Matthew 5

Matthew 5:1

जे आत्म्याने दीन ते धन्य का?

जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे [५:३].

जे शोक करतात ते धन्य का?

जे शोक करतात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यांत येईल [४:४].

Matthew 5:5

जे सौम्य ते धन्य का?

जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील [५:५].

जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य का?

जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य कारण ते तृप्त होतील [५:६].

Matthew 5:11

येशूकरिता ज्यांचा अपमान व छळ होतो ते धन्य का?

येशूकरिता ज्यांचा अपमान व छळ होतो ते धन्य कारण स्वर्गांत त्यांचे प्रतिफळ मोठे आहे [५:११-१२].

Matthew 5:15

विश्वासणा-यांनी त्यांचा प्रकाश लोकांसमोर कसा पाडावा?

सत्कर्में करण्याद्वारे विश्वासणा-यांनी त्यांचा प्रकाश लोकांसमोर पाडावा [५:१५-१६].

Matthew 5:17

जुन्या कराराच्या नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथाचे येशू काय करावयास आला?

जुन्या कराराचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ येशू पूर्ण करावयास आला [५:१७].

Matthew 5:19

स्वर्गाच्या राज्यांत कोणाला मोठा म्हणतील?

जे कोणी देवाच्या आज्ञा पाळतील आणि त्यां इतरांना शिकावितील त्यांना स्वर्गाच्या राज्यांत मोथा म्हणतील [५:१९].

Matthew 5:21

जो कोणी खून करील तोच केवळ न्यायसभेच्या दंडास पात्र होतील परंतु ते सुद्धा जे काय करितील?

जे कोणी खून करितील तेच केवळ नव्हे तर, जो कोणी आपल्या भावार उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल [५:२१-२२].

Matthew 5:23

आपल्या भावाचे आपल्या विरुद्ध कांही असेल तर आपण काय केले पाहिजे असे येशूने शिकविले?

आपल्या भावाचे आपल्या विरुद्ध कांही असेल तर प्रथम आपण जाऊन त्याच्याशी समेत करावा असे येशूने शिकविले [५:२३-२४].

Matthew 5:25

न्यायालयांत जाण्याअगोदर आपल्या वादीशी आपण काय करावे असे येशूने शिकविले?

न्यायालयांत जाण्याअगोदर आपण आपल्या वादीशी सलोखा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे येशूने शिकविले [५:२५].

Matthew 5:27

केवळ व्यभिचार करणेच चुकीचे नाही तर काय करणे सुद्धा चुकीचे आहे असे येशूने शिकविले?

केवळ व्यभिचार करणेच चुकीचे आहे असे नाही तर एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहणे सुद्धा चुकीचे आहे असे येशूने शिकविले [५:२७-२८].

Matthew 5:29

जे कांही आपल्याला पाप करण्यांस प्रवृत्त करते त्याचे आपण क्या केले पाहिजे असे येशूने सांगितले?

आपल्याला पाप करण्यांस प्रवृत्त करणा-या प्रत्येक गोष्टींपासून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे असे येशूने शिकविले [५:२९-३०].

Matthew 5:31

कोणत्या कारणाकरिता येशूने घटस्फोटाची परवानगी दिली?

व्यभिचाराच्या कारणाकरिता येशूने घटस्फोटाची परवानगी दिली [५:३२].

कांही उचित कारणाशिवाय कोणी पती आपल्या पत्नीला घटस्फोट देतो आणि ती पुन्हा विवाह करते तर तो तिला काय होण्यास कारणीभूत होतो?

जर तिचा पती तिला घटस्फोट देतो व ती पुन्हा विवाह करते तर तो तिला व्यभिचारिणी करतो [५:३२].

Matthew 5:36

आपण स्वर्गाची, पृथ्वीची, यरूशलेमेची, किंवा आपल्या मस्तकाची शपथ घेण्याऐवजी काय करावे असे येशूने सांगितले?

ह्या सर्वांची शपथ घेण्यापेक्षा आपले बोलणे "होय, होय," किंवा "नाही, नाही" असावयास पाहिजे [५:३३-३७].

Matthew 5:38

जो आपल्याशी दुष्टपणाने वागतो त्याच्याशी आपली वागणूक कशी असावयास पाहिजे असे येशूने शिकविले?

जो आपल्याशी दुष्टपणाने वागतो त्याला आपण प्रतिकार करू नये असे येशूने शिकविले [५:३८-३९].

Matthew 5:43

आपल्या वै-यांशी आणि जे आपला छळ करतात त्यांच्याशी आपण कसे वागावयास पाहिजे असे येशूने शिकाविले?

आपल्या वै-यांवर व जे आपला छळ करतात त्यांच्यावर आपण प्रीति केली पाहिजे व त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे असे येशूने आपल्याला शिकविले [५:४३-४४].

Matthew 5:46

जे आपल्यावर प्रीति करतात केवळ त्यांच्यावरच आपण प्रीति करू नये तर आपल्या वै-यांवर देखील आपण प्रीति करावी असे येशूने का सांगितले?

येशूने सांगितले की जे आपल्यावर प्रीति करतात केवळ त्यांच्यावरच आपण प्रीति केली तर आपल्याला प्रतिफळ मिळत नाही कारण परराष्ट्रीय अगोदरच जे करीत आहेत तेच केवळ आपण करीत आहोत [५:४६-४७].