Matthew 2

मत्तय 02 सर्वसाधारण नोंदी

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरामध्ये काव्यात्मक ओळ ही पुढील वाक्याच्या वचनामध्ये बसवली जाते जेनेकरून ते वाचण्यासाठी सोपे असेल. ULT हे 6 आणि 18, या वचनामधील काव्यात्मक गोष्टीशी करते, जी वचने जुन्या करारामधील आहेत.

या अध्यायामधील विशेष संकल्पना

“त्याचा तारा”

या शब्दांचा उल्लेख कदाचित तारा यासाठी होतो ज्यावरती विद्वान लोक इस्राएलाच्या नवीन राज्याचे चिन्ह असा विश्वास ठेवतात. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#sign)

या अध्यातील भाषांतराच्या इतर संभाव्य अडचणी

“विद्वान लोक”

इंग्रजी भाषांतरामध्ये या वाक्याचे भाषांतर करण्यासाठी पुष्कळ वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग केला जातो. त्या शब्दांमध्ये “मागी” आणि “ज्ञानी लोक” असा समावेश आहे. ते लोक विद्वान किंवा ज्योतिषी असावेत. जर तूम्ही करु शकता, तर तूम्ही त्यासाठी सर्वसाधारण शब्द “विद्वान लोक” भाषांतर करावे.”

Matthew 2:1

General Information:

या ठिकाणी गोष्टीच्या नवीन भागाची सुरवात होते आणि अध्यायाच्या शेवटा पर्यंत ती चालू आहे. हेरोदाने यहूद्यांच्या नवीन राजाला मारण्याच्या प्रयत्नाविषयी मत्तय आम्हाला सांगते.

Bethlehem of Judea

बेथलहेम शहर यहूदीया प्रांतात आहे

in the days of Herod the king

जेव्हा हेरोद त्या ठिकाणी राजा होता

Herod

हे सम्राट हेरोदाला संदर्भित करते.

learned men from the east

पूर्वेकडील लोक जे ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते

from the east

दूर देशाहून यहूदीयाच्या पूर्वेस

Matthew 2:2

Where is he who was born King of the Jews?

ताऱ्यांचा अभ्यास करून त्या लोकांना माहित झाले की जो राजा होणार आहे तो जन्मला आहे. तो कोठे आहे याचा ते शोध घेत होते. वैकल्पिक भाषांतर: “एक बाळ जे यहूद्यांचा राजा होईल त्याचा जन्म झाला आहे. तो कोठे आहे?”

his star

ते हे म्हणत नव्हते की ते बाळ त्या ताऱ्याचे खरे मालक होते. वैकल्पिक भाषांतर: “तो तारा जो त्याविषयी सांगतो” किंवा “तो तारा जो त्याच्या जन्माशी निगडीत आहे”

in the east

जसा तो पूर्वेकडे उदयास आला किंवा “जेव्हा आम्ही आमच्या देशामध्ये होतो”

worship

संभाव्य अर्थ 1)दैवी समजून त्या बाळाची आराधना करण्याचा त्यांचा हेतू, किंवा 2) त्या बाळाचा मानवी राजा म्हणून आदर करण्याचा होता. जर तुमच्या भाषेमध्ये दोन्ही अर्थाचे शब्द असतील, तर तूम्ही त्यांचा या ठिकाणी उपयोग करू शकता.

Matthew 2:3

he was troubled

तो चिंतातूर होता. हेरोद चिंतातूर होता की ते बाळ त्याच्या जागी राजा बनेल.

all Jerusalem

या ठिकाणी “यरुशलेम” लोकांना दर्शवते. आणखी, “सर्व” म्हणजे “पुष्कळ”. या गोष्टीला महत्व देण्याची अतिशयोक्ती मत्तय करत आहे की किती लोक चिंतातूर आहेत. वैकल्पिक भाषांतर: “यरुशलेम मधील पुष्कळ लोक” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-hyperbole)

Matthew 2:4

General Information:

6 वचनामध्ये, मुख्य याजक आणि शास्त्री मीखा संदेष्ट्याच्या वचनाचा उपयोग करून हे दाखवतात की ख्रिस्त यरुशलेममध्ये जन्मास येईल.

