मत्तयकृत शुभवर्तमानाची प्रस्तावना

भाग 1: सर्वसाधारण प्रस्तावना

मत्तयकृत शुभवर्तमानाची रूपरेषा

  1. येशू ख्रिस्ताचा जन्म आणि त्याच्या सेवेची सुरुवात (1:1-4:25)

  2. डोंगरावरील येशूचे प्रवचन (5:1-7:28)

  3. आरोग्य देण्याच्या द्वारे येशू देवाच्या राज्याचे वर्णन करतो (8:1-9:34)

  4. सेवाकार्य आणि देवाचे राज्य याविषयी येशूची शिकवण (9:35-10:42)

  5. देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाविषयी येशूची शिकवण. येशूवरील झालेल्या विरोधाची सुरुवात (11:1-12:50)

  6. देवाच्या राज्याविषयी येशूने दिलेले दाखले (13:1-52)

  7. येशूला झालेला विरोध आणि देवाच्या राज्याविषयी झालेला गैरसमज (13:53-17:57)

  8. देवाच्या राज्यामधील जीवनाविषयी येशूची शिकवण (18:1-35)

  9. येशूचे यहूदिया मधील सेवाकार्य (19:1-22:46)

  10. शेवटचा न्याय आणि तारण याविषयी येशूची शिकवण (23:1-25:46)

  11. येशूचे वधस्तंभी खिळणे,त्याचे मरण आणि पुनरुस्थान (26:1-28:19)

मत्तयचे पुस्तक काय आहे ?

नवीन करारामधील चार पुस्तकांपैकी मत्तय हे एक पुस्तक आहे जे येशूच्या जीवनाविषयी वर्णन करते. या शुभवर्तमानाच्या लेखकांनी येशू कोण होता आणि त्याने काय केले ह्याच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी लिहिले आहे. मत्तयमध्ये येशू हा मसीहा आहे हे दर्शवले आहे, आणि देव त्याच्या द्वारे इस्राएलचे तारण करेल. मत्तयमध्ये येशूने मसीहा विषयीच्या जुन्या करारामधील भविष्यवाण्यांची पूर्णता केल्याचे वरचेवर स्पष्ट केले आहे .याचा अर्थ असा की त्याचे वाचक हे सर्वप्रथम यहूदी असावेत. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#christ)

भाषांतरकारांनी या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे करावे?

भाषांतरकार कदाचित या पुस्तकाला त्याच्या मूळ शीर्षकाने, “मत्तयकृत शुभवर्तमान”, किंवा “मत्तयचे शुभवर्तमान.” किंवा स्पष्ट असे शीर्षक त्याच्या साठी निवडले जाईल, जसे, मत्तयने येशूविषयी लिहिलेले शुभवर्तमान आहे.” (पहा: /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-names)

मत्तयचे शुभवर्तमान कोणी लिहिले?

पुस्तक लेखकाचे नाव स्पष्ट करत नाही. असो, आदीच्या ख्रिस्ती वेळेमध्ये, पुष्कळ ख्रिस्ती लोकांची कल्पना होती की लेखक हा मत्तय आहे.

भाग 2: धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या संकल्पना

स्वर्गाचे राज्य काय आहे ?”

ज्या प्रकारे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या लेखकांनी देवाच्या राज्याविषयी लिहिले आहे त्या प्रकारे मत्तय स्वर्गाच्या राज्याविषयी लिहितो. स्वर्गाच्या राज्यामध्ये देव सर्वत्र सर्व लोकांवर व निर्मिती वर राज्य करतो. ज्या लोकांचा तो राज्यामध्ये स्वीकार करतो ते आशीर्वादित होतील. ते देवा सोबत सर्वदा राहतील.

येशूच्या शिकवणीच्या पद्धती कोणत्या होत्या?

लोक येशूला रब्बी म्हणून संबोधत असत. रब्बी म्हणजे देवाच्या नियम शास्त्राचा शिक्षक होय. इस्राएल मधील इतर धार्मिक शिक्षकांसमान येशूची शिकवण होती. त्याचे विद्यार्थी होते जे जिथे तो जात असे त्या ठिकाणी ते ही जात असत. त्या विद्यार्थांना शिष्य म्हंटले जात असे. त्याने अनेकदा दाखले सांगितले. दाखले ह्या कथा आहेत ज्यामधून नैतिक धडे शिकवले जातात. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#lawofmoses आणि /WA-Catalog/mr_tw?section=kt#disciple आणि /WA-Catalog/mr_tw?section=kt#parable)

भाग 3: भाषांतरातील महत्वाच्या समस्या

सारांशित शुभवर्तमान (सिंनोप्टिक गॉस्पल्स) कोणते आहेत?

