Matthew 4

Matthew 4:1

सैतानाने येशूला परीक्षेत कसे पाडले हे हा विभाग वर्णन करतो.

सैतान...भुरळ पाडणारा

हे दोन्ही एकाचाच उल्लेख करतात. दोघांचे भाषांतर करण्यासाठी कदाचित तुम्हांला एकाच शब्दाचा उपयोग करावा लागेल.

त्याने उपास केला...त्याला भूक लागली

हे येशूचा उल्लेख करतात.

  • जर तू देवाचा पुत्र आहेस तर, आज्ञा कर

हा असू शकतो मोह १) स्वत:च्या फायद्यासाठी चमत्कार करणे, "आज्ञा करण्याद्वारे हे सिध्द कर की तू देवाचा पुत्र आहेस" (पाहा: यु डी बी ). सैतानाला हे माहित आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे असे गृहीत धरणे हे सर्वांत चांगेल आहे.

ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर

"ह्या धोंड्यांना म्हण की, 'भाकरी हो!'"

Matthew 4:5

सैतानाने येशूला परीक्षेत कसे पाडले हे हा विभाग वर्णन करतो.

तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक

हा असू शकतो मोह १) स्वत:च्या फायद्यासाठी चमत्कार करणे, "तू खरच देवाचा पुत्र आहेस म्हणून, तू स्वत:ला खाली टाकू शकतोस" किंवा २) हे आव्हान किंवा आरोप असू शकतो, "तू स्वत:ला खाली टाकून देऊन हे सिद्ध कर की तू खरच देवाचा पुत्र आहेस" (पाहा: यु डी बी ). सैतानाला हे माहित आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे असे गृहीत धरणे हे चांगले आहे.

खाली

जमिनीवर

तो आज्ञा करील

"तुझी काळजी घेण्यासाठी देव त्याच्या दूतांना आज्ञा करील: किंवा "देव याच्या दूतांना सांगेल की, 'त्याची काळजी घ्या.'"

Matthew 4:7

सैतानाने येशूला परीक्षेत कसे पाडले हे हा विभाग वर्णन करतो.

आणखी असे लिहिले आहे

ह्याचे असे भाषांतर करू शकता, "आणखी, मी तुला सांगतो की, हे पवित्र शास्त्रामध्ये आहे."

त्याने त्याला म्हटले

"सैतानाने येशूला म्हटले"

मी हे सगळे कांही तुला देईन

'मी तुला सर्व कांही देईन." परीक्षक ह्यावर भर देत आहे की "हे सर्व कांही" मी तुला देईन आणि त्यांच्या पैकी केवळ कांही असे नव्हे.

Matthew 4:10

सैतानाने येशूला परीक्षेत कसे पाडले हे हा विभाग वर्णन करतो.

येशू पवित्र शास्त्र वचनानिशी सैतानाचे वाक्ताडन करण्याची ही तिसरी वेळ आहे.

मत्तयाने वेगळ्या शीर्षकाचा उपयोग केला आहे, जे "सैतानांचाच" उल्लेख करते.

पाहा

येथे "पाहा" हा शब्द आपल्याला येणाऱ्या एका नव्या माहितीकडे ध्यान देण्यांस सावध करीत आहे.

Matthew 4:12

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे हा विभाग वर्णन करीत आहे.

योहानाला अटक करण्यांत आले

"राजाने योहानाला तुरुंगांत टाकले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 4:14

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.

Matthew 4:17

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.

स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे

३:२ ह्या वचनाचे जसे तुम्ही भाषांतर केले होते तसेच ह्याचे करावे.

Matthew 4:18

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.

जाळे ताळमे

"जाळे फेकणे"

माझ्या मागे या,

येशू शिमोनाला आणि अंद्रियाला त्याच्या मागे येण्यांस, त्याच्याबरोबर राहाण्यांस, व त्याचे शिष्य होण्यांस आमंत्रित करीत आहे. पर्यायी भाषांतर: "माझे शिष्य व्हा"

मी तुम्हांला माणसे धरणारे करीन

पर्यायी भाषांतर: "जसे तुम्ही मासे गोळा करता तसे मी तुम्हांला देवाची माणसे कशी गोळा करावे हे शिकवीन." (पाहा: रूपक)

Matthew 4:21

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.

ते त्यांची जाळी नीट करीत होते

"ते" हा शब्दांत दोन भाऊ आणि जब्दीचा समावेश आहे, किंवा केवळ दोन भावांचाच समावेश आहे.

त्याने त्यांना बोलाविले

"येशूने योहाना आणि याकोबाला बोलाविले" ह्या वाक्यांशाचा अर्थ असा आहे की येशूने त्यांना त्याच्या मागे येण्यांस, त्याच्याबरोबर राहाण्यांस, आणि त्याचे शिष्य होण्यांस आमंत्रित केले.

लागलेच

"त्याच क्षणी"

तारू सोडले...आणि त्याला अनुसरले

हे जीवन परिवर्तन आहे हे स्पष्ट आहे. ही माणसे यापुढे मासे धरणारे नसणार आणि ते त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सोडून देऊन त्यांच्या उर्वरित जीवनात येशूला अनुसरतील.

Matthew 4:23

गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.

सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दु:खणी

"प्रत्येक प्रकारचे रोग आणि प्रत्येक प्रकारचे आजार." "रोग" आणि "आजार" ह्या शब्दांचा घनिष्ठ संबंध आहे परंतु शक्यतो ते दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांचे भाषांतर केले पाहिजे. "रोग" ह्यामुळे व्यक्ती आजारी पडतो. आणि "दु:खणी" हा शारीरिक अशक्तपणा किंवा दु:ख जे रोगांचा परिणाम असतो.

दकापलीस

"दहा शहरे" (पाहा यु डी बी ), गालील समुद्राच्या आग्नेयकडे असलेला प्रदेश.