.
  • लाबानची मुलगी राहेल हिच्याशी लग्न करण्याची याकोबाची पसंती होती.
  • लाबानाने याकोबाला फसवले आणि त्याला राहेल ही पत्नी म्हणून देण्याच्या आधी याकोबाला त्याच्या मोठ्या मुलीशी लेआशी लग्न करावयास लावले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, नाहोर, लेआ, राहेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लामेख

तथ्य:

उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लामेख नावाच्या दोन मनुष्यांचा उल्लेख केला आहे.

  • पहिल्या लामेखाचा उल्लेख काइनाचा वंशज म्हणून केला आहे. त्याने त्याच्या दोन बायकांना अभिमानाने सांगितले की, त्याला जखमी केलेल्या एका माणसाला त्याने ठार केले.
  • दुसरा लामेख हा शेथचा वंशज होता. * तो नोहाचा पिता सुद्धा होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा काइन, नोहा, शेथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लिव्याथान

तथ्य:

"लिव्याथान" या शब्दाचा संदर्भ, खूप मोठा, आता अस्तित्वात नसलेल्या प्राण्याशी आहे, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्राच्या सुरवातीच्या लिखाणामध्ये, ईयोब, स्तोत्रसंहिता, आणि यशयाच्या पुस्तकांमध्ये आढळतो.

  • लिव्याथानचे वर्णन मोठा, सापासारखा प्राणी, मजबूत आणि भयानक, आणि सभोवतालचे पाणी "उकळवण्याची" क्षमता असलेला असे केले आहे. त्याचे वर्णन एखाद्या डायनासोर प्राण्याप्रमाणेच होते.
  • यशया संदेष्ट्याने लिव्याथानसाठी "सरपटणारा साप" असा संदर्भ दिला आहे.
  • ईयोबाने लिव्याथानच्या प्रत्यक्ष माहितीबद्दल लिहिले होते, म्हणून तो प्राणी त्याच्या आयुष्यात जिवंत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः यशया, ईयोब, सर्प)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लुक

तथ्य:

लुक ह्याने नवीन करारातील दोन पुस्तके लिहिली: लुक कृत शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये.

  • पौलाने कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात, पौल लुकचा वैद्य असा संदर्भ देतो. पौलाने लुकचा उल्लेख त्याच्या आणखी दोन पत्रामध्ये केला.
  • असे समजले जाते की लुक एक ग्रीक आणि विदेशी मनुष्य होता, जो ख्रिस्ताचा विश्वासी बनला होता. त्याच्या शुभवर्तमानामध्ये, लुक अनेक वृतान्ताचा समावेश करतो, ज्यात येशूचे सर्व लोकांच्याबद्दलचे प्रेम, यहुदी आणि परराष्ट्रीय दोन्हीसाठी ठळक होते.
  • लुकने पौलाला त्याच्या सुवार्ताप्रसाराच्या दोन यात्रेमध्ये सोबत दिली आणि त्याच्या कामामध्ये त्याला मदत केली.
  • काही आद्य मंडळींच्या लिखाणामध्ये, असे म्हंटले जाते की, लुक सुरीयातील अंत्युखिया या शहरात जन्माला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अंत्युखिया, पौल, सुरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लुस्त्र

तथ्य:

लुस्त्र हे प्राचीन आशिया मायनरमधील एक शहर होते, ज्याला पौलाने आपल्या सुवार्ता प्रसाराच्या प्रवासाच्या वेळी भेट दिली होती. ते लुकवनियाच्या प्रांतात स्थित होते, जे आताचा तुर्की देश आहे त्यामध्ये आहे.

  • जेंव्हा इकुन्यातील यहुद्यांनी पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना धमकी दिली, तेंव्हा ते दर्बे आणि लुस्त्र येथे पळून गेले.
  • लुस्त्रमध्ये, पौल तीमिथ्याला भेटला, त्याच्या साथीचा सुवार्ता प्रसारक आणि मंडळींची स्थापना करणारा बनला.
  • पौलाने लुस्त्र येथे एका अपंग मनुष्याला बरे केल्यानंतर, तेथील लोकांनी पौल व बर्णबाला देव म्हणून त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेषितांनी त्यांना दटावले आणि असे करण्यापासून त्यांना रोखले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: सुवार्ता प्रसारक, इकुन्या, तीमोथ्यी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


लेआ

तथ्य:

लेआ ही याकोबाच्या पत्नींपैकी एक होती. ती याकोबाच्या दहा मुलांची आहे होती, आणि त्यांची वंशावळ इस्राएलमधील बारा वंशापैकी दहा होते.

  • लेआचा पिता लाबान, जो याकोबाची आई रिबका हिचा भाऊ होता.
  • याकोबाने जेवढी प्रीती राहेलीवर केली, तेवढी त्याने लेआवर केली नाही, पण देवाने लेआला खूप मुले देऊन भरपूर आशीर्वाद दिला.
  • लेआचा मुलगा यहूदा हा दावीद राजा आणि येशूचा पूर्वज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, यहूदा, लाबान, राहेल, रिबका, इस्राएलाच्या बारा वंशज).

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लेवी, लेवीनी

व्याख्या:

लेवी हा याकोबाच्या किंवा इस्राएलाच्या बारा मुलांपैकी एक होता. "लेवी" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो, जो इस्राएलाच्या लेवी गोत्राचा वंशज आहे.

  • मंदिराची काळजी घेणे आणि धार्मिक विधी आयोजित करणे, ज्यामध्ये बलिदान आणि प्रार्थना अर्पण करणे ह्यांचा समावेश होता, या जबाबदाऱ्या लेवींच्या होत्या.
  • सर्व यहुदी याजक हे लेवी होते, जे लेवीचे वंशज आणि लेवी गोत्राचा एक भाग होते. (तथापि, सर्व लेवी याजक नव्हते.)
  • लेवी याजाकाला बाजूला वेगळे करून त्याला मंदिरामध्ये देवाची सेवा करण्यासाठी समर्पित केले जात होते.
  • "लेवी" नावाचे दोन इतर मनुष्य, हे येशूचे पूर्वज होते, आणि त्यांची नावे लुककृत शुभवर्तमान या पुस्तकाच्या वंशावळीत आढळतात.
  • येशूचा' शिष्यः मत्तय ह्याला सुद्धा लेवी म्हणून संबोधले जात होते.

(हे सुद्धा पहा: मत्तय, याजक, बलिदान, मंदिर, इस्राएलाचे बारा गोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


लोट

तथ्य:

लोट हा अब्राहामाचा भाचा होता.

  • तो अब्राहमाचा भाऊ हराण याचा मुलगा होता.
  • लोटाने अब्राहामाबरोबर कनान देशापर्यंत प्रवास केला आणि तो सदोम नगरात स्थायिक झाला.
  • लोट हा मवाबी आणि अम्मोनी लोकांचा पूर्वज होता.
  • जेंव्हा शत्रू राजाने सदोमावर हल्ला केला आणि लोटाला बंदी बनवले, तेंव्हा अब्राहाम लोटाला सोडवण्यासाठी आणि त्याची मालमत्ता परत मिळवण्यासाठी शेकडो लोकांना घेऊन आला.
  • सदोम शहरामध्ये राहणारे लोक हे फार दुष्ट होते, म्हणून देवाने त्या नगराचा नाश केला. पण पहिल्यांदा लोट आणि त्याच्या कुटुंबाला ते शहर सोडण्यास सांगितले, म्हणजे ते वाचतील.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, अम्मोन, हारान, मोवाब, सदोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


वश्ती

तथ्य:

जुन्या करारातील पुस्तक एस्तेर यामध्ये, वश्ती ही परसाचा राजा अहश्वेरोश याची पत्नी होती.

  • अहश्वेरोष राजाने वश्ती राणीला दूर घालवून दिले, जेंव्हा तिने त्याच्या मेजवानीला येण्याच्या आणि तिची सुंदरता त्याच्या द्राक्षरस प्यालेल्या अधिकारी आणि सरदारांना दाखवण्याच्या आज्ञेला मानले नाही.
  • ह्याच्या परिणामस्वरूप, नवीन राणीसाठी शोध घेतला गेला आणि अखेरीस एस्तेरला राजाची नवीन राणी म्हणून निवडण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, एस्तेर, पारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शखेम

तथ्य:

शखेम हे कनानमधील यरुशलेम पासून जवळपास 40 मैलावरील एक गाव होते. * जुन्या करारामध्ये "शखेम" हे एका मनुष्यांचे नाव देखील होते.