Matthew 2:5

In Bethlehem of Judea

बेथलहेम शहर यहूदीया प्रांतात आहे

this is what was written by the prophet

हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर: “हेच ते जे खुप आधी संदेष्ट्यानी लिहून ठेवले आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 2:6

you, Bethlehem, ... are not the least among the leaders of Judah

मीखा यरुशलेम मधील लोकांशी बोलत आहे जसे ते त्याच्या सोबत आहेत पण ते सोबत नाहीत. आणखी, ते कनिष्ट नाहीत” याचे होकारार्थी वाक्यामध्ये भाषांतर होऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही, बेथेलहेम निवासी,..यहूदिया प्रांतातील अती महत्वाच्या नगरातील तुमचे नगर आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-apostrophe आणि /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-litotes)

who will shepherd my people Israel

एक मेंढपाळ म्हणून मीखा त्या सरदाराविषयी बोलत आहे. याचा अर्थ तो लोकांचे मार्गदर्शन करेल आणि काळजी घेईल. वैकल्पिक भाषांतर: “जसा मेंढपाळ मेंढराचे मार्गदर्शन करतो तसे तो माझे लोक इस्राएल ह्यांचे मार्गदर्शन करील” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metaphor)

Matthew 2:7

Herod secretly called the learned men

याचा अर्थ इतर लोकांना माहिती न होता हेरोद ज्ञानी लोकांशी बोलला.

men to ask them exactly what time the star had appeared

हे एक प्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतर करू शकतो. वैकल्पिक भाषांतर: “पुरुषांनो, आणि त्याने त्यांना विचारले, ‘अगदी कोणत्या वेळी तो तारा प्रगट झाला?” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-quotations)

what time the star had appeared

ते हे सूचित करते की ज्ञानी लोकांनी तारा कधी प्रगट झाला होता ते त्याला सांगितले. वैकल्पिक भाषांतर: “कोणत्या वेळी तो तारा प्रगट झाला. पहिल्यांदा तारा जेव्हा प्रगट झाला तेव्हा ज्ञानी लोकांनी हेरोदाला सांगितले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

Matthew 2:8

young child

हे येशूला दर्शवते.

bring me word

मला कळवा किंवा “मला सांगा” किंवा “मला परत बातमी द्या”

worship him

पहा हे जसे तूम्ही मत्तय 2:2.मध्ये भाषांतर केले आहे.

Matthew 2:9

After they

नंतर ज्ञानी लोक

they had seen in the east

त्यांनी पूर्वेकडे वर आलेले पाहिले होते किंवा “त्यांनी त्यांच्या देशात पाहिले होते”

went before them

त्यांना मार्गदर्शन केले किंवा “त्यांना घेऊन गेले ”

stood still over

थांबला

where the young child was

त्या ठिकाणी जेथे लहान मुल होते

Matthew 2:11

Connecting Statement:

येथे हा देखावा मरीया, योसेफ, आणि लहान मुल येशू राहत असलेल्या घराकडे वळतो.

They went

ज्ञानी लोक निघून जातात

They fell down and worshiped him

त्यांनी गुडघे टेकले आणि आपली मस्तके लवून नमन केले. हे त्यांनी येशूला आदर देण्यासाठी केले. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-symaction)

their treasures

येथे “खजिना” हा शब्द ते वापरत असलेल्या पेटी किंवा थैल्या याला दर्शवते. वैकल्पिक भाषांतर; “डबे कि जे त्यांचे खजिने ठेवण्यास वापरण्यात आले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-metonymy)

Matthew 2:12

God warned them

मग, देवाने ज्ञानी लोकास इशारा दिला. कारण देवाला ठाऊक होते की हेरोद बाळाचा घात करण्यास पाहत होता.

dream not to return to Herod, so

हे प्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतरीत केले जावू शकते. वैकल्पिक भाषांतर: “स्वप्नामध्ये, बोलला, ‘हेरोद राजाकडे परत जाऊ नका,’ म्हणून” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-quotations)

Matthew 2:13

General Information:

15 वचनामध्ये, मत्तय हे दाखवण्यासाठी होशेय संदेष्ट्याचे उदाहरण देतो की ख्रिस्त मिसरमध्ये वेळ घालवेल.

they had departed

ज्ञानी लोक निघून जातात

appeared to Joseph in a dream

योसेफ स्वप्न पाहत असता त्याच्याकडे आला

Get up, take ... flee ... Remain ... you

देव योसेफाशी बोलत आहे, जेनेकरून हे सर्व एकवचनी स्वरुपात असावे. . (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-you)

until I tell you

या विधानाचा पूर्ण अर्थ स्पष्ट केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत परत येणे सुरक्षित आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

I tell you

येथे “मी” हे देवाला दर्शवतो. देवदूत देवाकडून बोलत आहे.

Matthew 2:15

He remained

ते हे सुचवते की योसेफ, मरीया आणि येशू मिसरमध्ये राहिले. वैकल्पिक भाषांतर: “ते राहिले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

until the death of Herod

हेरोदाच्या मरणापर्यंत मत्तय 2:19. हे वाक्य मिसरमध्ये त्यांच्या राहण्याच्या कालावधीचे वर्णन करते आणि असे म्हणत नाही की हेरोद या वेळी मरण पावला.

