19
सूटपत्राविषयी प्रश्न

1 येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर, त्याने त्याच्या शिष्यांना घेतले आणि तो गालील जिल्ह्यातून निघून गेला. यहूदीया प्रांतातून जे यार्देन नदीच्या पूर्वेस होते तेथे ते गेले. 2 तेव्हा तेथे मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांना त्याने बरे केले.

3 काही परूशी त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे असे आमचे यहूदी नियमशास्त्र परवानगी देते काय? त्याच्याशी वादविवाद करता यावा ह्यासाठी त्यांनी त्याला असे विचारले. 4 मग येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचलेले आहे, म्हणून तुम्हांला नक्कीच माहीती पाहिजे की, देवाने प्रथम लोक निर्माण केले होते, तेव्हा त्यावेळी ‘त्याने एक पुरूष बनवला आणि त्याने एक स्त्री बनवली’.

5 एक स्त्री व पुरुष लग्न करतात तेव्हा त्यांनी यापुढे त्यांच्या आई-वडीलांसोबत राहू नये. त्याउलट, त्या दोघांनीही एकत्र राहिलेच पाहिजे, आणि ते इतके जवळ येतील की ते एका व्यक्तीप्रमाणे एक होतील.’ आणि देव हे का म्हणाला हे स्पष्ट करते. 6 परिणामी, पूर्वी ते दोन स्वतंत्र लोक म्हणून काम करीत असले तरी ते आता एक देह असल्यासारखे आहेत. हे सत्य आहे म्हणून, देवाने जिच्याशी त्याला जोडले त्या पुरूषाने कधीही आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ नये.

7 मग परूशी त्याला म्हणाले, हे सत्य असल्यास, “एखाद्या पुरूषाने आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायची इच्छा असेल तर त्याने तिला घटस्फोट देण्यासाठी ठोस कारण सांगणारा एक कागद द्यावा आणि नंतर तिला पाठवून द्यावे अशी मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?” 8 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या हट्टी पूर्वजांना आपले स्वत:चे मार्ग हवे होते म्हणून मोशेने त्यांना आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली, आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा काही वेगळे नाही. पंरतु देवाने प्रथम एक पुरूष आणि एक स्त्री बनवली, तेव्हा त्यांनी एकमेकांपासून वेगळे व्हावे असा त्याचा हेतू नव्हता. 9 मी ठामपणे तुम्हांला सांगत आहे की, देव असे मानतो की जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देतो व दुसऱ्या स्त्री सोबत लग्न करतो तर तो व्यभिचार करतो. त्याच्या पहिल्या पत्नीने जर व्यभिचार केला तरच तो घटस्फोट देऊ शकतो.”

10 शिष्यांनी त्याला म्हटले, “हे सत्य असल्यास, पुरुषांनी कधीही लग्न करू नये हे योग्य ठरेल!” 11 त्याने उत्तर दिले, “प्रत्येक मनुष्याला ही शिकवण स्वीकारणे शक्य होणार नाही, पंरतु केवळ ज्याला देव ते स्वीकारण्यास शक्य करेल तेच लोक स्वीकारतील. 12 काही पुरुष लग्न करत नाहीत कारण ते जन्मापासून ते लैंगिकरित्या सदोष असतात. इतर काही पुरुष जे लग्न करत नाहीत कारण त्यांच्या मनाचे खच्चीकरण केलेले असते. मग आणखी काही पुरुष आहेत जे लग्न न करण्याचा निर्णय घेतात कारण लग्न करण्याऐवजी देवाची सेवा त्यांनी करावी व देवाने त्यांच्यावर राज्य केलेले बरे असा ते विचार करतात. लग्नाविषयी जे काही मी बोललो आहे ते समजून घेण्यास तुम्ही सक्षम असाल तर ते मान्य करावे आणि त्याचे पालन करावे.”
येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो

13 मग काही लहान मुलांना येशूकडे आणण्यात आले जेणेकरून त्याने त्याचे हात त्यांच्यावर ठेवावे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. परंतु लोकांनी असे केले म्हणून शिष्य त्यांच्यावर रागावले. 14 आम्ही त्याच्यांवर रागवत आहोत हे येशूने पाहिले, तेव्हा तो आम्हांला म्हणाला, “लहान बालकांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका! कारण जसे ते नम्र आहेत आणि विश्वास धरतात, त्याच्यासारख्या असणाऱ्या लोकांवरच देव राज्य करणार आहे.” 15 मग येशूने मुलांवर त्याचे हात ठेवले आणि त्यांना आशीर्वादीत करावे म्हणून देवाला प्रार्थना केली. मग तो त्या ठिकाणाहून निघाला.