  • याकोबाने त्याचा भाऊ एसाव ह्याच्याशी समेत केल्यानंतर तो जिथे राहत होता, त्या जागेत शखेम हे गाव होते.
  • याकोबाने शखेममध्ये हमोर हिव्वी याच्या मुलांकडून जमीन विकत घेतली. ही जमीन नंतर त्याच्या कुटुंबाची दफनभूमी बनली, आणि त्या जागी त्याच्या मुलांनी त्याला दफन केले.
  • हमोराचा मुलगा शखेम ह्याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला, ह्याचा परिणाम म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम गावात राहणाऱ्या सगळ्या मनुष्यांची कत्तल केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः कनान, एसाव, हामोर, हिव्वी, याकोब)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शबा

तथ्य:

प्राचीन काळात, शबा हे एक प्राचीन संस्कृती किंवा जमिनीचा प्रांत होता, जो दक्षिणी अरबस्तानमध्ये कुठेतरी स्थित होता.

  • शबा हा देश किंवा प्रांत, कदाचित अशा ठिकाणी स्थित होता, जिथे सध्याचा यमन आणि इथिओपिया हे देश आहेत.

8 त्याचे रहिवासी हे कदाचित हामचे वंशज असावेत.

  • शबाची राणी शलमोन राजाला भेटायला आली, जेंव्हा तिने त्याच्या श्रीमंती आणि सुज्ञानाच्या प्रसिद्धीबद्दल ऐकले.
  • जुन्या कराराच्या वंशावळीमध्ये "शबा" नावाच्या अनेक मनुष्यांची नोंद केलेली यादी आढळते. हे शक्य आहे की, शबा या प्रांताचे नाव ह्यापैकी एका मनुष्यानंतर आलेले असावे.
  • जुन्या करारामध्ये एकदा बैरशेबा या शहराचे लहान नाव शबा असे लिहिले आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अरबस्तान, बैरशेबा, इथिओपिया, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शमसोन

तथ्य:

शमसोन हा इस्राएलाच्या शास्त्यांपैकी किंवा सोडवणाऱ्यापैकी एक होता. तो दान गोत्रातील होता.

  • देवाने शमसोनाला अतिमानवी शक्ती दिली, जिचा उपयोग त्याने इस्राएलाचा शत्रू पलीष्टी ह्यांच्याशी लढण्यासाठी केला.
  • शमसोन हा तो कधीही त्याचे केस कापणार नाही आणि कधीही द्राक्षरस किंवा इतर आंबवलेले पेय पिणार नाही या प्रतिज्ञेमध्ये जीवन जगत होता. जोपर्यंत त्याने त्याची प्रतिज्ञा पाळली, देव त्याला शक्ती पुरवत राहिला.
  • शेवटी त्याने त्याची प्रतिज्ञा मोडली आणि त्याचे केस कापण्याची परवानगी दिली, ज्याने पालीष्ट्यांना त्याला पकडण्यास सक्षम केले.
  • शमसोन बंदिवासात असताना, देवाने त्याला त्याची शक्ती परत मिळवण्यास सक्षम केले, आणि त्याला अनेक पलीष्ट्यांच्याबरोबर खोटा देव दागोन ह्याचे मंदिर नष्ट करण्याची संधी दिली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: सोडवणारा, पलीष्टी, इस्राएलाचे बारा गोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शमुवेल

तथ्य:

शमुवेल हा संदेष्टा आणि इस्राएलाचा शेवटचा शास्ते होता. त्याने शौल आणि दावीद दोघांनाही इस्राएलावर राजा म्हणून अभिषेकित केले.

  • शमुवेल हा रामाच्या गावात एलकाना आणि हन्ना ह्यांच्या घरी जन्माला आला.
  • हन्ना वांझ होती, म्हणून तिने देवाला कळकळीची प्रार्थना केली की, देवाने तिला एक पुत्र द्यावा. शमुवेल हा तिच्या प्रार्थनेचे उत्तर होता.
  • हन्नाने वचन दिले की, जर तिने देवाला एक पुरुष मुलाला जन्माला देण्याची असाध्य विनंती केली असेल, आणि तिची विनंती मान्य झाली असेल, तर ती आपल्या मुलाला यहोवाला समर्पित करेल.
  • देवाला दिलेले तिचे हे वचन पूर्ण करण्यासाठी, जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, तेंव्हा हन्नाने त्याला एली या मंदिरातील याजकाबरोबर राहण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी पाठवले.
  • देवाने शमुवेलाला महान संदेष्टा म्हणून वाढवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हन्ना, शास्ते, संदेष्टा, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शलमोन

तथ्य:

शलमोन हा दाविदाच्या मुलांपैकी एक होता. त्याच्या आईचे नाव बेथशेबा होते.

  • जेंव्हा शलमोन राजा बनला, देवाने त्यांना सांगितले की तुला पाहिजे ते तू माग. म्हणून शलमोनाने लोकांच्यावर न्यायीपणाने आणि चांगले शासन करण्याकरिता सुज्ञान मागितले. शलमोनाच्या विनंतीने देव आनंदित झाला आणि त्याने त्याला दोन्ही सुज्ञान आणि भरपूर संपत्ती दिली.
  • शलमोन हा यरुशलेममध्ये असलेले भव्य मंदिर बांधण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
  • जरी शलमोनाने त्याच्या राज्य करण्याच्या सुरवातीच्या काळात सुज्ञपणे शासन केले, तरी नंतर त्याने मूर्खपणाने परराष्ट्रीय स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरवात केली.
  • शलमोनाच्या अविश्वासूपणामुळे, त्याच्या मृत्यनंतर देवाने इस्रायेलाचे, इस्राएल आणि यहूदा असे दोन भाग केले. हे राज्ये सहसा एकमेकांच्या विरोधात लढली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथशेबा, दावीद, इस्राएल, यहूदा, इस्राएलाचे राज्य, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:14 नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.

  • 18:01 ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला. देवाने शल्मोनास दर्शन दिले व त्यास सर्वात अधिक काय हवे आहे असे विचारले. जेंव्हा शल्मोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले. शल्मोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.

  • 18:02 आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले.

  • 18:03 परंतू शल्मोनाने परराष्ट्रीय स्त्रीयांवर प्रेम केले. शलमोन वृद्ध झाल्यानंतर त्यानेही त्यांच्या दैवतांची पूजा केली.

  • 18:04 देव शल्मोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलाच्या राज्याचे दोन भाग केले.

  • Strong's: H8010, G4672


शारोन, शारोनाचे मैदान

तथ्य:

शारोन हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून कर्मेल पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या सपाट, सुपीक जमिनीच्या क्षेत्राचे नाव आहे. ह्याला शारोनाचे मैदान असेही म्हणतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये शारोनाच्या मैदानावर वसलेल्या बऱ्याच शहरांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये याफे, लोद, आणि कैसरीया या शहरांचा समावेश आहे.
  • याचे भाषांतर "मैदान ज्याचे नाव शारोन आहे" किंवा "शोरोनाचे मैदान" म्हणून केले जाऊ शकते.
  • जे लोक शारोन मध्ये राहत होते, त्यांना "शारोनी" असे म्हंटले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः कैसरिया, कर्मेल, योफा, समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शिनार

तथ्य:

शिनार म्हणजे "दोन नद्यांचा देश" आणि दक्षिणेकडील मेसोपटेम्यामधील एक मैदान किंवा क्षेत्राचे नाव होते.

  • शिनार नंतर "खास्दी" आणि त्या नंतर "बाबेल" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • बाबेल शहरातील शिनारच्या मैदानावर राहणाऱ्या प्राचीन लोकांनी, स्वतःला महान बनविण्यासाठी एक मोठा बुरुज बांधला.
  • नंतरच्या काळात, यहुद्यांचा कुटुंब प्रमुख अब्राहम ह्याच प्रांतातल्या ऊर शहरात राहिला, ज्याला कालांतराने "खास्दी" असे संबोधण्यात आले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः अब्राहम, बाबेल, बाबेली, खास्दी, मेसोपटेम्या, कुटुंबप्रमुख, ऊर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शिमोन "

तथ्य:

पवित्र शास्त्रामध्ये शिमोन नावाचे अनेक वेगवेगळे पुरुष होते.

