Matthew 2

Matthew 2:1

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्माला तेव्हा काय झाले ह्याचे हा अध्याय वर्णन करीत आहे.

यहूदीयातील बेथलेहेम

"यहूदीया प्रांतातील बेथलेहेम शहर" (यु डी बी )

शिक्षित पुरुष

"खगोलशास्त्रज्ञ" (यु डी बी )

हेरोद

हे महान हेरोदाचा उल्लेख करते

यहूद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कोठे आहे?

त्या माणसांना हे ठाऊक होते की जो राजा होणार आहे तो जन्माला आहे. तो कोठे आहे ह्याचा ते शोध करीत होते. "ते बाळ जे यहूद्यांचा राजा होणार आहे जन्मले आहे. तो कोठे आहे?"

त्याचा तारा

"त्याच्याबद्दल सांगणारा तारा" किंवा "तो तारा जो त्याच्या जन्माशी संबंधित आहे" ते बाळ त्या ताऱ्याचा कायदेशीर मालक आहे अये ते म्हणत नव्हते.

उपासना

ह्या शब्दाचे संभाव्य अर्थ हे आहेत १) ते एक दैवी बाळ म्हणून त्याची उपासना करण्याचा त्यांचा हेतू होता, किंवा २) एक मानवी राजा म्हणून ते त्याचा "सन्मान" करू इच्छित होते. तुमच्या भाषेमध्ये जर दोन्ही अर्थ अमाविष्ट असलेला शब्द असेल तर त्याचा येथे उपयोग करण्याचा विचार करा.

तो अस्वस्थ झाला

"तो चिंतिती झाला होता" की कोणा दुसऱ्याला त्याच्या जागी यहूद्यांचा राजा म्हणून घोषित करतील.

सर्व यरुशलेम

"यरूशलेमेमधील पुष्कळ लोक" (यु डी बी ) राजा हेरोद आता काय करील ह्या विचाराने घाबरून गेले होते.

Matthew 2:4

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

यहूदीयातील बेथलेहेमात

पर्यायी भाषांतर: "यहूदीयातील बेथलेहेम शहरांत."

असे संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले आहे

हे कर्तरी प्रयोगामध्ये लिहिले जाऊ शकते "हे असे संदेष्ट्याने लिहिले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले आहे

पर्यायी भाषांतर: "मीखा संदेष्ट्याने लिहिले आहे."

हे बेथलेहेमा तू....यहूद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही

"तुम्ही जे बेथलेहेमामध्ये राहाता, तुमचे शहर हे निश्चितच महत्वाचे आहे" (यु डी बी ) किंवा "तू बेथलेहेमा...सर्व शहरांमध्ये तू फार महत्वाचा आहेस." (पाहा: परोक्ष संबोधन) (पाहा:पर्यायोक्ती)

Matthew 2:7

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

हेरोदाने शिक्षित लोकांना गुप्तपणे बोलाविले

ह्याचा अर्थ दुसऱ्या लोकांना कळू न देता हेरोद शिक्षित लोकांशी बोलला.

तो शिशु

हे बालक येशूच उल्लेख करते

नमन करणे

१:२ मध्ये उपयोग केलेल्या त्याच शब्दाचा उपयोग करून भाषांतर करा

Matthew 2:9

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

राजाचे सांगणे ऐकल्यानंतर

"नंतर" (यु डी बी ) "शिक्षित लोकांनी राजाचे ऐकल्यानंतर"

त्यांच्या पुढे गेला

पर्यायी भाषांतर: "मार्गदर्शन केले."

वर जाऊन थांबला

पर्यायी भाषांतर: "वर थांबला"

Matthew 2:11

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

ते

हे शिक्षित लोकांचा उल्लेख करते

नमन करणे

१:२ मध्ये उपयोग केलेल्या त्याच शब्दाचा उपयोग करून भाषांतर करा.

Matthew 2:13

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

ते निघून गेले

"ते शिक्षित माणसे निघून गेले"

उठ, घे...पळून जा....तेथेच राहा...तू

देव योसेफाशी बोलत आहे, म्हणून हे सर्व एकवचनी प्रकार असावे. (पाहा: "तू" चे प्रकार)

हेरोदाच्या मरणापर्यंत

२:१९ ह्या वचनापर्यंत हेरोद मारत नाही. मिसर देशामध्ये त्यांच्या राहाण्याच्या संपूर्ण काळाचे वर्णन करत, आणि हेरोद ह्या वेळेस मारतो हे सांगत नाही.

मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे

हे होशेय ११:१ ह्यातील अवतरण आहे. होशेयमधील इब्री मजकूरापेक्षा मत्तयामधील ग्रीक मजकूर हा वेगळा आहे. विशेष जोर "मिसर देशातून" ह्या शब्दावर आहे आणि दुसऱ्या इतर ठिकाणी नाही: "मिसर देशातून मी माझ्या पुत्राला बोलाविले आहे."

Matthew 2:16

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

मग हेरोद

मरीया आणि येशूला घेऊन योसेफ जेव्हा मिसर देशात पळून गेला तेव्हा हेरोदाने काय केले ह्याचे हे वर्णन करते. २"१९ पर्यंत हेरोद मारत नाही.

त्याला फसविले गेले

"शिक्षित लोकांनी त्याला फसवून लज्जित केले" (पाहा: यु डी बी )

त्याने पटवून सर्व पुरुष मुलांना मारून टाकले

"त्याने आदेश देऊन सर्व मुलांना मारून टाकले" किंवा "त्याने तेथे सैनिक पाठवून सर्व पुरुष बालकांना मारून टाकले." (यु डी बी )

Matthew 2:17

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे. ३१:१६ हे वचन यिर्मयामधून घेतलेले अवतरण आहे. मत्तयामधील ग्रीक मजकूर हा यिर्मयामधील इब्री मजकूरापेक्षा थोडासा वेगळा आहे.

Matthew 2:19

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

पाहा

हे मोठ्या कथेमधील दुसऱ्या घटनेच्या प्रारंभाला चिन्हांकित करते. मागील घटनेपेक्षा ह्यांत वेगवेगळ्या लोकांचा समावेश असू शकतो. तुमच्या भाषेमध्ये असे करण्याचा मार्ग असू शकतो.

बाळकाचा जीव घेण्यांस जे पाहात होते

"जे बालकाला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते" (पाहा: शिष्टोक्ति)

Matthew 2:22

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.

परंतु त्याने जेव्हा ऐकले

"परंतु जेव्हा योसेफाने ऐकले"

त्याचा बाप हेरोद

हा अर्खेलावाचा बाप आहे.

तो तेथे जाण्यांस भ्याला

"तो" हा शब्द योसेफाचा उल्लेख करतो.

त्याला नासोरी म्हणतील

"त्याला" हा शब्द येशूचा उल्लेख करतो.