16 येशू एका बाजूने जात असता, एक तरुण मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “गुरूजी, देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” 17 येशू त्याला म्हणाला, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? केवळ एकच अस्तित्व चांगले आहे आणि खरोखर काय चांगले आहे ते त्यालाच ठाऊक आहे. ते अस्तित्व म्हणजे देव आहे. पंरतु देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे या तुझ्या इच्छेबद्दल तू केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मी तुला सांगतो की, देवाने मोशेला दिलेल्या आज्ञा नियमितपणे पाळ.” 18 मग त्या मनुष्याने येशूला विचारले, “कोणत्या आज्ञा मी पाळल्याच पाहिजे?” येशूने त्याला उत्तर दिले, “कोणाचाही खून करू नको, व्यभिचार करू नको, कोणत्याही गोष्टींची चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, 19 आपली आई आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर, आणि तुझ्या स्वतःवर जितके जास्त प्रेम तू करतो तितकेच प्रेम तुझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर कर.”

20 तो तरुण मनुष्य येशूला म्हणाला, “या सर्व आज्ञा मी नियमित पाळत आलो आहे. म्हणून देवा बरोबर सार्वकालिक जीवन जगता यावे म्हणून या व्यतिरिक्त आणखी मी काय करावे?” 21 येशूने त्याला म्हटले, “तुला जशी देवाची इच्छा आहे तसे जर परिपूर्ण व्हायचे असेल तर, घरी जा, तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्वकाही विकून टाक, आणि ते पैसे गरिबांना वाटून टाक.” याचा परिणाम असा होईल की तू स्वर्गात श्रीमंत असशील. म्हणून, माझ्या मागे ये, आणि माझा शिष्य हो!” 22 त्या तरुण मनुष्याने ते शब्द ऐकले, तेव्हा तो दुःखी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता आणि त्याच्या मालकीचे सर्वकाही असलेले तो देऊ इच्छित नव्हता.
श्रीमंतीपासून होणारे तोटे

23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “हे तुमच्या अंतःकरणात साठवून ठेवा: देवाने श्रीमंत लोकांच्या जीवनावर राज्य करावे म्हणून ते सहमत होणे फार कठीण आहे. 24 हे देखील लक्षात ठेवा: एका सुईच्या डोळ्याच्या माध्यमातून जाणे एका ऊंटासाठी हे शक्य आहे. देवाने श्रीमंत लोकांच्या जीवनावर राज्य करावे म्हणून ते सहमत होणे हे त्यापेक्षाही आणखी कठीण आहे.”

25 शिष्यांनी हे ऐकले, तेव्हा ते अतिशय चकित झाले. देवाने सर्वात जास्त आशीर्वाद श्रीमंत लोकांना दिला आहे असा विचार ते करत असे. म्हणून ते येशूला म्हणाले, “हे जर असे आहे, तर कोणाचेही तारण होऊ शकणार नाही असे दिसून येते!” 26 तेव्हा येशूने त्याच्यांकडे न्याहाळून पाहिले आणि तो म्हणाला, “होय, लोकांना स्वतःला वाचविणे अशक्य आहे. परंतु देव त्यांना वाचवू शकतो, कारण देव काहीही करू शकण्यास समर्थ आहे!” 27 मग पेत्र त्याला म्हणाला, “तुम्हांला माहित आहे की आम्ही सर्वकाही मागे सोडले आहे आणि तुम्हांला अनुसरण्यासाठी आम्ही तुमचे शिष्य झालो आहोत तर हे करण्यासाठी आम्हांला काय लाभ मिळेल?”

28 येशू त्यांना म्हणाला, “हे तुमच्या अंतःकरणात साठवून ठेवा: तुम्हांला अनेक लाभ मिळतील. देव नवीन पृथ्वीची निर्मिती करेल आणि तेव्हा मी, मनुष्याचा पुत्र, त्याच्या महान सिंहासनावर बसेन तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात तुम्ही प्रत्येक एका सिंहासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशातील लोकांचा न्याय कराल.

29 माझे शिष्य होण्याकरता ज्याने आपले एखादे घर किंवा मैदानातील एखादा भूखंड, त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला, त्यांच्या मुलांना, किंवा इतर कोणत्याही कुटूंबातील सदस्यांना मागे सोडले त्यांना देव प्रतिफळ देईल. देवासाठी त्यांनी ते सोडून दिले म्हणून शंभर वेळा अनेक पटीने लाभ देईल. आणि ते देवासोबत सर्वकाळासाठी जगतील. 30 परंतु या जीवनात महत्वाचे असलेले अनेक लोक भविष्यात त्या वेळी महत्त्वाचे नसतील आणि आता बिनमहत्त्वाचे असलेले बरेच लोक भविष्यात त्या वेळी महत्वाचे ठरतील.