Matthew 4

Matthew 4:1

सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून कोणी येशूला अरण्यांत नेले?

सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने येशूला अरण्यांत नेले [४:१].

अरण्यामध्ये येशूने किती वेळ उपास केल?

अरण्यामध्ये येशूने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला [४:२}.

सैतानाने येशूला टाकलेली पहिली परीक्षा कोणती होती?

धोंड्याची भाकर करावी ही पहिली परीक्षा सैतानाने येशूला टाकली [४:३].

पहिल्या परीक्षेचे येशूने कोणे उत्तर दिले?

येशूने म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाने जगेल [४:४].

Matthew 4:5

सैतानाने येशूला टाकलेली दुसरी परीक्षा कोणती होती?

येशूने स्वत:ला मंदिरावरून खाली फेकावे अशी सैतानाने त्याला परीक्षा टाकली [४:५-६].

Matthew 4:7

दुस-या परीक्षेचे येशूने कोणते उत्तर दिले?

येशूने म्हटले परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहूं नको [४:७].

सैतानाने येशूला टाकलेली तिसरी परीक्षा कोणती होती?

जर येशूने त्याला नमन केले तर तो जगातील सर्व राज्यें येशूला देईल अशी सैतानाने त्याला परीक्षा टाकली [४:८-९].

Matthew 4:10

तिस-या परीक्षेचे येशूने कोणे उत्तर दिले?

येशूने म्हटले तुझा देव परमेश्वर ह्याला नामंकर,व केवळ त्याचीच उपासना कर [४:१०].

Matthew 4:14

येशू कफर्णहूमास गेल्यानंतर त्याच्याद्वारे काय पूर्ण झाले?

यशयाने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली जेथे असे म्हटले आहे की एक मोठा प्रकाश पाहातील [४:१५-१६].

Matthew 4:17

नंतर येशूने कोणता संदेश देण्याची सुरूवात केली?

"पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे" [४:१७].

Matthew 4:18

पेत्र आणि अंद्रियाला तो काय करील असे येशूने म्हटले होते?

तो पेत्र आणि अंद्रियाला माणसे धरणारे करील असे येशूने म्हटले होते [४:१९].

Matthew 4:21

पेत्र, अंद्रिया, याकोब, आणि योहान हे त्यांचा उदरनिर्वाह कसा करीत होते?

पेत्र, अंद्रिया, याकोब, आणि योहान हे सर्व मासे धरणारे होते [४:१८-२१].

Matthew 4:23

ह्या वेळेस येशू शिकविण्यासाठी कोठे गेला होता?

येशू गालीलाच्या सभास्थानात शिकविण्यासाठी गेला होता [४:२३].

येशूकडे कोणत्या प्रकारचे लोक आणले होते आणि येशूने त्यांना काय केले?

नाना प्रकारच्या रोग्यांना आणि भूतग्रस्तांना येशूकडे आणण्यांत आले होते आणि त्याने सर्वांना बरे केले [४:२४].

ह्या वेळेस किती लोक येशूच्यामागे चालले?

ह्या वेळेस लोकांचे थव्यांचे थवे येशूच्यामागे चालले [४:२५].