Matthew 22

Matthew 22:5

राजाच्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीस आमंत्रित केलेल्या लोकांना बोलाविण्यासाठी जेंव्हा राजाचे दास गेले तेंव्हा त्यांनी काय केले?

कांही लोकांनी आमंत्रणाचा गंभीरपणे विचार केला नाही व ते त्यांच्या कामाधंद्याला गेले, तर दुस-यांनी राजाच्या दासांना धरून जिवे मारले [२२:२-६].

लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिलेल्या पहिल्या लोकांना राजाने काय केले?

राजाने आपले सैनिक पाठवून त्यांच्या नाश केला व त्यांचे नगर जाळून टाळके [२२:७].

Matthew 22:8

मग राजाने लग्नाच्या मेजवानीस कोणाला बोलाविले?

राजाच्या दास जितक्या वाईट आणि चांगल्या लोकांना घेऊन येऊ शकले तितक्यांना त्याने आमंत्रित केले [२२:९-१०.

Matthew 22:13

लग्नाच्या मेजवानीस लग्नाचा पोषाख न घालता जो व्यक्ती आला होता त्याला राजाने काय केले?

राजाने त्याचे हातपाय बांधून त्याला बाहेरील अंधारांत टाकून दिले [२२:११-१३].

Matthew 22:15

परूशी येशूला काय करण्याचा प्रयत्न करीत होते?

परूशी लोकांनी येशूला बोलण्यांत कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली [२२:१५].

परुश्यांच्या शिष्यांनी येशूला कोणता प्रश्न विचारला?

कैसरला कर देणे योग्य आहे किंवा नाही असे त्यांनी येशूला विचारले [२२:१७].

Matthew 22:20

परुश्यांच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे येशूने कसे उत्तर दिले?

येशूने म्हटले कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा [२२:२१].

Matthew 22:23

पुंरुत्थानाबद्दल सदूकी लोकांचा काय विश्वास होता?

पुनरुत्थान नाही असा सदूकी लोकांचा विश्वास होता [२२:२३].

Matthew 22:25

सदूकी लोकांच्या कथेत एका स्त्रीला किती पती होते?

त्या स्त्रीला सात पती होते [२२:२४-२७].

Matthew 22:29

सदूकी लोकांना कोणत्या दोन गोष्टीं माहित नव्हत्या असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की सदूकी लोकांना शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य ह्याबद्दल माहित नव्हते [२२:२९].

पुंरुत्थानानंतर लग्नाविषयी येशूने काय म्हटले?

पुंरुत्थानानंतर ते लग्न करून घेत नाहीत असे येशूने म्हटले [२२:३०].

Matthew 22:31

पुनरुत्थाना आहे हे येशूने शास्त्रातून कसे दाखविले?

येशूने त्या शास्ताभागाचा उल्लेख केला जेथे देवा असे म्हणतो की तो अब्राहामाचा, इसहाकाचा, आणि याकोबाचा देव - म्हणजे जिवंतांचा देव आहे [२२:३२].

Matthew 22:34

परुश्यांच्या वकिलाने येशूला कोणता पश्न विचारला?

नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत मोठी आहे असे वकिलाने येशूला विचारले [२२:३६].

Matthew 22:37

प? सर्वांत मोठ्या दोन आज्ञा कोणत्या असे येशूने सांगितले?

तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने, व पूर्ण मनाने प्रीति कर आणि तू आपल्या शेजा-यावर स्वत:सारखी प्रीति कर ह्या सर्वांत मोठ्या दोन आज्ञा आहेत असे येशूने सांगितले [२२:३९].

Matthew 22:41

येशूने परूशी लोकांना कोणता प्रश्न विचारला?

ख्रिस्त कोणाचा पुत्र आहे असे येशूने विचारले [२२:४२].

परूशी लोकांनी येशूला काय उत्तर दिले?

ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे असे परूशी लोकांनी उत्तर दिले [२२:४२].

Matthew 22:43

नंतर येशूने परूश्याना कोणता दुसरा प्रश्न विचारला?

तर मग दावीद त्याच्या पुत्राला, ख्रिस्ताला, प्रभू कसे म्हटला असे येशूने विचारले [२२:४३-४५].

Matthew 22:45

परूश्यांनी येशूला काय उत्तर दिले?

परूशी लोक येशूला एका शब्दानेहि उत्तर देऊ शकले नव्हते [२२:४६].