  • जुन्या करारामध्ये, याकोबाच्या (इस्राएलाच्या) दुसऱ्या मुलाचे नाव शिमोन ठेवण्यात आले होते. लेआ त्याची आई होती. * त्याचे वंशज हे इस्राएलच्या बारा कुळांपैकी एक बनले.
  • शिमोनच्या कुळाने कनानमधील वचन दिलेल्या देशातील दक्षिणेकडील प्रदेशाचा भाग व्यापला. या प्रदेशाला यहुदाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाने संपूर्णपणे घेरलेले होते.
  • जेंव्हा योसेफ आणि मरिया ह्यांनी येशू बाळाला यरुशलेममधील मंदिरात देवाच्या समर्पनासाठी आणले, तेंव्हा शिमोन नाव असलेल्या वृद्ध मनुष्याने, त्याला मसिहाला पाहण्याची देवाने परवानगी दिली म्हणून त्याने देवाची प्रशंसा केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, ख्रिस्त, समर्पण, याकोब, यहूदा, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शिमोन जिलोत

तथ्य:

शिमोन जिलोत हा येशूच्या बारा शिष्यांपैकी एक होता.

  • येशूच्या शिष्यांच्या यादीत शिमोनचा उल्लेख तीन वेळा केला आहे, परंतु त्याच्याबद्दल अजून काहीच माहिती नाही.
  • शिमोन हा त्या आकारांपैकी एक होता, जे येशू स्वर्गात परत गेल्यानंतर यरुशलेममध्ये प्रार्थनेसाठी एकत्र जमत होते.
  • "जिलोत" या शब्दाचा अर्थ कदाचित, शिमोन हा त्या "जिलोत" चा सदस्य असावा असा होऊ शकतो, एक यहुदी धार्मिक संघ, जो रोमी सरकारचा जोरदार विरोध करत असताना, मोशेचे नियमशास्त्राचे पालन करण्यास उत्साही होता.
  • किंवा, "जिलोत" या शब्दाचा अर्थ, "आवेशी" असा होतो, ज्याचा संदर्भ शिमोनाच्या धार्मिक आवेशाशी होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, बारा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


शिलो

तथ्य:

शिलो हे एक भिंतींची तटबंदी असलेले शहर होते, ज्यावर इस्राएली लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली कब्जा केला.

  • शिलो हे शहर यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि बेथेल शहरच्या उत्तरपूर्व दिशेस वसलेले होते.
  • यहोशवा इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्याच्या काळात, शिलो हे शहर इस्राएली लोकांच्या सभेचे ठिकाण होते.
  • यहोशवाने इस्राएलाच्या बारा कुळांना, कनानमधील कोणता भाग कोणत्या कुळाला नियुक्त केला गेला आहे हे सांगण्यासाठी, ते सर्व शिलो येथे एकत्र जमले.
  • यरुशलेममध्ये मंदिर बांधण्याच्या आधी, शिलो ही जागा होती, जिथे इस्राएली लोक देवाला बलिदान अर्पण करण्यासाठी येत.
  • जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, त्याची आई त्याला शिलो येथे देवाची सेवा करण्याकरिता आणि याजक एली कडून शिक्षण घेण्याकरिता घेऊन गेली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथेल, समर्पण, हन्ना, यरुशलेम, यार्देन नदी, याजक, बलिदान, शमुवेल, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शेथ

तथ्य:

उत्पत्तीच्या पुस्तकात, शेथ हा आदाम आणि हव्वा यांचा तिसरा मुलगा होता.

  • हव्वा बोलली की, शेथ हा तिचा मुलगा हाबेल याच्या बदल्यात तिला मिळाला आहे, ज्याला त्याचा भाऊ काइन याने मारले होते.
  • नोहा हा शेथच्या वंशाजांपैकी एक आहे, म्हणून जो कोणी पुरानंतर जगात आहे तो शेथचा सुद्धा वंशज आहे.
  • शेथ आणि त्याचे कुटुंब हे पहिले लोक होते, ज्यांनी "देवाच्या नावाचा धावा केला."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हाबेला, काइन, बोलवणे, वंशज, पूर्वज, पूर, नोहा.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शेम

तथ्य:

शेम हा नोहाच्या तीन मुलांपैकी एक होता, उत्पत्तीच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे, पृथ्वीवर सर्वत्र आलेल्या पुराच्या काळात, तो सर्वांच्या बरोबर तरावात गेला.

शेम हा अब्राहम आणि त्याच्या वंशजांचा पूर्वज होता.

  • शेमचे वंशज "शेमी" म्हणून ओळखले जात होते; ते "शेमी" भाषा जसे की हिब्रू आणि अरबी बोलत होते.
  • पवित्र शास्त्र सूचित करते की, शेम हा जवळपास 600 वर्षे जगला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः अब्राहाम, अरबी, तारू, पूर, नोहा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शेम

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये शेम नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • गेराचा मुलगा शेम हा बन्यामीन वंशातला होता ज्याने दावीद राजाला शाप दिला आणि त्याला दगडमार केला, जेंव्हा तो त्याचा मुलगा अबशालोम पासून मरणाच्या भीतीने यरुशलेमेस पळून जात होता.
  • शेम नाव असलेले जुन्या करारामध्ये अनेक लेवी याजक देखील होते.

(हे सुद्धा पहा: अबशालोम, बन्यामीन, लेवीय, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


शोमरोन, शोमरोनी

तथ्य:

शोमरोन हा इस्रायलच्या उत्तरेकडील भागातील शहराचे आणि त्याच्या सभोवतालचे नाव होते. हा प्रांत शारोनाच्या मैदानाच्या पश्चिमेस आणि यार्देन नदीच्या पूर्वेस स्थित होता.

  • जुन्या करारामध्ये, शोमरोन हे उत्तरेकडील इस्राएल राज्याची राजधानी होते. नंतर सभोवतालच्या प्रांताला देखील शोमरोन म्हंटले गेले.
  • जेंव्हा अश्शुरी लोकांनी उत्तरेकडील इस्राएल राज्यावर विजय मिळवला, तेंव्हा त्यांनी शोमरोन शहर काबीज केले आणि उत्तरेकडील इस्राएलांना तो प्रांत सोडून अश्शुराच्या वेगवेगळ्या शहरात जाण्यास भाग पडले.
  • जे इस्राएली लोक निघून गेले होते, त्यांच्या जागी अश्शुरी लोकांनी पुष्कळ परराष्ट्रीयांना शोमरोनच्या प्रांतात आणले.
  • त्या प्रांतात शिल्लक राहिलेल्या काही इस्राएली लोकांनी, तेथे आलेल्या परराष्ट्रीयांबरोबर अंतरवंशीय विवाह केला, आणि त्यांच्या वंशजांना शोमरोनी असे म्हणण्यात आले.

यहुदी लोक शोमरोनी लोकांचा तिरस्कार करत असत, कारण ते अंशतः यहुदी होते, आणि त्यांच्या पूर्वजांनी मूर्तिपूजक देवतांची उपासना केली होती.

  • नवीन कराराच्या कालखंडात, शोमरोन प्रदेशाच्या सीमांच्या उत्तरेला गालीलचा प्रदेश आणि दक्षिणेला यहुदीयाचा प्रदेश होता.

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, गालील, यहूदिया, शारोन, इस्राएलाचे राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:04 तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

  • 27:08 ‘‘त्या मागून येणारा तिसरा व्यक्ति एक शोमरोनी होता. (शोमरोनी हे यहूदी वंशातील परराष्ट्रीयांशी विवाह केलेले लोक होते. शोमरोनी व यहूदी एकमेकांचा द्वेष करत असत.)

  • 27:09 ‘‘मग त्या शोमरोन्याने त्या मनुष्याला उचलून आपल्या गाढवावर बसविले व त्याने त्याला मार्गावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणिले व त्याची काळजी घेतली.”

  • 45:07 तो शोमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले.

  • Strong's: H8111, H8115, H8118, G4540, G4541, G4542


शौल (जुना करार)

तथ्य:

शौल हा इस्राएली मनुष्य होता, ज्याला देवाने इस्राएलाचा पहिला राजा होण्यासाठी निवडले.

  • शौल उंच आणि देखणा, आणि शक्तिशाली सैनिक होता. इस्राएल लोकांना जसा राजा हवा होता, तो तश्या प्रकारचा मनुष्य होता,
  • जरी त्याने सुरवातीला देवाची सेवा केली, पण नंतर शौल गर्विष्ठ बनला आणि त्याने देवाची अवज्ञा केली. ह्याचा परिणाम म्हणून, देवाने दाविदाला शौलाच्या जागी राजा म्हणून नेमले आणि शौलाला युद्धात ठार मरण्याची परवानगी दिली.
  • नवीन करारामध्ये, तिथे एक शौल नावाचा यहुदी होता, त्याला पौल या नावाने देखील ओळखले जाते आणि जो नंतर येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:01 शौल इस्त्रायलचा पहिला राजा होता. इस्राएल लोकांना पाहिजे तसाच तो सुंदर व ऊंच होता. इस्त्राएलावर काही वर्षे शौल राजाने चांगले राज्य केले. * परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.

