दोन पूर्वजांची पथम नोंद केली आहे आणि ते म्हणजे दावीद आणि अब्राहाम [१:१].
योसेफाची मरीया, हीची नोंद केली आहे कारण तिच्या द्वारेच येशू जन्माला आला [१:१६].
योसेफाबरोबर राहाण्यांस येण्यागोदर मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झाली [१:१८].
योसेफ नीतिमान मनुष्य होता [१:१९].
मरीयाबरोबरील त्याच्या मागणीस गुप्तपणे समाप्त करण्याचा त्याने निर्णय घेतला [१:१९].
देवदूताने योसेफाच्या स्वप्नांत येऊन त्याला मरीयेचा त्याची पत्नी म्हणून स्वीकार करण्यास सांगितले कारण तिच्या गर्भातले बाळ हे पवित्र आत्म्यापासून होते [१:२०]
योसेफाला ह्यासाठी बाळाचे नाव येशू ठेवण्यांस सांगितले होते कारण की तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणार होता [१:२१].
जुन्या करारातील भविष्यवाणीने सांगितले की, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि ते त्याला इम्मानुएल हे नांव देतील, ज्याचा अर्थ "आम्हाबरोबर देव" [१:२३].
येशूला जन्म देईपर्यंत मरीयेबरोबर न झोपण्याची योसेफाने काळजी घेतली होती [१:२५].