मत्तयकृत शुभवर्तमान, मार्ककृत शुभवर्तमान आणि लुककृत शुभवर्तमान यांना सारांशित शुभवर्तमान म्हणतात कारण त्यामध्ये पुष्कळ सारखे शास्त्रभाग आहेत. “सारांशित” हा शब्द म्हणजे “एकत्र पाहणे.“

त्या वचनांना समांतर गणले जाते जे दोन किंवा तीन शुभवर्तमानमध्ये एकसारखे आढळतात. सारांशित शास्त्र भागाचे भाषांतर करताना, भाषांतर करणाऱ्यांनी तेच शब्द एकसारखे भाषांतर करावे.

येशूने स्वतःचा “मनुष्याचा पुत्र” असा उल्लेख का केला आहे?

शुभवर्तमानमध्ये, येशू स्वतःला “मनुष्याचा पूत्र” म्हणवतो. हा शास्त्रभाग दानीएल 7:13-14 मधील आहे. या शास्त्रभागामध्ये एका व्यक्तीचे वर्णन “मनुष्याचा पुत्र” असे केले आहे. याचा अर्थ तो व्यक्ती मनुष्या सारखा दिसणारा होता. देवाने मनुष्याच्या पुत्राला सर्व राष्ट्रावर सर्वकाळ शासन करण्याचा अधिकार दिला. आणि सर्व लोक सर्वकाळ त्याची आराधना करीत राहतील.

येशूच्या काळातील यहूदी “मनुष्याचा पूत्र” हे शिर्षक कुणासाठीही वापरत नसत. त्यामुळे, येशूने ते स्वतः साठी वापरले यासाठी की तो खऱ्या अर्थाने कोण होता हे त्यांना समजावे. (पहा: /WA-Catalog/mr_tw?section=kt#sonofman)

पुष्कळ भाषेमध्ये “मनुष्याचा पुत्र” असे भाषांतर करणे कठीण असू शकते. वाचकांचा अचूक भाषांतरामध्ये गैरसमज होऊ शकतो. भाषांतरकार त्याच्यासाठी वैकल्पिक शब्द वापरू शकतात जसे “मानव”. शिर्षकाचे स्पष्टीकरण करण्यासाठी तळटीप समाविष्ट करणे मदतीचे होईल.

मत्तयकृत शुभवर्तमानामधील वचनामध्ये मुख्य समस्या कोणत्या आहेत? खालील वचने पवित्र शास्त्राच्या जुन्या प्रतीमध्ये आढळतात पण नवीन प्रती मध्ये समाविष्ट केलेली नाहीत:

  • “जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा तिरस्कार करतात त्यांचे चांगले करा” (5:44)
  • “कारण राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव सर्वकाळ तुझी आहेत. आमेन “(6:13)
  • “पण या सारखे दुष्ट आत्मे प्रार्थना आणि उपवासाविना जात नाहीत” (17:21)
  • “कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे” (18:11)
  • “बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत” (20:16)
  • “अहो परुश्यांनो व नियम शास्त्राच्या शिक्षकांनो, ढोग्यांनो केवढी तुमची दुर्दशा, कारण विधवांची घरे तूम्ही खाऊन टाकता, ढोंगी पणाने लांब प्रार्थनेचा दिखावा करता. यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होईल.” (23:14)

भाषांतरकारांना सूचना आहे की या वचनांचा समावेश करू नये. तरी, जुन्या पवित्र शास्त्राच्या प्रतीमध्ये एक किंवा अधिक भागांचा समावेश असेल, तर भाषांतरकार त्यांचा समावेश करू शकतात. जर त्यांचा समावेश केला असेल तर ते आयताकार ([]) रखान्या मध्ये असावेत यासाठी की ते मत्तयकृत शुभवर्तमान मधील मूळचे नाहीत हे दर्शविण्यासाठी आहे. (पहा : /WA-Catalog/mr_tm?section=translate#translate-textvariants)