  • 17:04 लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूण शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले.

  • 17:05 शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला.

  • Strong's: H7586, G4549


सदोम

व्याख्या:

सदोम हे कनानच्या दक्षिणेकडील भागातील शहर होते, जिथे अब्राहामाचा भाचा लोट हा त्याच्या बायको आणि मुलांसोबत राहत होता.

  • सदोमच्या आजूबाजूच्या परिसराची जमीन अतिशय सुपीक आणि भरपूर पाणी दिलेली होती, त्यामुळे लोटाने कनानमध्ये स्थायिक झाल्यावर तेथे राहण्याचे निवडले.
  • या शहराचे नेमके स्थान माहित नाही, कारण देवाने सदोम आणि त्याच्या जवळचे शहर गमोराचा, तिथल्या लोकांच्या वाईट कृत्यांची शिक्षा म्हणून पूर्णपणे नाश केला होता.
  • सदोम आणि गामोराच्या लोकांचे सर्वात महत्वाचे पाप म्हणजे, ते लोक समलैंगिकतेमध्ये होते.

(हे सुद्धा पहा: कनान, गमोरा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सन्हेरीब

तथ्य:

सन्हेरीब हा अश्शूराचा एक शक्तिशाली राजा होता, ज्याने निनवेला एक श्रीमंत, महत्त्वपूर्ण शहर बनवले.

  • राजा सन्हेरीब हा त्याच्या बाबेलाच्या आणि यहूदा राज्याच्या विरोधातील युद्धासाठी प्रसिद्ध आहे.
  • तो एक अतिशय गर्विष्ठ राजा होता, आणि त्याने यहोवाची थट्टा केली.
  • हिज्कीया राजाच्या काळात, सेन्हरीबने यरुशलेमवर हल्ला केला.
  • सेन्हरीबच्या सैन्याचा नाश होण्यास यहोवा कारणीभूत झाला.
  • जुन्या करारातील राजे आणि इतिहास या पुस्तकांमध्ये सन्हेरीबच्या कारकीर्दीतील काही घटनांविषयीची नोंद आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः अश्शूर, बाबेल, हिज्कीया, यहुदा, थट्टा, निनवे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सफन्या

तथ्य:

सफन्या, जो कुशीचा मुलगा, हा एक संदेष्टा होता जो यरुशलेममध्ये राहत होता आणि त्याने योशीया राजा राज्य करत होता, त्यावेळी भविष्यवाणी केली. यिर्मया ज्या कालावधीत जगला, तो सुद्धा त्याच कालावधीत होता.

  • त्याने यहुदी लोकांवर खोट्या देवतांची उपासना करण्याबद्दल दोष लावले. त्याच्या भविष्यवाण्या, जुन्या करारातील सफन्याच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत.
  • जुन्या करारामध्ये सफन्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती, त्यापैकी बरेचजण याजक होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हेही पाहा: यिर्मया, योशीया, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


समुद्र, महासागर, पश्चिमी समुद्र, भूमध्य समुद्र

तथ्य:

पवित्र शास्त्रात, "महासागर" किंवा "पश्चिमी समुद्र" ह्याचा संदर्भ ज्याला आता "भूमध्य समुद्र" म्हंटले जाते त्याच्याशी येतो, जो पवित्र शास्त्राच्या काळातील लोकांच्यासाठी ज्ञात असलेले सर्वात मोठा पाण्याचा साठा होता.

  • भूमध्य समुद्राच्या सिमांलगत: इस्राएल (पूर्वेस), युरोप (उत्तर आणि पश्चिमेस) आणि आफ्रिका (दक्षिणेस).
  • प्राचीन काळात, हा समुद्र व्यापारासाठी आणि प्रवासासाठी खूप महत्वाचा होता, कारण त्याच्या सीमारेषेला लागून अनेक देश होते. या समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असलेली शहरे आणि लोक समूह हे अतिशय समृद्ध होते, कारण त्यांच्यासाठी इतर देशातून जहाजांद्वारे साहित्य मागवणे सहज शक्य होते.
  • हा महासागर इस्राएलच्या पश्चिमेस स्थित होता, म्हणून काहीवेळा ह्याला "पश्चिमी समुद्र" असे देखील संदर्भित केले जाते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: इस्राएल, लोकसमूह, सम्रुध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सादोक

तथ्य:

दावीद राजाच्या काळात, सादोक हे एका महत्वाच्या महायाजाकाचे नाव होते.

  • जेंव्हा अबशालोमाने दावीद राजाच्या विरोधमध्ये बंड केले, तेंव्हा सादोकाने दावीदाचे समर्थन केले आणि त्याला कराराचा कोश परत यरुशलेमेस आणण्यास मदत केली.
  • काही वर्षानंतर, त्याने दाविदाचा मुलगा शलमोनाला राज्याभिषेक करण्यासाठीच्या समारंभात देखील भाग घेतला.
  • नहेम्याच्या काळात दोन वेगवेगळ्या सादोक नावाच्या मनुष्यांनी य्रूशलेमेची भिंत बांधण्यास मदत केली.
  • सादोक हे योथाम राजाच्या आजोबाचे देखील नाव होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: कराराचा कोश, दावीद, योथाम, नहेम्या, शासन, शलमोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सारा ,साराय

तथ्य:

  • सारा ही अब्राहमाची बायको होती.
  • तिचे मूळतः नाव "सराय" होते, पण देवाने ते "सारा" असे बदलले.
  • साराने इसहाकाला जन्म दिला, ज्या पुत्राचे देवाने तिला आणि अब्राहमाला वचन दिले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, इसहाक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • म्हणून अब्रामाची पत्नी, साराय, त्यास म्हणाली, “ देवाने मला मुले दिली नाहीत आणि आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मला मुले होणार नाहीत, म्हणून तुम्ही माझी दासी, हागार घ्या. तिच्याबरोबर लग्न सुद्धा करा म्हणजे ती मजसाठी पुत्र प्रसवेल.”

  • “तुझी पत्नी साराय हीस पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल.

  • देवाने सारायचेही नाव बदलले “सारा असे ठेवले याचा अर्थ, “राजकन्या.”

  • एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असतांना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला. त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव इसहाक ठेवले.

  • Strong's: H8283, H8297, G4564


सिदोन, सिदोनी

तथ्य:

सिदोन हा कनानचा जेष्ठ मुलगा होता. सिदोन नावाची एक कनानी नगर देखील होते, ज्याचे नाव कदाचित कनानच्या मुलाच्या नंतर ठेवण्यात आले असावे.

  • सिदोन हे शहर, इस्राएलच्या उत्तरपश्चिम दिशेस, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, जे सध्याच्या लबानोनमधील आधुनिक देशांचा भाग आहे, त्या प्रांतात स्थित होते.
  • "सिदोनी" हे फेनिकेच्या लोकांचा समूह होता, जो प्राचीन सिदोन मध्ये आणि त्याच्या सभोवतालच्या प्रांतामध्ये राहत होता.

पवित्र शास्त्रामध्ये, सिदोनचे सोर शहराशी जवळचे संबंध होते, आणि ही दोन्ही शहरे त्यांच्या संपत्तीसाठी आणि त्यांच्या अनैतिक वर्तनासाठी प्रसिद्ध होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, नोहा, फेनिके, समुद्र सोर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सिद्कीया

तथ्य:

योशीयाचा मुलगा, सिद्कीया हा यहुदाचा शेवटचा राजा होता (इ. स. पूर्व 597-587). जुन्या करारामध्ये सिद्कीयाच्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती.

