Matthew 14

Matthew 14:1

येशू कोण होता असे हेरोदाला वाटले?

हेरोदाला वाटले येशू हा मेलेल्यांतून उठाविण्यांत आलेला बाप्तीमा देणारा योहान आहे [१४:२].

Matthew 14:3

हेरोद अयोग्य असे काय करीत होता ज्याबद्दल बाप्तिस्मा देणा-या योहानाने त्याला सांगितले होते?

हेरोदाने त्याच्या भावाच्या बायकोशी लग्न केले होते [१४:४].

हेरोदाने बाप्तिस्मा देणा-या योहानाला तुरंत मारून का टाकले नाही?

हेरोदाने बाप्तिस्मा देणा-या योहानाला तुरंत ठार मारले नाही कारण लोक त्याला संदेष्टा समजत होते [१४:५].

Matthew 14:6

हेरोदाच्या वाढदिवसाच्या वेळी हेरोदियाने नाच केल्यावर हेरोदाने काय केले?

हेरोदिया जे कांही मागेल ते तिला शपथपूर्वक देण्याचे हेरोदाने वचन दिले [१४:७].

Matthew 14:8

हेरोदियाने काय मागितले?

हेरोदियाने बाप्तिस्मा देणा-या योहानाचे शीर एका तबकांत घालून आणण्यांस सांगितले [१४:८].

हेरोदाने हेरोदियाची मागणी का पूर्ण केली?

हेरोदाने हेरोदियाची मागणी पूर्ण केली कारण त्याच्या शापथांमुळे आणि तेथे पंक्तीला बसलेल्या लोकांमुळे [१४:९].

Matthew 14:13

मोठा लोकसमुदाया पाहिल्यानंतर येशूची प्रतिक्रिया कोणती होती?

येशूला त्यांचा कळवला आला आणि त्याने त्यांच्यातील दु:खणेक-यांना बरे केले [१४:१४].

Matthew 14:16

येशूने त्याच्या शिष्यांना लोकसमुदायासाठी काय करण्याचे आव्हान दिले?

लोकसमुदायाला कांहीतरी खावयास देण्याचे आव्हान येशूने त्याच्या शिष्यांना दिले [१४:१६].

Matthew 14:19

शिष्यांनी त्याच्याकडे आणलेल्या पांच भाकरी आणि ते दोन मासे ह्यांचे येशूने काय केले?

येशूने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि त्या भाक-या मोडून लोकसमुदायाला देण्यास शिष्यांक्कडे दिल्या [१४:१९].

किती लोक जेवले आणि किती भोजन उरले?

जवळ जवळ पांच हजार पुरुष अधिक स्त्रियां व लेकरें जेवली आणि बारा टोपली भोजन उरले [१४:२०-२१].

Matthew 14:22

लोकसमुदायाला निरोप दिल्यानंतर येशूने काय केले?

येशू प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला [१४:२३].

समुद्राच्या मध्यभागी शिष्यांची काय अवस्था झाली होती?

वारा आणि लाटांमुळे शिष्यांचा तारूवरील तावा जवळ जवळ सुटला होता [१४:२४].

Matthew 14:25

येशू शिष्यांकडे कसा गेला?

येशू शिष्यांकडे पाण्यावर चालत गेटला [१४:२५].

शिष्यांनी जेंव्हा येशूला पाहिले तेंव्हा येशूने त्यांना काय सांगितले?

येशूने त्याच्या शिष्यांना हिम्मत धरा आणि भिऊ नका असे सांगितले [१४:२७].

Matthew 14:28

येशूने पेत्राला येऊन काय करण्यास सांगितले?

येशूने पेत्राला येऊन पाण्यावर चालण्यांस सांगितले [१४:२९].

पेत्र पाण्यांत का बुडू लागला होता?

पेत्र जेंव्हा घाबरला तेंव्हा तो पाण्यांत बुडू लागला [१४:३०].

Matthew 14:31

जेंव्हा येशू व पेत्र तारावात चढले तेव्हा काय झाले?

जेव्हा येशू व पेत्र तारवांत चढले तेंव्हा वारा पडला [१४:३२}.

जेंव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी काय केले?

जेंव्हा शिष्यांनी ते पाहिले तेव्हा ते येशूच्या पाया पडले आणि त्यांनी म्हटले की येशू खरोखर देवाचा पुटे होता [१४:३३].

Matthew 14:34

येशू व शिष्य समुद्राच्या दुस-या किना-याला गेल्यानंतर लोकांनी काय केले?

जेंव्हा येशू व शिष्य समुद्राच्या दुस-या किना-यावर गेल्यानंतर, लोकांनी रोग्यांना येशूकडे आणले [१४:३५].