Out of Egypt I have called my son

मी माझ्या पुत्राला मिसर देशामधून बोलावले आहे

my son

होशेय मध्ये हे इस्राएल लोकांशी संबंधित आहे. मत्तय असे म्हणतो की येशू देवाचा पूत्र आहे ही सत्यता आहे. मुलासाठी एक शब्द वापरुन त्याचे भाषांतर करा की ते एकुलता एक पुत्र किंवा पहिला पुत्र असे दर्शवू शकेल.

Matthew 2:16

General Information:

ह्या घटना हेरोदाच्या मृत्यूच्या आधी घडल्या, जे मत्तयने मत्तय 2:15. मध्ये नमूद केल्या आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-events)

Connecting Statement:

येथे हे दृश्य परत हेरोदाकडे वळते आणि सांगते की त्याने काय केले जेव्हा त्याला समजले की ज्ञानी लोकांनी त्याची फसवणूक केली.

he had been mocked by the learned men

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “ज्ञानी लोकांनी त्याला फसवून लज्जास्पद केले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

He sent and killed all the male children

हेरोदाने मुलांना स्वतः मारून टाकले नाही. वैकल्पिक भाषांतर: “त्याने आपल्या सैनिकांना सर्व मुलांना ठार मारण्याची आज्ञा दिली” किंवा “त्याने सर्व मुलांना मारुन टाकण्यासाठी सैनिक पाठविले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-explicit)

two years old and under

2 वर्ष आणि त्यापेक्षा लहान (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-numbers)

according to the time

वेळेनुसार

Matthew 2:17

General Information:

मत्तय हे दाखवण्यासाठी यिर्मया संदेष्ट्याचे उदाहरण देतो की बेथेलहेम प्रातांतील सर्व मुलांचा मृत्यू शास्त्रवचनानुसार होता.

Then was fulfilled

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “हे पूर्ण झाले” किंवा “हेरोदाचे कार्य पुर्ण झाले” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

what had been spoken through Jeremiah the prophet

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याद्वारे फार पूर्वी सांगितले होते” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Matthew 2:18

A voice was heard ... they were no more

मत्तय यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातील शब्द वापरत आहे.

A voice was heard

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकांनी आवाज ऐकला” किंवा “मोठ्याने आवाज झाला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

Rachel weeping for her children

पुष्कळ वर्षांपूर्वी राहेल जगली होती. ही भविष्यवाणी राहेलला दाखवते जी तिच्या वंशजांसाठी रडत मरण पावली.

she refused to be comforted

हे कर्तरी स्वरुपात सांगता येईल. वैकल्पिक भाषांतर: “कोणीही तिला सांत्वन देऊ शकले नाही” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

because they were no more

कारण मुले निघून गेली होती आणि परत कधीच येणार नाहीत, ते मृत आहेत हे सांगण्याचा ‘ते नाहीत” हा एक सौम्य मार्ग आहे. वैकल्पिक भाषांतर: “कारण ते मेलेले होते” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-euphemism)

Matthew 2:19

Connecting Statement:

येथे हे दृश्य मिसरकडे येते, जेथे योसेफ, मरीया, आणि लहान येशू राहत आहेत.

behold

हे मोठ्या गोष्टीतील दुसऱ्या घटनेची सुरवात दर्शवते. यामध्ये कदाचित पूर्वीच्या घटनांपेक्षा वेगवेगळ्या लोकांचा सामावेश होऊ शकतो. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा मार्ग असावा.

Matthew 2:20

those who sought the child's life

येथे “मुलाच्या जीवाची मागणी” हे असे आहे की ते मुलाला मारून टाकण्याची इच्छा बाळगतात. वैकल्पिक भाषांतर: “ते लोक बाळाला ठार मारण्यासाठी त्याचा शोध करत होते” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-euphemism)

those who sought

हे राजा हेरोद आणि त्याचे सल्लागार यांना दर्शवतो.

Matthew 2:22

Connecting Statement:

हा मत्तय 2:1 मध्ये सुरु झालेल्या या भागाचा हा शेवट आहे . हेरोदाने यहूद्यांचा नवीन राजा मारण्याचा प्रयत्न केला.

But when he heard

पण जेव्हा योसेफाने ऐकले

Archelaus

हेरोदाच्या मुलाचे हे नाव आहे. (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-names)

he was afraid

योसेफ घाबरला होता

Matthew 2:23

what had been spoken through the prophets

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पुष्कळ वर्षाआधी परमेश्वर जे संदेष्ट्याद्वारे बोलला” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#figs-activepassive)

he would be called a Nazarene

येथे “तो “ येशूचा उल्लेख करतो. येशूच्या काळापूर्वी संदेष्ट्यानी त्याला मसीहा किंवा ख्रिस्त म्हणून संबोधले होते. वैकल्पिक भाषांतर: “लोक म्हणतील की ख्रिस्त एक नासरी आहे” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-names)