  • नबुखद्नेस्सर राजाने यहोयाकिम राजाला बंदी करून बाबेलाला घेऊन जाताना सिद्कीयाला यहुदाचा राजा बनवले. सिद्कीयाने नंतर बंड केले आणि ह्याचा परिणाम म्हणून नबुखद्नेस्सराने त्याला बंदी केले आणि सर यरुशलेमेचा नाश केला.
  • कनानाचा पुत्र, सिद्कीया हा इस्राएलचा राजा अहाब ह्याच्या काळातील एक खोटा संदेष्टा होता.
  • सिद्कीया नावाचा एक अशा मनुष्यांपैकी एक होता, ज्याने नहेम्याच्या काळात देवाबरोबर करार केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, बाबेल, यहेज्केल, इस्राएलाचे राज्य, यहोयाकिम, यिर्मिया, योशीया, यहूदा, नबुखद्नेस्सर, नहेम्या)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


सिनाय, सिनाय पर्वत

तथ्य:

सिनाय पर्वत हा एक पर्वत आहे जो कदाचित आताचा सिनाय द्वीपकल्प असे म्हंटले जाते त्याच्या दक्षिणेतील भागात स्थित आहे. हा "होरेब पर्वत" या नावानेही परिचित आहे.

  • सिनाय पर्वत हा मोठा, खडकाळ वाळवंटाचा भाग आहे.
  • जेंव्हा इस्राएल लोक मिसरातून वचनदत्त भूमीकडे जात होते, तेंव्हा ते, सिनाय पर्वताजवळ आले.
  • देवाने मोशेला सिनाय पर्वतावर दहा आज्ञा दिल्या.

(हे सुद्धा पहा: वाळवंट, मिसर, होरेब, वचनदत्त भूमी, दहा आज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.

  • तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.

  • पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता.

  • मग यहोशवाने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या सीनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात.

  • Strong's: H2022, H5514, G3735, G4614


सीला, सिल्वान

तथ्य:

सीला हा यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांचा पुढारी होता.

  • यरुशलेमेतील मंडळीच्या वडिलांनी पौल व बर्णबा यांच्याबरोबर पत्रे घेऊन अंत्युखियाला जाण्यासाठी सीला ह्याला नियुक्त केले.
  • नंतरच्या काळात सीलाने लोकांना येशूविषयी शिकवण्यासाठी पौलाबरोबर इतर शहरांमध्ये प्रवास केला.
  • फिलिप्पै येथे पौल व सीला यांना तुरुंगात टाकण्यात आले. ते तेथे असतानाच त्यांनी देवाची स्तुती केली आणि देवाने त्यांना तुरुंगातून सोडवले. त्यांच्या साक्षीचा परिणाम म्हणून तुरुंगाधिकारी ख्रिस्ती बनला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अंत्युखिया, बर्णबा, यरुशलेम, पौल, फिलिप्पै, तुरुंग, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 47:01 एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.

  • 47:02 तिने पौल व सीला यांना आपल्या घरी बोलाविले, तेव्हा ते तिच्या कुटुंबासोबत राहिले.

  • 47:03 पौल आणि सीला प्रार्थनेच्या स्थळी लोकांस वारंवार भेटले.

  • 47:07 तेव्हा या मुलीच्या धन्यांनी पौल व सीला यांना रोमन अधिकाऱ्याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगामध्ये टाकले.

  • 47:08 त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले.

  • 47:11 तुरूंगाचा अधिकारी पौल व सीलाकडे जात असतांना थरथर कापत होता, तो म्हणाला, "माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?"

  • 47:13 दुसऱ्या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सीला यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले. तेव्हा पौल व सीला यांनी लुदिया व इतर बंधूंना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले.

  • Strong's: G4609, G4610


सुक्कोथ

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये सुक्कोथ हे दोन शहरांचे नाव होते. "सुक्कोथ" या शब्दाचा अर्थ "निवारा" असा होतो.

  • पहिले सुक्कोथ नावाचे शहर, यार्देन नदीच्या पश्चिमेस वसलेले होते.
  • याकोब त्याच्या कुटुंब आणि गुरेढोरांसमवेत सुक्कोथ येथे निवारा बांधून राहिला.
  • शेकडो वर्षानंतर, गीदोन आणि त्याचे थकलेले लोक सुक्कोथ येथे थांबले, कारण ते मिद्यानी लोकांचा पाठलाग करत होते, परंतु तिथल्या लोकांनी त्यांना तेथे अन्न देण्यास नकार दिला.
  • दुसरे सुक्कोथ हे मिसरच्या उत्तरी सीमेवर स्थित होते, आणि हे ते ठिकाण आहे, जेथे इस्राएल लोक लाल समुद्रातून पलीकडे गेल्यानंतर थांबले होते, कारण ते मिसरच्या गुलागिरीतून पळून चालले होते.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


सूरिया

तथ्य:

सुरिया हा देश इस्राएलाच्या उत्तरेला स्थित होता. नवीन कराराच्या काळात, हा रोमी साम्राज्याच्या शासनाखाली असलेला प्रांत होता.

  • जुन्या कराराच्या काळात, सुरियाचे (अरामी) लोक हे लोक इस्राएली लोकांचे सर्वात बलवान सैनिकी शत्रू होते.
  • नामान हा सुरियाच्या (अरामी) सैन्याचा सेनापती होता, ज्याला त्याच्या कुष्टरोगापासून अलीशा संदेष्ट्याने बरे केले.
  • सुरियाचे अनेक रहिवासी हे अरामचे वंशज होते, जो नोहाचा मुलगा शेम ह्याच्या वंशातून खाली आला होता.
  • दिमिश्क, सुरियाची राजधानी, या शहराचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा केलेला आहे.
  • शौल दिमिश्क शहराकडे तिथल्या ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याच्या योजनेने निघाला होता, परंतु येशूने त्याला थांबवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, सेनापती, दिमिश्क, वंशज, अलीशा, कुष्टरोग, नामान, छळ, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सोअर

तथ्य:

सोअर हे एक छोटे शहर होते, जिथे लोट पळून गेला, जेंव्हा देवाने सदोम आणि गमोरा शहरांचा नाश केला.

  • हे पूर्वी "बेला" म्हणून ओळखले जात होते, परंतु लोटाने या "लहान" शहराला वाचविण्यासाठी देवला विचारले, तेव्हा त्याला "सोअर" असे नाव देण्यात आले.
  • सोअर हे यार्देन नदीच्या मैदानावर किंवा मृत समुद्रच्या दक्षिणेच्या सपाट ठिकाणी स्थित आहे असा समज आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः लोट, सदोम, गमोरा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सोर, सोरी

तथ्य:

सोर हे एक प्राचीन कनानी शहर होते, जे आताच्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला होते, जे सध्याच्या लबानोनमधील आधुनिक देशांचा भाग आहे. त्याच्या लोकांना "सोरी" असे म्हंटले जाते.

  • या शहराचा काही भाग समुद्रात बेटावर स्थित होता, तो मुख्य भूभागापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर होता.
  • त्याचे स्थान आणि देवदार वृक्ष यासारख्या मौल्यवान नैसर्गिक संसाधानामुळे, सोर हे एक समृद्ध व्यापार उद्योग होता आणि ते खूप समृद्ध होते.
  • दावीद राजाला राजमहाल बांधताना मदतीसाठी सोरच्या हराम राजाने देवदार वृक्ष आणि कुशल कामगार पाठवले.
  • अनेक वर्षानंतर, शलमोन राजालासुद्धा मंदिर बांधताना मदतीसाठी, हराम राजाने लाकूड आणि कुशल कामगार पाठवले. शामोन राजाने त्याची भरपाई मोठ्या प्रमाणात गहू आणि जैतून तेल देऊन केली.
  • सोर हे नेहमी त्याच्या जवळचे प्राचीन शहर सिदोन ह्याच्याशी संबंधित होते. ही कनान देशातील फेनिके प्रांतातील सर्वात महत्वाची शहरे होती.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: कनान, देवदार, इस्राएल, समुद्र, फेनिके, सिदोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


स्तेफन

तथ्य:

स्तेफन हा पहिला ख्रिस्ती शहीद म्हणून सर्वात आठवणीत राहणारा ख्रिस्ती आहे, म्हणजेच तो पहिला व्यक्ती होता, ज्याला येशुवर त्याच्या असलेल्या विश्वासामुळे मारण्यात आले. त्याच्या जीवन आणि मृत्यूबद्दलची तथ्ये प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नोंद केलेली आहेत.

