Matthew 1

Matthew 1:1

वचनें १

७ येशूच्या वंशावळीची यादी.

दाविदाचा पुत्र, अब्राहामाचा पुत्र, पर्यायी भाषांतर: "दाविदाचा वंशज जो अब्राहामाचा वंशज." अब्राहाम आणि त्याचा वंशज दावीद, आणि दावीद आणि त्याचा वंशज येशू ह्यांच्यामध्ये अनेक पिढ्या होत्या. "दाविदाचा पुत्र" हे ९:२७ ह्या वचनांत आणि इतर ठिकाणी एक शीर्षक म्हणून उपयोगांत आणले गेले, परंतु असे वाटते की येथे त्याच्या उपयोग केवळ येशूच्या पूर्वजांची ओळख करून देण्यासाठी केला गेला आहे.

अब्राहाम हा इसहाकाचा पिता होता

पर्यायी भाषांतर: "अब्राहम हा इसाहाकाचा पिता झाला" किंवा "अब्राहामाला इसहाक नावाचा एक पुत्र होता." जर तुम्ही हे एकाच पद्धतीने सांगितले आणि उरलेल्या यादीमध्ये त्याच प्रकाराचे अनुसरण केले तर हे तुमच्या वाचकांसाठी चांगले होईल.

तामार

ज्या भाषांमध्ये पुलिंगी आणि स्त्रीलिंगी प्रकार आहेत त्यांनी हिच्या नावासाठी स्त्रीलिंगी प्रकाराचा उपयोग करावा.

Matthew 1:4

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२

३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.

सल्मोन हा राहबेपासून झालेल्या बवाजाचा पिता होता

"सल्मोन हा बवाजाचा पिता होता, आणि बवाजाची आई राहेब होती." किंवा "सल्मोन आणि राहेब हे बवाजाचे आई=बाप होते."

रुथेपासून झालेल्या ओबेद्चा पिता बवाज होता

बवाज हा ओबेदचा पिता होता, आणि ओबेदाची आई रुथ होती" किंवा "बवाज आणि रुथ हे ओबेदाचे आई

बाप होते"

राहेब.....रुथ

ज्या भाषांमध्ये पुलिंगी आणि स्त्रीलिंगी प्रकार आहेत त्यांनी त्यांच्या नावांसाठी स्त्रीलिंगी प्रकाराचा उपयोग करावा.

उरीयाच्या बायकोपासून झालेल्या शलमोनाचा पिता दावीद होता

"दावीद हा शलमोनाचा पिता होता, आणि उरीयाची बायको ही शलमोनाची आई होती" किवा "दावीद आणि उरीयाची बायको शलमोनाचे आई

बाप होते"

उरीयाची बायको

"उरीयाची विधवा"

Matthew 1:7

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२

३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.

आसा

कधी कधी ह्या नावाचे भाषांतर "आसाफ" असे केले जाते.

उज्जीयाचा पिता योराम

योराम हा प्रत्यक्षांत उज्जीयाच्या आजोबाचा आजोबा होता, म्हणून "पिपा" ह्या शब्दाचे "पूर्वज" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते (यु डी बी )

Matthew 1:9

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२

३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.

आमोन

कधी कधी ह्याचे "आमोस" म्हणून भाषांतर केले जाते.

यखन्याचा पिता योशीया

खरे पाहिल्यास योशीया हा यखन्याचा आजोबा होता (पाहा यु डी बी )

बाबेलास देशांतर झाले त्यावेळी

"जेव्हा याऱ्य त्यांना बाबेलास जाण्याची सक्ती केली होती" किंवा "जेव्हा बाबेलाच्या लोकांनी त्यांना बाबेलास राहाण्यांस भाग पाडले." जर तुमची भाषा कोण बाबेलास गेले ह्याबद्दल खुलासा मागते तर तुम्ही असे म्हणू शकता की, "इस्राएल लोक" किंवा "यहूदीयामध्ये राहाणारे इस्राएल लोक."

Matthew 1:12

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२

३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.