  • स्तेफनाला विधवा आणि इतर गरजू ख्रिस्ती लोकांना अन्न पुरवण्याद्वारे त्यांची सेवा करण्यासाठी यरुशलेममधील आद्य मंडळीने सेवक म्हणून नियुक्त केले होते.
  • विशिष्ठ यहुद्यांनी स्तेफन हा देवाविरुद्ध आणि मोशेच्या नियमांविरुद्ध बोलतो असा त्याच्यावर दोष लावला.
  • स्तेफनाने, देव इस्राएल लोकांच्याबरोबर सुरुवातीपासून कसा वागला ह्याच्या इतिहासापासून सुरवात करून, तो येशू जो मसिहा ह्याबद्दल धाडसाने बोलला.
  • यहुदी पुढाऱ्यांनी आवेशात येऊन स्तेफनाला शहराबाह्रेर नेऊन मरेपर्यंत दगडमार केला.
  • त्याच्या देहदंडाचा साक्षी तार्ससचा शौल होता, जो नंतर प्रेषित पौल बनला.
  • स्तेफन हा त्याच्या मरणापूर्वीच्या शेवटच्या शब्दांसाठी प्रसिद्ध होता, "प्रभू तू त्यांचे हे पाप त्यांच्यावर लादू नकोस," जे इतर लोकांच्यासाठी असलेले त्याचे प्रेम दाखवते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: नियुक्त, सेवक, यरुशलेम, पौल, दगड, सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हगार

तथ्य:

हगार ही एक मिसरी स्त्री होती, जी साराची व्यक्तिगत दासी होती.

  • जेंव्हा सारा गर्भ धारण करण्यास सक्षम नव्हती, तेंव्हा तिने हगारला तिचा नवरा अब्राम ह्याला तिच्यापासून मुल होण्यासाठी त्याला दिले.
  • हगारने गर्भ धारण केला आणि तिने अब्रामाच्या मुलाला इश्माएल ह्याला जन्म दिला.
  • जेंव्हा हगार वाळवंटात क्लेशामध्ये होती, तेंव्हा देवाने तिचे निरीक्षण केले आणि तिच्या वंशजांना आशीर्वादित करण्याचे अभिवचन दिले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, वंशज, इश्माएल, सारा, सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 05:01 म्हणून अब्रामाची पत्नी, साराय, त्यास म्हणाली, “ देवाने मला मुले दिली नाहीत आणि आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मला मुले होणार नाहीत, म्हणून तुम्ही माझी दासी, हागार घ्या. तिच्याबरोबर लग्न सुद्धा करा म्हणजे ती मजसाठी पुत्र प्रसवेल.”

  • 05:02 हागारेपासून अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले.

  • Strong's: H1904


हनन्या

तथ्य:

जुन्या करारांमध्ये हनन्या नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.

  • हनन्या नावाचा एक मनुष्य, बाबेलमध्ये इस्राएली बंदिवान म्हणून होता, ज्याचे नाव बदलून "शद्रख" असे ठेवण्यात आले.
  • त्याला शाही सेवक हे पद, त्याच्या उत्कृष्ट चरित्र आणि क्षमता यामुळे देण्यात आले होते.
  • एकदा हनन्या (शद्रख) आणि दुसरे इतर दोन इस्राएली तरुण पुरुष ह्यांना आगीच्या भट्टीमध्ये फेकण्यात आले, कारण त्यांनी बाबेली राजाची उपासना करण्यास नकार दिला. देवाने त्यांची हानी होण्यापासून त्यांचे संरक्षण करून, स्वतःचे सामर्थ्य दाखवून दिले.
  • अजून एक हनन्या नावाच्या मनुष्याचे नाव शलमोन राजाच्या वंशाजाच्या यादीमध्ये नोंद करण्यात आले आहे.
  • एक दुसरा हनन्या हा, यिर्मया संदेष्टा, ह्याच्या काळातील एक खोटा संदेष्टा होता.
  • अजून एक हनन्या नावाचा मनुष्य जो याजक होता, त्याने नहेम्याच्या काळात उत्सवामध्ये नेतृत्व करण्यात मदत केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पाहा: अजऱ्या, बाबेल, दानीएल, खोटा संदेष्टा, यिर्मिया, मीशाएल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हनोख

तथ्य:

जुन्या करारांमध्ये हनोख नावाचे दोन मनुष्य होते.

  • एक मनुष्य ज्याचे नाव हनोख होते, तो शेथचा वंशज होता. तो नोहाचा पणजा होता.
  • या हनोखाचे देवाबरोबर जवळचे संबंध होते आणि जेंव्हा तो 365 वर्षांचा झाला, तो जिवंत असतानाच देव त्याला स्वर्गात घेऊन गेला.
  • दुसरा मनुष्य हनोख हा काइनाचा मुलगा होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा काइन, शेथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हन्ना

तथ्य:

हन्ना यरुशलेममध्ये 10 वर्ष्यांसाठी मुख्य यहुदी याजक होता जो, अंदाजे ई. स. 6 ते ई. स. 15 पर्यंत होता. मग त्याला रोमी सरकारद्वारा मुख्य याजकगणातून काढून टाकण्यात आले, तरी तो यहूदी लोकांमध्ये एक प्रभावशाली नेता म्हणून बनून राहिला.

  • हन्ना हा कयफा चा सासरा होता जो येशूच्या सेवेच्या काळात अधिकृत मुख्य याजक होता.
  • मुख्य याजक निवृत्त झाल्यावर सुद्धा ते कार्यालयाच्या काही जबाबदाऱ्यांसोबतच ते पदवी पण ठेवत असत, त्यामुळे हन्ना सुद्धा कयफा आणि इतरांच्या याजकगणामध्ये मुख्य याजक म्हणून ओळखला जातो.
  • येशूच्या यहुदी नेत्यांपुढील सुनावणी दरम्यान, येशूला प्रथम प्रश्न विचारण्यासाठी हन्ना समोर नेले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मुख्ययाजक, याजक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


हन्ना

तथ्य:

हन्ना ही शमुवेल संदेष्ट्याची आई होती. ती एलकानाच्या दोन पत्नींपैकी एक होती.

  • हन्ना गर्भधारणा करू शकत नव्हती, ही तिच्यासाठी फार मोठी दुःखाची गोष्ट होती.
  • मंदिरामध्ये, हन्नेने देवाने तिला पुत्र देण्याविषयी कळकळीने प्रार्थना केली, तिने त्या पुत्राला देवाच्या सेवेसाठी समर्पित करण्याचे वचन दिले.
  • देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि जेंव्हा शमुवेल बाळ पुरेसा मोठा झाला, तेंव्हा ती त्याला सेवेसाठी मंदिरामध्ये घेऊन आली.
  • त्याच्यानंतर देवाने हन्नेला अजून मुले दिली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: गर्भधारणा, शमुवेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हबक्कूक

तथ्य:

जेंव्हा राजा यहोयाकीम यहुदावर राज्य करत होता, त्यावेळी हबक्कूक हा जुन्या करारातील संदेष्टा होता. संदेष्टा यिर्मया सुद्धा याच्या काळात जिवंत होता.

  • जवळपास ई. सन पूर्व 600 मध्ये, जेंव्हा बाबेली लोकांनी इस्राएलवर कब्जा केला आणि बऱ्याच यहुदी लोकांना बंदी बनवून घेऊन गेले, तेंव्हा या संदेष्ट्याने हबक्कूक नावाचे पुस्तक लिहिले.
  • देवाने हबक्कूकला, कसे "खास्दी (बाबेली)" लोक येतील आणि यहुदावर कब्जा करतील याबद्दल भविष्यवाणी दीली.
  • हबक्कूकच्या वाक्यांपैकी सर्वात प्रसिद्ध एक असे आहे: "धार्मिक माणूस त्याच्या विश्वासाद्वारे जगेल."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे

(हे सुद्धा पहा: बाबेल, यहोयाकीम, यिर्मया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हमाथ, हमाथी, लेबो हमाथ

तथ्य:

हमाथ ही उत्तरी सुरियामधील (अराम), कनानच्या भूमीच्या उत्तरेस असलेले, महत्वाचे शहर होते. हमाथी हे नोहाचा मुलगा कनान ह्याचे वंशज होते.

  • "लेबो हमाथ" हे नाव कदाचित हमाथ शहराजवळील डोंगराच्या संदर्भात आहे.
  • काही आवृत्त्या "लेबो हमाथ" चे भाषांतर "हमाथचे प्रवेशद्वार" असे करतात.
  • दावीद राजाने हमाथचा राजा तोवू ह्याच्या शत्रूंचा पराजय केला, त्यामुळे ते चांगल्या पदावर गेले.
  • हमाथ हे शलमोन राजाच्या भांडाराच्या शहरांपैकी एक होते, जिथे रसद ठेवली जात होती.
  • हमाथची भूमी, जिथे सिद्कीया राजा नबुखदनेस्सर राजाकडून मारला गेला, आणि जिथे यहोअहाज राजाला मिसरी फारोने बंदी केले.
  • "हमाथी" या शब्दाचे भाषांतर "हमाथ शहरमध्ये राहणारा व्यक्ती" असेही केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बाबेल, कनान, नबुखदनेस्सर, सुरिया (अराम), सिद्कीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हर्मोन डोंगर

तथ्य:

हर्मोन पर्वत, हा लबानोन पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील टोकावरील इस्राएलमधील सर्वात उंच डोंगराचे नाव आहे.

  • हे गालील समुद्राच्या उत्तरेस, इस्राएल आणि आराम यांच्यातील उत्तर सीमेवर वसलेले आहे.
  • "सिर्योन पर्वत" आणि "सनीर पर्वत" ही इतर लोकसमुहांनी हर्मोन पर्वताला दिलेली इतर नावे आहेत.
  • हर्मोन पर्वताला तीन मोठी शिखरे आहेत. सर्वात उंच शिखर हे 2800 मीटर उंच आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्त्राएल, गालील समुद्र, आराम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हव्वा

तथ्य:

हे पहिल्या स्त्रीचे नाव होते. तिच्या नावाचा अर्थ "जीवन" किंवा "जगणे" असा होतो.

  • देवाने अदामाची फासळी काढून त्याच्यापासून हव्वेची निर्मिती केली.
  • अदामाची "मदतनीस" म्हणून हव्वेला निर्माण केले. देवाने दिलेल्या कामात अदामाला मदत करण्यासाठी ती त्याच्या बाजूला आली.
  • हव्वेला शैतानाने भुरळ घातली (सर्पाच्या रुपात) आणि जे फळ देवाने खाऊ नका असे सांगितले होते, ते खाऊन केलेले ते पहिले पाप होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः आदम, जीवन, शैतान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 01:13 मग देवाने आदामाच्या एका फासळीपासून एक स्त्री तयार करुन तिला आदामासमोर आणले.

  • 02:02 परंतु त्या बागेमध्ये एक धूर्त साप होता. तो स्त्रीस म्हणाला, “काय तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ?

  • 02:11 आदामाने त्याच्या बायकोस हव्वा हे नाव दिले याचा अर्थ “जन्मदात्री कारण तिच्याद्वारेच सर्व माणसे जन्मास आली.

  • 21:01 देवाने वचन दिले की हव्वेला जे संतान होईल ते सापाचे डोके फोडील.

  • 48:02 हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने सर्पाद्वारे संभाषण केले.

  • 49:08 जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले.

  • 50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.

  • Strong's: H2332, G2096


हाग्गय

तथ्य:

यहुदी लोक बाबेलमधील बंदिवासातून घरी परतल्यावर, हग्गय हा यहुदाचा संदेष्टा होता.

  • हग्गय भविष्यवाणी करण्याच्या काळात, उज्जीया राजा यहुदावर राज्य करीत होता.
  • याच काळात जखऱ्या संदेष्टा देखील भविष्यवाणी करीत होता.
  • हाग्गय आणि जखऱ्या यांनी यहुदी लोकांना, नबुखदनेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली बाबेली लोकांनी नाश केलेल्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे आवाहन केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: बाबेल, यहूदा, नबुखदनेस्सर, उज्जीया, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हाबेल

तथ्य:

हाबेल हा आदाम आणि हव्वा यांचा दुसरा मुलगा होता. तो काइनचा लहान भाऊ होता.

  • हाबेल मेंढपाळ होता.
  • हाबेलाने परमेश्वराला अर्पण म्हणून त्याच्याकडे असलेल्यापैकी काही प्राण्यांचे अर्पण केले.
  • परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला.
  • आदाम आणि हव्वा यांचा ज्येष्ठ पुत्र काइन याने हाबेलाचा खून केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा काइन, अर्पण, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:


हाम

तथ्य:

हाम हा नोहाच्या तीन मुलांपैकी दुसरा मुलगा होता.

  • सर्व पृथ्वीला व्यापणाऱ्या, सर्वत्र आलेल्या पुराच्या वेळी, हाम आणि त्याचे भाऊ, त्यांच्या बायकांबरोबर, नोहासोबत तारूमध्ये होते.
  • पुरानंतर, एक घटना अशी घडली, जिथे हामने त्याचा पिता नोहाचा खूप अनादर केला. ह्याचा परिणाम, नोहाने हामचा मुलगा कनान आणि त्याच्या वंशजांना शाप दिला, ज्यांना अखेरीस कनानी म्हणून ओळखले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: तारू, कनान, अनादर, नोहा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हामोर

तथ्य:

हामोर हा एक कनानी मनुष्य होता जो शखेम शहरामध्ये राहत होता, जेंव्हा याकोब आणि त्याचे कुटुंब सुकोथ शहराजवळ राहत होते. तो एक हिव्वी होता.

  • हमोरच्या मुलाकडून याकोबाने कुटुंबासाठी दफनभूमी विकत घेतली.
  • जेंव्हा ते तेथे होते, तेंव्हा हमोराचा मुलगा शेखेम याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला.
  • दीनाच्या भावांनी हमोरच्या कुटुंबावर ह्याचा सूड उगवला आणि शेखेम शहरातील सर्व मनुष्यांना मारून टाकले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहाः कनान, हित्ती, याकोब, शेखेम, सुकोथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हारान

तथ्य:

हारान हा अब्राहामाचा लहान भाऊ आणि लोटाचा पिता होता.

  • ऊर शहरातून कनान देशाला प्रवास करत असताना, अब्राहम आणि त्याचे कुटुंब काही काळापर्यंत ज्या गावामध्ये राहिले, त्या गावाचे नाव सुद्धा हारान होते.
  • दुसरा मनुष्य हारान हा कालेबचा मुलगा होता.
  • तिसरा मनुष्य ज्याचे नाव हारान होते, तो लेव्यांचा वंशज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, कालेब, कनान, लेवीय, लोट, तेरह, ऊर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हिज्कीया

व्याख्या:

हिज्कीया हा यहुदाच्या राज्यवर राज्य करणारा 13 वा राजा होता. तो देवावर विश्वास ठेवणारा आणि त्याची आज्ञा पाळणारा राजा होता.

  • त्याचा पिता अहाज, जो एक दुष्ट राजा होता, त्याच्यासारखे न होता, हिज्कीया राजा चांगला राजा होता, ज्याने यहुदामधील मूर्तीच्या उपासनेच्या सर्व जागांचा नाश केला.
  • एकेकाळी, जेंव्हा हिज्कीया राजा अतिशय आजारी पडला होता, आणि जवळपास मरणास टेकला होता, तेंव्हा त्याने देवाला, त्याचा जीव वाचवण्याची कळकळीची विनंती केली. देवाने त्याला बरे केले आणि त्याला 15 वर्षे अधिक जगण्याची परवानगी दिली.
  • हे घडले आहे, ह्याचे हिज्कीयासाठीचे चिन्ह म्हणून, देवाने सूर्याला आकाशात मागे सरकण्यास लावून चमत्कार केला.
  • जेंव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला, तेंव्हा देवाने, हिज्कीयाने त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी केलेली प्रार्थनासुद्धा ऐकली.

(हे सुद्धा पहा: अहाज, अश्शुरी, खोटे देव, यहूदा, सन्हेरीब)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हित्ती

व्याख्या:

हित्ती हे हामचे वंशज त्याचा पुत्र कनान ह्याच्याद्वारे होते. ते एक मोठे साम्राज्य बनले, जे आताचा तुर्की देश आणि उत्तरी पलीष्ट्याच्या देशाचा भाग आहे तिथे स्थित होते.

  • अब्राहामाने एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून जमिनीचा एक तुकडा विकत घेतला, जेणेकरून तो त्याच्या मृत बायकोला, साराला तिथल्या गुहेत दफन करू शकेल. कालांतराने अब्राहाम आणि त्याच्या वंशाजांपैकी अनेकांना त्या गुहेमध्ये दफन करण्यात आले.
  • एसावाचे पालक दुःखी झाले, जेंव्हा त्याने दोन हित्ती स्त्रियांना बायको करून घेतले.
  • दाविदाच्या शूर पुरुषांपैकी एका मनुष्याचे नाव उरिया हित्ती होते.
  • शलमोनाने लग्न केलेल्या काही विदेशी स्त्रिया हित्ती होत्या. त्या विदेशी स्त्रियांनी शलमोनाचे मान देवापासून दूर वळवले, त्याचे कारण त्या खोट्या देवाची उपासना करत होत्या.
  • हित्ती लोकांनी बऱ्याचदा इस्राएली लोकांना, शारीरिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या धोका दिला.