देशांतर झाल्यावर

१:११ मध्ये उपयोगांत आणलेल्या त्याच शब्दांचा उपयोग करा.

जरूब्बाबेलाचा पिता शल्तीएल

खरे पाहिल्यास शल्तीएल हा जरूब्बाबेलाचा आजोबा होता (पाहा यु डी बी ).

Matthew 1:15

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२

३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.

मरीया जिच्या पोटी येशू जन्माला आला

ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते, "मरीया जिने येशूला जन्म दिला." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

बाबेलास देशांतर

१:११ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला आहे त्याच शब्दांचा उपयोग करा.

Matthew 1:18

येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांच्या सुरूवातीचा हा वृत्तांत आहे. जर तुमच्या भाषेमध्ये विषय बदल व्यक्त करण्याचा कांही मार्ग असेल, तर तुम्ही त्याच्या येथे उपयोग करावा.

योसेफाशी लग्न करण्यासाठी मरीयाची मागणी झाली होती

"लग्न करण्याचे वचन दिले होते" किंवा "लग्न करण्यांस वचनबद्ध होती." साधारणपणे आई

बाप त्यांच्या मुलांच्या लग्नाची व्यवस्था करतात.

त्यांचा सहवास होण्यापूर्वी

ह्या शिष्टोक्तिचा अर्थ "त्यांचा लैगिक संबंध होण्याअगोदर." (पाहा:शिष्टोक्ति)

ती गर्भवती झालेलि दिसून आली

"तिला मूल होणार अशी त्यांना जाणीव झाली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

पवित्र आत्म्या द्वारे

पवित्र आत्म्याने मरीयेला मूल देण्यासाठी सक्षम केले.

Matthew 1:20

येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांना सांगण्याचे हे चालू ठेवते.

दर्शन दिले

देवदूत अचानक योसेफाकडे आला

दाविदाचा पुत्र

ह्या प्रकरणांत, "चा पुत्र" ह्या अभिव्यक्तीचा अर्थ "चा वंशज." दावीद हा योसेफाचा पिता नव्हता, तर दावीद हा योसेफाचा पूर्वज होता.

तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे

"जे बाळ तिच्या गर्भांत आहे त्या बाळाची गर्भधारणा पवित्र आत्म्याद्वारे झाली आहे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ती एका पुत्राला जन्म देईल

कारण देवाने दूताला पाठविले होते म्हणून, गर्भातील बाळ हा पुत्र आहे हे त्याला माहित होते.

त्याचे नाव तू असे ठेव

ही आज्ञा आहे: "त्याचे नांव ठेव" किंवा "त्याला नाव दे" किंवा "त्याचे नाव दे"

तो त्याच्या लोकांना तारील

"त्याचे लोक" हे यहूद्यांचा उल्लेख करते

Matthew 1:22

येशूचा जन्म होईल ह्या भविष्यवाणीस मत्तयाने उद्धृत केले.

प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते

ह्यांस कर्तरी प्रयोगामध्ये मांडू शकतो जसे "फार पूर्वी प्रभूने यशया संदेष्ट्याला जे लिहावयास सांगितले होते ते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

पाहा

पर्यायी भाषांतर: "बघा" किंवा "लक्षपूर्वक ऐका" किंवा "मी तुम्हांला आता जे सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या."

कुमारी गर्भवती होईल आणि एका पुत्राला जन्म देईल

हे वचन यशया ७:१४ मधून घेतलेले थेट अवतरण आहे.

Matthew 1:24

येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांकडे हा विभाग वळतो.

आज्ञापिले

मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यांस आणि त्याचे नाव येशू असे ठेवण्यांस दूताने योसेफाला सांगितले होते. (वचन २०

२१).

तो तिच्याबरोबर झोपला नाही

"तिच्याबरोबर त्याने लैगिक संबंध ठेवले नाहीत (पाहा: शिष्टोक्ती)

त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले

"योसेफाने त्याच्या पुत्राचे नाव येशू ठेवले"