(हे सुद्धा पहा: वंशज, एसाव, विदेशी, हाम, शूर, शलमोन, उरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हिल्कीया

तथ्य:

योशीया राजाच्या काळात हिल्कीया हा महायाजक होता.

  • मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, हिल्कीया महायाजकाला नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आणि ते पुस्तक योशीया राजाकडे आणण्याची आज्ञा करण्यात आली.
  • जेंव्हा त्याच्यासाठी त्या नियमशास्त्राचे वचन करण्यात आल्यानंतर, योशीया राजा दुःखी झाला आणि तो यहूदाच्या लोकांना पुन्हा उपासना करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी निमित्त झाला.
  • अजून एक हिल्कीया नावाचा मनुष्य हा एल्याकीमचा मुलगा होता, आणि तो हिज्कीया राजाच्या काळात राजवाड्यामध्ये काम करत होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पाहा: एल्याकीम, हिज्कीया, महायाजक, योशीया, यहूदा, नियम, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हिव्वी

तथ्य:

कनान देशामध्ये राहणाऱ्या सात मोठ्या लोकसमुहापैकी हिव्वी हा एक होता.

  • हे सर्व समूह, ज्यामध्ये हिव्वीचा सुद्धा समावेश आहे, ते सर्व कनान जो नोहाचा नातू होता, त्याचे वंशज होते.
  • शेखेम या हिव्वीने, याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला, आणि तिच्या भावांनी बदल्यात अनेक हिव्वी लोकांना मारले.
  • जेंव्हा यहोशवाने कनान देशावर कब्जा करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, इस्राएल लोक हिव्वी लोकांच्यावर कब्जा करण्याऐवजी, त्यांच्याबरोबर करार करून फासले गेले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: कनान, हमोर, नोहा, शेखेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हेब्रोन

तथ्य:

हेब्रोन हे, यरुशलेमच्या 20 मैल दक्षिणेस असलेल्या उंच, खडकाळ टेकड्यांमधील एक शहर होते.

  • इब्राहिमच्या काळात इ.स.पू. 2000 च्या सुमारास हे शहर बांधले गेले. जुन्या करारातील, ऐतिहासिक अहवालात याचा उल्लेख अनेकदा करण्यात आला होता.
  • दावीद राजाच्या जीवनात हेब्रोन शहराची फार मोठी भूमिका होती. अबशालोमसहित त्याच्या अनेक पुत्रांचा जन्म तेथे झाला.
  • रोमी साम्राज्याने इ. स.70 च्या आसपास हे शहर नष्ट केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अबशालोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हेरोद, हेरोद अंतिपा

तथ्य:

येशूच्या जीवनाच्या बऱ्याच काळादरम्यान, हेरोद अंतिपा हा रोमी साम्राज्याच्या काही भागाचा शासक होता, ज्यामध्ये गालील प्रांताचा समावेश होतो.

  • त्याच्या पित्याप्रमाणेच, महान हेरोद, अंतिपाला सुद्धा, जरी तो राजा नसला तरीही, काहीवेळा "हेरोद राजा" असे संदर्भित करण्यात आले आहे.
  • हेरोद अंतिपाने रोमी साम्राज्याच्या एक-चतुर्थांश भागावर शासन केले आणि त्याला "मांडलिक हेरोद" असेही म्हंटले जाते.
  • अंतिपा हा "हेरोद" होता, ज्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.
  • येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी, ज्याने त्याला प्रश्न विचारले तो सुद्धा हेरोद अंतिपाच होता.
  • नवीन करारातील इतर हेरोद हे, अंतिपाचा मुलगा (अग्रीप्पा) आणि नातू (अग्रीप्पा 2), ज्यांनी प्रेषितांच्या काळात शासन केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वधस्तंभावर खिळणे, महान हेरोद, बाप्तिस्मा करणारा योहान, राजा, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


हेरोदीया

तथ्य:

बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळात, हेरोदीया ही हेरोद अंतिपा याची पत्नी होती.

  • हेरोदीया ही हेरोद अंतिपा याचा भाऊ फिलीप्प याची मूळ पत्नी होती, परंतु नंतर तिने बेकायदेशीररित्या हेरोद अंतिपाशी लग्न केले.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोद आणि हेरोदीयाला बेकायदेशीररित्या लग्न करण्यासाठी दोष दिला होता. या कारणास्तव, हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकले आणि हेरोदीयामुळे अखेरीस त्याचा शिरच्छेद केला गेला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हेरोद अंतिपा, योहान (बाप्तिस्मा करणारा))

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


होरेब

व्याख्या:

होरेब पर्वत हे सिनाय पर्वतासाठीचे दुसरे नाव आहे, जिथे देवाने मोशेला दहा आज्ञा लिहिलेल्या दगडी पाट्या दिल्या.

  • हेरोब पर्वताला "देवाचा पर्वत" असेही म्हंटले जाते.
  • होरेब ही जागा होती, जिथे मोशेने मेंढरांना चारताना जाळणारे झुडूप बघितले.
  • होरेब पर्वत ही जागा होती, जिथे देवाने इस्राएली लोकांना त्याच्या आज्ञा लिहिलेल्या दगडी पाट्या देऊन त्यांच्याबरोबरचा स्वतःचा करार प्रकट केला.
  • जेंव्हा इस्राएली लोक वाळवंटामध्ये भटकत होते, तेंव्हा हीच ती जागा होती, ज्यावर पाणी देण्यासाठी, देवाने मोशेला काठी आपटायला सांगितले.
  • या पर्वताचे निश्चित ठिकाण माहित नाही, पण हा कदाचित आताचा सिनाय द्वीपकल्प आहे त्याच्या दक्षिण भागात स्थित असावा.
  • हे शक्य आहे की, "होरेब" हे पर्वताचे प्रत्यक्षात नाव असावे, आणि "सिनाय पर्वत" ह्याचा सरळ अर्थ "सिनायचा पर्वत" आणि त्याचा संदर्भ या तथ्याशी असू शकतो की, होरेब पर्वत हा सिनायच्या वाळवंटात स्थित आहे.

(हे सुद्धा पहा: करार, मोशे, सिनाय, दहा आज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


होशे

तथ्य:

जुन्या करारांमध्ये होशे हे इस्राएलच्या राजाचे आणि इतर बऱ्याच मनुष्यांचे नाव होते.

  • अहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे राज्य करण्याच्या काळात, एलाचा मुलगा होशे हा इस्राएलावर नऊ वर्षासाठी राजा होता.
  • नूनचा मुलगा यहोशवाचे आधीचे नाव होशे होते. मोशेने त्याला आणि इतर अकरा जणांना कनानची भूमी हेरायला पाठवण्याच्या आधी त्याचे नाव होशे वरून बदलून यहोशवा ठेवले.
  • मोशे मेल्यानंतर, यहोशवाने इस्राएली लोकांन्ना कानानच्या भूमीचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले.
  • होशे नावाचा दुसरा मनुष्य हा अजज्या ह्याचा मुलगा होता, आणि तो एफ्राइमच्या लोकांचा पुढारी होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाज, कनान, एफ्राइम, हिज्कीया, यहोशवा, मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


होशेय

तथ्य:

होशेय ख्रिस्ताच्या येण्याच्या सुमारे 750 वर्षांपूर्वी, जगलेला आणि भविष्यवाणी करणारा इस्राएलचा एक संदेष्टा होता.

  • त्याची सेवा राजा यराबाम, जखऱ्या, योथाम, आहाज, होशा, उज्जीया आणि हिज्कीया या अनेक राजांच्या माध्यमातून बरीच वर्षे चालली.
  • देवाने होशेयाला, जरी तीने विश्वासघात केला, तरीही गोमर नावाच्या एका वेश्येशी लग्न करण्यास आणि तिच्यावर प्रेम करत राहण्यास सांगितले.
  • हे देवाचे, त्याच्याशी विश्वासघात करणाऱ्या लोकांचे, इस्रायेलाचे चित्र होते.
  • इस्राएल लोकांच्या पापामुळे, होशेयाने त्यांच्या विरोधमध्ये भविष्यवाणी केली, आणि त्यांना मूर्तींची उपासना करण्यापासून परत देवाकडे वळण्यासाठी ताकीद केली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाज, हिज्कीया, होशेया, यराबाम, योथाम, उज्जीया, जखऱ्या)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: